१. पाव
पाव बनवण्यासाठी आम्ही पहिले पुढील प्रमाणे साहित्य घेतले.
प्रमाण 1. मैदा 10kg
2.साखर११०gm
. 3.मीठ210gm
. 4.ब्रेड इम्प्रुअर 20 gm 5. यीस्ट110gm 6. तेल 150gm
हे साहित्य वजन करून घेतले . उद्या चाळून घेतला व त्यामध्ये ब्रेड इम्प्रुअर साखर एका वाटीत कालवून घेतले. मैदा कालवून घेण्या अगोदर हे त्यात टाकले .व मैदा कालवून 1तास फरमटेशनल ठेवला.
व नंतर पाव बनवले. व कासटींग काढली.
अ.क | मटेरीयल | वजन | दर | किमत |
१ | मैदा | १०kg | ३६ | ३६० |
२ | साखर | ११०gm | 4.4 | |
३ | मीठ | 210gm | 20 | 4.2 |
४ | ब्रेड इम्प्रुअर | 20gm | 350 | 7 |
5 | यीस्ट | 110gm | 150 | 16.5 |
6 | तेल | 150gm | 100 | 15 |
7 | ओव्हन | 1युनिट | 14 | 14 |
421 |
मजुरी35% | 147 |
आलेला खर्च | 568.48 |
2.चिक्की
कृती – १ पहिले कढई घेतली व गॅस व चमचा हे साहित्य घेतले.
. २.साखर ३५० gm, शेंगदाणे ४००gm तेल ५gm हे वजन करून घेतले
३. त्यानंतर गॅस चालू करून कढई गॅस वरती ठेवली. व शेंगदाणे भाजले . व त्याची साल काढून घेतली.
. ४. शेंगदाणे स्वच्छ केल्यावर पुन्हा गॅसवर ठेवले त्यामध्ये साखर टाकून पाघळवली. त्यामध्ये शेंगदाणे टाकले व मिश्रण केले.
५. व पहिल्या ट्रे ला तेल लावले व त्यात नंतर मिश्रण टाकले व लाटून घेतले.
६. नंतर चिक्की कट करून घेतली. पॅकिंग केली.
तपशील | वजन | दर | किंमत |
शेंगदाणा | ४००gm | १३० | ५२ |
साखर | ३५०gm | ४० | १०.५ |
तेल | ५gm | १०० | ०.५ |
गॅस | ६७.५gm | ९०६ | ४ .३० |
६७ | |||
मजुरी३५% | २३ .४५ |
. ती बनवण्यासाठी आम्हाला ९०.४५ इतका खर्च आला.
३. नान कटाची
कृती -१) पहीले आम्ही प्रमाण ठरवले.ते पुढील प्रमाणे
२) त्यात मैदा ३००gm पीठी साखर२५०gm डालडा २५०gm
३) साहित्य वजन करून घेतले.
४) पहिले मैदा कालवून घेतला. व नंतर त्याची नानकटाई बनवली
.
अ.क | मटेरीयल | वजन | दर | किंमत |
१ | मैदा | ३००gm | ३६ | १०.८ |
२ | पिठी साखर | २५०gm | ४४ | ११ |
३ | डालडा | २५०gm | १२० | ३० |
४ | ओव्हन | १युनिट | १४ | १४ |
५ | गॅस | ७.५gm | ९०६ | ०.४७ |
६६.२७ | ||||
मजुरी३५% | २३.१९ | |||
८९.४६ |
नानकटाई बनवण्यासाठी८९.४६रुपये खर्च आला. व 706 ग्रॅम नानकटाई तयार झाली.
४. पपई कॅन्डी
कृती -१) पहिले कच्ची पपई आणली. व तिचे वजन केले.ते६३९gm
२) स्वच्छ धुवून घेतली व त्याची साल काढून घेतली.
३) पपईचे लहान लहान तुकडे केले.
४) 493 ग्रॅम साखर घेऊन तिचे पाक तयार केले.
५) त्या पाकामध्ये पपईची लहान तुकडे टाकले व मिश्रण करून घेतले.
६) व त्यामध्ये फ्लेवर साठी 2ml टाकले व रंग 1ml टाकला.
७) ती पपई कँडी दोन दिवस सुकत टाकली.
