अवाला प्रकल्प

(Amla Processing Unit Project Proposal)

प्रस्तावना

मी dbrt ची विद्यार्थिनी आहे . आम्ही आवळा हा प्रोजेक्ट तयार केला. आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो. त्यात व्हिटामिन c जास्त प्रमाणात असते व ते औषधी फळ मानले जाते. या प्रकल्पातून आवळ्याचे गुणधर्म ,उपयोग व महत्व याची माहिती घेतली आहे.

उद्देश

1 आवळ्याचे औषधी गुणधर्म जाणून घेणे.

2 तो कोणत्या सिझन मध्ये उपलब्ध होतो हे जाणून घेणे.

3 आवळ्यापासून कोणत्या प्रकारचे product तयार होतात ह्याची माहिती मिळवणे.

सर्वे

जयवंत भिकाजी गायकवाड यांची मुलाखत घेतली. ते हिवरे कुंभार मध्ये राहणारे होते. त्यांना शेतात 50 झाडे लावलेली होती.

आवळ्याचे 2 प्रकार आहेत. 1(राय आवळा)

2 (कंठी आवळा )

आवळ्याचे झाडे लावल्यानंतर 5 ते 6 वर्षांनी त्याला आवळा यायला लागले.

साहित्य

पातेल,चमचा , ग्लास, मग, डिश, नमक, काळी मिरी , जीरा,मसाले,आवळे , विनेगर, इत्यादी.

कृती

सर्व प्रथम आम्ही आवळे निवडून घेतले. त्यानंतर त्याला मिठाच्या पाण्यात 12 तास भिजत घातले. त्यानंतर त्यांना गरम पाण्यात शिजवून घेतले. त्यानंतर मसाले घालून आणि त्यात तेल घालून त्याला मुरायला ठेवलं. ते टिकण्यासाठी व आंबट लागण्यासाठी त्यात विनेगर टाकलं.

त्यानंतर आम्ही त्याचापासून आम्ही लोणच तयार केले .आणि आवळा सुपारी तयार केली .

त्यातून काय शिकलो :आवळा हा शरीरासाठी खूप उपयोगी असतो .

आलेल्या समस्या :

मला हा प्रोजेक्ट करताना खूप समस्या आल्या मला समाजात नव्हत कि ब्लोग कसा लिहायचा

समाधान :

मी सरांना विचारल समजून घेतल सरांनी मला समजून सांगितल

1 .

निरीक्षण

आवळा हा पांगून ठेवला पाहिजे नाहीतर तो लवकर खराब होतो .

निष्कर्ष

या प्रकल्पातून आवळा हा खूप पोषक आणि बहुगुणी फळ आहे हे समजले .त्याचा खूप औषधी उपयोग होतात अवल्यापासून तयार होणारे पदार्थ आरोग्य आणि आर्थिक दोन्ही दृष्टीकोनातून फायदेशीर आहेत . म्हणून आवळ्याचे महत्व सर्वांनी जाणून ग्यावे व त्याचा वापर करावा .

खर्च :

मटेरीअल वजन दर kg किमत
1 आवळा ८ kg ६० $/kg 480 .00
2 लोणच मसाला ७ paket ५० rs /kg 350 .00
३ तेल 1.५ kg १३० rs /kg 195.00
४ लोणच बॉटल ४० बॉटल १० rs /बॉटल 400.00
५ लेबल ४० लेबल २ rs /1 लेबल 80.00
६ gas चार्जेस ३० ग्राम ८७० rs /१४ kg 1.86
७ फोइल पेपर ४० paper 1 rs /१४ फोइल 10.00
८ मीठ ७०० gm १५ rs /kg 10.50
९ कालोन्जी ७० gm ४० rs /१०० gm 28.00
१० मजुरी ३५ % 2106 .40
११ फोइल चार्जेस 1/2 युनिट्स १७ rs /युनिट 5.00

मोरिंगा चिक्की

प्रस्तावना

मोरिंगा हा इक असा औषधी गुणधर्म असलेला व पोषण मूल्यांनी भरलेला पदार्थ आहे . मोरिंगा मध्ये क्याल्शिम ,आयर्न ,प्रोटीन,वित्यानिम A ,C यांचे प्रमाण खूप जास्त आहे . त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हाडे मजबूत होतात .

