हवा आत घेणे आणि जळलेले वायू बाहेर सोडणे यासाठी वापरले जातात.
४. डिझेल इंजिनची कार्यप्रणाल.
चार-स्ट्रोक डिझेल इंजिनमध्ये चार स्ट्रोक असतात.
सक्शन स्ट्रोक: सिलिंडरमध्ये हवा आत घेतली जाते.
कॉम्प्रेशन स्ट्रोक: हवा दाबली जाते व तिचे तापमान वाढते.
पॉवर स्ट्रोक: डिझेल फवारले जाते. गरम हवेमुळे ते स्वतः पेटते आणि पिस्टनला खाली ढकलते.
एक्झॉस्ट स्ट्रोक: जळलेले वायू बाहेर सोडले जातात.
५. डिझेल इंजिनचे उपयोग
ट्रॅक्टर आणि शेतीची यंत्रे
जनरेटर
ट्रक आणि बस
पाणी उपसण्याचे पंप
औद्योगिक यंत्रे
६. देखभाल करताना घ्यायची काळजी
इंजिन ऑइलची पातळी तपासावी.
एअर फिल्टर आणि डिझेल फिल्टर स्वच्छ ठेवावे.
कूलंटची पातळी तपासावी.
इंधनाची गळती तपासावी.
देखभाल करण्यापूर्वी इंजिन बंद करून थंड होऊ द्यावे.
प्रॅक्टिकल चाचणी