कॉस्टिंग
अ.क | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१ | पपई | ६३९gm | १० | १० |
२ | साखर | ४९३gm | ४० | १९.७२ |
३ | गॅस | ४५gm | ९०६ | २.८७ |
४ | फ्लेवर | २gm | ३७ | ३.७ |
५ | रंग | १gm | ३५० | ०.३५ |
६ | पॅकिंग बॉक्स | ७ | ३ | २१ |
५७.६४ | ||||
मजुरी३५% | २०.१७ |
700ग्रॅम कॅन्डी बनवली
५. व्हेज पफ
कृती:१) व्हेज पफ बनवण्यासाठी पहिले आम्ही साहित्याचे प्रमाण काढले.
२) त्यानंतर खाली प्रमाणे साहित्य वजन करून घेतले ५०० ग्रॅम मैदा लिली मार्जिन 312.5 ग्रॅम कस्टर्ड पावडर 12.5 ग्रॅम साखर १२.५ ग्रॅम मीठ 12.5 ग्रॅम पाणी 312.5 ग्रॅम प्रमाणे साहित्य वजन करून घेतले.
३) लीली मार्जिन मधून 25 ग्रॅम बाजूला घेतले व ते गरम करून घेतले.
४) मैद्यामध्ये मीठ पाणी टाकून मैदा कालवुन घेतला.
५) कालवलेल्या मैद्याला चार वेळा लिली मार्जिन लावले. लाटून घेतले
६) नंतर व्हेज पफ बनवण्यासाठी शेप देऊन व्यवस्थित कट केले
७) ओव्हन मध्ये पंधरा मिनिटे बेक केले.
या साठी आम्हाला खालील प्रमाणे खर्च आला
अ.क | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१ | मैदा | ५०० ग्रॅम | ३६ | १८ |
२ | लिली मार्जिन | ३१२.५ ग्रॅम | 85.71 | 26.78 |
३ | कस्टर्ड पावडर | 12.5 ग्रॅम | 100 | 1.25 |
४ | साखर | 12.5 ग्रॅम | 40 | ०.५ |
५ | मीठ | 12.5 ग्रॅम | 20 | ०.२५ |
६ | पाणी | ३१२.५ ग्रॅम | ||
४६.७८ | ||||
मजुरी३५% | १६.३७ |
५०० ग्रॅम व्हेज पफ 63.15 रुपये खर्च आला व 20 व्हेज पफ तयार झाले.
६. दूषित पाणी
१) कृती: पहिले आम्ही दूषित पाणी याबद्दल समजून घेतले
२) त्यानंतर किचनच्या आणि ड्रीम हाऊसचे पाणी चेक केले
३) पाणी चेक करताना असे लक्षात आले की दूषित पाणी असल्यास पाण्याचा रंग काळा होतो.हे पाणी पिणे योग्य राहत नाही.
४) व शुद्ध पाणी असल्यास पाण्याचा रंग पिवळसर होतो व ते पिणे योग्य असते.
७. रक्तदाब
कृती:
१) हे प्रॅक्टिकल करण्यासाठी पहिले आम्ही रक्तदाब याविषयी समजून घेतले.
२) त्यानंतर पाहिले की रक्तदाबाचे दोन प्रकार पडतात.१. उच्च रक्तदाब २. कमी रक्तदाब
३) उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे.
१. व्यायामाचा अभाव २. अति मानसिक तणाव ३. आहारात जंक फूड ४. आहारात मिठाचे प्रमाण वाढते ५. अति वजन वाढणे.
लक्षणे;१ डोकेदुखी, डोळ्यांपुढे अंधार, चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा जाणवणे.
८.पिझ्झा
कृती:१) पहिले आम्ही पिझ्झा साठी कोणते कोणते साहित्य लागते याचे प्रमाण घेतले.
२) नंतर साहित्य वजन करून घेतले ते पुढील प्रमाणे.
३) मैदा१५०gm, ईस्ट २gm, साखर १५gm, मीठ २gm हे साहित्य घेतले.
४) मैद्यामध्ये टाकून घेतले व ईश्वर साखर व्यवस्थित ढवळून मैद्यामध्ये टाकली . व मैदा मळून घेतला.
