आवळा प्रकल्प

मी DBRT ची विद्यार्थिनी आहे. आम्ही आवळा या विषयावर प्रोजेक्ट केला आहे. आवळा हा आरोग्यासाठी उपयुक्त फळं आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन C खनिज आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ति वाढते. आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते. आवळा डोळयांच्या, केसांच्या, तसेच पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो.

परंतु आवळयाचा हंगामा मर्यादित असल्याने तो जास्त काळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. आवळ्यापासून आवळा लोणचे, आवळा कॅडी, आवळा सुपारी, आवळा पावडर इत्यादी आवळयाचे पदार्थ तयार करून ते वर्षभर वापरता येतात.

. या प्रकल्पाच्या माध्यमातून मी आवळयाचे गुणधर्म, त्यावरील प्रक्रिया पद्धती व त्याचे आरोग्यदायी फायदे याचा अभ्यास केला.

. उद्देश :-

. 1) आवळयातील व्हिटामिन सी आणि त्याचे आरोग्यावरील फायदे समजून घेणे.

. 2) आवळा जास्त काळ टिकण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रकिया (मुरांबा, कॅन्डी, लोणचं, पावडर ).

. 3) आवळ्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे आरोग्यदायी महत्व समजून घेणे.

. सर्वे :-

. जयवंत भिकाजी गायकवाड यांची मुलाखत घेतली.त्यांनी आम्हाला आवळा बदल माहिती सांगितली की आवळ्याचे दोन प्रकार आहेत.

. 1) राय आवळा. 2) कंठी आवळा

. आवळयाचा सिझन में ते जून असतो. आवळा साधारण दिवाळी पर्यंत असतो. मार्केट मध्ये आवळ्याचा भाव 70-80 किलो असतो.

. साहित्य :-

. पातेल, चमचा, गॅस, मग, डिश, मीठ, काळी मिरी, जीरा,मसाले, आवळे, व्हिनेगर इत्यादी.

. कृती :-

. सर्व प्रथम आम्ही आवळे निवडून घेतले. त्यानंतर त्याला मीठाच्या पाण्यात 12 तास भिजत घातले. त्यानंतर त्यांना गरम पाण्यात शिजवून घेतले. त्यांनंतर आवळयाला मसाले लावून आणि त्यात तेल घालून मुरायला ठेवले.ते टिकण्यासाठी त्यात व्हिनेगर टाकले.

. त्यानंतर आम्ही त्यांच्या पासून आचार तयार केला. आणि आवळा सुपारी तयार केली.

. त्यातून काय शिकलो :-

. आवळा हा शरीरासाठी उपयोगी असतो.

. निरीक्षण :-

. आवळा हा पसरून ठेवला पाहिजे, नाही तर तो लवकर खराब होतो.

. निष्कर्ष :-

. या प्रकल्पातून आवळा हा खूप पोषक आणि बहुगुणी फळ आहे.हे समजलं त्यांचा खुप औषधी उपयोग होतो. आवळ्यापासून तयार होणारे पदार्थ आणि आर्थिक दोन्ही दुष्टीकोनातून फायदेशीर आहेत. म्हणून आवळयाचे महत्व सर्वांनी जाणून घ्यावे. त्याचा वापर करावा.

. खर्च :-

.

मटेरियल वजन दर किंमत
1) आवळा 8 kg 60 Rs/ kg 480.00
2) लोणचं मसाला 7 packet 50 Rs/ kg 350.00
3) तेल 1.5 kg 130 Rs/ kg 195.00
4). लोणचं बाॅटल 40 बाॅटल 10 Rs/ बाॅटल 400.00
5). लेबलं 40 लेबल 2 Rs/ 1 लेबल 80.00
6) gas चार्जेस 30 gm 870 Rs/ 14 kg 1.86
7) फोईल चार्जेस 40 पेपर 1 Rs/ 14 फोईल 10
8) फोईल चार्जेस 1/2 युनिट 17 Rs / युनिट 500.00
9) मीठ 700 gm 15 Rs/ kg 10.50
10) कलोंजी 70 gm 40 Rs/ 100 gm 28.00
मजूरी 2106.40

.

