1) शेळी पालन

• शेळीच्या जाती

(अ) देशी जाती

  1. उस्मानाबादी
  2. संगमनेरी
  3. जमनापारी
  4. सिरोही

(ब) विदेशी जाती

  1. सानेन
  2. आफ्रिकन बोअर
  3. अल्पाइन
  4. अंगोरा
  5. तोगेनबर्ग

• मेंढ्यांच्या जाती

(अ) देशी जाती

  1. दख्खनी
  2. नेल्लोर
  3. बन्नूर
  4. माडग्याळ

(ब) विदेशी जाती

  1. मेरीनो

• शेळ्यांचे प्रजनन

  1. वयात येण्याचा काळ सरासरी 7 ते10 महिने.
  2. प्रथम गर्भ राहण्याचे वय 11 ते 15 महिने.
  3. प्रथम गाभण राहताना शरीराचे वजन 22 ते 24 kg.
  4. गाभण काळ 145 ते 150 दिवस.
  5. दोन वेतातील अंतर 7 ते 9 महिने.

• मेंढ्यांचे प्रजनन

  1. मेंढींचा गाभण काळ 142 दिवस ते 152 दिवस.
  2. प्रथम गाभण राहण्याचे वय 14 ते 20 महिने.
  3. मेंढ्यांच्या ऋतुकालाचा अवधी 36 तास.

• खाद्य ( Feeding )

  1. Dicoats plants ( द्विद्वल झाडे)
  2. monocoats plants ( एकदल झाडे )
  3. Dry fodder ( सुखा चारा )
  4. concentrated feed ( खुराक/ रतीब )

2) माती परीक्षण

• माती परीक्षण म्हणजे :-

  1. शेतजमीनीतील रासायनिक आणि जैविक घटकांचे विश्लेषण करणे.
  2. माती परीक्षणामध्ये मातीतील घटकांचे प्रमाण कळते, त्यानुसार कोणत्या पिकांसाठी ती उपयुक्त आहे आणि कोणत्या घटकांची कमतरता आहे हे समजते.
  3. एकंदरीत माती परीक्षणातून जमिनीची सुपीकता, आरोग्य आणि उत्पादकता समजते.

• माती परीक्षण का?

  1. मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते.
  2. जमीन आम्लधर्मी आहे की विम्लधर्मी हे समजते.
  3. संतुलित खतांचा वापर आणि खतांचे बचत करता येते.
  4. अन्नद्रव्यांचा समतोल राखणे.
  5. जमिनीची सुपीकता टिकवणे.

• मातीचा नमुना केव्हा घ्यावा :-

  1. मातीचा नमुना पीक काढणीनंतर आणि नांगरणीच्या आधी घ्यावा.
  2. खाते टाकल्यानंतर मातीचा नमुना घेऊ नये.
  3. पिकांमधील दोन ओळींच्या मधून माती घ्यावी.

• मातीचे नमुने कसे घ्यावेत :-

  1. सर्वात आधी नमुना घेण्याचा जागा निश्चित करावे.
  2. सदरच्या ठिकाणी इंग्लिश ‘ V ‘ आकाराच्या 20cm खोलीचा खड्डा घ्यावा त्या खड्ड्यातील माती बाहेर काढावी.
  3. सर्व खड्ड्यांमधून माती एकत्र करून त्यांचे समान चार भाग करावे.
  4. समोरील दोन बाजूंची माती काढून टाकावी आणि पुन्हा मातीचे चार भाग करावे. ( अशी कृती 0.5 kg माती होईपर्यंत करत राहावी. )
  5. वरील माती ओली असेल तर ती सावलीत वाळवावी.

