१) गाईच्या गोठ्यातील नोंदचा

उददेश :- गाईच्या गोठ्यातील नोंदचा अभ्यास करणे.

१) गाईच्या गोठ्यातील नोंदी का घ्यावा.

=कारण आपण गाईंना चारा घालतो. तो चारा खाल्ल्याने गाईनी आपल्या दुध किती दिले .याचा आपल्याला सहजच आढावा घेता येते आपल्याला यांचा चारा घालण्याचे प्रमाण constant ठेवले तर त्यावरुन दुधावर काय परिणाम होतात. किंवा दुध कमी जास्त होते का हे सर्व आपल्याला नोंद पऋकातुन कळत असते म्हणून गाईच्या गोठ्यातील गोदी घेणे गरजेचे आहे.

२) गाईच्या गोठ्यात नोंदी घेतांना कशाची करण्याची आपण नोंद घेतली पाहिजे.

= गाईच्या गोठ्यातील नोंदी होतांना खाद्य खादय आणि दुध याची नोंद घेतली पाहिजे.तसेच त्यांच्या आरोग्याची तक्ता याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे.

३) प्राण्यांचा आरोग्याचा तक्ता का करावा ?

= या तक्ता आपण त्यांचे निरीक्षण करत असतो त्या निक्षिणावरुन आपल्याला प्राण्यांची लक्षणे समजत असतात तसेच त्यावरुन आपल्याला उपचार काय करावे हे पण लक्षात येत असते. तसेच त्या लक्षणांच्या मागे किती किती पेटी खर्च झाले हे सुदधा आपल्याला समजत असते.

खाद्य व दूध तक्ता

दिनांकदूधज्वारी कडवळकडबागोळी पेंडभुसा
16 – 12 – 215 + 6.5 + 6.5 = 1810 + 103 + 3 = 62 + 2 + 2 = 61 + 1 + 1 = 3
17 – 12 – 216.5 + 6 + 4 = 16.515 + 153 + 3 = 61 + 1 + 1 = 31 + 1 + 1 = 3
18 – 12 – 215.5 + 4 + 6 = 15.615 + 153 + 3 = 61 + 1 + 1 = 31 + 1 + 1 = 3
19 – 12 – 216 + 4 + 4 = 1415 + 153 + 3 = 61 + 1 + 1 = 31 + 1 + 1 = 3
20 – 12 – 216 + 4.5 + 4 = 14.515 + 153 + 3 = 61 + 1 + 1 = 31 + 1 + 1 = 3
21 – 12 – 216 + 4.5 + 4 = 14.515 + 153 + 3 = 61 + 1 + 1 = 31 + 1 + 1 = 3
22 – 12 – 216 + 4.5 + 4.5 = 1515 + 153 + 3 = 61 + 1 + 1 = 31 + 1 + 1 = 3

2)कंपोस्ट खत तयार करणे

उददेश:- कंपोस्ट खत तयार करणे

साहित्य:- कंपोस्ट बेंड, प्लॅस्टिक कागद, शेण, पाणी, कंपोष्ट कचरा

कृती:- १) कंपोष्टचे कचरा तयार करणे

२) ३×८ चा बेंड तयार करणे

३) नंतर त्यावर पहिल्या सुका करण्याचा भर पसरला

४) त्यावर शेणाली रलरी पसरवला

५) पुन्हा सुका कचण्याया थर त्यावर केला

६) पुन्हा त्यावर शेणाची रलरी करून पसरवली

७) असे पुन्हा केले व नंतर त्यावर कंपोस्ट कल्यर

८) शिंपले.

काळजी :- १) कंपोस्टखत करण्यासाठी चांगला बेंड तयार करणे.

२) बेंड वर दररोज पाणी मारले पाहिजे.

कंपोस्ट खत तयार करण्यासाठी प्लॅस्टिकची कागद का वापरतात.

= जर कंपोस्ट खतांवर जास्त प्रमाणात पाऊस पडला तर त्यातले जिवाणू, बँकटेरिया हे त्या कंपोस्ट खतामध्ये राहत नाहीत. कंपोस्ट खत

.

3)फळबाग लावण्याच्या पदधती.

१) चोरस पद्धत .

२) आयत मांडणी पद्धत.

३) समभुज त्रिकोण पद्धत .

४) षटकोण पद्धत .

५) समपातळी रेषा मांडणी पद्धत.

१) चोरस पदधत,:-

या पद्धतीत झाडे व ओळी यामध्ये समान अंतर असायला हवे.आपण यामध्ये पेरू,आबा, चिकु, इत्यादी फळझाडे लावु शकतै.

२) आयत मांडणी पद्धत :-

या पद्धतीत आपण ओळीमधील अंतर समान ठेवता येते. परंतु झाडांमध्ये आपण अंतर समान ठेवु शकत नाही.यामध्ये आपण पाल ,कारली , इत्यादी पिक घेवु शकतो.

