धूर विरहित चुलहा
धुर विरहित कार्य:-
१) नेहमीच्या चुलीत जाळाच्या उष्णतेचा जेवढा वापर होतो त्याच्या सुमारे दुप्पट अधिक उष्णता मिळले.
२) पहिल्या टप्यात शिल्लक राहिलेला कार्बन दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे जळतो व या टप्यात देखील य वापर करता येतो.
धुर विरहित चुलीचे फायदे –
१) इंधनाची (लाकडाची) बचत होते.
२) जंगल तोड कमी व पर्यावरणाचे संवर्धन.
३) वापरलेल्या इंधनाचा पुरेपूर व पूर्ण उपयोग होतो.
४) चुलीतील जाळापासून सुरक्षितता.
५) एकाच वेळी चुलीचा दुहेरी उपयोग,
६) स्वयंपाक करणे सुरक्षित,
७) कमीत कमी वायू प्रदूषण.
इंधन म्हणजे काय :-
जे पदार्थ कमी तापमानास (ज्वलनांक) पेट घेतात; जळाल्यानंतर भरपूर उष्णता देतात असे पदार्थ आपण इंधने म्हणून वापरतो. केरोसिन (रॉकेल), गोबर गॅस (मिथेल), एल.पी.जी. (ब्यूटेन) ही सर्व इंधने ही कार्बन व हायड्रोजनपासून बनलेली असतात, यात कार्बनची साखळी असते. जेवढी साखळी लांब तेवढे ते इंधन जळण्यास कठीण. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये दाबाखाली द्रवरुप ब्युटेन वायू साठवलेला असतो. सिलेंडरमधून बाहेर आल्यावर दाब कमी होतो. व द्रवाचा वायू बनतो.
खाली तीन वेगवेगळ्या इंधनांचा वापर करून वेळ खालीलप्रमाणे आहे.