मोरिंगा चिक्की

. प्रस्तावना :-

. मोरिंगा हा एक असा औषधी गुणधर्म असलेला व पोशनमुल्यानी भरलेला पदार्थ आहे. मोरिगामध्ये क्लाशियम, आर्यन, प्रोटीन व्हिटॅमिन, A , C यांचे प्रमाण खुप जास्त आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

. उद्देश :-

. 1) पोष्टिक व आरोग्यदायी अल्पाहार उपलब्ध करणे.

. 2) ग्रामीण महिलांना व शेतकऱ्यांना उत्पादने साधन उपलब्ध करून देणे.

. 3) मुलांच्या पोषणात सुधारणा करणे.

. साहित्य :-

. 1) 1500 किलो शेंगदाणे

. 2) 1 किलो जवस

. 3) 1 किलो तीळ

. 4) 100 ग्रॅम मोरिंगा पावडर

. 5) 25 ग्रॅम तूप

. 6) 750 ग्रॅम गुळ

. आवश्यक साधने :-

. कढाई/ पातेल

. गॅस शेगडी

. चमचे/ कलथा

. पाट – लाटणे/ रोलिंग पिन

. चाकू 🔪 सुरी

. वजनकाटा

. हायजेनिक पॅकिंग

. कृती :-

. शेंगदाणे, जवस,तीळ, भाजून घ्यावे .

. कढईत गुळ टाकून वितळून घ्यावे. त्यांनंतर तूप टाकून ते मिश्रण करून घ्यावे.

. पाक योग्य होईपर्यंत तो गरम करावा.

. त्यात मोरिंगाची पावडर आणि शेंगदाणे जवस, तीळ मिश्रण करावे.

. थोडं तूप घालून मिश्रण पाटावर ओतून लाटण्याने पसरावे.

. गरम असतानाच चौकोनी/ गोल आकारात कापून घ्यावे.

. थंड झाल्यावर हायजेनिक पॅकिंग मध्ये भरून विक्रीसाठी ठेवावे.

. त्यांतून काय शिकलो :-

. मोरिगाचे महत्व –

. मोंरिगा म्हणजे शेवगा हा पोषणमूल्यांनी समृद्ध असा वनस्पती आहे. त्यांच्या शेंगा, पाने, फुले आणि बिया उपयोगी आहेत.

. पौष्टिक मूल्य –

. मोरिंगाच्य प्रथिने, लोह, कॅल्शियम जीवनसत्त्वे ( A, C ) व अॅटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

. औषधी उपयोग –

  • रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत होते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • शरीरातील सूज व वेदना कमी करण्यासाठी उपयुक्तत.

अन्न व स्वयंपाकातील उपयोग-

. * मोरिगाची पाने भाजी, सूप, पोहे, पराठा यामध्ये वापरता.

. * शेंगा सांबर व इतर भाज्यांमध्ये वापरतात.

. पर्यावरणपूरकता –

. मोरिगा झाड जलद वाढते आणि जमिनीची सुपीकता.

. * मोरिंगा चिक्कीची चव गोडसर व थोडी वेगळी लागते.

. निरीक्षण :-

. * चिक्की खुसखुशीत व पौष्टिक होती.

. * बनवण्यासाठी पध्दत सोपी व कमी खर्चिक आहे.

. निष्कर्ष –

. या प्रकल्पातून आम्हाला कळले की मोंरिगा (शेवगा) हे झाड केवळ भाजीपुरतेच उपयुक्त नसून त्यातून तयार केलेली चिक्की सुध्दा पौष्टिक आणि चविष्ट असते. त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते व स्थानिक संसाधनांचा योग्य उपयोग होतो.

. शिकलो ते,

. * पोषक अन्न तयार करण्याचे कौशल्य.