३) समभुज त्रिकोणी पद्धत :-

या पद्धतीमध्ये त्रिकोण त्या तिनं point ला आपन फळझाडे लावतो. यामध्ये आपण लीची, आंबा , पेरू इत्यादी फळझाडे लावु शकतो.

४) षटकोण पद्धत:-

या पद्धतीत आपण रकोणच्या आकार करून त्याच्या प्रत्येक कोणावर झाडे लावतो.यामध्ये आपण चिकु लिबु संत्री मोसंब इत्यादी झाडे लावतो.

५) समपातळी रेषा मांडणी पद्धत:-

ही पद्धत डोंगराळ सत्रात झाडे लावण्यासाठी वापरतात.तसेच या पद्धतीमुळे मातीची चुप होत नाहीं म्हणुन डोंगराळ भागात ही पद्धत वापरतात . तिथे आपण सांग ,सारडा ,असे झाडें लावु शकतो.

  • फळझाडे लावण्याचे अंतर

जवारी =४५×१५ cm

बाजरी= ३०×१५ cm

बटाटा =६०×२० cm

कादा= १५×१० cm

भात= १५×१५ cm

कारले= १.५×१ m

दोडका= १.५×१ m

मीरची=६०×४५ cm

वागे=९०×९० cm

कोबी=४५×३० cm

हळद=३०×३० cm

झेंडू=६०×६० cm

कापुस=९०×९० cm

केळी=१.५×१.५ m

बोर=६×६ m

पपई=२.५×२.५ m

सिताफळ=५×५ m

डालिब=४.५×३ m

चिकु=१०×१० m

पेस=६×६ m

द्राओ=३×१.५ m

4)तन नियंत्रण करणे

उद्देश:- शेतातील तण नियंत्रण ठेवणे

*भौतिक पद्धत:-या पद्धतीमध्ये शेतात नांगराच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने खोल नांगरणी केली जाते. तसेच दोन वेळा तण खाळी करावी तसेच जर आपल्याला भात ऊस यांचे पिक घ्यायचे असेल तर यांच्यामधील तण नियंत्रण ठेवण्यासाठी जमीन जाळावी लागले. तसेच कधी कधी आपण रकरण्याच्या साहाय्याने सुडधा तण किय‌‍ऋण करू शकतो.

*पिक पेरणी पद्धत:- या पद्धतीत तण नियंत्रण ठेवायचे असेल तर आपल्याला पिकाची केल्यावर करावी.म्हणजे आपण बदलुन पिक घेत असतो कारण त्याच जागेवर पुन्हा उद्या एकच पिक घेतले तर नियंत्रण होणार नाही.

*पद्धत:- या पद्धतीत तण नियंत्रण ठेवण्यासाठी शेतात किडे सोडावे लागतात.उदा.हक्ती गवत शेतामध्ये खुप आहे. तर त्या डावावर नियंत्रण ठेवण्यासाठी हक्ती गवत खाणारे कोठे सोडले जाता.

*रासायनिक पद्धत:-या पद्धतीत शेतात chemical फवारणीचे असतात.त्याना आपण लग्न नाशक म्हणतो तर येथे दोन प्रकारचे तननाशक असतात.१) selected व २) Non selected sclected या प्रकारामध्ये आपल्याला कोणत्या मनावर नियंत्रण ठेवायचे आहे.त्याच्या वर फवारण्या चे तननाशक असते तर यामध्ये तीन चार प्रकारचे तण आहे. तर त्यातुन जे प्रन नियंत्रण ठेवण्याचे तननाशक फवारणी केली आहे तेच तण नष्ट होईल बाकी तण तसेच राहील.

Non selected:-या मध्ये सर्वच तण नियंत्रण होत असते.हे मोकळ्या रानावर पवारांच्या वापरतात.

5) दूध काढणे

उद्देश:- दूध काढणे

साहित्य :- दूध काढण्याचे मशीन , बकेट , गरम पाणी , इत्यादी .

कृती :- १) गरम पाण्याने कास धुवून घ्यावी .
२) मशीन त्या काशीला लावून घेणे .
३) मशीन चालू करणे .

निरीक्षण :- १) गाईची कास स्वछ धुवून घेणे .
२) मशीने दूध काढताना त्याकडे चांगलं लक्ष द्यावे .
३) मशीनने दूध सात मिनिटाने निघाले पाहिजे .

  • दूध काढण्याच्या दोन पद्धती .
    १) मशीन द्वारे दूध काडू शकतो .
    २) हाताने दूध कडू शकतो .

6) चारा तयार करणे

उद्देश :- गाईचा चारा तयार करणे .

