छत्री

प्रस्तावना __ फोल्डिंग छत्री बनवणे म्हणजेच काहीतरी नवीन युनिक

तयार करणे ,

सर्वे __ विविध जागेचे निरीक्षण केले कॅम्पस मध्ये आणि छत्री

कुठे लावायची मला त्याची जागा नेमली,

. उद्देश__ छत्री तयार करण्यामागचे कारण हे होते की जे पाहून

. येथील त्यासाठी एक बसायची जागा एखाद ठिकाण दाखवणे होय

. साहित्य__ 25×5–35×5– 100×100– ट्यूब 30×5 चि पट्टी

. व 25×5 ची पट्टी

कृती __ कटिंग, वेल्डिंग, पॉलिशीग, ग्राइंडिंग, पावडर कोटिंग, सर्व पार्ट

. असेंबल करणे

. मी हे शिकलो__ अर्क वेल्डिंग मारायला शिकलो, co2 वेल्डिंग मारायला

. शिकलो, पावडर कोटिंग करायला शिकलो, ब्रॅण्डिंग व कटिंग शिकलो

निरीक्षण__ छत्री कुठे तयार करायची कुठं छान दिसेल व किती हाईट

. वर असली पाहिजे याचे निरीक्षण केले व तिकडे किती साफसफाई चे आणि

. काय केल्यामुळे आकर्षण होईल त्याचे निरीक्षण केले

. भविष्यातील उपयोग __ भविष्यातील त्या छत्रीच्या सावलीमध्ये पाहुणे

. किंवा मुलं मुली बसायची व्यवस्था होईल हा त्याचा भविष्यातील उपयोग आहे

डोम रीनोवेषन :

प्रस्तावना :-

आम्ही डोममध्ये सर्व नवीन काहीतरी करण्याचा ठरवलेला प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमधून आश्रमातील विविध कार्य व क्रियाकलाप लोकांसमोर दिसून यावेत, असा आमचा उद्देश आहे. हे सादरीकरण साध्या पद्धतीने न करता, वारली चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विचार आहे, ज्यामुळे पारंपरिक कलात्मकता टिकून राहील आणि आधुनिकतेसह एक आगळावेगळा संगम साधता येईल.

सर्वे :-

डोममध्ये काय व कसे करायचे यासाठी प्रथम 3D डिझाईन तयार केले. त्यानंतर लागणारे साहित्य निश्चित करून गावात जाऊन आणले. जागेची पाहणी व मोजमाप करून सर्वे केला.

उद्देश :-

डोम रिनोवेशन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की आश्रमातील मुलांसाठी एक चहा पिण्याची जागा तसेच आरामात बसण्यासाठी योग्य ठिकाण तयार करणे. या जागेमुळे मुलांना एकत्र येऊन गप्पा मारता येतील, विश्रांती घेता येईल आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी एक अनुकूल वातावरण मिळेल.

साहित्य :-

स्क्रॅपर

पुट्टी

ट्रॅक्टर इमल्शन

प्रायमर

डिस्टेंपर

सिमेंट कलर

काळा ऑइल पेंट

सिमेंट कच

पॉलिश पेपर (सॉफ्ट व हार्ड)

कृती :-

बाहेरून रंग केला, आत वारली चित्रकला केली, खांबाला काळा ऑइल पेंट लावला. बाहेर भिंत बांधली, झाडांच्या फांद्या कापल्या, पाणी जाण्यास भोक पाडले आणि पन्हाळीसाठी हिरवा प्लास्टिक पाईप लावला.

निरीक्षण :-

बाहेरचा रंग कोणता वापरायचा आणि तो छान दिसेल का, आतला रंग कसा द्यायचा, वारली चित्रकला करावी का, घर कमी खर्चात टिकाऊ कसे करावे—हे सर्व विचार करून निरीक्षण केले.

निष्कर्ष :-

बाहेरच्या रंगासाठी असे रंग निवडावेत जे आकर्षक दिसतात आणि हवामानापासून टिकतात.

आतच्या भिंतींवर हलका रंग वापरावा आणि वारली चित्रकला करून पारंपरिक सौंदर्य जोपासावे.

घर कमी खर्चात टिकाऊ बनवण्यासाठी साहित्याची योग्य निवड, मोजमाप, आणि योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.

