ठिबक सिंचन प्रकल्प
१. प्रस्तावना
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीत पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास पीक उत्पादन वाढते आणि पाणी वाचते. आजच्या काळात पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे ठिबक सिंचन पद्धती अत्यंत उपयुक्त ठरते. या पद्धतीत पाण्याचा अपव्यय होत नाही आणि झाडांच्या मुळाशी थेंबथेंब पाणी पोहोचवले जाते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि खर्चही कमी होतो.
२. उद्देश
या प्रकल्पाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे :
- पाण्याची बचत करणे.
- झाडांना आवश्यक तेवढेच पाणी देणे.
- सिंचनासाठी लागणारा वेळ आणि श्रम कमी करणे.
- आधुनिक शेती पद्धतीची माहिती घेणे.
- ठिबक सिंचन प्रणालीचे प्रत्यक्ष कार्य समजून घेणे.
३. सर्वे
आमच्या परिसरातील काही शेतकऱ्यांशी चर्चा केली असता असे आढळले की अनेक शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. त्यांनी सांगितले की या पद्धतीने पाण्याचा वापर ५०% पर्यंत कमी होतो, झाडांची वाढ एकसमान होते आणि खत देणेही सोपे जाते. काही ठिकाणी शासनाकडून अनुदानही मिळते. त्यामुळे ही पद्धत सर्वाधिक लोकप्रिय होत आहे.
४. साहित्य
या प्रकल्पासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :
- फावडे
- खोरी
- टिकाव
- घमेलं
- पाईप (मुख्य लाईन व शाखा लाईन)
- नळ्या (ड्रिपर नळ्या)
- झाडांची रोपे (फुलझाडे व फळझाडे)
- मोजपट्टी
- पाणीपुरवठा टाकी
५. कृती
- सर्वप्रथम जागेची साफसफाई केली.
- नंतर जमिनीची नांगरटी केली.
- जागा मोजून घेतली आणि झाडांच्या ओळींचे अंतर ठरवले.
- त्या ठिकाणी खड्डे खोदले.
- फुलझाडे व फळझाडे आणून लावली.
- झाडांना पाणी घातले.
- ठिबक सिंचनासाठी मुख्य पाईप बसवले.
- प्रत्येक झाडाजवळ नळी जोडली.
- नळ्यांमधून एक मिनिटात किती थेंब पाणी पडते ते निरीक्षण केले.
- सर्व प्रणाली व्यवस्थित कार्य करते याची खात्री केली.
६. लर्निंग (शिकलेले)
- ठिबक सिंचनाची रचना कशी करतात हे समजले.
- पाण्याचा योग्य वापर कसा करायचा हे कळले.
- शेतीत तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो हे शिकता आले.
- टीमवर्क आणि नियोजन याचे महत्त्व कळले.
७. निरीक्षण
- एक मिनिटात साधारणपणे ३० ते ४० थेंब पाणी पडले.
- प्रत्येक झाडाच्या मुळाशी समान प्रमाणात पाणी पोहोचले.
- माती ओलसर राहिली पण पाण्याचा अपव्यय झाला नाही.
- काही दिवसांनंतर झाडांची वाढ चांगली दिसली.
८. निष्कर्ष
ठिबक सिंचन ही शेतीतील आधुनिक आणि उपयुक्त पद्धत आहे. या पद्धतीत पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते, झाडांची वाढ एकसमान होते आणि श्रम कमी लागतात. त्यामुळे ही पद्धत सर्व शेतकऱ्यांनी वापरावी.
९. आलेल्या अडचणी
- काही ठिकाणी पाईपमधून गळती झाली.
- पाणी दाब कमी असल्यास सर्व नळ्यांमधून समान पाणी येत नाही.
- नळ्या बसवताना योग्य अंतर राखणे थोडे कठीण गेले.
- काही वेळा कचरा पाईपमध्ये अडकला, त्यामुळे साफसफाई करावी लागली.