प्रॅक्टिकल – 1 हत्ती गवताची लागवड
साहित्य – टिकाव,फावडे,खोर
कृती – सर्व प्रथम हत्ती गवत लागवड विषयी माहिती घेतली व जागा मोजून घेतली ८५×२१ फुट जागेत ३, ३ फुटांच्या सऱ्या बनवल्या व पाणी सोडण्यासाठी पाठा बनवले.आणी दिड दिड फुटांच्या अंतरावर हत्ती गवताची लागवड केली ३०० हत्ती गवताची लागवड केली.नंतर पाणी सोडलं

हत्ती गवत लागवडीसाठी जमीन तयार करताना
प्रॅक्टिकल – (२) प्राण्यांच्या वजनावरून त्यांचे खाद्य ठरवणे
साहित्य – वजन काटा
कृती – (१) प्राण्यांच्या वजनानुसार त्यांचे खाद्य कसे ठरवायचे याविषयी माहिती घेतली .
(२) नंतर शेळ्यांची वजन केले.
(३) वजन केल्यानंतर त्यांची वजन किती आहेत त्यानुसार खाद्य किती लागते ते काढून बघितले.
(४) खुराक ,सुखाचारा ,ओला चारा किती प्रमाणात द्यायचे हे कळाले.

शेळीचे वजन मोजताना
प्रॅक्टिकल – (३) माती परीक्षण
साहित्य – चंचूपात्र , बॉटल इ.
कृती – (१) माती परीक्षण का करायची त्याविषयी माहिती घेतली.
(२) माती परीक्षण करण्यासाठी मातीच्या नमुना कसा घ्यायचा त्याविषयी माहिती घेतली.
(३) झिगझॉग किंवा नागमोडी पद्धतीने पद्धतीने मातीच्या नमुना घ्यावा लागतो
(४) माती आणली व प्रात्यक्षिक माती परीक्षण करून बघितले
(५) सॉइललॅब मध्ये जाऊन माती परीक्षण केली.


माती परीक्षण करताना
प्रॅक्टिकल – (४) वनस्पती प्रसाराच्या पद्धती
साहित्य – ट्रे पॉलिथिन कटर.
कृती – (१) तुतीचे फांद्या तोडून आणल्या.
(२) डोळा असलेले फांद्या तोडल्या फांद्याची कटिंग केली.
(३) बेडमध्ये मातीत 50% शेणखत मिसळून त्यात ट्रायकोडर्मा पावडर टाकली
(४) आणि त्यात तुतीचे फांद्यात टाकल्या .आणि पाणी दिल्या आणि ह्युमिडिटी चेंबरने झाकून दिले. आणि बी पद्धती खोड पान पद्धती कलम पद्धती याविषयी माहिती घेतली.

तू तिचे कलम लावताना
प्रॅक्टिकल – ( ५) कंपोस्ट खत तयार करणे
साहित्य – फावडा , घमेला पॉलिथिन
कृती – (१) कंपोस्ट खत तयार करणे विषयी माहिती घेतली.
(२) कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सर्वात पहिले जमिनीवर एक पॉलिथिन ठेवली.
(३) सात इंची उंचीवर पाला पाचोळा टाकल्या व वरून शेणखताची स्लरी टाकली.
(४) व पुन्हा पाला पाचोरा टाकल्या व शेणखत स्लरी टाकली.
(५) नंतर पाणी सिंपळले याप्रकारे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी ठेवले.

कंपोस्ट खत तयार करताना
प्रॅक्टिकल – (६) बीज प्रक्रिया
साहित्य – टिकाव फावडा खोर ट्रे कॅरेट इत्यादी.
कृती – १) सर्वात प्रथम बीज प्रक्रिया विषयी माहिती घेतली व ज्या बियावर पेरणीपूर्व केलेली जाणारी प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया होय.
२) बीज प्रक्रियेमध्ये तीन पद्धतीत आपण वीज प्रक्रिया करू शकतो एक भौतिक पद्धत रासायनिक पद्धत रासायनिक पद्धत आणि जैविक पद्धत
३) 600 ग्रॅम कांद्याचे बिया घेतल्या व त्यात ट्रायकोडर्मा पावडर मिसळली व
४) व सर यात फेकल्या.
५) नंतर पाठा पद्धतीने पाणी सोडले.