पाणी जाण्याची सोय आणि पन्हाळीसाठी प्लास्टिक पाईप यासारख्या सूक्ष्म बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे

भविष्यातील उपयोय :-

डोम रिनोवेशनमुळे मुलांना विश्रांती, गप्पा मारणे आणि एकत्र बसण्याची जागा मिळेल. तसेच या जागेचा उपयोग छोटे कार्यक्रम, अभ्यास किंवा क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी करता येईल.

टाईनी हाऊस

प्रस्तावना :-

आजच्या वेगवान जीवनशैलीत व वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची कमतरता भासत आहे. मोठ्या घरांच्या तुलनेत लहान, किफायतशीर व पर्यावरणपूरक घरांची संकल्पना पुढे येत आहे. त्यालाच टायनी हाऊस असे म्हणतात.

या प्रकल्पामध्ये आम्ही १० फूट × १० फूट क्षेत्रफळाचे टायनी हाऊस डिझाइन केले आहे.

सर्वे :-

कमी खर्चात व कमी जागेत आवश्यक सोयी उपलब्ध करून देणारे घर म्हणजे टायनी हाऊस.
या प्रकल्पात आम्ही १०x१० फूट टायनी हाऊस डिझाईन केले आहे.

यात –

स्वयंपाकघर

हॉल

स्नानगृह व शौचालय

उद्देश :-

कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग करणे

कमी पैशात जास्त जागेचा वापर करणे.

स्वस्त व किफायतशीर घर उपलब्ध करून देणे.

किचन, हॉल व बाथरूम यांसारख्या मूलभूत सोयी समाविष्ट करणे.

पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम करणे.

ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या कमी करणे.

साहित्य :-

१.५ × १.५ इंच ट्यूब

सिलिंग शीट (PUC) – छतासाठी

भिंत शीट (सिमेंट शीट) – भिंतीसाठी

नट व बोल्ट – जॉईंट्स व जोडणीसाठी

सिमेंट प्लायवूड – मजल्यासाठी व आतील कामासाठी

बाथरूम साहित्य –

नळ (Tap)

कमोड (कमोड/शौचालय सीट)

बेसिन (हात धुण्याचे बेसिन)

काळी वायर 1.5 mm/2.5

हिरवी वायर 1.5mm/2.5

लाल वायर 1.5 mm/2.5

कृती :-

फ्रेम तयार करणे

१.५ x १.५ इंच ट्यूब वापरून चौकट (Frame) तयार करणे

नट-बोल्टच्या सहाय्याने जोडणी करणे

भिंती व छत बसवणे

भिंतींसाठी सिमेंट शीट लावणे

छतासाठी PUC शीट बसवणे

वायरिंग केली व बोर्ड भरले आणि, वायर साठी वायरिंग पाईप लावले.

नळ (Tap) बसवणे

कमोड (Toilet Seat) बसवणे

बेसिन (Wash Basin) बसवणे

निरीक्षण :-

टायनी हाऊस प्रकल्पामध्ये कमी जागेत व कमी खर्चात किचन, हॉल व बाथरूम या आवश्यक सोयी उपलब्ध झाल्या.
साहित्याचा योग्य वापर करून घर मजबूत, टिकाऊ व पर्यावरणपूरक बनले आहे.

निष्कर्ष :-

१०x१० फूट टायनी हाऊस कमी खर्चात, कमी जागेत व टिकाऊ साहित्य वापरून बांधता येते.
यामध्ये सर्व मूलभूत सुविधा मिळून हे घर किफायतशीर व उपयुक्त ठरते.

भविष्यातील उपयोय :-

टायनी हाऊस संकल्पना भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हे घर पोर्टेबल, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असल्याने विद्यार्थ्यांसाठी, प्रवाशांसाठी व लहान कुटुंबासाठी उपयोगी आहे

मी हे शिकलो:-

वायरिंग कसे करायचे ते शिकलो.

PUC सिल्लिंग लावायचं शिकलो.

स्टाईल्स बसवायला शिकलो.

प्लंबिंग शिकलो.

दरवाजा आणि खिडकीची फ्रेम बनवायला शिकलो.

पेंटिंग कसे करायचे ते शिकलो.

शेड

प्रस्तावना :-

घरासमोरील मोकळ्या जागेचा योग्य वापर करून बसण्यासाठी, वाहन ठेवण्यासाठी व पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून शेड तयार करण्याचा विचार करण्यात आला.

