वायर व त्यांचे प्रकार

वायरचे प्रमुख प्रकार१. रचनेनुसार प्रकार सिंगल स्ट्रँड वायर :

यात धातूची एकच जाड तार असते. ही लवचिक नसते. घरातील स्थिर वायरिंगसाठी वापरली जाते.मल्टी-स्ट्रँड वायर:

यात अनेक बारीक तारा एकत्र गुंडाळलेल्या असतात. ही खूप लवचिक असते. हालचाल होणाऱ्या उपकरणांमध्ये वापर.२. कोरनुसार प्रका सिंगल कोर वायर :

यात एकच चालक (कंडक्टर) असतो. घरातील साध्या वायरिंगमध्ये वापर.मल्टी कोर वायर :

यात दोन किंवा अधिक चालक एकाच आवरणात असतात. औद्योगिक कामांसाठी व उपकरणांमध्ये वापर.३. इन्सुलेशन व वापरानुसार प्रका पीव्हीसी वायर :

ओलावा रोखणारी, मजबूत आणि जास्त काळ टिकणारी वायर. घरांमध्ये सर्वाधिक वापरली जाते.फ्लेक्सिबल वायर :

मऊ आणि सहज वाकवता येणारी वायर. घरगुती उपकरणे जोडण्यासाठी वापर.वेदर प्रुफ वायर :

ऊन, पाऊस आणि हवामानाचे बदल सहन करणारी बाहेरील वापरासाठीची तार.रंगानुसार वायरचे वर्गीकरण लाईव्ह वायर :

लाल किंवा तपकिरी रंग. (मुख्य विद्युत प्रवाह वाहून नेते)न्यूट्रल वायर :

निळा किंवा पांढरा रंग. (परतणारा प्रवाह)अर्थ वायर :

हिरवा किंवा पिवळा-हिरवा रंग. (सुरक्षिततेसाठी)