प्रकल्प अहवाल 2022-23
विभागाचे नाव:-agriculture
प्रकल्पाचे नाव:-compost bed,तयार करणे.
प्रकल्प करणाऱ्याचे नाव:- प्रथमेश मेसाजी कांबळे
पत्ता:- लोणी, काळभोर जि.पुणे ता.हवेली
साथीदाराचे नाव:- लक्ष्मण भोरे
मार्गदर्शक:- सोनल मॅडम
प्रकल्प केल्याचे ठिकाण:- विज्ञान आश्रम, पाबळ
मु.पो.पाबळ,ता. शिरूर,जि. पुणे
प्रकल्प सुरू करण्याचे दिनांक:-09/12/2022
प्रकल्प समाप्ती दिनांक:-15/01/2022
मार्गदर्शक. प्राचार्य. संचालक
अनुक्रमांक:-
1) प्रस्तावना:-
कंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी दिलेल्या रासायनिक खतांमधील अन्नद्रव्य विद्राव्य स्वरूपात रूपांतर घेऊन पिकांना उपलब्ध होतात. तसेच जमिनीत महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करण्यास मदत होते. सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून कंपोस्ट खत तयार होते. सेंद्रिय पदार्थ कार्बनच्या अनेक संयुगाने बनलेले असतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू असते आणि शेवटी सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर साध्या असेंद्रिय संयुगात होते. जमिनीच्या उत्पादन क्षमतेत सेंद्रिय पदार्थाचे कार्य सुपीक जमीन बनविण्यात सेंद्रिय पदार्थाचा प्रत्यक्ष सहभाग असतो. कारण त्यामधून हळूहळू अन्नद्रव्ये पिकासाठी उपलब्ध होतात. सेंद्रिय पदार्थांच्या खनिजीकरणामुळे कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस व इतर मूलद्रव्य मुक्त होतात. भारी जमिनीत चिकण मातीच्या कणांचे प्रमाण जास्त असते.
2) उद्देश:-
कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.
कंपोस्ट खतामुळे भारी जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मातीची धूप कमी होते. हलक्या जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
3) अडचणी:-
बेड साठी कागद शोधावा लागला.
आणि पाणी देताना, अडचण आली.
4) निरीक्षण:-
कम्पोर्ट करण्यासाठी 30ते45 दीवस लागतात. व कम्पोर्ट बेड ला 1अठोडा सलग पाणी द्यावे लागते. कारन त्यामुळे ते कुजते. 1अठोड्या नंतर फक्त अठोडयातुन एकदा पाणी घालावे.
5) संदर्भ:-
• compost bed, कोणत्या प्रकारचे असते. हे नीट पाहिले.
• अभियांत्रिक पुस्तकातून पाहिले.
• सोनल मॅडम कडून विचारून माहिती घेतली.
• नेटवर व्हिडिओ पाहिले.
6) नियोजन:-
पहिले कंपोस्ट बेड बद्दल माहिती घेतली,त्यानंतर त्याला लागणारे साहित्य जमा केले, एक जागा निश्चित केली त्यावर कंपोस्ट बेड लावले.
अनुभव:-
कंपोस्ट खत का तयार करावे हे समजले व त्याचे फायदे समजले कंपोस्ट खत शेतात कसे टाकावे हे समजले त्याचे काय परिणाम होतात त्याबद्दल माहिती मिळाली कंपोस्ट बेड तयार होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो हे पण समजते.
माहिती ;-
आम्ही तीन कम्पोर्ट बेड तयार केले.
1)शेनाचे
2) कोंबडं खत
3) अझोला
1)शेण खत;-
10kg शेण खत+10kgकडबा
शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकते. जनावरांच्या गोठ्यातील शेणामध्ये जनावरांचे मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्यांचे अवशेषही असतात. गोठ्याच्या कडेला माती टाकून त्यात जनावरांचे मूत्र शोषून घेता येते.
2) कोंबडं खत;-
10kgकोंबडं खत+10kgकडबा
कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. कोंबडी खतामध्ये मुख्यतः १३ अन्नद्रव्ये असतात. सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे ०.५ टक्क्याच्या खाली चालले आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. बऱ्याच प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते. कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो. ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात.
3)अझोला खत;-
10kgअझोला खत+10kg10kgकडबा
नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही याचा वापर होतो. पण नत्राबरोबरच या वनस्पतीत प्रथिने, जीवनसत्त्वे (अ आणि ब) असेच क्षारतत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ॲझोलामध्ये प्रथिनेचे प्रमाण २५ ते ३० टक्के, १०-१५ टक्के खनिज व ७-१२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ल असतात.
%costing%
अ.क्र. | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किमत | |
1) | बाजरी चा कडबा | 10 kg | 1रु | 10रु | |
2) | यूरिया | 10 kg | 10 रु | 100 रु | |
3) | आजोला | 10 kg | 100 रु | 1000 रु | |
4) | शेण | 10 kg | 2 रु | 20 रु | |
5) | कोंबड खत | 10 kg | 3.42 रु | 34.2 रु | |
6) | पाणी | (30 दिवस =1,015 लीटर) | 1लीटर =0.015) | 15.85 रु |
एकूण आलेला खर्च =1180.05