सर्वे :-

ठिकाणाची निवड: सपाट, निचरा असलेली, वारा व सूर्यप्रकाश योग्य असा भाग निवडणे.

जमिनीचे मोजमाप: क्षेत्रफळ मोजणे (मीटर/फूट मध्ये).

दिशा ठरवणे: शेडची दिशा (पूर्व-पश्चिम / उत्तर-दक्षिण) हवामानानुसार ठरवणे

उद्देश :-

घरासमोरील मोकळी जागा छायेअंतर्गत बसण्याची व विश्रांती घेण्याची सोयीची बनवणे.घरासमोरील साफसफाई आणि जमिनीचा हानीकारक परिणाम कमी करणे; परिसराचे उपयोगिता वाढविणे.

साहित्य :-

2″x2″ ट्यूब I-Channel (30 फूट)

1″x3″ ट्यूब वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग व्हील पत्रे (16 फूटी)

कोटिंग / पेंट स्क्रू / बोल्ट-नट

फाउंडेशन मटेरियल – सिमेंट, वाळू, खडी (खांबांसाठी बेस)

कृती :-

आय चॅनल खांब उभारणे,शिडी तयार करणे,मापन करणे,

पत्रे लावणे,स्क्रू मारणे.

सेफ्टी साठी आडवा पत्रा बसवणे

निरीक्षण :-

संपूर्ण शेडचे मापन, जोड, वेल्डिंग व सुरक्षा बाबींचे प्रत्यक्ष निरीक्षण करून कामाची गुणवत्ता निश्चित केली

निष्कर्ष :-

या कामात आय चॅनलचे खांब उभे केले, शिडी तयार केली, मोजमाप करून पत्रे बसवली व स्क्रूने घट्ट केली. सेफ्टीसाठी एक आडवा पत्रा लावून काम सुरक्षित व मजबूत बनवले. या प्रक्रियेतून मापन, बसवणी व सुरक्षा यांचे महत्त्व समजले.

भविष्यातील उपयोय :-

हे काम भविष्यात टिकाऊ, सुरक्षित व मजबूत रचना तयार करण्यास मदत करेल.
यामुळे वेळ, पैसा व मजुरीची बचत होईल आणि बांधकामाची गुणवत्ता वाढेल.

मी हे शिकलो:-

या कामातून मी आय चॅनल बसवणे, शिडी तयार करणे, मोजमाप घेणे, पत्रे लावणे व स्क्रूने फिटिंग करणे हे शिकलो. तसेच सेफ्टीसाठी योग्य आधार देणे किती महत्त्वाचे आहे हेही समजले.

टेबल तयार करणे

प्रस्तावना -:

स्वयंपूर्ण पद्धतीने मजबूत व टिकाऊ स्ट्रक्चर तयार करण्यासाठी लोखंडी ट्यूब, अँगल, प्लायवुड, स्टील पत्रा तसेच सन्माईका वापरून एक युनिट/फ्रेम तयार करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये कटिंग, वेल्डिंग, फिनिशिंग व पेंटिंग हे काम करण्यात आले.

उद्देश -:

वापरासाठी उपयुक्त व मजबूत स्ट्रक्चर तयार करणे.

लोखंडी काम, वेल्डिंग, फिनिशिंग आणि पेंटिंग या कौशल्यांचा सराव व प्रत्यक्ष अनुभव घेणे.

साहित्य -:

1.5 x 1.5 ची ट्यूब

35 x 5 चा अँगल

4 x 8 चा प्लायवुड

सन्माईका

पंचिंग जाळी

रेड ऑक्साइड

बॉटम पट्टी

ऑइल पेंट

4 x 8 चा स्टील पत्रा

स्क्रू 2.5 इंच

रोलर 2 इंच – 2 नग

ब्रश 2 इंच – 2 नग

14 इंच व्हील – 1 नग

ग्रॅण्डिंग व्हील – 5 नग

कटिंग व्हील – 10 नग

पॉलिश व्हील – 5 नग

वेल्डिंग रॉड – 1 पुडा

कृती -:

आवश्यक मोजमाप घेऊन 1.5×1.5 ट्यूब व 35×5 अँगल कट केले.

फ्रेमचा आकार बनवत वेल्डिंग करून स्ट्रक्चर तयार केले.

जॉइंट ग्रॅण्डिंग करून सपाट केले.