• नमुना तपासणीसाठी देताना घ्यायची काळजी :-

  1. नमुना क्रमांक
  2. नमुना घेतल्याची दिनांक
  3. शेतकऱ्याचे संपूर्ण नाव
  4. गाव, पोस्ट, जिल्हा, तालुका
  5. सर्वे किंवा गट क्रमांक
  6. नामुन्यांचे क्षेत्र
  7. बागायत किंवा जिरायत
  8. मागील हंगामातील पीक आणि वाण
  9. पुढील हंगामातील पीक आणि वाण
  10. जमिनीचा उतारा किंवा सपाट
  11. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट.

• माती परीक्षणाचे फायदे :-

  1. माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्य आणि जमिनीचे दोष समजतात आणि त्याप्रमाणे नियोजन करता येते.
  2. जमीन आम्लधारी किंवा विम्लधारी हे समजते त्यानुसार पिकांची निवड आणि खतांची नियोजन करता येते.
  3. जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात.
  4. खतांचा संतुलित वापर होऊन खतांचा येणारा खर्च कमी करता येतो.
  5. जमिनीची सुपीकता टिकून ठेवता येते आणि उत्पादन क्षमता वाढवता येते.

• उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण :-

Soil Test

3) कुक्कुटपालन

• कोंबड्यांच्या जाती संकरित व गावठी

कोंबड्यांची अंडी मास व पिल्लांच्या उत्पादनासाठी पाळल्या जातात. या व्यवसायातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीच्या कोंबड्यांची निवड करून व्यवसाय करावा..

1. गिरीराज

ही जात अंडी मास उत्पादनासाठी उपलब्ध असते. एका दिवसाचे पिल्लाचे वजन 45gm असते. या जातीच्या नराचे वजन 4 ते साडेचार पर्यंत असते. या जातीच्या मादी वर्षाला किमान 230 ते 250 अंडी देते. अंड्यांचा रंग तपकिरी असते. या जातीचा वापर जास्त प्रमाणात होतो.

2. वनराज

वनराज ही हैदराबादच्या कुक्कुटपालनाच्या प्रकल्प संचनाद्वारे विकसित केलेली आहे. या कोंबड्यांचे एक दिवसाचे पिल्लू 40 ते 50gm एवढे असते. या जातीची मादी वर्षाला 180 ते 200 अंडी देते.

3. कावेरी

या कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी गावरान चवदार सारखे असते. या कोंबड्या वर्षभरात 180 ते 200 अंडी देतात. अंडी व मास यासाठी फायदेशीर ठरते.

4. सह्याद्री/ सातपुडा

ही जात कोकणातल्या वातावरणासाठी असून यामध्ये विविध रंगाचे प्रकार आढळतात. काटक व रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. या कोंबड्यांचे मास खाण्यासाठी गावरान सारखी चवदार असते. सरासरी वजन 3 ते 3.5 एवढे असते. या कोंबड्या वर्षभराला 180 ते 200 अंडी देतात. अंड्यासाठी व मासासाठी फायदेशीर ठरते.

• अंडी व मांस उत्पादनासाठी ही कोंबडी पाळली जाते:-

  1. कलिंगा ब्राऊन:- कलिंगा ब्राऊन ही कोंबडी उत्पादनक्षम अशी सुधारित गावरान कोंबड्यांची जात आहे. या कोंबड्यांच्या मासाची चव देशी कोंबड्यांसारखे असते.
  2. कडकनाथ:- कडकनाथ हे देशी कोंबड्यांची दुर्मिळ प्रजात आहे. औषधी गुणधर्म व चविष्ट माप यासाठी या कोंबड्या प्रसिद्ध आहेत. या जातीच्या मासाला बाजारात मोठी मागणी असते.

• विदेशी जाती

  1. व्हाइट लेगहॉर्न :- इटली देशातील ही जात लेगहॉर्न या गावाचे असून ती हलक्या जातीमध्ये मोडते. या कोंबड्या वर्षाला दोनशे ते तीनशे इतके अंडी देते. या जातीच्या कोंबड्यांचे व्यवस्थापन व्यावसायिक दृष्ट्या काळाजीपूर्वक करावी लागते.
  2. न्होड आयलँड रेड :- ही मुळीच अमेरिकेतला न्होड आयलँड अमेरिका बेटातील आहे. या जातीची कोंबडी वर्षाला सुमारे 180 ते 200 अंडी देते. सरासरी वजन 56kg असते.

