PROJECT
2024 – 2025
विभागाचे नाव :- Foodlab
प्रोजेक्टचे नाव :- आवळा सुपारी
प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव :- Alanka Pawar
साथीदाराचे नाव :- Kirti Pawar
मार्गर्शन करणाऱ्याचे नाव :- Reshma Madam
प्रस्तावना :- काही फळ आपल्याला सीजननुसार खायला भेटतात उदा. आवळा..!! आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट साफ राहतं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील आढळतं, जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आवळा रोज खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदू सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.
• आवळा सुपारी बनवायची असेल तर :-
साहित्य :-
आवळे – 5 kg.
जीरा – 100 gm.
हिंग – 50 gm.
ओवा – 50 gm.
मीठ – 300 gm.
काळे मीठ – 100 gm.
काळी मिरी – 200 gm.
गॅस – 30 gm.
कृती :-
1. सर्व आवळे धुवून घेणे आणि उकळून घेणे.
2. उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पिस करणे
. 3. तीन पिस केलेल्या आवळ्याना परत चाकूच्या मदतीने तीन पिसमध्ये कट करून घेणे त्यानंतर सर्व फोडी एका भांड्यात ठेवणे.
4. मीठ टाकून फोडींना वरखाली करून मिक्स करून घेणे.
5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवावे आणि रात्रभर तसेच सोडावे.
6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवावे.
7. सर्व मसाले मटेरियल मोजून घेणे आणि मिक्स करणे.
8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचनी वरखाली करून मिक्स करणे.
9. मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
10. 8-9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.
• आवळ्याचे / आवळा सुपारीचे सेवन केल्यास होणारे फायदे :-
- डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
- आवळ्याच्या फायद्यांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि तुरट गुणधर्म समाविष्ट आहेत जे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.
- भारतीय गूसबेरी पांढऱ्या रक्त पेशी देखील वाढवते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत होते.
- लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे
- नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं.
- आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा.
Photos :-


