मोजमाप

मोजमाप :-

  1. 1 cm = 10 mm
  2. 1m = 100 cm
  3. 1000 m = 1 km
  4. 1m = 3’3 inch
  5. 1inch = 25 mm
  6. 1ft = 30 cm
  7. 12 inch = 1 ft
  8. 1 brass = 100 3ft
  9. 1 ft = 300 mm
  10. 1 kg = 1000 gm
  11. , 1 ltr = 1000 ml
  12. 1/2 ltr = 500 ml
  13. 1/4 ltr = 250 ml
  14. 1 inch = 2.5 cm
  15. 1 ft = 12 inch
  16. 1ft = 30 cm
  17. 5.9 inch = 172.5 cm
  18. 6.3 inch = 187.5 cm

मोरिंगा चिक्की तयार करणे

उद्देश :- मोरिंगा चिक्की तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- शेंगदाणे , गूळ , तूप , जवस , तीळ इ.

साधने :- पॅकिंग बॉक्स , स्टिकर , लाटणे इ.

कृती :- सर्वप्रथम 80 gm , तीळ 120 gm , मो¡~¡”रिंगा पावडर 20 gm घेतले. 300 gm गूळ घेतला. त्याचे मिश्रण केले. गुळाचा पाक तयार केला. त्यामध्ये ते मिश्रण मिक्स करून घेतले. नंतर ते मिक्स केलेले मिश्रण ट्रे वर काढले व लाटण्याने पसरवले व ते चिक्की कटरने कट केले. 800 gm चिक्की बनवण्यासाठी आम्हाला 153.50 येवडा खर्च आला.

बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करणे

उद्देश :- बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- बाजरीचे पीठ , गुळ , तीळ , जवस , इलायची पावडर , मगज बी , तूप इ.

साधने :- स्टिकर , पॅकिंग बॉक्स , गॅस , मिक्सर इ.

कृती :-

  1. बाजरीचे पीठ 400 gm
  2. गूळ 600 gm
  3. तीळ 360 gm
  4. मगज बी 240 gm
  5. जवस 240 gm
  6. तूप 160 gm
  7. इलायची पावडर 20 gm

अन्न पदार्थ टिकवण्याच्या पद्धती

नैसर्गिक पद्धती :-

  1. वाळवणे :- पालेभाज्या , फळे , मासे .
  2. खारवणे / जास्त प्रमाणात साखर वापरणे .
  3. थंड करणे .
  4. गोठवणे .
  5. उकळवणे .
  6. हवा बंद डब्यात व बॅगेत ठेवणे .
  7. भाजने .

केमिकल पद्धती :-

  1. पोटॅशियम मेटा बाय सल्फेट
  2. पेक्टिन

वैयक्तिक स्वच्छता

वैयक्तिक स्वच्छता ( स्वतःची स्वच्छता )

  1. पोट साफ करणे
  2. हात धुणे
  3. ब्रश करणे
  4. व्यायाम करणे
  5. कोमट पाणी पिने
  6. अंघोळ करणे
  7. केस विचारणे ( तेल लावणे )
  8. पोषक आहाराचे सेवन
  9. नखे कापावीत

*) स्वतःची स्वच्छता का केली पाहिजे ?

—> आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी स्वतःची स्वच्छता केली पाहिजे.

नान कटाई

उद्देश :- नानकटाई बनवण्यास शिकणे.

साहित्य :- मैदा , डालडा , पिठीसाखर , ट्रे , तेल इ.

साधने :- ओव्हन

कृती :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 350 gm डालडा घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठीसाखर 350 gm चाळून टाकली.

3) नंतर त्यात 500 gm मैदा टाकला, व फ्लेवर 5 ml टाकले.

4) व ते मिश्रण करून घेतले. व सगळ्यांनी वेगवेगळ्या आकाराच्या नानकटाई तयार केली.

5) ओव्हनमध्ये 150° C ते 180°C तापमानावर बेक केले.

प्राथमिक उपचार

उद्देश :- 1) रुग्णांचा जीव वाचतो. 2) जखम कमी होते.

3) वेळेत उपचार होतो . 4) जास्त रक्तस्त्राव नाही .

प्रथमोपचार पेटीतील साहित्य व त्यांचे उपयोग :- 1) बँडेज :- जखमेवर जिवाणू बसत नाहीत. 2) जखम सुखी होते. 3) जखम कमी होते .