उद्देश

1 :पौष्टिक व आरोग्यदायी अल्पाहार उपलब्ध करणे .

2 :ग्रामीण महिलांना व शेतकऱ्यांना उत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे .

3 :मुलांच्या पोषणात सुधारणा करणे .

साहित्य :

1 : 1500 किलो शेंगदाणे

2 : 1 किलो जवस

3 : 1 किलो तेल

4 : 100 ग्राम मोरिंगा पावडर

5 : 25 gm तूप

6 : 750 gm गूळ

आवश्यक साधने

कढई /पातेल

ग्यास शेगडी

चमचे ,कालथा

पोल पट ,रोलिंग पिन

चाकू व सुरी

वजनकाटा

हायजेनिक प्याकिंग

कृती

शेंगदाणे ,जवस,तील,भाजून घ्यावेत .

काढईत गुळ टाकून वितळून घ्यावे त्यानंतर तूप टाकून ते मिक्स करून घ्यावे .

पाक योग्य होईपर्यंत तो गरम करावा .

त्यात मोरीन्गाची पावडर आणि शेंगदाणे ,जवस ,तीळ ,मिक्स करावे .

थोडे तूप लावून मिश्रण पाटावर ओतून लाटण्याने पसरावे .

गरम असतानाच चौकोनी /गोल आकारात कापून घ्यावे .

थंड झाल्यावर हायजेनिक प्याकिंग मध्ये भरून विक्रीसाठी ठेवावे .

आलेल्या समस्या :

मला कॉस्टिंग काढायला टेबल कसा घ्यायचा टे समाजात नव्हत .

समाधान :

सरांनी मला सांगितल टेबल कसा घ्यायचं मग माझ्या समस्या दूर झाल्या .

त्यातून काय शिकलो

मोरिंगाचे महत्व

मोरिंगा म्हणजे शेवगा हा पोषण मूल्यांनी समृद्ध असा वनस्पती आहे.त्याच्या शेंगा ,पाने ,फुले आणि बिया सर्वच उपयोगी आहेत .

पौष्टिक मूल्य

मोरिंगाच्यापानांमध्ये प्रथिने , लोह ,क्याल्शिम ANTIOXIDANTS मुबालक प्रमाणात असतात .

औषधी उपयोग

१ .. रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते .

२ .. रोग्प्रतीकाराची शक्ती वाढते .

३ .. शरीरातील सूज व वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त .

पर्यावरण पूरकता

मोरिंगा झाड जलद वाढते आणि जमिनीची सुपीकता .

निरीक्षण

मोरिंगा चिक्कीची चव गोडसर व थोडी वेगळी लागली .

चिक्की खुशखुशीत व पौष्टिक होती .

बनवण्याची पद्धत सोपी व कमी खर्चिक आहे .

निष्कर्ष

या प्रकल्पातून आम्हाला कळले कि मोरिंगा (शेवगा) हे झाड केवळ भाजीपुर्तेच उपयुक्त नसून त्यातून तयार केलेली चिक्की सुद्धा पौष्टिक आणि चविष्ट असते . त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते व स्तानिक संसाधनांचा योग्य उपयोग होतो .