आहारः– कोंबड्यांना संतुलित आहार द्या, ज्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, आणि जीवनसत्त्वे असावीत.त्यांना पाण्याची चांगली उपलब्धता हवी.

४. आरोग्यःनियमित आरोग्य तपासणी करा.लसीकरण आणि रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करा.

५. बाजारपेठः- स्थानिक बाजारात अंडी आणि मांसाची विक्री करणे.ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आपल्या स्थानिक वातावरणानुसार योग्य तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे महत्त्वाचे आहे.

4) BATTREY SPRAYER PUMP

पिकांवर फवारण्याचा यंत्र म्हणजेच spreying pump..!!

बटाट्याच्या शेतीमध्ये फवारणी करताना:-

• Battery Sprayer spare Parts:-

  1. Motor :- पाण्यावर दाब देण्याचे कार्य करते.
  2. Switch :- चालू व बंद करण्याची कार्य करते.
  3. Handle:- स्प्रे चालू बंद करण्यासाठी.
  4. nosal :- 1) पाण्याची दिशा ठरवण्यासाठी. 2) पाण्याचे थेंबात रूपांतर करण्यासाठी. 3) वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे नोझल असतात.
  5. 16 mm :- मोटर पासून नोझल पर्यंत पाणी पोहोचवण्याचे कार्य करते.
  6. Charger :- बॅटरी चार्ज करण्यासाठी.

• petrol pump

• mist gun

• Tractor mount sprayer pump

• Agri drone sprayer

• Hand sprayer

• फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी:-

  1. मास्क, चष्मा, बूट, कोट वेगळे ठेवावे.
  2. फवारणीनंतर हात, तोंड पाण्याने स्वच्छ धुवावे.
  3. फवारणीचे औषध मुलांपासून दूर ठेवावे.
  4. use केलेल्या औषध लवकरात लवकर नष्ट करावे.
  5. फवारणीचे औषध खाण्याच्या पदार्थापासून दूर ठेवावे.
  6. वाऱ्याचे वेग जास्त असल्यास फवारणी करू नये.
  7. फवारणी करताना माणसांना व प्राण्यांना शेतात येऊ देऊ नये.
  8. फवारणी करताना कोणतीही व्यसन करू नये.
  9. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करावे.
  10. फवारणीचे expire date पाहूनच फवारणी करावे.

5) दुध काढण्याच्या पद्धती:-

जनावरांचे दूध काढत असताना योग्य पद्धतीत दूध काढणे व हाताळणे गरजेचे आहे.

1) हाताने दूध काढणे:-

  1. मूठ पद्धत :- या पद्धतीचा उपयोग गाईचे दूध काढण्यासाठी वापर केला जातो.
  2. चिमटा पद्धत :– ही पद्धत प्रामुख्याने शेळ्या व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.
  3. अंगठा पद्धत :- ही पद्धत प्रामुख्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी वापरले जाते.

• फायदे

  1. सडाला इजा होत नाही.

• तोटे

  1. वेळ जास्त जातो.
  2. लेबर चार्ज जास्त लागते.
  3. खर्च जास्त होतो.
  4. जास्त जनावरांसाठी ही पद्धत वापरली जात नाही.

2) मशीनने दुध काढणे :-

  1. सोलार चलित यंत्र :- यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून दूध यंत्र चालवली जाते.
  2. इलेक्ट्रिक मिल्किंग मशीन :- हे मशीन घरातील विजेवर चालवले जाते.

• फायदे

  1. वेळ कमी लागतो.
  2. लेबर चार्ज कमी लागते.
  3. खर्च कमी लागतो.

