

अनुभव (Experience)हा प्रोजेक्ट बनवताना आम्हाला असा अनुभव आला की, आम्ही वेल्डिंग करायला शिकलो आणि चांगल्या पद्धतीने ग्रील बनवायला शिकलो.
२. अडचण (Challenge / Difficulty)ग्रील बसवण्यासाठी असलेल्या भिंती आत-बाहेर (असमान) असल्यामुळे २x२ चे पाईप उभे करण्यात अडचण आली.
कृती:सरांनी आम्हाला ग्रील बनवण्याचा प्रोजेक्ट दिला. त्यानंतर आम्ही मापे घेऊन आकृती काढली. त्यानंतर २x२ चे ७४ आणि ७६ इंची पाईप कापून घेतले. त्यानंतर १x१ च्या ट्यूबचे १२ फुटांचे ८ तुकडे कापले. त्यानंतर ‘D’ पाईपचे १२ फुटांचे ४ तुकडे कापले आणि ते फिट केले. त्यानंतर ‘D’ पाईपच्या आणि १x१ च्या ट्यूबच्या मध्ये ६ इंचाची जागा सोडून वेल्डिंग केली. तसेच ३५-४ ची पट्टी खाली सपोर्टला जोडून वेल्डिंग केली. संपूर्ण ग्रील तयार झाल्यावर पॉलिश पेपरने घासून घेतले. त्यानंतर रंग (कलर) मारला आणि काम पूर्ण झाले.
साहित्य व साधने:• साधने (मशीन्स): वेल्डिंग मशीन, ग्राइंडर मशीन, पाईप कटर, ड्रिल मशीन.• साहित्य (मटेरियल): २x२ पाईप, १x१ पाईप, लोखंडी पट्टी, नट-बोल्ट, रंग.
प्रकल्प अहवाल २०२५-२६विज्ञान आश्रम पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे.
विभागाचे नाव – अभियांत्रिकी
प्रकल्पकर्ता – मुकुंद मुंजाळ
मार्गदर्शक – श्री. जाधव सरप्रकल्प सुरू केल्याची तारीख – दि. २१/०९/२०२६प्रकल्प पूर्ण (बंद) केल्याची तारीख – दि. २०/१०/२०२६उद्देश – ग्रील तयार करत असताना आम्ही चांगल्या प्रकारे वेल्डिंग करायला शिकलो. तसेच, या ग्रीलमुळे वरून लहान मूल किंवा मोठी व्यक्ती खाली पडू शकणार नाही.