कृती :- १) मशीन चालू करणे .
२) बाजरीची पेंड सोडून मशीन मध्ये टाकणे .
३) मशीन मध्ये बाजरीचे बारीक बारीक तुकडे करून घेणे .
४) कुट्टीच वजन करून घेणे .
५) कुट्टीच लियर करून घेणे .
६) त्यावरती ५० ग्राम मीठ व ५० ग्राम शोडा टाकून घेणे .
७) पुन्हा त्यावर कुट्टीचा लियर तयार करून घेणे .

साहित्य :- कुट्टी मशीन , चारा , वजन काटा , कॅरेट , कपाट , १५ ग्राम मीठ , २० ग्राम सोडा .

  • निरीक्षण :- १) कुट्टी बारीक करणे .
    २) चार पेरिश ठेवणे.
    ३) चारा टाकताना चारा मिक्स करणे .
  • कुट्टी मशीन :- १) धार , ब्लेड , २ मोटर सफर विल .

7) पीक लागवडीच्या पद्धती .

उद्देश :- पीक लागवडीच्या पद्धती .

  • भाजी पीक लावण्याच्या पद्धती
  • १) फेकणे पद्धत
    २) पेरणे पद्धत
    ३) टोकेने पद्धत

१) फेकणे पद्धत :- या पद्धतीमध्ये आपण आपल्या हाताने
धान्य , बियाणे फेकणे पेरत असतो .
त्यास फेकणे पद्धत मानतात तसेच धान्य
समान समान अंतरावर राहत नाहीत कुठे
पडते तर कुठे पडत नाही .

२) पेरणी पद्धत :- या पद्धतीमध्ये आपण यंत्राच्या साह्याने
बियाणे पेरत असतो . तर यामध्ये पेरत
असताना एकीमध्ये अंतर सारखं असत
तर झाडांमध्ये अंतर कमी जास्त होत असते .

३) टोकाने पद्धत :- या पद्धतीत हाताने बियाणे माती मध्ये टाकतो
या मध्ये आपल्या झाडांमधील ओळीतील
अंतर सारखं करत असत .

8) पिकांना पाणी देण्याची पद्धत

उद्देश :- पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .

१) तुषार सिंचन

साहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .

कृती :-

१) सर्व पाईप पसरवणे
२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं
३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं
४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली नंतर मोटार चालू केली .

  • काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .

२) ठिबक सिंचन

साहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन , सबमेन लाईन , एअर वॉल , कॉक ..

कृती

१) मेण पाईप टाकली
२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या साह्याने जोडून घ्यावे .
३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .
४) स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .
५) मोटार चालू करण्याचे आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक करा .

काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .

३) पाठ पाणी देणे

साहित्य :- फावडे

कृती

फावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा .
प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची काळजी घावी .

तोटा

१) पाणी जास्त वाया जाते
२) खात द्यायला अडचण होते
३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही.

9) पिकाची खताचा डोस ठरवणे.

१०) जनावरांचे अंदाजे वजन काढणे.

उद्देश :- जनावरांचे अंदाजे वजन करणे

साहित्य :- मोजपट्टी नोंदवही ,पेन ,गाई

कृती :- १) मीटर टेपने गाईची लांबी मोजली

२) नंतर गाईचा घेर मोजला

३) लांबी मोजत असताना लांबी ७६ इंच आली व छातीचा घेर हा ६३ इंच आला.

११) बीज प्रक्रिया

उद्देश :- बीज प्रक्रिया

साहित्य :- पाणी m- 45,Trichodemd.

कृती :- १) झेडु ची मिरची व वांगी ही रोपे आपली.

२) त्यानंतर m45 पाणी मध्ये म्हणजे पाणी m45 मिक्षण करून घेतले.

३) त्यानंतर रोप लावण्यासाठी कुडा तयार करून घेतला.

४) तयार केलेला घालतात रोपे बुडवून झाडामध्ये लावली.

५) m45 ने रोपांना कीड लागत नाही.

*बीज प्रक्रिया का करावि.

१) बिया चे संरक्षण.

२) बीयाची चांगली लागवण.

३) रोपे निरोगी.

४) उचादन भरपुर.

  • बीजा मार्फत रोग
  • १) बीजा मध्ये रोगाचे वीषाणु .
  • २) बीयाणाच्या अंतर्भगा .
  • ३) बीयाणाच्या अंतर्भागात.

१२) प्राण्याचे तापमान येणे.

उद्देश :- प्राण्याचे तापमान घेणे.

साहित्य :- थर्मामीटर ,हात मोजी, कोदवही पेन,

कृती:- पहिल्या आम्ही गोठ्यात गेलो आणि तापमान घेतले.

१) उरमानीबादी ब बकरीची तापमान घेतले.तर -९९-२.f इतके आहे.

२) सोजत शेळी चे तापमान -१०१’.५’f एवढे आहे.