जमीन तयार करताना
प्रॅक्टिकल – (७) ठिबक सिंचनाची काळजी व देखभाल
साहित्य – ड्रिपर टी जॉइंडर. इ.
कृती – १) ठिबक सिंचनाची काळजी व देखभाल साठी पंपांच्या पुढे एक वॉटर मीटर पाणी मोजण्याचे प्रेशर गेज दाबमापक यंत्र बसवावे.
२) पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा दाब आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास पंप तपासून त्याची दुरुस्ती करावी.
३) दर दोन दिवसांनी पंपांच्या आवाज त्यांचे तापमान व गळती तपासाव
४) गाळण्याची देखभाल व पाणी घालण्यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण्या वापरल्या जातात
५) वाळूची गाळणी किंवा जाडीच्या गाडीने पाईप लाईन उपनद्या तोट्या किंवा ड्रीपर्स याविषयी माहिती घेतली

ठिबक सिंचनासाठी ड्रीपर जॉइंडर लावताना
क्टिकल -(8) गाईचे अंदाजी वजन काढणे
साहित्य – टेप वही पेन
कृती – १) गाईचे अंदाजे वजन काढण्यासाठी सर्वप्रथम आम्ही गाईचे अंदाजे वजन काढणे विषयी माहिती घेतली .
२) आणि टीप च्या साह्याने गाईची लांबी व रुंदी मोजले लांबी मध्ये सिंगी पासून तर शेपूट पर्यंत.
३) रुंदी मध्ये छातीच्या घेरा मोजले.
४) व अ×अ×ब÷१०४१६ या सूत्रावरून अंदाजी गायीचे वजन काढले.

गायीची अंदाजी वजन काढण्यासाठी मीटरटेपने गाईचे लांबी व छातीचा घेरा मोजताना
क्टिकल – (9) मास उत्पादन साठीच्या जाती
कृती – १) मास उत्पादन साठीच्या जाती विषयी व्हिडिओ बघितली व त्याची माहिती घेतली.
२) यामध्ये शेळ्यांची जाती त्यांची नावे मूळ स्थान रंग शरीराचे वजन पाळण्याच्या उद्देश या जोडी देण्याची क्षमता याविषयी माहिती घेतली.
३) यामध्ये उस्मानाबादी संगमनेरी शिरोही आफ्रिकन बोअर आणि सानेन बरबरी या शेळ्यांच्या जाती विषयी माहिती घेतली.


शेळ्यांना खाद्य टाकताना
क्टिकल – (10) वनस्पती उती संवर्धन
साहित्य – चंचुपात्र मोजपात्र सॅनिटायझर मीडिया इत्यादी
कृती – १) वनस्पती उती संवर्धन म्हणजेच प्लांट टिशू कल्चर विषयी माहिती घेतली व त्याविषयी एक व्हिडिओ बघितले.
२) या रोपट्यातील अथवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी अथवा त्या वाढविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो याला प्लांट टिशू कल्चर असे म्हणतात याविषयी माहिती घेतली .
३) आई ए बी ए ग्रोथ रेगुलेटर
ऑक्शिन
सायटो की नाईन याविषयी माहिती घेतली.
४) स्वाईन लॅब जाऊन टिशू कल्चर विषयी माहिती घेतली आणि प्रॅक्टिकल केले .