हँडवॉश :- 1) किटाणू पासून संरक्षण होते. 2) हात स्वच्छ होतात .

सॅनिटायजर :- 1) हातावरील किटाणूंचा नाश होतो.

हायड्रोजन पेरॉक्साइड :- 1) जखम निर्जंतुक करण्यासाठी . 2) जखम कमी होते.

डोळ्यातील ड्रॉप :-1) डोळ्यांसाठी वापरतात व वेल्डिंग लागली असता आणि डोळ्यातून पाणी येत असतात ड्रॉप चा वापर करतात.

प्राथमिक उपचार :- वैयक्तिक उपचार करण्या अगोदर केलेला उपचार म्हणजे प्राथमिक उपचार होय.

हॅन्ड वॉश चे स्टेप :- 1) सुरुवातीला हँडवॉश घेऊन हाताचे तळवे एकमेकांवर घासावी. 2) नंतर डाव्या हाताची बोटे उजव्या हाताच्या बोटात घालून घासावे. 3) दोन्ही हाताची बोटे एकमेकात घालून घासावे. 4) त्यानंतर बोटांच्या मागील बाजू घासावे. 5) नंतर प्रत्येक बोट घासून घ्यावे. 6) नंतर दोन्ही हाताचे तळवे घासून घ्यावे. 7) नंतर हातांची मनगटी घासून घ्यावी. 8) हात योग्य पद्धतीने घासून झाल्यावर पाण्याने हात स्वच्छ धुवावे.

सेफ्टी

उद्देश :- खालील सेफ्टी वापरणे.

सेफ्टीचे नियम :- 1) स्वच्छ ऍप्रॉन व डोक्यातली टोपी घालावी. 2) हात स्वच्छ असावेत आणि हॅन्ड ग्लोज घालावे. 3) सर्व साहित्य साधने आपल्याजवळ असावे. 4) प्रॅक्टिकल करून झाल्यावर गॅस सिलेंडर बंद करावा. 5) साहित्य कोरड्या बरणीत बंद करून ठेवावे व त्याला लेबल लावून व्यवस्थित ठेवावे. 6) फ्रिज दर आठवड्याला स्वच्छ करावा. 7) पदार्थ घेण्यासाठी स्वतंत्र चमचा व तो स्वच्छ असावा. 8) नियमित वापरात येणाऱ्या पदार्थांना लेबल लावणे. 9) पदार्थ पॅक करून त्यावर तपशील लावावा. 10) विभागातील वापरलेले टेबल व जमीन स्वच्छ करावे. 11) विभाग बंद करताना विजेची उपकरणे बंद करून ठेवावीत. 12) भांडी, उपकरणे आणि साधने यांची स्वच्छता व सावधगिरी असावी.

रक्तदाब

उद्देश :- रक्तदाब तपासणी शिकणे.

रक्तदाब म्हणजे काय ?

आपले हृदय शुद्ध रक्त करून धामन्यांमार्फत पाठवले जाते तेव्हा तिथे दाब निर्माण होतो त्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात .

रक्तदाबाचे दोन प्रकार :- 1) उच्च दाब 2) कमी दाब

उच्चदाबाची कारणे :- 1) शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की ते हाता पायाच्या लहान लहान रक्तवाहिन्यांच्या भिंती लगत जमा होतात. त्यामुळे रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण होतो.

कमी रक्तदाबाची कारणे :- 1) रक्ताच्या प्रवाहाची गती कमी करणे. 2) डोके जड होणे, चक्कर येणे, अशक्तपणा येणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे. 3) O२ आणि अन्य पोषक द्रवाचा मेंदूला होणारा पुरवठा बंद होते.

लिंबाचा रस ( स्कॉश )

उद्देश :- लिंबू सरबत तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- लिंबू , साखर , पाणी , मीठ

साधने :- गॅस , टोप , लेमन squizzer

फायदे :- 1) तुमची भूक स्थिर करते.

2) ऍनर्जी वाढवते.

3) हे स्वच्छ त्वचेला प्रोत्साहित करते.

4) पेशिंना संरक्षण देते.

रक्तगट तपासने

उद्देश :- रक्तगट तपासता येणे व रक्तामधील असणारे घटकांची माहिती घेणे.

