आवळा प्रकल्प
प्रस्तावना:-
आवळा हे एक औषधी गुणधर्म असलेले फल असून त्याला आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन C, खनिजे व अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते. आवळा डोळ्यांच्या, केसांच्या तसेच पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो.
परंतु आवळ्याचा हंगाम मर्यादित असल्याने तो जास्त काळ टिकवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. यामधून लोणचं, मुरंबा, रस, कँडी इत्यादी स्वरूपात आवळ्याचे पदार्थ तयार करून ते वर्षभर वापरता येतात.
या प्रकल्पाच्या माध्यमातून मी आवळ्याचे गुणधर्म, त्यावरील प्रक्रिया पद्धती व त्याचे आरोग्यदायी फायदे यांचा अभ्यास केला आहे.
उद्देश:-
१. आवळ्यामधील औषधी गुणधर्म व पोषक घटकांचा अभ्यास करणे.
२. आवळ्यातील विटामिन C आणि त्याचे आरोग्यावरील फायदे समजून घेणे.
३. आवळा जास्त काळ टिकवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रिया (मुरंबा, लोणचं, कँडी, रस इ.) जाणून घेणे.
४. आवळ्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे आरोग्यदायी महत्त्व समजून घेणे.
५. स्थानिक स्तरावर आवळ्याच्या प्रक्रियेमुळे मिळणारे आर्थिक फायदे ओळखणे.
सर्वे:-
आवळा हा एक औषधी गुणधर्म असलेला फल आहे. पारंपरिक पद्धतींमध्ये तसेच आयुर्वेदामध्ये आवळ्याला विशेष स्थान आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून आवळ्याचा वापर, त्याचे फायदे आणि लोकांमध्ये असलेली जागरूकता समजून घेण्याचा प्रयत्न केला.
सर्वेक्षणातून दिसून आलेले मुद्दे :
१. बहुतेक लोक आवळ्याचा वापर कच्चा किंवा लोणचं/मुरंबा स्वरूपात करतात.
२. काही लोकांना आवळा तिखट-आंबट चवेमुळे थेट खायला आवडत नाही, त्यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थ अधिक लोकप्रिय आहेत.
३. अनेकांना आवळ्यामध्ये विटामिन C जास्त प्रमाणात असते हे माहीत आहे.
४. आरोग्याबाबत जागरूक लोक आवळ्याचा वापर नियमितपणे करतात.
५. ग्रामीण भागात आवळ्याचा वापर पारंपरिक पद्धतींनी (लोणचं, रस) केला जातो, तर शहरी भागात कँडी, ज्यूस, गोळ्या या स्वरूपात अधिक वापर केला जातो.
वापरलेले साहित्य:-
१. कच्चा आवळा – विविध पदार्थ तयार करण्यासाठी मुख्य घटक.
२. साखर – मुरंबा, कँडी व रस तयार करण्यासाठी.
३. मीठ – लोणचं तयार करताना.
४. हळद – लोणच्यासाठी.
५. मेथी दाणे – लोणच्यासाठी.
६. मोहरी दाणे व मोहरी पावडर – लोणच्यासाठी.
७. तेल – लोणचं टिकवण्यासाठी.
८. पाणी – रस व कँडी प्रक्रियेसाठी.
९. काचेची बरणी / डबे – पदार्थ साठवण्यासाठी.
१०. गॅस शेगडी व भांडी – उकळणे, शिजवणे व प्रक्रिया करण्यासाठी.
११. चमचे व चलनी – माप घेण्यासाठी व गाळण्यासाठी
कृती :-
१. आवळा मुरंबा
साहित्य: आवळा, साखर, पाणी.
- आवळे स्वच्छ धुऊन उकळत्या पाण्यात शिजवून घ्यावेत.
- शिजलेले आवळे हलके दाबून बिया काढाव्यात.
- साखरेचा पाक करून त्यात आवळे टाकावेत.
- काही तास पाकात भिजवून ठेवून नंतर साठवावा.
२. आवळा कँडी - साहित्य: आवळा, साखर.
- आवळे शिजवून त्यांचे तुकडे करावेत.
- साखरेच्या पाकात टाकून २-३ दिवस मुरू द्यावे.
- नंतर त्यांना उन्हात वाळवून कँडी तयार करावी.
३. आवळा लोणच - साहित्य: आवळा, मीठ, हळद, मेथी दाणे, मोहरी, तेल.
- आवळे उकळून मऊ करून घ्यावेत.
- त्यात मीठ, हळद, भाजून घेतलेले मेथी व मोहरी टाकावे.
- नंतर गरम तेल घालून लोणचं साठवावे.
त्यानुन काय शिकलो -;
- प्रकल्पामुळे मला विषयाशी संनधित नवीन माहीत समजली .
- टीमसोंबत काम केल्यामुळे सांवद कौशल्य वाढले .
- वेळेचे नियोजन कस करायच ते शिकलो .
- समस्या सोडवण्याची पद्धत शिकत आली .
- फक्त थियरी न राहता प्रत्यक्ष प्रयोग /सर्वे /उत्पादन यामधून अनुभव मिळाला .
- काम करताना अडचणी आल्या पण त्यातून नवीन उपाय शोधले .
- आत्मविस्वस वाढला .
- जबाबदारीने काम कस करायच ते शिकलो .
- गटात एकत्र काम करण्याच महत्व समजल .
निरीक्षण
१ गुणधर्म टिकवणे – आवळ्यातील व्हीटामीन c , औषधी गुणधर्म उत्पादन प्रक्रियेत कितपत टिकवतात हे पाहता आल .
२ चव व