शिकलो ते

पोषक अन्न तयार करण्याचे कौशल्य

गटाने काम करण्याचे महत्व

स्तानिक शेती व झाडाचं उपयोग

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी नव्या कल्पना

खर्च

माटेरीयाल वजन दर किंमत
1 . शेंगदाणे २०० gm १३० rs २६ .00
2. तील १२० gm २०० rs २४ .00
3 . जवस 80 gm १२० rs ९.६ .00
४ . तूप ४० gm ६०० rs 12 .00
5 . gas १२० gm ८७० rs /unit ७.४५
६ . गुल 400 gm ४५ rs १८ .00
७ . प्याकिंग बिल 2 बॉक्स 5 rs 10 .00
८ . स्टीकर 2 1.5 3.00
९ . मिक्सर चार्जेस 1/2 unit 10 rs / unit 5 .00
10 . मोरिंगा पावडर २० gm ६०० rs 12.00
मजुरी ३५% ४८७.00 १८७.७१

चहा

प्रस्तावना

भारतामध्ये चहा हा प्रत्येक घरात अविभाज्य घटक आहे . सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कधीही प्यायला तयार असणारा हा पेय अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा इक महत्वाचा भाग आहे . या प्रोजेक्ट मध्ये आपण साधा ,सुगंधी आणि चविष्ट चहा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत .

साहित्य 

1 . पाणी = १०० ml 

2 . दुध =3 लिटर 

3 . साखर =5 चमचे (चवीनुसार)

४ . चहापत्ती =2 चमचा 

5 . आल (खिसलेल) –10 gm 

६ . वेलची =४ते 5 (ठेचून)

कृती :

पाणी आणि चहापत्ती ,अद्रक ,विलायची उकळून घेणे आणि दुध टाकून उकळून घ्यावे .नंतर गळून घ्यावे .

काळजी घेणे :

     चहा पत्ती जास्त घालू नये ;चहा कडवट होऊ शकतो .

      दुध आणि पाण्याचे प्रमाण चवीप्रमाणे ठेवावे .

उकळताना भांडे लक्षात ठेवावे अन्यात्झा चहा उतू जाऊ शकतो .

चहाचे प्रकार :

1  . आला -वेलची चहा 

2 . कडक चहा 

3 . लिंबू चहा ( दुधाशिवाय ) blak tee 

४ . मसाला चहा 

5 . ग्रीन टी 

निष्कर्ष : 

चहा हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे . योग्यप्रमाणात साहित्य ,मसाले आणि उकळी दिल्यास सध्या चहाचीही चाव अप्रतिम होऊ शकते .हा प्रोजेक्ट चहा बनवण्याची साधी पण आवश्यक पद्धत स्पष्ट  करतो. 

 

शेंगदाणा चिक्की 

प्रस्तावना

शेंगदाणा ही भारतात लहानपणापासूनच खाल्ली जाणारी एक आवडती व पौष्टिक भाजी आहे. त्याचप्रमाणे, शेंगदाणा वापरून विविध प्रकारचे पदार्थ तयार होतात, त्यापैकी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे चिक्की. चिक्की ही पारंपरिक भारतीय गोड पदार्थ असून, ती चविष्ट, पौष्टिक आणि ऊर्जा देणारी असते.

शेंगदाणा चिक्की तयार करणे ही एक सोपी प्रक्रिया असून, घरगुती व व्यावसायिक दोन्ही प्रकारांनी तयार केली जाते. या प्रोजेक्टद्वारे मला शेंगदाणा चिक्कीच्या तयारीची पध्दत, आवश्यक साहित्य, तसेच त्याच्या आरोग्यदायी फायद्यांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.

हा प्रोजेक्ट मला स्वयंपाककला, व्यवसाय आणि आरोग्य या तीनही क्षेत्रांतील ज्ञान वाढवण्यास मदत करील. तसेच, स्थानिक बाजारात या पदार्थाची मागणी आणि त्याचे आर्थिक महत्त्वही समजण्याचा प्रयत्न करणार आहे.