रक्तामध्ये असणारे महत्वाचे घटक कोणते ?

पांढऱ्या पेशी , लाल पेशी व इतर पेशी = 40 % प्लाझमा = 60 %

पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. कार्य :- रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणे.

प्लाझमा :- प्लाजमा म्हणजे रक्तातील पातळ सिरम.

रक्तगटाचा शोध कोणी लावला व केव्हा ?

कार्ल लँडस्टीनर ( 1900 – 1902 )

तिळाची चिक्की

  1. उद्देश :- तिळाची चिक्की तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- तीळ , साखर , गॅस , ट्रे , तूप , बॉक्स , स्टिकर

साधने :- कढई , ट्रे , शेगडी , पलिता, लाटणे , कटर

कृती :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले . 2) नंतर तीळ व साखर समप्रमाणात वजन करून घेतले . 3) कढईत साखर घेतली व गॅस पेटवला. आणि साखरेचा पाक तयार केला . 4) त्या पाकात बारीक केलेले तीळ टाकले व ते मिश्रण ढवळून घेतले . 5) त्यानंतर ट्रे व लाटणे व कटरला तेल लावले . आणि ते केलेले मिश्रण ट्रे वर ओतून घेतले . 6) नंतर ते लाटण्याने पसरवले व त्याला चिक्की कटरने कट केले . 8) मग ते बॉक्स मध्ये ठेवले . =500 gm

पाणी परीक्षण केंद्र

उद्देश :- पाणी परीक्षण करण्यास शिकणे.

साहित्य :- पाणी टेस्टिंग बॉटल चेस्ट पेपर पेन

कृती :- 1) सर्वप्रथम साहित्य गोळा करणे. 2) नंतर त्या बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकला. 3) व त्या बॉटलवर तारीख व वेळ दिली. 4) व ती बॉटल साईडला ठेवून दिली

निरीक्षण :- 24 तासानंतर ते पाणी काळे झाले त्यामुळे ते पाणी पिणे योग्य नाही.

अनुमान :- खराब पाण्याचे पाणी परीक्षण करण्यास शिकलो .

दूषित पाणी होण्याचे कारण :- 1) कारखान्याचे सांडपाणी पाण्यात जनावरे कपडे वाहने धुणे पाण्यात कचरा टाकतात.

दूषित पाण्याने होणारे आजार :- 1) सर्दी , खोकला, डेंगू , निमोनिया , टायफाईड , कावीळ , उलटी , जुलाब , पोटदुखी , त्वचा रोग , केसात कोंडा , केस गळणे.

पाव तयार करणे

उद्देश :- पाव बनवण्यास शिकणे.

साहित्य :- मैदा , ईस्ट , मीट , तेल , ब्रेड , इम्प्रोअर , गॅस

साधने :- ओव्हन , आटा मेकर , ओव्हन , ट्रे

कृती :- 1) 7 किलो मैदा घेऊन ईस्ट व पाणी एकत्र करून घेतले. 2) मैद्यात मीठ टाकले व त्यामध्ये ब्रेड इम्प्रोवाईजर टाकले. 3) ईस्ट तयार झाल्यावर ते मैद्यात टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतले. 4) ट्रे ला तेल लावून झाल्यानंतर पिठाचे पावासाठी गोळे तयार करून घेतले. व ते 30 मिनिटांसाठी फुगण्यासाठी ठेवले. 5) ट्रे ओव्हन मध्ये ठेवले पाव बेक करण्यासाठी 250°C च्या वरती तापमान सेट केले. 6) पाव बेक झाल्यावर त्यावर तेल लावून घेतले व थंड झाल्यावर पाव उलटे करून घेतले.

अनुमान :- पाव बनवणे शिकलो.

शेंगदाणा चिक्की तयार करणे

उद्देश :- शेंगदाणा चिक्की तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- शेंगदाणे , गूळ , साखर , तेल , ट्रे , चिक्की कटर , लाटणे , गॅस , वजनकाटा , सूरी , पॅकिंग बॉक्स

शेंगदाण्यामध्ये असणारे पौष्टिक घटक :- 1) प्रथीने 2) कॅल्शियम 3) व्हिट्यामिन डी

कॅलरीज

उद्देश :- अन्नपदार्थात असणारी कॅलरीज , अन्नाचे कार्य , शरीराच्या वाढीसाठी , शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे , शरीराचे तापमान 37°C असते.

