१. पॉलीहाऊस म्हणजे काय?पॉलीहाऊस म्हणजे पॉलीथिन आच्छादनाखाली नियंत्रित वातावरणात शेती करण्याची आधुनिक पद्धत. तापमान, आर्द्रता, प्रकाश आणि पाण्याचे व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेतले जाते.

नैसर्गिक वायुवीजन पॉलीहाऊस

• फॅन-पॅड (क्लायमेट कंट्रोल) पॉलीहाऊस

• लो टनेल

• शेडनेट हाऊस

• इन्सेक्ट नेट हाऊस

प्रत्येक प्रकाराची उपयोगिता, खर्च व व्यवस्थापन वेगवेगळे असते.

फायदे

• वर्षभर उत्पादन

• हवामानापासून संरक्षण

• पाणी व खताची बचत

• अधिक उत्पादन व दर्जेदार माल

• निर्यातक्षम गुणवत्ता

• कीड-रोगांचे प्रमाण कमी.

तोटे

• प्रारंभिक गुंतवणूक जास्त

• तांत्रिक ज्ञान आवश्यक

माती व पाण्याची तपासणी करावी. विद्राव्य खतांचा फर्टिगेशनद्वारे वापर करावा. NPK, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये नियोजनानुसार द्यावीत. EC व pH नियमित तपासावे.

दररोजची कामे

•तापमान व आर्द्रता नोंद

•ठिबक प्रणाली तपासणे

•कीड-रोग निरीक्षण

•सुकलेली पाने काढणे

•आवश्यकतेनुसार खत व पाणी देणे

•वायुवीजन व स्वच्छता राखणे