4×8 स्टील पत्रा फिट केला व पंचिंग जाळी लावली.

प्लायवुड व सन्माईका शीट आकारानुसार कापून बसवली.

रेड ऑक्साइड कोटिंग करून फिनिशिंग दिली.

नंतर ऑइल पेंट रोलर व ब्रशने लावले.

बॉटम पट्टी, व्हील व स्क्रू बसवून पूर्ण तयार केले.

शेवटी पॉलिश व्हीलने स्मूथ फिनिश केली.

निरीक्षण -:

योग्य मोजमाप व कटिंग केल्यास स्ट्रक्चर अचूक व मजबूत होते.

रेड ऑक्साइड लावल्याने गंज रोखला जातो.

वेल्डिंग नंतर ग्रॅण्डिंग केल्यास फिनिशिंग आकर्षक मिळते.

व्हील बसवल्याने युनिट सहज हलवता येते.

निष्कर्ष- :

उत्तम नियोजन, योग्य साहित्य व कौशल्य वापरल्याने मजबूत आणि टिकाऊ स्ट्रक्चर तयार करता येते. फिनिशिंग व्यवस्थित केल्यास उत्पादनाचा दर्जा अधिक चांगला दिसतो.

मी हे शिकलो -:

मोजमाप घेणे, कटिंग आणि वेल्डिंगची योग्य पद्धत.

पेंट व फिनिशिंगचे महत्त्व.

औद्योगिक साहित्य वापर कौशल्य.

कामातील सुरक्षितता आणि गुणवत्ता नियंत्रण.

भविष्यातील उपयोग -:

घरगुती किंवा औद्योगिक वापरासाठी अशा प्रकारच्या युनिट्स/टेबल्स/रॅक तयार करता येतील.

कस्टम फर्निचर व्यवसायात उपयोग होऊ शकतो.

वेल्डिंग व फॅब्रिकेशन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

बांधकाम

प्रस्तावना :

गेस्ट हाऊस बांधकाम हा एक महत्वाचा प्रकल्प असून त्यामध्ये जागेची आखणी, विटांची मांडणी, भिंतींची उंची, खिडक्या–दरवाज्यांची जागा .या सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करावी लागते. या प्रकल्पाद्वारे आम्ही प्रत्यक्ष बांधकाम कसे करायचे, कोणते साधन कसे वापरायचे आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता कशी राखायची हे शिकून घेतले.

र्वे :

बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेचा सखोल सर्वे करण्यात आला.

जागेचे मोजमाप घेण्यात आले.

गेस्ट हाउसची दिशा, वारा–तापमान याचा विचार करण्यात आला.

  या सर्वेच्या आधारे अंतिम प्लॅन आणि मोजमाप निश्चित करून चौकट तयार करण्यात आली.

उद्देश :

गेस्ट हाऊसचा बांधकाम कार्य प्रत्यक्ष अनुभवणे

मार्किंग, प्लॅनिंग आणि मोजमाप यांचा योग्य वापर शिकणे

विटा लावणे, भिंत उचलणे, प्लॅस्टर करणे या मूलभूत टप्प्यांवर कौशल्य मिळवणे

बांधकामासाठी आवश्यक उपकरणांची ओळख करणे

सुरक्षित आणि दर्जेदार बांधकाम कसे करावे हे जाणून घेणे

साहित्य :

ACC  

केमिकल 

थापी , घमेल

कळंबा स्पिरिट

लाईन दोरी

फक्की, मोजपट्टी, हातोडा इत्यादी

कृती :

सर्वप्रथम गेस्ट हाऊसचा संपूर्ण प्लॅन काढण्यात आला. त्यामध्ये भिंतींची रचना, दारे-खिडक्या, बाथरूमची जागा इत्यादींचा समावेश होता.प्लॅननुसार जागेवर फक्कीने अचूक आखणी (Marking) करण्यात आली. गेस्ट हाऊसच्या बेसलाइनसाठी मजुरांकडून विटांची सरळ लाईन लावण्यात आली.

कळंबा स्पिरिट व लाईन दोरी वापरून भिंती सरळ आणि समतोल ठेवत विटा रचण्यात आल्या.ज्या जागी खिडक्या आणि दारे बसवायची होती, तेथे आवश्यक जागा सोडण्यात आली.भिंती निर्धारित उंचीपर्यंत उचलण्यात आल्या.

