सेफ्टी

कोणतेही विद्युत दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी मुख्य वीजपुरवठा बंद करून फ्यूज काढला आहे याची खात्री करा.

“काम चालू आहे” असा फलक लावा.

काम करताना रबरी हातमोजे आणि रबरी चप्पल/बूट वापरा.उपकरणांची अर्थिंग व्यवस्थित आहे का ते तपासा.

शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्यास पाणी वापरू नका; माती किंवा वाळू वापरा.योग्य प्रकारचा फ्यूजच वापरा.

टेस्टरचा वापर फक्त वीज आहे की नाही हे तपासण्यासाठी करा; स्क्रू-ड्रायव्हर म्हणून वापरू नका.

इन्सुलेटेड (विद्युतरोधक) साधने वापरा.

विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला थेट स्पर्श करू नका; लाकडी काठी किंवा इन्सुलेटेड वस्तू वापरून दूर करा.

कामाची जागा स्वच्छ ठेवा.अग्निशामक यंत्र उपलब्ध आहे व त्याची वैधता तपासा.

जखम झाल्यास प्रथमोपचार पेटीचा वापर करा.

cpr