गेस्ट होस्टेल वायरिंग

१) प्रस्तावना

मी विज्ञान आश्रममध्ये इलेक्ट्रिकल कोर्स करत असताना गेस्ट होस्टेल वायरिंग हा प्रत्यक्ष प्रोजेक्ट निवडला. या प्रोजेक्टचा उद्देश प्रत्यक्ष इमारतीमध्ये पूर्ण वायरिंग सिस्टिम कशी डिझाईन करायची, बसवायची व सुरक्षितपणे चालू करायची हे शिकणे होता.
या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काम आम्ही स्वतः केले, जसे की डायग्राम काढणे, मार्किंग करणे, मटेरियल खरेदी करणे, वायरिंग करणे, बोर्ड भरणे, MCB बसवणे आणि अर्थिंग करणे. त्यामुळे आम्हाला थिअरीसोबत प्रॅक्टिकल ज्ञान मिळाले.

२) उद्देश

  1. गेस्ट होस्टेलसाठी योग्य वायरिंग प्लॅन तयार करणे.
  2. डायग्रामप्रमाणे प्रत्यक्ष साइटवर काम करणे शिकणे.
  3. सेफ्टी नियम पाळून इलेक्ट्रिकल काम करणे.
  4. मार्किंग, पट्टी फिटिंग आणि वायरिंगचा अनुभव घेणे.
  5. स्विच बोर्ड, MCB बोर्ड आणि अर्थिंग कनेक्शन करणे शिकणे.
  6. मटेरियल निवड व खरेदी कशी करायची हे समजून घेणे.
  7. खर्चाचा अंदाज (आर्थिक नियोजन) लावणे शिकणे.
  8. टीमवर्क, टाइम मॅनेजमेंट आणि जबाबदारीने काम करणे शिकणे.

३) कृती (प्रक्रिया)

  1. सर्वप्रथम गेस्ट होस्टेलची पाहणी करण्यात आली.
  2. कुठे लाईट पॉईंट, फॅन पॉईंट, प्लग पॉईंट व स्विच बोर्ड येणार याचा डायग्राम काढण्यात आला.
  3. डायग्रामप्रमाणे लेझर मशीन वापरून अचूक मार्किंग करण्यात आले.
  4. मार्किंगनंतर पट्टी (PVC पट्टी) फिटिंग करून घेतली.
  5. आवश्यक मटेरियलची यादी तयार केली.
  6. गावामध्ये जाऊन वायर, स्विच, सॉकेट, MCB, बोर्ड, पट्टी इत्यादी मटेरियल खरेदी केली.
  7. खरेदी करताना योग्य दर्जाचे आणि योग्य रेटचे मटेरियल कसे निवडायचे हे शिकलो.
  8. पट्टीमध्ये योग्य साईजची वायर टाकून वायरिंग पूर्ण केली.
  9. स्विच बोर्ड भरले आणि कनेक्शन व्यवस्थित केले.
  10. MCB बोर्ड भरणे व त्याचे कनेक्शन शिकले.
  11. संपूर्ण वायरिंगनंतर अर्थिंग करण्यात आली.
  12. शेवटी सर्व पॉईंट्स चेक करून टेस्टिंग करण्यात आली.

४) निरीक्षण

  1. डायग्राम असल्यामुळे काम नियोजनबद्ध आणि सोपे झाले.
  2. लेझर मार्किंगमुळे काम अचूक आणि सरळ झाले.
  3. पट्टी फिटिंग योग्य केल्यामुळे वायरिंग नीट आणि सुरक्षित झाली.
  4. चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे वायरिंग टिकाऊ झाली.
  5. MCB मुळे सेफ्टी वाढली.
  6. अर्थिंग केल्यामुळे विद्युत धोक्याचा धोका कमी झाला.
  7. टीममध्ये काम केल्यामुळे वेळेचे योग्य नियोजन झाले.
  8. प्रत्यक्ष काम करताना आत्मविश्वास वाढला.

५) निष्कर्ष

या गेस्ट होस्टेल वायरिंग प्रोजेक्टमधून मला इलेक्ट्रिकल क्षेत्रातील खूप महत्त्वाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. मी मार्किंग, पट्टी फिटिंग, वायरिंग, बोर्ड भरणे, MCB बसवणे, अर्थिंग करणे हे सर्व काम स्वतः शिकले.
याशिवाय मटेरियल खरेदी, खर्चाचा अंदाज (आर्थिक ज्ञान), टाइम मॅनेजमेंट आणि टीमवर्क यासारख्या कौशल्यांचा विकास झाला.
हा प्रोजेक्ट माझ्या भविष्यातील इलेक्ट्रिकल कामासाठी खूप उपयोगी ठरेल आणि मला एक जबाबदार व कुशल इलेक्ट्रिशियन बनण्यास मदत करेल.

गेस्ट होस्टेल वायरिंग ची कॉस्टिंग

अ.क्रमालाचे नाव / साहित्यनग / मीटरदर (₹)एकूण किंमत (₹)
1Angle holder2730810
216 Amp Socket3145435
316 Amp Switch375225
46 Amp Socket24451080
56 Amp Switch4422968
6Ceiling Rose620120
7Zero Bulb340120
8Tube Light82001600
9Adapter1220240
10Regulator52801400
11Insulation Tape1010100
123 Module260120
132 Module380240
146 Module101201200
1516 Amp Module (S.S)2160320
16MCB SP3150450
17MCB 40 Amp1590590
18Fuse1620320
19D-Hook640240
20Square Box3210320
21Rawl Plug2115315
22Bottom Holder430120
23Tie1160160
242.5 sq mm Wire (Red & Black)235657130
251 sq mm Wire (R,B,G)316404920
261 sq mm Wire (Yellow – 45m)1820820
27Indicator380240
280.75 inch Patti1745765
291 inch Patti70503500
3035×8 Patti1080800
313 Module Plate265130
326 Module Plate101351350
3312 Module Plate3230690
3412 Module Surface3150450
35Earthing Rod1380380
36Earthing Powder1100100
37Earthing Tar18080

एकूण मटेरियल खर्च = ₹ 32,848 /-