 प्रोजेक्टचे उद्दिष्ट

  • शेंगदाणा चिक्की कशी तयार करावी हे शिकणे
  • त्याच्या आरोग्यदायी फायद्यांची माहिती देणे
  • स्थानिक आणि परकीय बाजारात त्याची मागणी समजावणे

संशोधन व माहिती संकलन

  • शेंगदाणा चिक्कीचा इतिहास
  • विविध प्रकार
  • तयार करण्याची प्रक्रिया
  • साहित्य व उपकरणे
  • स्वच्छता आणि सुरक्षितता

 प्रक्रिया

  • साहित्यांची यादी
  • तयार करण्याची पध्दत:
    • शेंगदाणा भिजवणे व भाजणे
    • साखर तयार करणे
    • शेंगदाणा आणि साखर मिसळणे
    • चिक्की तयार करणे (मिश्रण थोडे थोडे घालणे व थोडे थोडे भाजणे)
    • थंड होऊ देणे व कापणे

निष्कर्ष

या प्रोजेक्टमधून मला शेंगदाणा चिक्की तयार करण्याची प्रक्रिया निदर्शनास आली. शेंगदाणा, साखर, आणि काही मसाले वापरून ही स्वादिष्ट व पौष्टिक चिक्की तयार करता येते. या प्रक्रियेदरम्यान मला स्वच्छतेचे महत्त्व, योग्य तापमान आणि वेळेचे पालन करणे, तसेच दर्जेदार साहित्य वापरण्याची गरज समजली.

शेंगदाणा चिक्की ही केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. या प्रोजेक्टमुळे मला स्वयंपाकाची कौशल्ये विकसित झाली, तसेच उत्पादनाची प्रक्रिया आणि बाजारपेठेची जाणही झाली. भविष्यात या चिक्कीचे विविध प्रकार तयार करून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे.

सारांशतः, या प्रोजेक्टमुळे मला शेंगदाणा चिक्कीच्या तयारीची जाण येण्यास मदत झाली असून, त्याचा व्यवसायिक वापरही शक्य आहे, असे मला वाटते.

कॉस्टिंग 

मटेरियल  वजन         दर /kg  किंमत 
1 . शेंगदाणे  400 gm     
2 . गूळ  350 gm     
3 . तूप  25 gm     
४ . प्याकेजिंग  2 बॉक्स     
5. gas चार्जेस  ६० unit     
६ . मजुरी  ३५ %    
७ . स्टीकर       
       
       

 

पाव

प्रस्तावना (Introduction)

भारतात पाव हा नाश्ता, सँडविच, मिसळ-पाव, वडापाव अशा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. पाव घरगुती पद्धतीने तसेच मोठ्या बेकरींमध्ये यंत्रांच्या मदतीने तयार केला जातो. या प्रकल्पात पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य, प्रक्रिया आणि औद्योगिक पद्धत यांचा अभ्यास केला आहे.

पाव म्हणजे काय?

पाव हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला एक मऊ आणि हलका बेक केलेला पदार्थ आहे. त्यात यीस्ट घातल्यामुळे पीठ फुलते आणि पाव स्पंजी, हलका व मऊ तयार होतो.

 पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  1. मैदा

  2. पाणी

  3. यीस्ट (खमीर)

  4. साखर

  5. मीठ

  6. तेल 

    पाव बनवण्याची प्रक्रिया (घरगुती प्रक्रिया)

     यीस्ट तयार करणे

    • कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट मिसळून काही मिनिटे ठेवतात.

    • मिश्रण फेसाळ झाले की ते तयार झाले असे समजते.

     पीठ मळणे

    • मैद्यात मीठ, साखर, तेल व यीस्टचे मिश्रण घालतात.

    • हे पीठ 10–15 मिनिटे मऊ होईपर्यंत मळतात.

     पहिला फुलवणे (Proofing)

    • पीठ एका भांड्यात ठेवून झाकून 1–2 तास ठेवतात.

    • पीठ दुप्पट होते.

     आकार बनवणे

    • फुललेल्या पीठाचे गोळे करून पाव तयार करून घेणे . 

