आवळा प्रकल्प
प्रस्तावना ;
मी dBRT ची विद्यार्थिनी आहे . आम्ही ”आवळा ” हा प्रोजेक्ट तयार केला . आवळा आरोग्यासाठी खूप पौस्टिक असतो .
त्यात विटामिन C जास्त प्रमाणात असते व ते औषधी फळ मानले जाते .या प्रकल्पातून आवळ्याचे गुणधर्म , उपयोग व महत्व याची माहिती घेतली आहे .
उद्धेश ;
1 ; आवळ्याचे औषधी गुणधर्म जाणून घेणे .
2 ; तो कोणत्या सिझन मध्ये उपलब्ध होतो हे जाणून घेणे .
3 ; आवळ्या पासून कोणत्या प्रकारचे product तयार होतात ह्याची माहिती मिळवणे .
सर्वे ;
जयवंत ब्भिकाजी गायकवाड यांची मुलाखत घेतली . ते हिवरे कुंभार मध्ये राहणारे होते . त्यांच्या शेतात ५० झाडे लावलेली होती .
आआव्ल्याचे दोन प्रक्रार आहेत ; 1 [ राय आवळा ]
2 [ कंठी आवळा ]
आवळ्याची झाडे लावल्या नंतर त्याला ५ ते ६ वर्षांनी त्याला आवळा यायला लागते .
साहित्य ;
पातेलं , चमचा , ग्यास, मग ,डीश , नमक , काळी मिरी ,जीरा ,मसाले ,आवळे , विनेगर , इत्यादी .
कृती ;
सर्व प्रथम आम्ही आवळे निवडून घेतले . त्यानंतर त्याला मीठच्या पाण्यात १२ तास भिजत घातले . त्यानंतर त्यांना गरम पाण्यात शिजून घेतले .त्यानंतर आवळ्याला मसाले लाऊन आणि त्यात तेल घालून त्याला मुरायला ठेवल . ते टिकण्यासाठी व आंबट लागण्यासाठी त्यात विनेगर टाकल .
त्यानंतर त आम्ही त्याच्यापासून आम्ही आचार तयार केले , आणि आवळा सुपारी तयार केली .
त्यातून काय शिकलो ;
आवळा हा शरीरासाठी खूप उपयोगी असतो .
निरीक्षण ;
आवळा हा पांगून ठेवला पाहिजे नाहीतर तो लवकर खराब होतो .
निष्कर्श;
या प्रकल्पातून आवळा हा खूप पोषक आणि बहुगुणी फळ आहे हे समजल .त्याचा खूप औशधी उपयोग होतात आव्ल्यापासून तयार होणारे पधार्थ आरोग्य आणि आर्थिक दोन्ही दृष्टीकोनातून फायदेशीर आहेत .म्हणून आवळ्याचे महत्व सर्वांनी जाणून घ्यावे व त्याचा वापर करावा .
खर्च ;
माटरीअल | वजन | दर kg | किमत |
1 आवळा | 8kg | 60 rs/kg | 480.00 |
2 लोणचं मसाला | 7 पकेट | 50rs/kg | 350.00 |
3 तेल | 1.५kg | १३० rs / kg | १९५ .00 |
4 लोणचं बोटल | ४० बोटल | १० rs / बोटल | ४०० .00 |
5 लेबल | ४० लेबल | 2 rs /1 लेबल | ८० .00 |
6 gas चार्जेस | ३० ग्राम | ८७०rs /14 kg | 1.८६ |
७ फोइल पापर | ४० पेपर | 1 rs /14 फोइल | १० |
८ फोइल चार्जेस | 1/2 युनिट्स | १७ rs /unit | ५ .00 |
९ मीठ | ७०० ग्राम | १५ rs /kg | १०. 50 |
१० कलोंजी | ७० gm | ४० rs /100 gm | २८.00 |
मजुरी | २१०६ .४० |
मोरिंगा चिक्की
प्रस्तावना :
मोरिंगा हा एक असा औषधी गुणधर्म असलेला व पोशान्मुल्यानी भरलेला पाधार्थ आहे . मोरीगमध्ये क्याल्शियाम , आयर्न , प्रोटीन विटामिन A , C यांचे प्रमाण खूप जास्त आहे . त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हाडे मजबूत होतात .
उधेश :
1 : पौष्टिक व आरोग्यदायी अल्पाहार उपलब्ध करणे .
2 : ग्रामीण महिलांना व शेतकऱ्यांना उत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे .
3 : मुलांच्या पोषणात सुधारणा करणे .
साहित्य :
1 : १५०० किलो शेंदाने
2 : 1 किलो जवस
3 : 1 किलो तीळ
4 : 100 ग्राम मोरिंगा पावडर
५ : २५ ग्राम तूप
६ : ७५० ग्राम गुळ
आवश्यक साधने :
काढई / पातेल
गॅस शेगडी
चमचे , कलथा
पाट – लाटणे /रोलिंग पिन
चाकू व सुरी
वजनकाटा
हायजेनिक पॅकिंग
कृती :
शेंगदाणे , जवस , तीळ , भाजून घ्यावेत .
कढईत गूळ टाकून वितळून घ्यावे त्यानंतर तूप टाकून ते मिक्ष करून घ्यावे .
पाक योग्य होईपर्यंत तो गरम करावा .
त्यात मोरिंगाची पावडर आणि शेंगदाणे , जवस , तीळ मिश्र करावे .
थोड तूप लाऊन मिश्रण पाटावर ओतून लाटण्याने पसरावे .
गरम असतानाच चौकोनी / गोल आकारात कापून घ्यावे .
थंड झाल्यावर हायजेनिक पॅकिंगमध्ये भरून विक्रीसाठी ठेवावे .
त्यातून काय शिकलो
मोरिंगाचे महत्त्व –
मोरिंगा म्हणजे शेवगा हा पोषणमूल्यांनी समृद्ध असा वनस्पती आहे. त्याच्या शेंगा, पाने, फुले आणि बिया सर्वच उपयोगी आहेत.
पौष्टिक मूल्य –
मोरिंगाच्या पानांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (A, C) व अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
औषधी उपयोग –
- रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- शरीरातील सूज व वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त.
अन्न व स्वयंपाकातील उपयोग –
- मोरिंगाची पाने भाजी, सूप, पोहे, पराठा यामध्ये वापरतात.
- शेंगा सांबर व इतर भाज्यांमध्ये वापरतात.
पर्यावरणपूरकता –
मोरिंगा झाड जलद वाढते आणि जमिनीची सुपीकता .
निरीक्षण :
- मोरिंगा चिक्कीची चव गोडसर व थोडी वेगळी लागली.
- चिक्की खुसखुशीत व पौष्टिक होती.
- बनवण्याची पद्धत सोपी व कमी खर्चिक आहे.
निष्कर्ष
या प्रकल्पातून आम्हाला कळले की मोरिंगा (शेवगा) हे झाड केवळ भाजीपुरतेच उपयुक्त नसून त्यातून तयार केलेली चिक्की सुद्धा पौष्टिक आणि चविष्ट असते. त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते व स्थानिक संसाधनांचा योग्य उपयोग होतो.
७. शिकलो ते
- पोषक अन्न तयार करण्याचे कौशल्य
- गटाने काम करण्याचे महत्त्व
- स्थानिक शेती व झाडांचा उपयोग
- आरोग्यदायी जीवनशैलीसाठी नव्या कल्पना