शेळीपालन

शेळीपालनाच्या  पद्धती 

1.बंदिस्त शेळीपालन पद्धती

2.अर्धबंदिस्त. शेळीपालन पद्धती

बंधीस्त शेळीपालन 

शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.

अर्धबंदिस्त शेळीपालन

शेळ्या या विशेषत: फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.

1.उस्मानाबादी

मूळ स्थान :लातूर ,तुळजापूर ,उदगीर, उस्मानाबाद

रंग       :काळा

पाळण्याचा उद्देश :दूध ,मटन

शरीराचे वजन :नर = 50 मादी = 40

जुळे देण्याची क्षमता : 60%ते 80%

वैशिष्टे            :1. चविष्ट मटणसाठी प्रसिद्ध

                  2. दोन पिले देते .

                  3. रोग प्रतिकरक शक्ति उत्तम

2. सानेन

Saanen goat buy in Nur-Sultan

मूळ स्थान : स्विझरलँड

रंग  : पांढरा

पाळण्याचा उद्देश: दूध

शरीराचे वजन :नर =80 ,मादी =65

जुळे देण्याची क्षमता 65%

वैशिष्टे            :1. जगात  सर्वात जास्त दूध देणारी जात.

                  2. दररोज 3 ते 4.5 लीटर दूध देवू शकते.

3. सांगमनेरी   

           

मूळ स्थान  : सांगमनेर ,अहमदनगर

रंग    :पांढरा  किवा क्वचित दुसऱ्या रंगाचे ठिबके असतात .

पाळण्याचा उद्देश : दूध ,मटन

शरीराचे वजन :नर =40 ,मादी =50

जुळे देण्याची क्षमता : 25%

वैशिष्टे            :1. संख्या कमी होत चालली आहे

                  2.  संवर्धनाची गरज आहे

 4. सिरोहि  

मूळ स्थान : राज्यस्थान  गुजरात पालमपुर

रंग      : मुख्यता  तपकिरी त्यावर हलक्या तपकिरी रंगाचे ठिबके असतात .

पाळण्याचा उद्देश  :दूध , मटन

शरीराचे वजन : नर = 70 ,मादी = 40 ते 50

जुळे देण्याची क्षमता : 40%

वैशिष्टे            :1. बंधीस्त शेळीपालणासाठी उपयूक्त

                  2. बकरी ईद साथी विशेष मागणी .

5. आफ्रिकन बोअर

मूळ स्थान : दक्षिण आफ्रिका

रंग       : मानेवर गडद तपकिरी व पूर्ण शरीरावर पांढरा

पाळण्याचा उद्देश : दूध , मटन

शरीराचे वजन :नर =100 ते 130 , मादी 70 ते 90

जुळे देण्याची क्षमता : 90%

वैशिष्टे           :1. खायला  व्यवस्तीत मिळाल्यास दाररोज 200 ते 250g                                     वजनात वाढ

 6. बीटल

मूळ स्थान :पंजाब , हरियाणा

रंग     :90% शेळयांमध्ये काळा रंग    

पाळण्याचा उद्देश :दूध , मटन

शरीराचे वजन : नर 80=120 , मादी =60

जुळे देण्याची क्षमता : 53%

वैशिष्टे            :1. बंधीस्त शेळी पालणासाठी उपयुक्त

                  2. नरामध्ये दाट दाढी असते .

                  3. मादीमध्ये दाडी  आढळत नाही .