• तोटे

  1. खर्च जास्त येतो.
  2. कासेमध्ये दूध शिल्लक राहते त्यामुळे हाताने दूध काढावे लागते.
  3. मशीनमुळे जनावरांना सडाचे आजार होऊ शकते.

6) बीज प्रक्रिया

• बियाणे पेरणीपूर्वी बियांवर प्रक्रिया करतात कारण बियाणे व्यवस्थित उगवण्यासाठी, निरोगी रोपे तयार होण्यासाठी, पिकांचे किडे पासून संरक्षण होण्यासाठी, रोपांची चांगली वाढ होण्यासाठी. बियाणे रोग व किडे मुक्त राहण्यासाठी बियांवर रासायनिक, जैविक, भौतिक व संजीवके ( PGR) आणि जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया केली जाते. याला बीज प्रक्रिया असे म्हणतात.

• फायदे

  1. बियाणांचे चांगली उगवण होते.
  2. रोपांची व पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  3. पिक जोरदार येते.
  4. जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जिवाणूपासून पिकांचे संरक्षण होते.
  5. पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
  6. रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.
  7. बियाणांची उगवण क्षमता वाढते.

• साहित्य

  1. बियाणे
  2. बुरशीजन्य औषधे [ अँजोबॅक्टर, रायझोबिअम, सल्फर ( गंधक), पाणी ]

• साधने

1. घमीले, बादली, रद्दीपेपर, हातमोजे, मास्क.

7) बटाटा शेती

कोणतेही पीक उगवण्यासाठी सर्वात आधी जमीन तयार करावी लागते.( Field preparation) म्हणून शिफारस केलेली खत मात्रा काढली.

1 Hector= 2.5 एकर N : P: K

= 100 : 80 : 80 kg \ hector.

Fertilizer

  1. 50% nitrogen
  2. Full dose phosphorus
  3. Full dose potassium
  4. 50% nitrogen plantation झाल्यावर 30 दिवसानंतर द्यावे.

हे सर्व समजून घेतले.

1) soil testing

सर्वात आधी आम्ही बटाटा शेती करत असताना soil testing केली. व नंतर soil test चे NPK काढले.

N – 140 low

P – 13

K – very High

2) Required fertilizer dose

Google वरून potato चे NPK काढले.

N – 120 kg

P – 240 kg

k – 120 kg

Soil testing व required fertilizer dose वरून आलेले NPK:-

N – 120 × 50 = 180 kg

P – 240 × 25 = 300 kg

K – 120 × 50% = 60 kg

NPK काढल्यानंतर:-

1) 180 kg नत्र जमिनीत द्यायचे असेल तर युरिया किती लागेल हे काढले:-

1 kg N मिळवण्यासाठी 2.17 युरिया लागतो.

तर 180 kg N साठी :-

= 180 × 2.17

= 360.6 kg युरिया लागतो.

2) single super phosphate :- स्फुरद (P)

(SSP) = 16% P

:- 100 = 16

:- 100 × 1 = × गुणिले 16

:- × = 100/16 = 6.25

जेव्हा 6.25 kg ssp घेऊ तेव्हा 1kg P मिळेल.

म्हणून 300 kg P साठी :-

300 × 6.25

= 1875/50 kg ssp

= 37.5 गोणी लागले.

3) Murate of pottash :- पालाश (K)

100 kg MOP = 14.5 kg K

100 = 14.5 × X

:- 100/14.5 = X

:- X = 6.89 kg

जेव्हा आपण 6.89 kg MOP घेऊ तेव्हा आपल्याला 1 kg (K) मिळेल.

म्हणुन 60 kg (k) साठी:-

60 × 6.89

= 413 kg MOP लागले.

वरील सर्व खत मात्रा आम्ही बटाट्याच्या शेतीमध्ये दिले.