प्लांट टिशू कल्चर चे प्रॅक्टिकल करताना
क्टिकल -11- किचन गार्डन (सॅग गार्डन)
उद्देश – किचन गार्डन विषयी माहिती घेणे.
साहित्य – माती शेणखत खते विटांचे तुकडे पीव्हीसी पाईप पिशवी कडुलिबाचे पाले. राख.
कृती – 1) सर्वात पहिले आम्ही किचन गार्डन विषयी माहिती घेतली
2) नंतर माती राख शेणखत खते विटांचे तुकडे पीव्हीसी पाईप पिशवी कडुनबाचे पाले गोळा केले.
3) हे सर्व मटेरियल एकत्र करून मिक्स केले आणि एका पिशवीत टाकले.
4) एका पिशवीत पीव्हीसी पाईप उभी करून विटांचे तुकडे टाकले व पाईप मध्ये खडे टाकले व माती शेणखत टाकले तिच्यात बिट टाकले.
5) आणि पिशवी नीट ठेवले.

किचन गार्डन तयार करण्यासाठी माती खत पाले मिक्स करताना
प्रॅक्टिकल- 12 पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे
साहित्य – हावडा टिकाव इत्यादी
कृती – 1) टिकाव व फावडीच्या साह्याने जमीन सपाट केली .
2) एक एकसमान वापी तयार केली व फाठा बनवले.
3) नंतर पाठा पद्धतीने आणि सोडले.
4) व भोपळ्याचे रोपे युनिटी जेलमध्ये पाच ते दहा मिनिट बुडवून ठेवले
5) नंतर भोपळ्याचे रोपे लावले.

भोपळ्याची रोपे लागवड करताना
प्रॅक्टिकल -13 तन आणि तन नियंत्रण
लवाळा आघाडा रेशीम काटा मार्ट रानमाठ काटेरी मठ करडू कुंजारु रुई चिकटा ओसाडी गाजर गवत काँग्रेस पांढरी फुले मतारी रान करला गोखरू सहादेवी एक दाढी के ना चांदवेल अमरवेल बिसरम दीपमाळ दुधाने हजरदाने जोडली ताकड लाजाळू पातेरी अंबुशी तोतरा धोत्री पिवळा खारड वांदळे कुसाळी गवत छोटा चिमन चारा लोना.
या प्रकारचे गवत शेतीत खालील प्रमाणे नुकसान करतात
पिकांचे पाणी शोषून घेतात पिकाला पाणी कमी पडतात
गवत हा कीटक वाढवण्याचे काम करतात
जास्त गवत झाले की पिकाला चांगला हवा भेटत नाही
पिकांची वाढ होत नाही
गवताचे नियंत्रण = भौतिक पद्धत – खुली ने नांगरणी करणे खुरपिणे खुरपून काढणे
रासायनिक पद्धत = तन नाशकाची फवारणी करणे

फवारणी करताना
प्रॅक्टिकल – 14 बीज प्रक्रिया
जे अभियावर पेरणीपूर्व केली जाणारी प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया.
भौतिक पद्धत – बिया पाण्यामध्ये भिजवले जातात भाताचे बी पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवतात.
राख चोळणे -राखी जैविक कीटकनशक काचे काम करते एक किलो बियांना साधारणता अर्धा किलो राग सोडावी बिया अर्धा तास सावलीत सुखावी व नंतर त्याची पेरणी करावी
रासायनिक पद्धत – एक किलो ज्वारीच्या बियांना दहा ग्रॅम गंधक पावडर सोडणे
100 लिटर पाण्यात 250 ग्रॅम एम 45 नॅनकोझेब टाकून मिसळावे त्याच मिश्रणात उसाचे डोळे दहा मिनिट बुडवावे व लागवड करावी
कांद्याची रोपे – युनिक एसिड आणि एम 45 च्या द्रावणात बुडवल्याने मुळाची चांगली वाढ होते आणि कांद्या ला करपा रोग कमी येतो
जैविक पद्धत – बीज प्रक्रिया करण्यासाठी जैविक घटकाची वापरण करणे
उदाहरण . ट्रायकोडर्मा, पीएसबी, नायको रिझा
बियांच्या कडकपणा तुटते व उगवण क्षमता वाढते
उदाहरण. बुरशीजन्य रोग नाहीसा होतो.
औषधाची बचत खर्च कमी होतो

कांद्याची लागवड करण्यासाठी जमीन तयार करताना आणि कांद्याची बिया फेकताना