५) व अर्ध्या तासासाठी फर्मेंटेशन साठी ठेवला. फर्मेंटेशन झाल्यावर त्याला सेफ दिला. त्यावर बटर लावलं त्यात कांदा डोळी मिरची टमाटर कापून टाकले.
६) व ओव्हन दीडशे वरती सेट करून पंधरा मिनिटांचा टायमर लावून पिझ्झा भाजला .
पिझ्झा साठी आलेला खर्च
अ.क | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१ | मैदा | १५० ग्रॅम | ३६ | ५.४ |
२ | यीस्ट | २ ग्रॅम | १५० | ०.३ |
३ | मीठ | २ ग्रॅम | २० | ०.०४ |
४ | साखर | १५ ग्रॅम | ४० | ०.६ |
५ | कांदा ढोबळी टमाटर | १२३ ग्रॅम | १० | १० |
६ | बटर | १५ ग्रॅम | २०० | ३ |
७ | चीज | ३० ग्रॅम | ५०० | १५ |
८ | गॅस | ७.५ ग्रॅम | ९०६ | ०.४७ |
९ | ओव्हन | १/२ | १४ | ७ |
१० | टोमॅटो सॉस | १० ग्रॅम | ५ | ०.५ |
४२.३१ | ||||
मजुरी३५% | १४.८० | |||
५७.११ |
347 ग्रॅम साठी 57.11 रुपये खर्च आला.
९. जलसंजीवनी(O.R.S)
कृती;१) ते पहिले मी जलसंजीवनी म्हणजे काय हे समजून घेतले व त्याची माहिती घेतली.
२) त्यानंतर ते कसे तयार करायचे हे समजून घेतले.
३) व याचा उपयोग केव्हा केव्हा करावा कोणते आजार झाल्यावर याचा उपयोग करावा व कसा करावा हे समजून घेतले.
४) त्यामध्ये मी एक लिटर पाणी घेतले ते उकळून घेतले थंड केले व त्यात एक चमचा नमक व ६ चमचा साखर हे प्रत्यक्ष करून पाहिले.
१०. खारी
कृती: १) त्यासाठी पहिले आम्ही खारीसाठी लागणारे प्रमाण लिहिले. ते पुढील प्रमाणे
२) मैदा ५०० ग्रॅम, कस्टर्ड पावडर १२.५ ग्रॅम, लिली मार्जिन३१२, साखर १२.५ग्रॅम, मीठ १२.५ ग्रॅम याप्रमाणे साहित्य वजन करून घेतले.
३) कस्टर्ड पावडर साखर मीठ मैद्यामध्ये टाकले व मळून घेतले. लिली मार्जिन बारीक करून घेतले.
४) त्यानंतर लेअर बाय लेअर असे चार वेळेस लेयर तयार केले व लिली मार्जिन लावले.
५) ते झाल्यावर दहा मिनिट तो मैदा फ्रिजमध्ये ठेवला. व नंतर तो लाटून त्याची खारी तयार केली.
६) व ते भाजण्यासाठी ओव्हन चे टेंपरेचर १८० अंश डिग्री सेल्सिअस एवढे तापमान सेट केले
७) व पंधरा मिनिटांचा टायमर लावून खारी भाजली.
अ.क | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१ | मैदा | २५० ग्रॅम | ३६ | ९ |
२ | कस्टर्ड पावडर | १२.५ ग्रॅम | १०० | ०.६ |
३ | लिली मार्जिन | १५६ ग्रॅम | ३९० | ६०.८४ |
४ | साखर | १२.५ ग्रॅम | ४० | ०.२४ |
५ | मीठ | १२.५ ग्रॅम | २० | ०.१२ |
६ | पाणी | १५६ ग्रॅम | ||
७ | ओव्हन | १ युनिट | १४ | १४ |
८४.८ | ||||
मजुरी ३५% | २९.६८ | |||
१२४.४८ |
६००ग्रॅम खारीसाठी १२४.४८ रुपये इतका खर्च आला.
११. प्रथमोपचार
कृती: १) हे प्रॅक्टिकल करण्यासाठी प्रथम उपचार म्हणजे काय हे समजून घेतले. प्रथमोपचार म्हणजे डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार.