8) मूरघास तयार करणे

सर्वात आधी मूरघास तयार करताना लागणारी पिके :-

1. ज्वारी, मक्का, हत्ती गवत

आम्ही मुरघास तयार करताना सर्वात आधी ज्वारी घेतली व त्याची कृटी करून घेतली. ज्वारीचे बारीक तुकडे करून घेतले दोन ते तीन सेंटीमीटर एवढे व त्यानंतर 50 kg च्या पिशवीमध्ये चारा टाकला व त्यानंतर त्यामध्ये मीठ व गूळ टाकले त्यानंतर चारा टाकला परत त्यामध्ये मीठ आणि गुळ टाकले आणि परत एकदा त्यामध्ये चारा टाकला व पिशवीत हवा जाऊ नये याची काळजी घेतली आणि पिशवी घट्ट बांधली….!!

आपण मुरघास तयार करताना पुढील अडचणी येऊ शकतात:-

  1. हवा बंद न होणे.
  2. बुरशी लागणे.
  3. PH न तपासणे. PH तपासताना PH 4.7 पेक्षा कमी असावे.

Photo:-

9) गाईचे अंदाजे वजन काढणे

आम्ही कालवडीचे वजन काढले वजन काढताना कालवडीचे मोजपट्टीच्या साह्याने लांबी मोजून घेतली व छातीचा घेरा मोजून घेतला.

लांबी :- 150

रुंदी :- 35

सूत्र :- (छातीचा घेर ) 2 * लांबी/ 666

35 × 35 × 150 ÷ 666

= 275 kg

वरील वजन आले.

10) वनस्पती ऊती संवर्धन

उती संवर्धन म्हणजे झाडाच्या विशिष्ट अवयवांचा भागाची एखादी पेशी किंवा पेशीच्या समूह प्रयोग शाळेत आणि नियंत्रित वातावरणात परीक्षा नलिकेत ( test tube) मध्ये घालून त्यापासून रोपांची अभिवृद्धी करण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीस उती संवर्धन म्हणतात.

उती संवर्धन हे जैवतंत्रज्ञान ( Bio Technology ) या आधुनिक शास्त्राचा एक भाग आहे. डॉ. मोरेल या शास्त्रज्ञाने फ्रान्समध्ये 1960 मध्ये ऑर्किड या फुलझाडांमध्ये ऊती संवर्धनाचा उपयोग केला.

उती संवर्धन करण्याची पद्धत :-

उती संवर्धनाची पद्धत ही चाट कलमासारखीच असून त्यामध्ये 1 cm पेक्षा कमी लांबीचे खोड, मूळ, पान, फुल किंवा मुकुल ( डोळे ) यांचे तुकडे उपयोगात आणले जातात. एका डोळ्यापासून अनेक रोपे तयार करता येतात या गुणधर्माचा उती संवर्धन तंत्रामध्ये प्रामुख्याने वापर केला जातो. ज्यामध्ये अन्नद्रव्य, अमिनो आम्ले, साखर, संजीविके इ. चा समावेश असतो.

फायदे :-

  1. कमीत कमी कालावधीत निवड केलेल्या मातृवृक्ष पासून त्यांचेच अनुवंशिक शुद्ध गुण असलेली लक्षावधी दर्जेदार रोपे तयार करता येतात.
  2. रोपांची नियंत्रित वातावरणात वर्षभर निर्मिती करता येते रोपे विषाणू, जिवाणू व रोगापासून मुक्त आणि निरोगी असतात.
  3. निर्मित रोपांची रेषा लांब अंतरावर किंवा प्रदेशातील लाभ अंतरावर वक्री करता येते. कारण ही रोपे परीक्षानळीत नियंत्रित आणि निर्जंतू वातावरणात तयार केलेली असतात. निर्जंत असल्यामुळे आयात निर्यात बाबतीत क्वारंटाईन बाबतच्या अडचणी येत नाहीत

11) दुधातील भेसळ

दुधामध्ये कॅल्शियम, विटामिनस, फॅट्स, कार्बोहायड्रेट अशा अनेक गोष्टी असतात.