कॉस्टिंग :

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1ACC  1600801,28,000
2केमिकल 2350011,500
3मजुरी  [25%]34,875
total174,375

निरीक्षण :

मार्किंग अचूक झाल्यास संपूर्ण बांधकाम व्यवस्थित होते.

भिंतींची उंची वाढवताना लाईन दोरी अत्यंत आवश्यक ठरली.

कळंबा स्पिरिटमुळे भिंत एकदम सरळ व संतुलित राहिली.

ग्रीलच्या आकारानुसार वेल्डिंगची गुणवत्ता बदलते हे लक्षात आले.

प्लॅस्टरची फिनिशिंग भिंतींच्या दिसण्यावर परिणाम करते.

 निष्कर्ष :

गेस्ट हाऊस बांधकाम प्रक्रियेमुळे आम्हाला प्रत्यक्ष बांधकामाची सर्व टप्प्यांमधील अचूकता आणि कौशल्य शिकायला मिळाले. मार्किंग, विटांची रचना, लेव्हल तपासणे, या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या प्रकल्पामुळे आम्ही बांधकामाचे तांत्रिक ज्ञान तसेच कौशल्य आत्मसात केले.

भविष्यातील उपयोग :

गवंडी आणि बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी अनुभव उपयुक्त

मोठ्या इमारती, घर, शेड किंवा ऑफिस बांधकामासाठी बेसिक कौशल्य विकसित होते

ग्रील बनवणे, प्लॅस्टर करणे याची स्वतंत्र कामेही करू शकतो

बांधकामातील अचूकता व सुरक्षा याबद्दल चांगले ज्ञान मिळाले

मी हे शिकलो :

डिझाईनपासून रंगकामापर्यंत टेनी हाऊस तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजली.

अचूक मोजमाप, साधनांचा योग्य वापर आणि टीमवर्कचे महत्त्व कळले.

प्रकल्प करताना नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारी यांचे मूल्य शिकता आले.

छोट्या जागेत कार्यक्षम आणि आकर्षक घर कसे उभारता येते हे प्रत्यक्ष अनुभवले.

ग्रील

प्रस्तावना :

गेस्ट हाऊसच्या सुरक्षिततेसाठी आणि मजबूत बांधकामासाठी ग्रील बसवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पात आम्ही तीन वेगवेगळ्या मापांचे ग्रील मोजून, त्यांचे कॉस्टिंग करून, आवश्यक साहित्य खरेदी करून स्वतः ग्रील तयार केले. या प्रक्रियेत वेल्डिंग, ग्राइंडिंग, मोजमाप, फ्रेम तयार करणे, रेडॉक्साईड व पेंटिंग यासारखी कौशल्ये प्रत्यक्ष शिकण्याची आणि वापरण्याची संधी मिळाली.

सर्वे:

. सर्वात प्रथम गेस्ट हाऊसच्या खिडक्यांचे मोजमाप घेतले असता खालीलप्रमाणे तीन वेगवेगळ्या आकाराच्या ग्रीलची आवश्यकता असल्याचे आढळले:

पहिली ग्रील: 6 ‘× 5’

दुसरी ग्रील: 4 ‘ × 7’

तिसरी ग्रील: 2′ × 20″

मोजमापांच्या आधारे कॉस्टिंग केले व त्याप्रमाणे साहित्य खरेदी करण्यात आले.

उद्देश:

गेस्ट हाऊससाठी आवश्यक त्या आकाराच्या मजबूत ग्रील तयार करणे* गेस्ट हाऊसला सुरक्षा प्रदान करणे* धातू काम, वेल्डिंग, ग्राइंडिंग आणि फ्रेम फॅब्रिकेशन या कौशल्यांचा विकास करणे कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचे ग्रील तयार करणे

साहित्य:

. 30×3 L-angle

2×2 स्क्वेअर जाळी

10×10 स्क्वेअर बार

वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग डिस्क

Red oxide प्राइमर

काळा ऑइल पेंट

कृती:

