1.प्रस्तावना:
आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवणे ही काळाची गरज बनली आहे. शहरीकरणामुळे हरित क्षेत्रांची कमतरता निर्माण झाली असून, प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत बाग किंवा गार्डन ही एक सुंदर आणि शांततादायक जागा ठरते, जिथे लोक निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू शकतात. त्यामुळेच एक सुंदर, सुसज्ज आणि पर्यावरणपूरक बाग तयार करण्याचा संकल्प केला आहे.
2.सुरुवात:
या गार्डेन प्रकल्पाची सुरुवात स्वच्छता, मातीची मशागत, झाडांची निवड, पाणीपुरवठा व्यवस्था आणि निवडलेल्या ठिकाणाची मोजणी करून करण्यात येईल. बागेत फुलझाडे, औषधी वनस्पती, शोभेची झाडे तसेच सावली देणारी झाडे लावण्यात येतील. यासाठी स्थानिक लोकांचे आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाईल.
3.उद्देश:
- पर्यावरण संवर्धन: हरित क्षेत्र वाढवून परिसरातील प्रदूषण कमी करणे.
- सामाजिक जागरूकता: लोकांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करणे.
- शारीरिक व मानसिक आरोग्य: नागरिकांना ताज्या हवेचा आणि निसर्गाच्या सहवासाचा अनुभव देणे.
- शिक्षण व अभ्यास: विद्यार्थ्यांसाठी वनस्पतीशास्त्राचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी निर्माण करणे.
- सौंदर्यवर्धन: परिसर अधिक आकर्षक व सुंदर बनवणे.
4. गार्डनिंगसाठी साहित्य:
1. हातातील साधने (Hand Tools):
- खुरपी (Trowel): झाडं लावण्यासाठी आणि माती खणण्यासाठी
- खोरे (Hoe): तण काढण्यासाठी आणि माती फोडण्यासाठी
- फावडा (Spade): माती उपसण्यासाठी
- कुड (Rake): माती समतल करण्यासाठी किंवा पाने गोळा करण्यासाठी
- कात्री (Pruner / Shears): फांद्या कापण्यासाठी
2. पाणी देण्यासाठी साहित्य:
- पाण्याची टाकी / कॅन (Watering Can): झाडांना पाणी घालण्यासाठी
- पाईप (Hose Pipe): मोठ्या भागाला पाणी देण्यासाठी
- स्प्रिंकलर: मोठ्या गार्डनसाठी पाण्याचं छिंपक
3. माती आणि खतासाठी:
- कंपोस्ट बिन (Compost Bin): सेंद्रिय खत तयार करण्यासाठी
- खते (Fertilizers): वनस्पतींच्या पोषणासाठी
- मुल्चिंग साहित्य (Mulch): मातीचं थर झाकण्यासाठी
4. झाडं लावण्यासाठी साहित्य:
- रोपे (Saplings / Seedlings)
- बिया (Seeds)
- गमले (Pots / Grow Bags)
- माती (Soil): जसे की गार्डन माती, लाल माती, पोषणद्रव्ययुक्त मिक्स
5.कृती:
- माती निवडणे व तयार करणे
- भुसभुशीत व सेंद्रिय खतयुक्त माती निवडा.
- कुंडी किंवा गमला घ्या व त्यात ही माती भरा.
- बिया पेरणे
- पालकाच्या बिया मातीच्या १–२ से.मी. खोलीवर पेरा.
- बियांच्या मध्ये थोडं अंतर ठेवा.
- पाणी घालणे
- हळूवारपणे पाणी शिंपडा.
- दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या.
- देखभाल करणे
- तण (नको असलेली झाडं) वेळच्यावेळी काढा.
- गरजेनुसार खत द्या.
- पालकाची काढणी
- बिया पेरल्यानंतर २५–३० दिवसांनी पाने कापून वापरता येतात.
6.निरीक्षण
निरीक्षण करताना खालील गोष्टी लिहाव्यात:
- तारीख आणि वेळ – निरीक्षण केव्हा केलं?
- काय पाहिलं? – कृती / प्रयोग / निसर्ग / झाड वगैरे
- बदल काय दिसले? – रंग, आकार, वास, चव, उष्णता, गती इ.
- परिणाम काय झाला?
- तुमचा निष्कर्ष / मत – यातून काय शिकला?