दुधामध्ये मिक्स केल्या जाणाऱ्या गोष्टी :-

जसे की दुधामध्ये पाणी टाकणे व दुधाची कॉन्टिटी वाढवणे.

melarine chemical सुध्दा मिक्स केले जाते प्रोटीन लेवल वाढवण्यासाठी.

fourmiline chemical दूध जास्त काळ टिकून राहावे म्हणून युज केला जातो.

12) प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती

उदा. आपल्या गोठ्यामध्ये गाईंची संख्या जास्त असल्यास आपल्याला ऐका गाईला ओळखण्यास अडचण येत असे होऊ नये म्हणून आपण पुढील पद्धती वापरू शकतो.

Tag

tatto

stamp

आपण इयर टॅग use करू शकतो प्लास्टिक किंवा मेटलचे टॅग कानाला लावून त्यावर नंबर लिहू शकतो.

Tattoo :- आपण त्वचेवर गोंदण करुन ओळख बनवू शकतो.

13) प्राण्यांच्या दातावरून वय काढणे.

प्राण्यांना 8 दात असतात. दातातील जी पहिली जोbडी असते ती वयाच्या 15 किंवा 18 महिन्यात येते. दुसरी जोडी जी येते ती 20 किंवा 25 महिन्यात येते. तिसरी जोडी जी असते ती 24 किंवा 31 महिन्यात येते. चौथी जोडी जी असते ती 30 किंवा 35 व्या महिन्यात येते. उदा. शेळी जर 3 वर्षाची झाली असेल तर तिला सर्व दात आलेले असतात.

14) शेळीचे FCR काढणे

आम्ही शेळीच्या पिल्लांचे आधीचे वजन घेतले व आताचे वजन घेतले ते पुढीप्रमाणे

  1. Jocky weight :-2.650 kg हे 12 दिवसा अगोदर चे वजन आहे.

आजचे वजन = 4.370 – 2.650

दूध 400 ml = 1.720 ÷ 12

= 143. 75

Jocky चे weight आज 4.370 आहे तर Jocky चे एका दिवसाला 145.75 gm येवढे वाढत आहे.

सूत्र = आधीचे वजन – आताचे वजन = वाढलेले वजन

आधीचे वजन घेतल्यापासून ते आताचे वजन घेई पर्यंत दिलेले खाद्य किंवा दुध ÷ वाढलेले वजन

उदा. Jocky

.

15) Fogger ( तुषार सिंचन )

तुषार सिंचनच्या पद्धती :-

  1. One way fogger.
  2. Two way fogger.
  3. 4 way fogger.

एका नोझल मधून 7 LPH एवढे पाणी येते. आपल्या पॉलिहाऊस मध्ये 4 way fogger use करतो. 1 micron 0.01 mm एवढे असते. दोन फॉगर मधील अंतर हे 2.5 मीटर असली पाहिजे. 5 – 7°c तापमान कमी करू शकतो. Coverage area हे 5.5 sq m/2 एवढे असावे.

पॉलिहाऊस च्या पद्धती :-

  1. Fan pad polyhouse
  2. natural ventilated polyhouse.

16) हायड्रोपोनिक शेती

हायड्रोपोनिक शेती हे पाण्यावर केली जाणारी शेती आहे. पिक उत्पादन वाढीसाठी पुढील आवश्यक पीक अन्नद्रव्ये :-

• मुख्य अन्नद्रव्ये :-

  1. नत्र
  2. स्फुरद
  3. पालाश

• दुय्यम अन्नद्रव्ये:-

  1. कॅल्शियम
  2. मॅग्नेशियम
  3. सल्फर

• सूक्ष्म अन्नद्रव्ये:-

  1. कार्बन डायऑक्साइड
  2. हायड्रोजन
  3. लोह
  4. मॅगनीज
  5. बोरॉन
  6. झिंक
  7. कॉपर
  8. मॉलिब्डेनम
  9. क्लोरीन
  10. ऑक्सिजन

नायट्रोजन हे हवेमध्ये जास्त प्रमाणात आढळते. हवेमध्ये 78% nitrogen आहे.