. * गटाचे काम करण्याचे महत्त्व

. * स्थानिक शेती व झाडांचा उपयोग

. * आरोग्यदायी जीवनशैली साठी कल्पना

. खर्च :-

मटेरियल वजन दर किंमत
1) शेंगदाणे 200 gm 130 Rs 26
2) तीळ 120 gm 200 Rs 24
3) जवस 80 gm 120 Rs 9.6
4). तुप 40 gm 600 Rs 12
5) गॅस 120 gm 870 RS/ unit 7.45
6) गुळ 400 gm 45 Rs 18
7) पॅकिंग बील 2 बाॅक्स 5 Rs 10
8) स्टीकर 2 1.5 3
9) मिक्सर चार्जेस 1/2 युनिट 10 Rs/ unit 5
10) मोरिगा पावडर 20 gm 600 Rs 12
मजुरी 487 187.71

पाव

. प्रस्तावना :-

. भारतामध्ये पाव हा नाश्ता, सॅडविज, मिसळ पाव, वडापाव अशा अनेक पदार्थ मध्ये वापरला जातो. पाव घरगुती पध्दतीने तसेच मोठ्या बेकरी मध्ये तयार केला जातो. या प्रकल्पात पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य, प्रकिया आणि औद्योगिक पध्दत यांचा अभ्यास केला जातो.

. पाव म्हणजे काय –

. पाव हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला एक मऊ आणि हलका बेक केलेला पदार्थ आहे. त्यात पीस्ट घातल्यामुळे पिठ फुलते आणि पाव स्पंजी, हलका व मऊ तयार होतो.

. पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

. 1) मैदा

. 2) पाणी

. 3) पीस्ट (खमीर)

. 4) साखर

. 5) मीठ

. 6) तेल/ लोणी

. 7) दूध

. पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य (घरगुती प्रक्रिया )

. 1) पीस्ट तयार करणे

. * कोमट पाण्यात साखर आणि पीस्ट मिसळून काही मिनिटे ठेवतात.

. 2) मिश्रण फेसाळ झाले की ते तयार झाले असे समजते.

. 2) पीठ मळणे-

. * मैदयात मीठ, साखर, तेल व पीस्ट चे मिश्रण घालतात‌.

. * हे पीठ 10-15 मिनिटे मऊ होईपर्यंत मळतात.

. 3) पहिला फुलवणे

. * पीठ एका भांडयात ठेवून झाकून 1-2 तास ठेवतात.

. * पीठ दुप्पट होते.

. 4) आकार बनवणे

. * फुललेल्या पीठाचे गोळे करून पावाच्या साच्यात ठेवतात.

. 5) दुसरे फुलवणे

. * साच्यात ठेवलेले पीठ 30-40 मिनिटे ठेवतात,ते पुन्हा फुलते.

. 6) बेक करणे

. * ओव्हन 180-200°C वर गरम करून पाव 20-25 मिनिटे बेक करतात

. * पाव सोनेरी रंगाचा होतो.

. 7) थंड करणे

. * पाव ओव्हन मधून काढून थंड होऊन दिला की तो तयार

. पाव तयार.

. पाव खाण्याचे फायदे –

. * हलका आणि पचायला सोपा

. * कार्बोहाइड्रेचा चांगला स्त्रेत

. * विविध पदार्थ सोबत सहज वापरता येतो.

. * घरगुती बनवता तर अधिक पौष्टिक

. निष्कर्ष –

. पाव हा सोपा, हलका आणि सर्वांना आवडणारा खाद्यपदार्थ आहे.

. घरगुती आणि औद्योगिक अशा दोन्ही पद्धतीने तो बनवला जातो.

. पीस्ट हे पाव बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक आहे. योग्य प्रमाणात सामग्री आणि तापमान ठेवले तर उत्तम दर्जाचा पाव तयार होतो.

