नाव:- सतीश गोकुळ गौरकार
विषय :- सोलार टेक्निशियन
कंपनीच नाव =SunGET Solar Infra Pvt. Ltd.
Website :- https://www.sungetsolarinfra.com/
उद्दीष्ट:-
सर्व प्रकारचे रोपटॉप सोलर इन्स्टॉलेशन करता येणे
. त्या त्यातील सर्व कामे जसे की वेल्डिंग करणे स्ट्रक्चर बनवणे वायरिंग करणे प्लंबिंग करणे अशा प्रकारची सर्व कामे शिकून घेणे
. सोलार बाबतच्या आणखी नवीन गोष्टी शिकणे जसे की सोलर वॉटर हीटर सोलर वॉटर फिल्टर इत्यादी
सोलार मध्ये वापरले जाणारे काही साहित्य

केलेले काम

1 ) प्रोजेक्ट चालू करणे

२) प्रोजेक्ट डिस्कनेक्ट करणे

३) समस्या शोधणे

४) प्रोजेक्ट डिझाईन

५) ACDB,DCDB बनवणे

६) सोलर पॅनल पावर चेकिंग

७) DCDB कनेक्शन करणे

८) अर्थिंग करणे

९) पायपिंग आणि वायरिंग करणे

१०) स्ट्रक्चर उभारणी व पॅनल बसवणे

११) वॉटर फिल्टर इंलेशन

१२ ) नेमप्लेट बसवणे आणि मार्केटिंग
अनुभव :-
मी गेले अडीच महिने संगीत इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये अप्रेंटीशीप करत होतो त्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकलो अगदी सुरुवातीपासून ते पूर्ण प्रोजेक्ट चालू होईपर्यंत अशा सर्व गोष्टी मी तिथे शिकलो जसे की स्ट्रक्चर उभारणी असेल किंवा वायरिंग करणे असेल लोड कॅल्क्युलेशन करणे त्याचबरोबर अशा ACDB, DCDB बनवणे त्याचबरोबर इन्वर्टर चालू करणे आणि प्रोजेक्ट सुरू करणे स्ट्रिंग जोडणी पॅनल टू पॅनल अर्थिंग जोडणे त्याचबरोबर सर्व पॅनल सिरीज मध्ये जोडून घेणे अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी मी तिथे शिकलो प्रोजेक्ट डिझाईनिंग आणि त्याच्या सर्व प्रकारच्या डिझाईन जसे की प्लंबिंग ची डिझाईन असेल त्याचबरोबर इलेक्ट्रिक ची डिझाईन असेल आणि स्ट्रक्चर डिझाईन असेल अशा सर्व प्रकारच्या डिझाईन ओळखणे व त्यानुसार काम करणे हे शिकलो आकृतीवरून आपण एखादी इन्स्टॉलेशन करू शकतो हे खात्री पटली हे सर्व करत असताना प्रोजेक्ट लीड कसा करायचा सर्वांसोबत मिळून बसून काम कसे करायचे त्याचबरोबर आपले काम वेळेत कसे झाले पाहिजे आणि आपल्या एका प्रोजेक्टसाठी येणारा खर्च तो कसा मांडला पाहिजे अशा प्रकारच्या सर्व गोष्टी मी तिथे शिकलो बेसिक पासून एकदम ऍडव्हान्स पर्यंत सर्व गोष्टी मला तिथे शिकता आल्या शिकण्यासाठी वेळ कमी पडत होता असं मला जाणून आलं आपण जसं शिकत जाईल तितका वेळ कमी पडत जातो हे नक्कीच एखादी सिस्टीम बसत असताना किंवा ती काढत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कोणत्या प्रकारची सुरक्षितता वापरली पाहिजे हेही तिथे समजून आले
पुढे चालून मी सोलार क्षेत्रामध्ये स्वतःचेच असे मोठे काम करणार आहे यासाठी मी प्रयत्न करीन
धन्यवाद!