17) कलम तयार करणे

कलम तयार करणे म्हणजे एका झाडाचा भाग दुसऱ्या झाडाच्या भागाला जोडला जातो तेव्हा नवीन झाड तयार होते त्यालाच कलम करणे असे म्हणतात.

कलम चे तीन प्रकार असतात ते पुढील प्रमाणे:-

1) गुटी कलम :- आम्ही डाळिंबाच्या झाडावर गुटी कलम केले ते पुढील प्रमाणे ताठ फांदी घेतली त्या फांदीचे साल काढले 5 cm एवढे त्यावर स्पॅगन मॉसने ( शेवाळ ) झाकून ठेवले. शेवाळ्यावर पॉलिथिनची पट्टी गुंडाळली. व सुतळीने घट्ट बांधून घेतले.

2) दाब कलम :- आम्ही पेरूच्या झाडावर दाब कलम केले. दाब कलम केल्याने त्या फांदीला मुळ्या फुटतात मुळे फुटल्यानंतर मुळ्यासह फांदी कापून घेणे व ते मोकळ्या ठिकाणी लावणे.

3) पाचर कलम :- या पद्धतीमध्ये कुंटाचा व्यास 2.5 cm एवढे असते किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. सर्वप्रथम खुंटावर आडवा छाट मारावे त्यानंतर दुसऱ्या कलमाची पाचर बसेल अशा प्रकारे 3 ते 6 cm कापून खुंटाचा मध्यभागी काढावी. व ते जोड बांधून टाकावे. अशा पद्धतीने पाचर कलम केली जाते.

18) पिकांना पाणी देण्याच्या पद्धती

  1. पारंपारिक पद्धत
  2. पाटाने पाणी देणे.
  3. ठिंबक सिंचन
  4. तुषार सिंचन

• पाटाने पाणी देणे :- म्हणजेच सरी पद्धत होय. जमिनीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडणे पाण्याचे व्यवस्थापन करण्याची एक पद्धत यामध्ये पाण्याचे पथक किंवा सरी बनवून जमिनीतून पाण्याचे वितरण केले जाते.

• ठिंबक सिंचनामुळे पुढील फायदे होतात:-

  1. पाणी बचत :- कमी पाणी वापरून अधिक उत्पादन होते.
  2. समान पाणी वितरण :- प्रत्येक झाडाला आवश्यक पाणी मिळते.
  3. मातीचा संरक्षित वापर :- पाण्यामुळे मातीला हानी कमी होते.

19) जमीन मोजणी

1फूट= 12 inch

2 फूट= 24 inch

3 फूट= 36 inch एवढे असते.

नेहमी फुटाचे रूपांतर इंच मध्ये करत असताना दिलेल्या संख्येस 12 ने गुणावे.

नेहमी इंच चे रूपांतर फुटामध्ये करताना दिलेल्या संख्येस 12 ने भागावे.

हे सर्व समजून घेतले.

20) PGR ( plant growth regulator )

पुढील औषधे वापरली जातात :-

  1. Gibberellic acid :- हे acid plant चे hight वाढवण्यासाठी use केला जातो.
  2. Saytrocaynic
  3. Ethilin :- हे acid फळ पिकवण्यासाठी use केले जाते.
  4. Abscisic Acid :- stress relief करण्याचे काम करते.
  5. Auxil :- हे acid पान किंवा फुल चे size वाढवण्याचे काम करते.

