पॉलीहाऊस शेती –

सविस्तर व्याख्यान नोट्स१

. पॉलीहाऊस म्हणजे काय?

पॉलीहाऊस म्हणजे पॉलीथिन आच्छादनाखाली नियंत्रित वातावरणात शेती करण्याची आधुनिक पद्धत.

तापमान, आर्द्रता, प्रकाश आणि पाण्याचे व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेतले जाते.

२. पॉलीहाऊसचे प्रकार

• नैसर्गिक वायुवीजन पॉलीहाऊस

• फॅन-पॅड (क्लायमेट कंट्रोल) पॉलीहाऊस

• लो टनेल

• शेडनेट हाऊस

• इन्सेक्ट नेट हाऊसप्रत्येक प्रकाराची उपयोगिता, खर्च व व्यवस्थापन वेगवेगळे असते.

३. फायदे

• वर्षभर उत्पादन

• हवामानापासून संरक्षण

• पाणी व खताची बचत

• अधिक उत्पादन व दर्जेदार माल

• निर्यातक्षम गुणवत्ता

• कीड-रोगांचे प्रमाण कमी.

४. तोटे

• प्रारंभिक गुंतवणूक जास्त

• तांत्रिक ज्ञान आवश्यक

• नियमित देखभाल गरजेची

• वादळ किंवा गारपिटीमुळे नुकसान होऊ शकते.

५. बांधणीयोग्य जागेची निवड

, उत्तर-दक्षिण दिशा, GI पाइप फ्रेम, UV स्थिर फिल्म, कीटकजाळी, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, बेड तयार करणे, वायुवीजन व्यवस्था.

६. पॉलीहाऊसमधील प्रमुख पिकेढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, स्ट्रॉबेरी, गुलाब, जर्बेरा, कार्नेशन, लिली, ऑर्किड.

७. खत व्यवस्थापनमाती व पाण्याची तपासणी करावी.

विद्राव्य खतांचा फर्टिगेशनद्वारे वापर करावा.

NPK, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये नियोजनानुसार द्यावीत.

EC व pH नियमित तपासावे.

८. दररोजची कामे

• तापमान व आर्द्रता नोंद

• ठिबक प्रणाली तपासणे

• कीड-रोग निरीक्षण

• सुकलेली पाने काढणे

• आवश्यकतेनुसार खत व पाणी देणे

• वायुवीजन व स्वच्छता राखणे.

वरील प्रमाणे फोटो