एकक :- कॅलरीज हे नेहमी Kg आणि Gm मध्ये मोजतात.

कॅलरीज म्हणजे काय ?

आपण जे अन्न खातो त्यामधून आपल्याला जे ऊर्जा मिळते ते ऊर्जा म्हणजेच कॅलरीज होय.

कॅलरीज मोजण्याचे सूत्र :-

वजन उंची वय

(13.75× 48 wt) +(5×168 cm)–(6.076×18)+66

अन्नपदार्थातील भेसळ

उद्देश :- अन्नपदार्थात केलेली भेसळ ओळखण्यास शिकणे.

अन्नातील भेसळ म्हणजे काय ?

अन्नातील काही घटक काढून टाकणे अन्नामध्ये कमी दराच्या वस्तूंचे मिश्रण करणे अन्नामध्ये विषारी पदार्थ मिक्स करणे अन्नामध्ये जास्त रंग टाकणे.

उदा., टोमॅटो , तूप , लोणी , कडधान्य इ.

भेसळ पदार्थांच्या खाण्याने होणाऱ्या आजार :- विषबाधा , पोटाचे विकार

भेसळीचे प्रकार :- दुधात भेसळ , अन्न भेसळ , औषध भेसळ , भाज्यांची भेसळ

टोस्ट बनवणे

उद्देश :- टोस्ट बनवण्यास शिकणे.

साहित्य :- मैदा , ईस्ट , कस्टर पावडर , साखर , मीट

साधने :- ओव्हन , ट्रे , टोस्ट कटर , प्लेट

अनुमान :- चांगल्या प्रकारचे टोस्ट बनवने.

ORS तयार करणे

उद्देश :- ORS तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- पाणी , साखर , मीट , गॅस

ORS = Oral Rehydration Solutions

परिणाम :- गंभीर निर्जलीकरण होण्याच्या स्थितीमध्ये लक्ष न दिल्याने किडनी दुखणे आणि डोके दुखणे यांच्या सोबत मरण सुद्धा येऊ शकते.

चिंचेचा सॉस

उद्देश :- चिंचेचा सॉस तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- चिंच , गूळ , मिरची पावडर , काळे मीठ , गरम मसाला , गॅस इ.

कृती :- सर्वप्रथम सर्व लागणारे साहित्य गोळा केले. त्यानंतर चिंच साफ करून घेतले. नंतर 1 ltr पाण्यात 1 kg चिंच उकळवून घेतले . नंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले त्या मिश्रणात 330 gm मिरची पावडर , 100 gm काळे मीठ आणि 20 gm गरम मसाला टाकला आणि ते मिश्रण ढवळून घेतले. नंतर एका टोपामध्ये 3 kg गूळ टाकले व ते मिश्रण ढवळून घेतले. नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले. अशाप्रकारे चिंचेचा सॉस तयार केला एकूण 4 kg 8 gm सॉस किचनला दिला . तो सॉस बनवायला 427.18 Rs खर्च आला.

अनुमान :- चिंचेचा सॉस व्यवस्थित बनवायला शिकणे.

टोमॅटो सॉस

उद्देश :- टोमॅटो सॉस तयार कण्यास शिकणे .

साहित्य :- टोमॅटो , कांदा , लसूण , व्हीनेगर , दालचीनी पावडर , काळीमिरी , मीट , जिरे , लवंग , वेलदोडे , साखर .

साधने ;- चमचा , शेगडी , टोप , पलिता , सूरी , पाटा , मिक्सर .

कृती :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले .

2) टोमॅटो घेतले , लसूण चिरून घेतली , कांदा चिरून घेतला तिनीही पदार्थ कुकरमद्धे टाकून मिक्स करून घेतले .

3) कुकरच्या 2 शिट्या होईपर्यंत शिजवणे .

4) एक भांड्यात पाणी ठेवावे मिक्सरमधून हे मिश्रण पाण्यासकट थोडे थोडे टाकून अर्धा kg सिपीला पेस्ट करून घेणे व गाळणीने गाळून घेणे .

5) एका पांढऱ्या सूती रुमालाच्या आकाराच्या कापडात जिरे काळीमिरी , लवंग , वेलदोडे फोडून , दालचीनीचे तुकडे ठेऊन पुडी बांधा .