२.) प्रथमोपचार त्यांना फर्स्ट किट हे साहित्य पाहिले व ते केव्हा वापरावे हे समजून घेतले
३) त्यामध्ये बँडेज पट्टी, आयोडीन, डेटॉल, कॉटन एनटी बॅक्टेरिया टूब याचा वापर कसा करावा हे समजून घेतले.
४) यातून मला असे समजले की आपल्या घरामध्ये एक तरी प्रथमोपचार पेटी असावी.
१२. जॅम
कृती:१) पहिले सफरचंद धुवून ऊन घेतले. वजन केले.
२) सफरचंदाची साल काढली व कापून ते बारीक केले.
३) मिक्सरच्या मदतीने लहान केले. व तयार झालेल्या गर चाळणीच्या साह्याने गाळून घेतला.
४) तयार झालेल्या गर र कढईमध्ये लहान फिल्म वर गॅसवर गरम केला
५) तयार झालेल्या घराच्या 70 टक्के साखर टाकली. व सतत हलवले.
६) उकळी आल्यावर त्यामध्ये एक ग्रॅम सायट्रिक ऍसिड टाकले.
७) व जाम तयार झालेला आहे की नाही हे ब्रिक्स मीटर च्या सह्याने चेक केले.
जाम साठी आलेला खर्च
अ.क | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१ | सफरचंद | ७६४.९ ग्रॅम | १५० | ११४.७५ |
२. | साखर | ४३४ ग्रॅम | ४० | १७.३६ |
३ | गॅस | ५२.५ ग्रॅम | ९०६ | ३.३४ |
४ | सायट्रिक ऍसिड | १ ग्रॅम | ३५० | ०.३५ |
१३५.८ | ||||
मजुरी३५% | ४७.५३ | |||
१८३.३३ |
१२०० ग्रॅम जाम साठी 183.83 रुपये खर्च आला.
१३बाजरी चे लाडु
कृती: १) पहिले साहित्य वजन करून घेतले खालील प्रमाणे.
. २) बाजरीचे पीठ२०० ग्रॅम, तूप८० ग्रॅम, जवस १२० ग्रॅम,मगज बी १२० ग्रॅम, इलायची १० ग्रॅम, तीळ १८० ग्रॅम.
३) त्यानंतर बाजरीचे पीठ जवस मगज बी हे भाजून घेतले.
३) त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतली.
४) व ३०० ग्रॅम गूळ बारीक करून घेतला व गुळाचे पाक तयार केले.
५) व त्यामध्ये ८० ग्रॅम तूप टाकले व मिश्रण करून घेतले. व ते मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन लाडू तयार केले.
६) तयार झालेल्या लाडूचे वजन केले व पॅक केले.
बाजरीचा लाडूसाठी आलेला खर्च
अ.क | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१ | बाजरीचे पीठ | २०० ग्रॅम | ३७ | ७.४ |
२ | तीळ | १८० ग्रॅम | २४० | ४३.२ |
३ | जवस | १२० ग्रॅम | १२० | १४.४ |
४ | मगज बी | १२० ग्रॅम | ८०० | ९६ |
५ | इलायची पावडर | १० ग्रॅम | ३००० | ३० |
६ | तूप | ८० ग्रॅम | ५४० | ४३.२ |
७ | मिक्सर | १ युनिट | ७ | ७ |
८ | गॅस | ४५ ग्रॅम | ९०६ | २.८७ |
९ | गुळ | ३०० ग्रॅम | ४० | १२ |
१० | पॅकिंग बॉक्स | ६ | ५ | ३० |
११ | स्टिकर | ६ | २ | १२ |
२९८.०७ | ||||
मजुरी३५% | १०४.३२ | |||
४०२.३९ |
१४. सर्व व्यापक सुरक्षा सावधानता
१. कोणतेही काम करण्यापूर्वी ॲप्रोन व हेडकॅप घालावे.
२ काम झाल्यावर जागेची स्वच्छता करावी
३. कोणतेही काम झाल्यावर गॅस बंद करावे.
४. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची माहिती असावी.
१५. रोग व आजार
1. आजार
१. सर्दी
२. खोकला, ताप
३. डोकेदुखी, पोट दुखी ,घसा दुखणे
४. उलटी, चक्कर येणे, जुलाब होणे,
वेगवेगळ्या आजार होण्याची कारणे.
