आपल्या देशात गुळवेल चा उपयोग बऱ्याच आयुर्वेदिक औषधांसाठी केला जातो. जेव्हापासून राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव झाला आहे तेव्हापासून गुळवेलला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.रोग प्रतिकारशक्ती सुदृढ करण्यासाठी वापरली जाणारी एक सुप्रसिद्ध इमुनो मोड्युलटर औषधी वनस्पती म्हणून गुळवेल कडे बघितले जाते. या लेखात आपण गुळवेलचा आरोग्यदायी फायदे यांविषयी जाणून घ्यावी.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते: गुळवेल ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. जी रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी मदत करते. त्याला एंटीऑक्सीडेंट चे एक पावर हाउस देखील म्हटले जाते. गुळवेल फ्री रॅडिकल शी लढा देते व आपल्या शरीरातील पेशी निरोगी ठेवते. त्यामुळे रोगांपासून लांब राहता येते. गुळवेल शरीरातील टॉक्सिन बाहेर काढून टाकण्यास, रक्ताला शुद्ध करण्यास, रोगास कारणीभूत असलेल्या घातक बॅक्टेरिया यांची लढा देण्यास मदत करते तसेच यकृत रोग आणि युरिनरी ट्रॅक्ट संसर्गावर देखील प्रतिकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते.
- पचन क्षमता सुधारते: पचन क्षमता सुधारण्यास आणि आतड्यांची संबंधित समस्या वर उपचार करण्यासाठी गुळवेल खूप फायदेशीर मानली जाते. ही औषधी वनस्पती डी टॉक्सिक फाईन एजंट म्हणून देखील काम करते. गुळवेल पचन क्रिया बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. मजबूत पचन प्रणाली बनवण्यास मदत करते. तसेच यकृतावर कोणत्याही प्रकारचा ताण पडत नाही. बद्धकोष्टता समस्येवर देखील गुळवेल गुणकारी मानले जाते.
- मानसिक ताण आणि चिंता कमी करते: गुळवेल मध्ये अडपटॉजेनिक औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो. एडोपटोजेन हा एक असा घटक आहे जो आपल्या मानसिक ताण तणावातून मुक्त करण्यास मदत करतो. त्याचबरोबर आपल्या शरीरातील विषारी घटकांपासून मुक्त होण्यास आणि आपल्या स्मरण शक्तीला चालना देण्यास देखील मदत करते.
टीप – कुठल्याही प्रकारचे उपचार करण्या अगोदर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
उदेदश_:- आयुर्वेदिक वेलीची लागवड.
कामे -;
शेतामधून गुळवेलाचे रोपे आणले ती सर्व मोठया झाडा खाली लावले .
ती सर्व झाडांना रोज सकाळ आणि संध्यकाळ पाणी टाकले .
सर्व झाडांना नसर्गीक खत टाकले .