6) टोमॅटोच्या पेस्टमद्धे अर्धा चमचा मीट 2-3 दालचीनी , काळीमिरी , व्हीनेगर व एक चमचा साखर टाकणे .

7) नंतर ते गॅसवर ठेऊन उकळी येईपर्यंत सॉस घट्ट होईपर्यंत शिजवणे .

8) नंतर सॉस 10 – 15 मिनिटांनी कोरड्या बाटलीत भरून ठेवावा .

अनुमान :- टोमॅटो सॉस बनवायला शिकलो .

आवळा सुपारी

उद्देश :- आवळा सुपारी बनवण्यास शिकणे .

साहित्य :- साधे मीट , कळे मीट , काळीमिरी , जिरे , ओवा , हिंग , आवळा

साधने :- टोप , पलिता , शेगडी , सूरी , चमचा

कृती :- 1) 5 kg आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले .

2) स्टीकच्या साहाय्याने आवळ्यांना 15 – 20 होल केले . नंतर 6% मिटाचे द्रावण तयार करून सर्व आवळे 24 तासांसाठी त्यात ठेवले .

3) नंतर आवळे बुडतील इतके पाणी घेऊन ते 100 डिग्री तापमानाला उकळवून घेणे . उकळत्या पाण्यात मिठातील आवळे टाकून 5 मिनिट उकळत्या पाण्यात ठेवावे .

4) आवळा गरम पाण्यातून बाहेर काढल्या नंतर ते चांगले फुटले जातात . त्यातून बी वेगळी करायची व आवळ्याचे सुपारीवाणी तुकडे करायचे .

5) आवळ्यांच्या फोडींना 100 gm साधे मीट लाऊन उन्हात ठेवावे . 4 तासानंतर त्यातील पाणी वेगळे करून त्यात काळी मिरी , जिरे , ओवा घेणे .

6) सर्व पदार्थ स्लो गॅसवर भाजून त्यांची पावडर तयार करणे . पावडरमध्ये हिंग , काळीमिरी , काळे मीट , मिक्स करून घेणे ही पावडर सर्व आवळ्यांना फोडींना व्यवस्थित मिक्स करणे .

7) नंतर ही तयार झालेली सुपारी सोलार ड्रायरला व्यवस्थित ड्राय करून पॅकिंग करून ठेवणे

अनुमान :- आवळा सुपारी तयार करायला शिकलो .

केक तयार करणे

उद्देश :- केक बेस तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- मैदा , कोको पावडर , पिठीसाखर , बेकिंग पावडर , बेकिंग सोडा , दूध , बटर .

साधने :- बाऊल , स्टिक , ओव्हन , चमचा , ग्लास

कृती :- 1) सर्वप्रथम 130 gm मैदा घेतला . त्यामध्ये 60 ml दूध टाकून ढवळून घेतले . त्यानंतर त्यात 5 ml तूप टाकून पुन्हा ढवळून घेतले . केक साच्याला आतून बटर लाऊन मैदा लाऊन त्यात शुगर पावडरचे मिश्रण टाकले .

2) त्यात बेकिंग पावडर टाकून व सोडा टाकून मिश्रण ढवळून घेतले . पूर्ण मिश्रण मिक्स होईपर्यंत एका बाजूने ढवळले . त्यानंतर दूध घेऊन त्यात टाकले व त्यात फ्लेवर टाकून त्याला पुन्हा एका बाजूने ढवळले .

3) त्यानंतर त्याला तेल लावलेल्या भांड्यात ओतले . आणि ते ओव्हनमध्ये 150 ते 200 औंश सेल्सिअस या डिग्री तापमानात बेक करायला ठेवला .

4) बेक करून झाल्यावर 15 मिनिटांनी फ्रीजमद्धे ठेवल्यावर 10 मिनिटांनी काढले .

अनुमान :- चांगला केक तयार करणे .

केक नीट शिजला गेला पाहिजे .

पिझ्झा तयार करणे

उद्देश :- पिझ्झा तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- मैदा , ईस्ट , साखर , मीट , मिल्क पावडर , बटर , आल पेस्ट , तोटतो सॉस , शिमला मिरची , कांदा , टोमॅटो , चीज

साधने :- ओव्हन , पिझ्झा कटर , ट्रे , चमचा

कृती :- 1) सर्वप्रथम साहित्य गोळा केले .