21) जैविक खते तयार करणे ( गांडूळ खत )

गांडूळ खत तयार करत असताना त्या खतावर दिवसभर सावली राहील अशा ठिकाणी ठेवावे. गांडूळ खत तयार करत असताना साधारणपणे 2000 गांडूळ खतामध्ये सोडावी. खड्डा साधारण 1 मीटर लांब व 60 cm रुंद असा खड्डा असावा. त्या खड्ड्यामध्ये अर्ध कंपोस्ट खत व अर्धवट कुंजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापाचोळा मिसळून खड्डा भरावा. हे झाल्यानंतर गादी वाफा तयार होईल. हे खाद्य अंदाजे 200 kg होते या गादी कफ्यामध्ये 2000 गांडूळ सोडावी व त्यानंतर गादीवाफेवर गोणपटाचे अच्छादन करावे. दिवसातून तीन वेळा पाणी शिंपडावे. अशाप्रकारे गांडूळ खत तयार होते. हे खत झाल्यानंतर हाताने बाजूला करावे शक्यतो आपण खत बाजूला करत असताना अवजरांचा वापर करू नये जसे की टीकाव, ,खोरे, खुरपे ई. ) खड्डा नेहमी ओलसर ठेवावा.

• गांडूळाच्या शेतीसाठी फायदे:-

  1. गांडुळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
  2. मातीच्या कणांचा रचनेत उपयुक्त बदल घडविला जातो.
  3. तांदुळाची विस्टा म्हणजे उत्तम प्रकारचे खत आहे. याला ह्युमस असे म्हणतात.
  4. जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
  5. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी होते.
  6. जमिनीची धूप कमी होते.
  7. गांडूळ खत विशेषता अन्नधान्य, भाजीपाला व फलबागात उपयुक्त असते.

22) शेतात येणाऱ्या गवताची माहिती

शेतात आपण कोणतीही बी न टाकता उगवणारे झाड त्यालाच आपण शेतात येणारे गवत म्हणतो.

वैशिष्ट्ये:-f

  1. त्या झाडाची वाढ खूप लवकर होते.
  2. आपल्या शेतातील झाड वर सावली त्या झाडाची पडते व शेतातील झाडांना अन्न करायला व ऊर्जा मिळत नाही.
  3. या झाडांना पाणी कमी लागते.
  4. सर्व ऋतूत वाढ होते व जगतात.
  5. आपल्या झाडाचे खत ते शोषून घेतात.
  6. काही वनस्पती औषधी असतात.

गवताची पुढील नावे आहेत:-

  1. गामाघास
  2. दूर्वा घास
  3. मोथा
  4. चिरजीव शाक
  5. पांढरी लसूण
  6. चौलाई
  7. बारीक गवत
  8. चिंचोली गवत
  9. एक काडी गवत
  10. काँग्रेस

PROJECT

2024 – 2025

विभागाचे नाव :- Agriculture

प्रोजेक्टचे नाव :- शेळीच्या पिल्लांचे FCR काढणे.

करणाऱ्याचे नाव :- Alanka Pawar

साथीदाराचे नाव :- Kirti Pawar, Sagar kokare, Ishwar Bhosale

मार्गर्शन करणाऱ्याचे नाव :- Bhanudas Sir

प्रस्तावना :- शेळीचे FCR काढणे आम्ही शेळीच्या पिल्लांचे आधीचे वजन घेतले व आताचे वजन घेतले ते पुढीप्रमाणे

Jocky weight :-2.650 kg हे 12 दिवसा अगोदर चे वजन आहे.

आजचे वजन = 4.370 – 2.650

दूध 400 ml = 1.720 ÷ 12= 143. 75

Jocky चे weight आज 4.370 आहे तर Jocky चे एका दिवसाला 145.75 gm येवढे वाढत आहे. FCR काढताना पुढील सूत्र वापरले.

सूत्र = आधीचे वजन – आताचे वजन = वाढलेले वजनआधीचे वजन घेतल्यापासून ते आताचे वजन घेई पर्यंत दिलेले खाद्य किंवा दुध ÷ वाढलेले वजन घेतले.