     बेक करणे

    • ओव्हन 180°C वर गरम करून पाव 20–25 मिनिटे बेक करतात.

    • पाव सोनेरी रंगाचा होतो.

     थंड करणे

    • पाव ओव्हनमधून काढून थंड होऊ दिला की तो तयार!


    पाव खाण्याचे फायदे

    • हलका आणि पचायला सोपा

    • कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत

    • विविध पदार्थांसोबत सहज वापरता येतो

    • घरगुती बनवला तर अधिक पौष्टिक

    • निष्कर्ष (Conclusion)

      पाव हा सोपा, हलका आणि सर्वांना आवडणारा खाद्यपदार्थ आहे.
      घरगुती आणि औद्योगिक अशा दोन्ही पद्धतींनी तो बनवला जातो.
      यीस्ट हे पाव बनवण्यातील सर्वात महत्त्वाचे घटक आहे. योग्य प्रमाणात सामग्री आणि तापमान ठेवले तर उत्तम दर्जाचा पाव तयार होतो.

    •                                                                                  

    कॉस्टिंग 

मटेरियल वजन दर /kg किंमत
1 . मैदा ७ kg ४० / kg २८० .00
2 . इस्ट १५० gm १६० / kg २४.00
3 . साखर १५० gm ४१ / kg ६.१५
४ . मीठ १२० gm १५ / kg 1.८
5 . ब्रेड इम्प्रुअर १४ gm १३० / 50 gm 3.६४
६ . ओव्हन चार्जेस 1 unit १४ rs / unit १४ . 00
७ . तेल १०० gm १३० / kg १३.00
८ . मजुरी ३५ % ३४२.५९
११९.९०
४६५.४९६५

गार्लिक ब्रेड

प्रस्तावना :

गार्लिक ब्रेड हा युरोपियन आणि इटली येथे खाल्ला जाणारा पदार्थ आहे . आणि हा ब्रेड आपल्या महाराष्ट्रात पण खूप आवडीने खाल्ला जातो . प्रोजेक्टमध्ये आपण गार्लिक बटर मिक्स तयार करणे ,ब्रेडवर त्याची योग्य पद्धत लावणे आणि योग्य तापमानावर भाजून /बेक करणे शिकणार आहोत . तासेच्चाव,वास आणि बनवत यांचे निरीक्षण करून निष्कर्ष काढणार आहोत .

उद्देश :

1 . गार्लिक बटर पेस्ट कसे बनवतात ते शिकणे .

2 . ब्रेडचे भाग /कंप योग्यप्रकारे तयार करणे व त्यावर spread निट लावणे .

3 . बेकिंग /ताळल्याने ब्रेडमध्ये येणारा बदल -रंग ,कुरकुरीतपणा व सुवास यांचे निरीक्षण करणे .

४ . चव व सादरीकरनावरून निष्कर्ष काढणे .

साधने व साहित्य :

  • मैदा , यीस्ट , साखर , कोमात पाणी
  • सोफ्ट बटर –100 gm
  • लसून –५० gm
  • कोथिंबीर(बारीक चिरलेली)
  • मीठ 1/2 (चवीनुसार )
  • मिरी पावडर (चिमुटभर )
  • किसलेले चीज 1/2 क्यूब

उपकरणे :

  • बाउल आणि चमचा (मिक्सिंगसाठी)
  • चाकू व चोपिंग बोर्ड
  • बेकिंग tre
  • ओव्हन किवा टोस्टर
  • ब्रश

कृती :

माळून घेलेला मैदा गोल आकारात लाटून ग्यायचा आणि अपन्बानाव्लेली गार्लिक पेस्ट अर्ध्या साइडनेलावून घ्यायची आणि दुसरी रिकामी बाजू वरून टाकून घ्यायची .

बेक :

ओव्हन

ब एकिंग tre वर फोइल लावायचा ,ब्रेड ठेवून १८० c वर ८ ते १२ मिनिटे बेक करायचं .