. खर्च

मटेरियल वजन दर किंमत
1 मैदा 7 kg 40 kg 280
2 इस्ट 150 gm 160 kg 24.00
3 साखर 150 gm 41 kg 6.15
5मीठ 120 gm 15 kg 1.8
6 ब्रेड इंम्पुअर 14 gm 130/ 50 gm 3.64
7 ओव्हन चार्जेस 1 units 14 Rs/ unit 14.00
8 तेल 100 gm 130 / kg 13.00
9मजुरी 465.4965

शेंगदाणा चिक्की

. प्रस्तावना

. शेंगदाणा ही भारतात लहानपणापासून खाल्ली जाणारी एक आवडती व पौष्टिक भाजी आहे. त्याचप्रमाणे, शेंगदाणा वापरून विविध प्रकारचे पदार्थ तयार होतात. त्यापैकी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे चिक्की. चिक्की ही पारंपरिक भारतीय गोड पदार्थ असून, ती चविष्ट, पौष्टिक आणि ऊर्जा देणारी असते.

. शेंगदाणा चिक्की तयार करणे ही एक सोपी प्रक्रिया असून, घरगुती व व्यावसायिक दोन्ही प्रकारांनी तयार केली जाते. या प्रोजेक्ट द्वारे मला मला शेंगदाणा चिक्कीच्या तयारीची पध्दत, आवश्यक साहित्य, तसेच त्यांच्या आरोग्यादायी फायद्याची माहित जाणून घेण्याची संधी मिळाली.

. हा प्रोजेक्ट मला स्वयंपाक कला, व्यवसाय आणि आरोग्य आणि आरोग्य या क्षेत्रांतील ज्ञान वाढवण्यास मदत करील. तसेच, स्थानिक बाजारात या पदार्थांची मागणी आणि त्याचे आर्थिक महत्वाचे समजण्यास करणार आहे.

. प्रोजेक्टचे उदिष्ट

शेंगदाणा चिक्की कशी तयार करावी हे शिकणे.

. * त्याच्या आरोग्यादायी फायद्याची माहित देणे.

. * स्थानिक आणि परकीय बाजारात त्याची मागणी समजावणे.

. संशोधन व माहित संकलन

. * शेंगदाणा चिक्कीचा इतिहास

. * विविध प्रकार

. * तयार करण्याची प्रक्रिया

. * साहित्य व उपकरणे

. * स्वच्छ आणि सुरक्षितता

. प्रकिया

. * साहित्यांची यादी

. * तयार करण्याची पद्धत :

. * शेंगदाणा भिजवणे व भाजणे

. * साखर तयार करणे

. * शेंगदाणा आणि साखर मिसळणे

. * चिक्की तयार करणे (मिश्रण थोडे थोडे घालणे व थोडे थोडे

. ( भाजणे

. * थंड होऊ देणे व कापणे ‌.

. या प्रोजेक्ट मधून मला शेंगदाणा चिक्की तयार करण्याची प्रक्रिया निदर्शनास आली. शेंगदाणा, साखर, आणि काही मसाले वापरून ही स्वादिष्ट व पौष्टिक चिक्की तयार करता येते. या प्रक्रियेदरम्यान मला स्वछ्चतेचे महत्व, योग्य तापमान आणि वेळेचे पालन करणे. तसेच दर्जेदार साहित्य वापरण्याचे गरज समजली.

. निष्कर्ष –

. शेंगदाणा चिक्की ही केवळ चविष्ट नाही. तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. या प्रोजेक्ट मुळे मला स्वयंपाकाची कौशल्य विकसित झाली. तसेच उत्पादनाची प्रकिया आणि बाजारपेठाची जाणही झाली. भविष्यात या चिक्कीचे विविध प्रकार तयार करून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे.

. सारांशत, या प्रोजेक्ट मुळे मला शेंगदाणा चिक्कीच्या तयारीची जाण येण्यास मदत झाली असून , त्याचा व्यवसायिक वापरही शक्य आहे. असे मला वाटते.

. काॅस्टिंग –

.

मटेरियल वजन
1) शेंगदाणे 400 gm
2) गूळ 350 gm
3) तूप 25 gm
4) प्याकेजिंग 2 बाॅक्स
5) gas चार्जेस 60 युनिट
6) मजूरी 35 %
7) स्टीकर