. सर्व खिडक्यांचे अचूक मोजमाप घेतले. तीन वेगवेगळ्या मापांच्या ग्रीलची कॉस्टिंग केली व साहित्य खरेदी केले.30×3 L-angleवापरून सर्व ग्रीलची फ्रेम तयार केली. ४×७ ग्रीलसाठी फ्रेममध्ये 2×2 जाळी बसवली. त्यावर 4 इंच अंतरावर आडवे 10×10 स्क्वेअर बार लावले.व चार उभे स्क्वेअर बार बसवले. सर्व बार व अँगलची वेल्डिंग करून मजबुती दिली.वेल्डिंगनंतर संपूर्ण ग्रीलला ग्राइंडिंग करून स्मूथ फिनिश दिली. भिंतीत बसवण्यासाठी 30×3 अँगलचे चार तुकडे जोडले. ग्रीलला प्रथम Red Oxide प्राइमर लावला. त्यानंतर काळा ऑइल पेंट लावून फिनिशिंग दिले.

आलेल्या अडचणी :

.तीन वेगवेगळ्या मापांमुळे प्रत्येक ग्रीलसाठी फ्रेम वेगळ्या प्रकारे मोजावी लागली.

स्क्वेअर बारचे अंतर अचूक ठेवणे वेळखाऊ ठरले.

वेल्डिंग केल्यानंतर जॉइंट्स स्मूथ करण्यासाठी जास्त ग्राइंडिंग करावी लागली.

मोठ्या ग्रीलला हलवणे व सरळ ठेवणे कठीण गेले.

कॉस्टिंग :

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
130X30x3 L angal210 kg7014,700
210X10 [] BAR424 kg6025,440
32X2 जाळी[168] 2f223,696
430 x 3 पट्टी27 kg701,890
5रॉड पुडा34001,200
6कटींग व्हिल2025500
7ग्रीडिंग व्हिल2030600
8पॉलिश व्हिल1030600
9कटींग व्हिल [14 in]2200400
10प्रायमर4 l240960
11थीनर2 l120240
12ब्रश440160
13Electricity [10%]5,000
14मजुरी [15%]8,000
15TOTAL63,000

निरिक्षण :

सर्व ग्रील मजबूत व योग्य मापात तयार झाल्या. L-angle व स्क्वेअर बारच्या वापरामुळे ग्रीलची मजबुती खूप वाढली. पेंटिंगमुळे ग्रीलला आकर्षक मिळाले. संपूर्ण प्रक्रियेत मोजमाप अचूक ठेवणे सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे जाणवले.

निष्कर्ष :

.प्रकल्पातून आम्हाला ग्रील फॅब्रिकेशनचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले. वेल्डिंग, ग्राइंडिंग, फ्रेम तयार करणे, प्राइमिंग आणि पेंटिंग या सर्व कामांचे चांगले ज्ञान झाले. गेस्ट हाऊससाठी आवश्यक असलेल्या सर्व ग्रील्स यशस्वीरीत्या तयार करण्यात आल्या आणि कमी खर्चात उच्च गुणवत्ता मिळवली.

भविष्यातील उपयोग :

पुढील काळात अशाच प्रकारचे ग्रील, दरवाजे, फेन्सिंग किंवा खिडकी संरचना तयार करता येतील. या कौशल्याचा वापर करून स्वतंत्र काम किंवा व्यवसाय सुरू करता येईल.

कॉट तयार करणे

प्रस्तावना :

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक असा लोखंडी कोट (Cot) तयार करणे हा होता. कोटचे डिझाईन, फ्रेम तयार करणे, ग्राइंडिंग, वेल्डिंग, रेडऑक्साईड आणि पेंटिंग अशा सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष करून मेटल फॅब्रिकेशनचे मूलभूत कौशल्य आत्मसात करण्याचा हेतू या प्रकल्पातून साध्य केला.

र्वे :

बाजारात उपलब्ध मेटल ट्यूब्सची जाडी, प्रकार आणि गुणवत्ता

1×2 स्क्वेअर ट्यूब व 1×1 सपोर्ट ट्यूबची मजबुती

वेल्डिंग व ग्राइंडिंगसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता

रेडॉक्साईड आणि ऑइल पेंटच, टिकाऊपणा आणि किंमत

उद्देश:

या कॉट तयार करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश असा होता की गेस्ट हाऊससाठी वापरता येईल असा मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी लोखंडी कॉट तयार करणे.
गेस्ट हाऊस मध्ये अधिक वापर व वजन सहन करणारे फर्निचर आवश्यक असते, त्यामुळे लोखंडी स्क्वेअर ट्यूबचा वापर करून मजबुतीला प्राधान्य देण्यात आले.
गेस्ट हाऊसच्या सोयीसाठी दीर्घकाळ टिकणारे, कमी देखभालीचे आणि सुरक्षित फर्निचर तयार करणे हाच या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.