१. दूषित पाणी
२. दूषित हवा
३.दूषित अन्न
रोग
१टायफाईड,
२ टी बी,
३कावीळ
४.स्वाइन
५.फ्लू
६.डायबिटीज
७.डेंगू ,निमोनिया कोरोना
८.अर्धांग वायु ,कॅन्सर
९. हृदय विकार
१६. साॅस
कृती
1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले
2) त्यानंतर चिंच साफ करून घेतली
3)नंतर 3 लीटर पाण्यात 1 किलो चिंचटाकून उकळून टाकले.
4) मग चाळणी ने गाळून घेतले
5) निघालेले बलकांमध्ये 3 किलो गोळा टाकले व ते मिश्रण गॅसवर ठेवून डंवळून घेतले
6) त्यानंतर त्यांच्याप्रमाणे 20GM मिरची पावडर20GM गरम मसाला 30GM काळ मीठ टाकले आणि ते मिश्रण घेतले.
7) नंतर ते मिश्रण घेतले हेई परयत आणि थंड झाल्यावर बरंनी मध्ये पॅकिंग केलीकिचनला दिलीटाकले आणि ते मिश्रण डवळून घेतले
8) एकूण 4’8GM स्वास किचनला दिले 4’8GM स्वास बनवण्यासाठी427.18 खर्च पैसे आला.
17. अन्न पदार्थतिल भेसल
- भेसल कोण कोणत्या पदार्थमधे केली जाते ।
- तेल ,तूप
- कॉफी ,चहापावडेर
- वेगवेगले डा
- अन्न पदार्थ
- ओषध
- मसाले
- मध
- पालेभाज्या
- फले
भेसल युक्त पदार्थ खाल्याने शरीरावर होणारे दुशपरिणाम - फूड पॉइजन
- उल्टी ,जुलाब ,पोट दुखी
- अर्धानग वायु
प्रस्तावना; आजच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट ही कमी वेळेत तयार होऊन मिळेल अशी हवी असते. याचे कारण बऱ्याचशा महिला आज जॉब किंवा स्वतःचा व्यवसाय करतात त्यामुळे घरच्या कामासाठी खूप कमी वेळ उरतो. म्हणून कमी वेळेत बनवता येतील असे पदार्थ आवडतात. आणि आता रेडी टू इट प्रॉडक्ट मुळे ते सहज शक्य झाले आहे. म्हणून लोकांच्या मागणीनुसार मी इनपुरांची निवड केली.
प्रकल्पाचे नाव: हरभऱ्याला मोड आणून इन्स्टंट पुरण बनविणे
साहित्य: हरभरा, गॅस ,वेलची ,पॅकिंग ,पिशवी,गुळ, साखर
हरभरे भिजत टाकताना
कृती; १) सर्वप्रथम हरभरे निवडून स्वच्छ पाण्याने धुवून कोमट पाण्यामध्ये 24 तासांसाठी भिजत ठेवला.
२) 24 तासानंतर हरभऱ्याला एका सुती कापडामध्ये बांधून 48 तासांसाठी मोड आणण्यासाठी ठेवले.
३) साधारण दीड ते दोन इंच पर्यंत हरभऱ्याला मोड आल्यानंतर त्याचे वजन केले व सोलर रायला वाळायला टाकले.
४) तीन दिवसानंतर हरभरा पूर्ण वाळला. त्यानंतर त्याचे पुन्हा वजन केले. हरभऱ्याची साल काढण्यासाठी एका कापडावरती ओतले व लाटण्याच्या साह्याने लाटून साल काढली
. ५) साल काढल्यानंतर हरभऱ्याच्या डाळीचे वजन केले. जेवढे हरभऱ्याच्या डाळीचे वजन त्याच्या ८० टक्के गुळ व २०% साखर वेलची पुड घेऊन एकत्रित मिश्रण तयार करून घेतले.
६) तयार केलेले ओले पुरण पुरण यंत्राने बारीक केले व सोलर ड्रायरला ड्राय करून घेतले.
७) पुरण ड्राय होण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागला.
८) ड्राय झालेले पुरण मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घेतली व एका एअर बॅग पिशवीमध्ये पॅक केले व स्टिकर लावले.