2) 120 gm मैदा घेतला . ईस्ट + साखर + आल यांची पेस्ट तयार केली .

3) मैदयामद्धे बटर व पेस्ट टाकली व ते मिश्रण मळून घेतले .

4) चांगले मळून झाल्यावर 30 मिनिट फर्मेन्टेशनसाठी ठेवले .

5) त्यानंतर त्याच्यावर ठेवण्यासाठी कांदा , टोमॅटो , शिमला मिरची कापून घेतले .

6) फर्मेन्टेशन झालेल्या पिठापासून पिझ्झा बेस तयार केला .

7) त्यानंतर मीट व तिखट मसाले टाकले व त्यावर शिमला मिरची , कांदा , टोमॅटो यांचे तुकडे टाकून पिझ्झा डेकोरेट केला .

8) नंतर ते ओव्हनमध्ये 150 ते 180 औंश सेल्सिअस तापमानात बेक करण्यासाठी ठेवले .

अनुमान :- पिझ्झा तयार करणे , पिझ्झा चांगला बेक करणे .

आवळा कॅन्डी

उद्देश :- आवळ्यापासून आवळा कॅन्डी तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- आवळे , हिंग , साखर , पाणी , इलायची

साधने :- बरणी , गॅस

कृती :- 1) सर्वप्रथम 15 kg आवळे घेतले.

2) त्याला 10 ते 12 होल पाडले.

3) त्यानंतर त्यांना गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले.

4) आवळ्यांचे तुकडे करून घेतले आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले.

5) मग 1 बरणी घेतली त्या बरणीत सुरुवातीला साखर टाकली. त्यानंतर त्यात आवळ्यांचे तुकडे टाकले.

6) आणि बरणी पूर्णपणे पॅक बंद करून घेतली.

अनुमान :- आवळा कॅण्डी बनवायला शिकलो.

हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासने

उद्देश :- हिमोग्लोबिन तपासण्यास शिकणे.

साहित्य :- परीक्षा नळी, हिमोग्लोमीटर, ड्रॉपर, ब्रश, स्पिरिट, कापूस, लॅनसेट, हंडग्लोज HCI

कृती :- 1) परीक्षानळीत 20 ml n/10-HCI ड्रॉपच्या साहाय्याने घ्या. 2) डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला कापसाने स्पिरिटलावून निर्जंतुक करून घ्या व लॅनसेटच्या साहाय्याने टोचा. 3) एका स्वच्छ पिपेटच्या मदतीने 0.02 ml रक्त घेणे. ते HCI टाकलेल्या नळीत सोडा. ते हलवून रक्त HCI एकजीव करा. 4) परीक्षानळीत 15 min हिमोग्लोमीटरमधील 2 स्टँटर्ड नळ्यांच्या मध्ये ठेवा व रक्त आणि HCI ची अभिक्रिया पूर्ण होऊ दया. 5) परीक्षानळीत द्रावणाचा रंग स्टँटर्ड नळीत द्रावनाच्या रंगाशी जुळेपर्यंत त्यात डीस्टिल्ट वॉटर घाला.

निरीक्षण :- पुरुषांमध्ये 14 ते 18 gm HB असते आणि स्रियांमध्ये 12 ते 14 gm HB असणे आवश्यक. लहान मुलाचे याच्यात कमी – जास्त gm HB असते.

अनुमान :- HB तपासण्यास शिकणे आवश्यक आहे.

मानवी कंकाल तंत्र

उद्देश :- मानवाचे कंकाल तंत्र अभ्यासाने.

कंकाल तंत्राचे काम. 1) शरीराला आकार देणे. 2) शरीरातील आतील भागाचे सौरक्षण 3) शरीराला गती प्राप्त करणे. 4) शरीराला मजबुती प्राप्त होते.

कंकाल तंत्राचा निर्माण — अस्धी, उपअस्धी आणि सांधे यांना एकत्र करून कंकाल तंत्राचा निर्माण केला.

  1. जन्मलेल्या मुलांमध्ये 270 हाडे असतात.
  2. बाल अवस्थेतील मुलांमध्ये 350 हाडे असतात.
  3. किशोर वयाच्या व प्रौढ वयाच्या माणसांमध्ये 206 हाडे असतात.

