टाईनी हाउस
प्रस्तावना :-
आजच्या वेगवान जीवनशैलीत व वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची कमतरता भासत आहे. मोठ्या घरांच्या तुलनेत लहान, किफायतशीर व पर्यावरणपूरक घरांची संकल्पना पुढे येत आहे. त्यालाच टायनी हाऊस असे म्हणतात.
या प्रकल्पामध्ये आम्ही १० फूट × १० फूट क्षेत्रफळाचे टायनी हाऊस डिझाइन केले आहे.
सर्वे :-
कमी खर्चात व कमी जागेत आवश्यक सोयी उपलब्ध करून देणारे घर म्हणजे टायनी हाऊस.
या प्रकल्पात आम्ही १०x१० फूट टायनी हाऊस डिझाईन केले आहे.
यात –
स्वयंपाकघर
हॉल
स्नानगृह व शौचालय
उद्देश :-
कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग करणे
कमी पैशात जास्त जागेचा वापर करणे.
स्वस्त व किफायतशीर घर उपलब्ध करून देणे.
किचन, हॉल व बाथरूम यांसारख्या मूलभूत सोयी समाविष्ट करणे.
पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम करणे.
ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या कमी करणे.
साहित्य :-
१.५ × १.५ इंच ट्यूब
सिलिंग शीट (PUC) – छतासाठी
भिंत शीट (सिमेंट शीट) – भिंतीसाठी
नट व बोल्ट – जॉईंट्स व जोडणीसाठी
सिमेंट प्लायवूड – मजल्यासाठी व आतील कामासाठी
बाथरूम साहित्य –
नळ (Tap)
कमोड (कमोड/शौचालय सीट)
बेसिन (हात धुण्याचे बेसिन)
काळी वायर 1.5 mm/2.5
हिरवी वायर 1.5mm/2.5
लाल वायर 1.5 mm/2.5
कृती :-
फ्रेम तयार करणे
१.५ x १.५ इंच ट्यूब वापरून चौकट (Frame) तयार करणे
नट-बोल्टच्या सहाय्याने जोडणी करणे
भिंती व छत बसवणे
भिंतींसाठी सिमेंट शीट लावणे
छतासाठी PUC शीट बसवणे
वायरिंग केली व बोर्ड भरले आणि, वायर साठी वायरिंग पाईप लावले.
नळ (Tap) बसवणे
कमोड (Toilet Seat) बसवणे
बेसिन (Wash Basin) बसवणे
निरीक्षण :-
टायनी हाऊस प्रकल्पामध्ये कमी जागेत व कमी खर्चात किचन, हॉल व बाथरूम या आवश्यक सोयी उपलब्ध झाल्या.
साहित्याचा योग्य वापर करून घर मजबूत, टिकाऊ व पर्यावरणपूरक बनले आहे.
निष्कर्ष :-
१०x१० फूट टायनी हाऊस कमी खर्चात, कमी जागेत व टिकाऊ साहित्य वापरून बांधता येते.
यामध्ये सर्व मूलभूत सुविधा मिळून हे घर किफायतशीर व उपयुक्त ठरते.
भविष्यातील उपयोय :-
टायनी हाऊस संकल्पना भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हे घर पोर्टेबल, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असल्याने विद्यार्थ्यांसाठी, प्रवाशांसाठी व लहान कुटुंबासाठी उपयोगी आहे
मी हे शिकलो:-
वायरिंग कसे करायचे ते शिकलो.
PUC सिल्लिंग लावायचं शिकलो.
स्टाईल्स बसवायला शिकलो.
प्लंबिंग शिकलो.
दरवाजा आणि खिडकीची फ्रेम बनवायला शिकलो.
पेंटिंग कसे करायचे ते शिकलो.