३) सपना सेवेची तापमान १००.९’f

४) संगमनेरी शेळीचे तापमान १०१.६’f

५) सांनेन शेळीचे तापमान १००.१५ f

६) खडकी शेळीचे तापमान १००.१५’f

७) निरज बोकडाचे तापमान १०२.३’ f

काळजी :- १) शेळ्यांना त्रास नाही झाला पाहिजे.

२) तापमान घेतांना हात मोजे वापरावे.

निरिक्षण :- तापमान घेतीना बकरी जास्त वेळ स्थिर राहत नाही.

१३) गोठ्यातील स्वच्छता व फवारणी

उदेश :- गोठ्यातील स्वच्छता करणे व गोचीडवर नियंत्रण करणे

कृती :- १) आंम्ही पाहिले गोठ्यातील साफ सफाई केली

२) जनावरांना चांगल्या जागी बांधून ठेवले

३) गाईचे रोग उचलून ते खतामधे टाकले

४) गाईंना स्वछ धूवून घेतल

५) त्यानंतर फवारणीच्या द्वारे पूर्ण गोठ्या फवारणी केली

६) त्यानंतर चुना पाण्यात घोळून पूर्ण गोठ्यात मारला

७) ह्याने पूर्ण गोठ्यातील जंतूंचा नायनार होईल

  • गोचिडमुळे जनावरांचा आरोग्यावर पण परिणाम होतो काही परिणाम दिसून येतात काही दिसत नाही
  • गोचीड हे जनावरांचे रक्त शोसून घेते व त्यांना अशक्तपणा येवू शकतो
  • जनावरांमधून विवीध प्रकारचं परजिव आडलतात पण वेलो वेळी त्यांना फवारणी करून घ्यावी .

१४) प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती

उदेश :- प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती

कृती :- १) गोंधने – म्हणजे आपण प्राण्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या शरीरावर ट्याटू कडतो

२) बिला मारणे – म्हणजे आपल्याकडे जास्त प्राणी असल्यास त्यांचावर लक्ष नाही जात किंवा एखादा प्राणी हरवू शकतो म्हणुन त्यांना नंबर दिला जातो

३) ब्राडींग – म्हणजे आपण जो नंबर देत असतो तो नंबर ग्राम करून त्यांचा अंगावर मारला जातो नंबर गरम करून मारताना 5 सेकंद पर्यंत टच करून ठेवला जातो

काळजी :- ब्रांडिंग करताना 4 सेकंद वर गरम केलेला सिका मांडीवर ठेवला नाही पाहिजे नाहीतर त्यांची मंडी जाळून त्यानं त्रास होईल .

15) कीटक नाशक आणि बुरशी नाशक फवारणी तयार करणे

उद्देश :- कीटक नाशक आणि बुरशी नाशक फवारणी तयार करणे

साहित्य :- पंप,पाणी,ORGA NEEM,व DANTOTSU,कीटक नाशक

कृती :-

१) सर्वात आधी आपल्या फवारणी यंत्रात १०ली पाणी भरून घ्यावे
२) आधी पंप स्वच्छ धुवून घ्यावा
३) नोझल मधून सगळी कडे समान फवारणी पडत आहे कि नाही हे बघून घ्यावे
४) पंपात स्वच्छ पाणी भरून घ्यावे
५) त्यानंतर ORGANEEM 25ml व DANTOTSU हे टाकल

६) त्यानंतर सर्व पेरूच्या रोपाला व मिरचीच्या रोपाला फवारणी केली

काळजी:-

१) फवारणी करताना पाण्याच्या वर खाली दोन्ही जागी फवारणी करावी
२) गरजे पुरता फवारणी करावी
३) फवारणी करताना सुरक्षा ठेवावी
४) फवारणी करताना आपल्या डोळ्याची व त्वचेची काळजी घ्यावी
५) शरीर स्वच्छ करून घ्यावे

Agricultural Sprayer Pump In Depalpur, Madhya Pradesh - Dealers & Traders
  • फवारणी करण्याच्या आधी घेण्याची काळजी
    १) पंप स्वच्छ धुवून घ्यावा
    २) पाईपच्या आतली स्वच्छता करून घ्यावी
    ३) नोझर साफ करून घ्यावे

  • फवारणी करताना घ्यायची काळजी
    १) आपल्या सुरक्षेसाठी मास्क किंवा कापड तोंडाला बांधावा
    २) हातात हॅन्डग्लोज घालावे
    ३) हवा ज्या दिशेने असेल त्या दिशेने फवारणी करावी
    ४) फवारणी झाल्यावर शरीर स्वच्छ करून घ्यावे

  • फवारणी झाल्यावर घ्यायची काळजी
    १) पंप स्वच्छ धुवून घ्यावा
    २) नोझल व पाईप साफ करून घ्यावे
    ३) आपली स्वच्छता करून घ्यावी