लिंबू लोणचे तयार करणे

उद्देश :- लिंबू लोणचे तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- लिंबू, साखर, काळे मीठ, मी. पावडर, बेडेकर मी. पावडर, गॅस, बॉटल

साधने :- शेगडी, टोप, पालिता

लिंबाच्या लोणच्याची फ्लो चार्ट

लिंबू धुवून व उकळवून घेणे

1 लिंबाचे 8 तुकडे करणे

सर्व मसाले व साखर, मीठ मिक्स करणे

ते लिंबामध्ये टाकणे

नंतर जार मध्ये भरणे

4 ते 6 दिवस सूर्यप्रकाशामध्ये ठेवणे

ते गरम केल्यानंतर व थंड केल्यानंतर तेल जोडणे

पूर्ण झाल्यावर स्टोरेज करणे

खवा तयार करणे व त्यापासून गुलाबजाम तयार करणे

उद्देश :- खवा तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- दूध, साखर, गॅस, पाणी, तेल

साधने :- कढई, शेगडी, पलिता, टोप, चमचा

कृती :- 1) सर्वप्रथम 4 लिटर दूध घेतले. 2) दूध एका भांड्यात घेऊन गॅसवर ठेवले. व मंद आचेवर खवा तयार होईपर्यंत आठवले. 3) दुधाचा खवा बनवताना दूध पलीत्याने सारखे हलवावे. 4) खवा घट्ट तयार करावा . 5) मंद आचेवर खवा तयार करण्यासाठी 1 1/2 तास लागला. 6) गायीच्या चार लिटर दुधापासून 400 ग्राम खवा तयार झाला. 7) त्यापासून गुलाबजाम तयार केले. 8) त्यानंतर गुलाबजाम फ्रीजमध्ये ठेवले.

अनुमान :- खवा तयार करण्यास व त्यापासून गुलाबजाम तयार करण्यास शिकलो.

अननस जाम तयार करणे

उद्देश :- अननस जाम तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- अननस, साखर, फ्लेवर, गॅस, लिंबू

साधने :- कढई, डबा, पलिता, शेगडी

कृती :- 1) सर्वप्रथम 1 kg अननस घेणे. 2) अननस सोलून घेणे. 3) अननस कट करून घेणे. 4) मिक्सरमध्ये ग्रॅंड करणे व त्याची पेस्ट तयार करणे. 5) जेवढे पल्प होते तेवढे साखर घेणे. 6) ते एकत्र करून घट्ट होईपर्यंत आटवणे. 7) त्यात 5 ml फ्लेवर टाकणे. त्यात एक लिंबू पिळून टाकणे. 8) जाम घट्ट होईपर्यंत आटवावा. 9) नंतर एका प्लेटमध्ये घेऊन जाम तयार झाला की नाही ते चेक करणे. 10) व जाम बॉटलमध्ये भरून स्टोरेज करणे.

अनुमान :- जाम तयार करण्यास शिकलो.

प्रोजेक्ट

2022 – 2023

विभागाचे नाव :- फूड लॅब

प्रोजेक्टचे नाव :- लिंबाचा squash

प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव :- रवी वऱ्हे

साथीदाराचे नाव :- गौतम ढेबे

मार्गदर्शकाचे नाव :- रेशमा मॅडम   

प्रस्तावना : –                                 

उन्हाळ्यात पेय म्हणून वेगवेगळ्या फळाचा सिरप squash म्हणून सरबत वापरला जातो. पण उन्हाळ्यात रसदार फळंही महाग असतात. ( लिंबू , संतरा , मोसंमबी , कलिंगड ) पण हिवाळ्यात हीच फळ स्वस्त दरात बाजारात मिळतात कारण हिवाळा हा थंडीचा ऋतु आहे . हिवाळ्यात रसदार फळांची मागणी कमी असते. पण हेच उन्हाळ्यात पहिले तर जास्त भाव असला तरी ही फळे सारबतासाठी विकत घेतली जातात म्हणून हिवाळ्यात स्वस्त असलेली फळाचा squashतयार करून त्यात जास्त प्रमाणत साखर वापरुन तो squash जास्त काळ टिकवता येतो साखर ही नैसर्गिक परिझरवेशन म्हणून पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी शुद्ध साखर अथवा मीठ याचा वापर केला जातो