साहित्य:

1” x 2” स्क्वेअर ट्यूब

1” x 1” स्क्वेअर ट्यूब

0.75″ x 0.75″ स्क्वेअर ट्यूब

वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग डिस्क

पॉलिश व्हील

रेडऑक्साईड प्रायमर

काळा ऑइल पेंट

पॉलिश पेपर

लंबी

कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन

कृती:

सर्वप्रथम कोटचे पूर्ण डिझाईन तयार करण्यात आले.

माप, फ्रेमचे स्वरूप आणि सपोर्टचे स्थान निश्चित केले.

1×2 स्क्वेअर ट्यूब वापरून वरची मुख्य फ्रेम तयार केली.

कोपऱ्यांवर अचूक जॉइंट तयार करून वेल्डिंग केले.

फ्रेमच्या मजबुतीसाठी 1×1 च्या एकूण 2 सपोर्ट तुकड्या बसवल्या.

सर्व तुकडे समान अंतरावर बसवण्यात आले.संपूर्ण फ्रेम ग्राइंडिंग करून वेल्डिंग जॉइंट्स स्वच्छ आणि गुळगुळीत केले.

15 इंच लांबीचे 1.5×1.5 च्या ट्यूबचे पाय बसवले.

पायांना वेल्डिंग करून नंतर ग्राइंडिंग केले

.संपूर्ण कोटला पॉलिश व्हीलने पॉलिश केले.

फ्रेमला गंज रोखण्यासाठी रेडऑक्साईड लावला.

रेडऑक्साईड सुकल्यावर जोईंट लंबी लावली त्यानंतर पॉलिश पेपरने घासले.

शेवटी कोटला काळा ऑइल पेंट लावून अंतिम फिनिशिंग दिले.

आलेल्या अडचणी :

1×1 सपोर्ट तुकड्यांचे मोजमाप अचूक ठेवणे

वेल्डिंग करताना ट्यूब सरळ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागली

ग्राइंडिंग करताना सरफेस पूर्ण सपाट आणण्यासाठी जास्त वेळ लागला

रेडॉक्साईड सुकण्यास उशीर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया थोडी उशीर झाली

पाय (Legs) व फ्रेम एकाच लेव्हलवर आणणे आव्हानात्मक होते

कॉस्टिंग :

अ . क्रमालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
10.75 x 0.75 स्क्वेअर ट्यूब20′25500
21 x 2 स्क्वेअर ट्यूब360′3010,800
31 x 1स्क्वेअर ट्यूब100′353,500
41/2 x 1/2 स्क्वेअर ट्यूब100′404,000
5रॉड पुडा2400800
6कटींग व्हिल525125
7ग्रीडिंग व्हिल530150
8पॉलिश व्हिल330150
9कटींग व्हिल [14 in]1200200
10लंबी2 kg5001000
11प्रायमर2 L240480
12थीनर2 L120240
13काळा ऑईल पेंट2 L340680
14रोलर15050
15Electricity [10%]2,270
16मजुरी [15%]3,400
17total28,350

निरिक्षण :

वेल्डिंग व ग्राइंडिंगने कोटची मजबुती आणि फिनिशिंग उत्कृष्ट आली.

सर्व सपोर्ट तुकडे योग्य वापरल्यामुळे फ्रेमला मजबूत आधार मिळाला.

रेडऑक्साईडमुळे धातूचे गंजापासून संरक्षण झाले.

काळ्या पेंटमुळे कोट आकर्षक आणि टिकाऊ झाला.

निष्कर्ष :

या प्रकल्पातून मेटल फॅब्रिकेशनचे महत्त्वाचे कौशल्य — डिझाइनिंग, कटिंग, वेल्डिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंग यांचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून एक मजबूत व दर्जेदार लोखंडी कोट तयार करण्यात आला.

भविष्यातील उपयोग :

घरगुती व हॉस्टेल वापरासाठी टिकाऊ कोट

कस्टम फर्निचर डिझाईनसाठी आधारभूत कौशल्य

विविध आकारमानाचे लोखंडी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी तांत्रिक ज्ञान