उदेश  :- शुगर परिझरवेशन चा वापर करून वेगवेल्या फळाचा squash तयार करून ठेवणे

साध्य :- या प्रोजेक्ट मधून आम्हाला असे साध्य करायचे आहे . की आपला माल जास्तीत जास्त कसा  पोहचेल .आणि आपल्याला कसा नफा होईल हे साध्य करायचे आहे

साहित्य :- लिंबू , साखर ,पाणी ,

साधने :- टोप , चाकू , कविलात ,गॅस ,प्लास्टीक जार ,लिंबाचा रस काढण्याचे यंत्र

निरीक्षण :- वेगवेगळ्या प्रोडक्ट बनवताना एकाच पदार्था पासून दूसरा पदार्थ तयार करता येतो .

         उन्हाळा या ऋतु मध्ये याची जास्त मार्केटिंग होते .

         लिंबाचा squash लवकरत लवकर बनवता येतो

        लिंबाचा रस मानवाच्या शरीरास भरपूर उपयोगी असतो

        लिंबापेक्षा लिंबाचा squash जास्त दिवस टिकतो

अडचण :- आम्हाला लिंबाच्या रस काढण्याच्या यंत्राने लिंबातून पूर्ण रस काढला जात नसल्याने लिंबाच्या फोडीतील  रस हाताने काढावा लागला

         दूसरा कोणताही पदार्थ टाकल्याने squashची चव बदली जात होती

       प्रॅक्टिकलमद्धे squash बनवला होता विद्यार्थ्याने तो प्रोडक्ट ग्राहक स्वीकारतील का हा प्रश्न अडचण करत होता

फायदे :- लिंबाच्या रसाने खालेले अन्न पचायला लागते व पोट साफ होते

       वजन कमी करण्यासाठी .

      त्याने रोगप्रतिकार शक्ति वाढते

       लिंबा  मध्ये जीवन सत्व असतात महणून उपयोगी .

कृती :- 

  1. सर्व प्रथम ताजे पिवळसर लिंबू निवडले .
  2. व पातळ सालीची लिंबू घेतले .
  3. नंतर स्वछ्य धुवून घेतले
  4. एका लिंबाचे दोन भाग केले
  5. यंत्राच्या साह्याने लिंबाचा रस काढून घेतला
  6. काढलेला रस गाळून घेतला
  7. लिंबाच्या रसाचे वजन केले
  8. मग साखरेचा पाक तयार करून घेतला.
  1. त्या पाकात लिंबाचा रस मिक्स केला
  2. तयार झालेल्या squash मध्ये सोडीयम बेजऑइड हे प्रीझर वेशन घालावे
  3. Squash बोटल मध्ये भरून स्टोअर केला

अनुभव :- लिंबाचा squash बनवण्यास शिकलो  

       हे एक प्रकारचे फळ पेय आहे ज्यामध्ये कमीत कमी 25% फळांचा रस किव्हा लगदा आणि 40 ते 50% एकूण विद्रव्य घन पदार्थ असतात . त्यात 1.0% आम्ल आणि 350 पीपीएम सल्फर डायऑक्साईड किव्हा 600 पीपीएम सोडियम बेर झोएट देखील आहे . सर्व करण्यापूर्वी ते पातळ केले जाते .               

       squash बनवण्यासाठी आंबा , संत्री आणि अननसाचा वापर व्यावसायिकरित्या केला जातो . हे लिंबू , चुना , बेल , पेरू , लीची , नाशपाती , जर्दाळु , पुमेलो , कस्तूरी खरबूज , पपई इत्यादीपासून देखील तयार केले जावू शकते . पोटॅशियम मेटाबिसल्फाईट संरक्षक म्हणून वापरुन किव्हा जामून , पॅशन- फ्रूट , पीच , फळसा , प्लम , तुती , रास्पबेरी , स्ट्रॉबेरी , ग्रेपफ्रूट ई ., सोडियम बेंझोएट संरक्षक म्हणून .

कॉस्टिंग :-

अ.क्रमटेरियलप्रमाणदरकिंमत
1लिंबू6 kg20 rs / 1 kg120
2साखर5 kg37 rs / 1 kg185
3गॅस360 gm1050 rs/ 14200 gm26.61
4कॅन्ड2 नग50 rs / 1 नग  100
   Total        =431.61
  मजुरी35%       =151.06
  एकूणTotal        =582.67