बांधकाम
बांधकाम म्हणजे काय?
बांधकाम म्हणजे भौतिक रचनेची निर्मिती किंवा उभारणी करण्याची प्रक्रिया या बांधकामासाठी इमारती, पूल,रस्ते,धरणे इत्यादी उभारणी करण केले जातात त्याला आपण बांधकाम असे म्हणतो.
1) बांधकामातील महत्त्वाचे बॉड प्रकार :
1) स्टेरचर बॉड : वेट लांब बाजूने एकमेकांना वर ठेवून बांधकाम केल जात.
2) हेडर बॉण्ड : प्रत्येकी एक स्टेरचर म्हणजे वीट रुंद बाजूने ठेवून रचना केली जाते.
3) इंग्लिश बॉण्ड – प्रत्येकी एक स्टेरचर आणि हेडर रांग ठेवून मजबूत बांधकाम केले जाते.
4) फ्लेमिश बॉण्ड : प्रत्येक रांगेत स्ट्रेरचर आणि हेडर विटा उलटून पलटून मांडल्या जातात.
बांधकाम साठी आवश्यक प्रमाण :
प्रत्येक बांधकामसाठी प्रमाण महत्वाचे असते व योग्य पद्धतीताला प्रमाण उपयोग करता आले पाहिजे.
1) सिमेंट आणि वाळूचे प्रमाण (mortar ratio )
उदाहरण: विटाचे बांधकाम -1:6 ( एक घमेले सिमेंट , सहा घमेले वाळू.)
2) प्लास्टरिंग – 1:4 ( 1 घमेले सिमेंट, 6 घमेले वाळू)
3) काँक्रीट मिक्सर प्रमाण :
• रूमच्या बांधकामासाठी -1:2:3 ( 1 घमेले सिमेंट , दोन घमेले वाळू, तीन घमेले खडी )
• मजबूत आरसीसी साठी :1:1.5:3,( 1 घमेले सिमेंट ,1.5 घमेले वाळू ,3 घमेले खडी )
*R.C.C चा पूर्ण अर्थ : रेनफोर सिमेंट काँक्रेट.
साधने :
1(हातगाडी 2) फावडा 3) वाळू,सिमेंट,डस्ट 4) विटा 5) थापी 6)घमेले
तपासणी केली :
1) पायपाची जागा बघितली
2) पाईप सुरक्षित आणि बेजवानीसाठी सोपे चेंबर तयार केले.
3) प्रमाण 1:6 घेतले ( एक घमेले सिमेंट आणि 6 जमेले क्रश
4) तयार करण्याचे जागेवरती पाणी टाकून नंतरुन माल टाकला आणि विटा पाण्यात भिजून घेतल्या.
5) व चेंबर तयार केले आणि प्लास्टर केले .




Milling Machine
उद्देश:-
विविध आकारांचे आणि जटील यांत्रिक भाग निर्माण करणे आहे हे सामग्रीवर कटिंग ड्रीडवर शिपिंग आणि मिलिंद मशीन चा उपयोग जटिल आकार आणि सुसंगत अचूकता आवश्यक असलेल्या भागांच्या निर्मितीसाठी केला जातो.
साहित्य:- मिलिंग मशीन, कटिंग, स्टूल, लाकूड, ब्लोअर, जॉब, की व सेफ्टी.
कृती:-
- पहिल्यांदा मशीन चालू करण्यापूर्वी सर्व साफसफाई करून घेतलीसर्व सेफ्टी आहे का नाही ते पहिल्यांदा घालावे नंतर मशीन जवळ जावे.
- लाकडाचा तुकडा हा मशीन मध्ये नीट बसवला व त्याला टाईप केला स्टॉलच्या मापावर त्याला ऍडजेस्ट करून घेतले व fit केले.
- नंतर हळू हळू त्याला forward press केले मग तिथून परत vertically आणल.
- मशीन चालू असताना जर मशीन मधून धूर निघाला तर फुक मारू नये त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते .

लेथ मशीन
लेथ मशीन उद्देश :
लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठी लेथ मशीन चा वापर करतात.
साहित्य :
वर्णीय कलीफएर , लेथ मशीन मटेरियल : लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा.
कृती :
लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . लेथ मशीन वापरताना सेफ्टी घातली. नंतर लेथ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. टूल पोस्ट वर टूल बीट लावले . चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. मशीन चालू करून हळू हळू टूल पोस्ट पुढे ढकलला.
लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूल :-
Facing :-
लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.·
TAPERING:-
टेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.
PARALLEL TURNING:- एक महत्त्वाचे

पायाची आखणी
उद्देश :
पायाची आखणी करणे म्हणजे पायाचे योग्य आकार रचना आणि संरचना करणे तयार करणे . यामध्ये प्रॅक्टिकलचे मुख्य
उद्देश पायाचे आखणी या अंगाची मपे आणि पॉलिहास ची पाया आखणी.
•पायाची आखणी करणे म्हणजे पायाचे योग्य रचना आणि संरचना तयार करणे.
साहित्य:-
पेपर, पेन्सिल, स्केल, रबर, टेप, गज, ओळंबा, गुणा, पावडर राखण्यासाठी, कोन मापक.
कृती:-
सर्वात आधी पायाखणीसाठी सर्व साहित्य जमा करावे.
पहिल्यांदा आकृती पाहिले . त्यानुसार त्याची लांबी व रुंदी पाहिली .
नंतर मेजर टेपने पहिले मापून घेतले त्यानंतर लांबी व रुंदी अन त्यावरती फक्कीचे मार्केट करून घेते केली .
मापन बरोबर आल्यावर आखणी करून घेतली.
त्यानंतरहून पूर्ण पक्की मारून घेतली त्यानंतर चैनल साठी आठ जागेवरती खड्डे काढले.


प्लाजमा कटर
प्लाजमा कटर म्हणजे काय?
मेटल पार्ट कट करण्यासाठी असतो किंवा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कट करू शकतो.
प्लाज्मा कटर हा एक प्रकारचा कापणी यंत्र (cutting tool) आहे, जो धातूचे अचूक आणि जलद कापणीसाठी वापरला जातो. हे साधन प्लाज्मा आर्च (plasma arc) तंत्रज्ञानावर कार्य करते, जेथे उच्च-तापमानदर्शक आयनाइझ्ड गॅस (प्लाज्मा) प्रवाहाचा वापर करून धातू वितळवून आणि उडवून टाकला जातो.
प्लाजमा मध्ये 0.1 mm ते 8 mm कट पर्यंत पत्र शीट करता येतो.
डिजाईनचे मटरने कट करण्यासाठी solid work वर किंवा AutoCAD वरती डिझाईन तयार केले जात.
मुख्य भाग :
1) power supply.
2) air compressor
3) torch
4) नोझझले
5) control panel
6) ground clamp
7)Electrode
कृती :
1) सर्वात पहिले सेफ्टी घातले ग्लव्स आणि ट्रान्सपरंट गॉगल.
नंतरुन पत्र्याचे शीट लावून घेतले.
नंतरुन ग्राउंड क्लंप जोडा त्यानंतरएअर नंतरुन आर कॉम्प्रेसर सुरू केला
चालू झाल्यानंतर प्लाजमा कटर सुरू केला
कंट्रोल सेटिंग चेक केला आणि त्यावरती डिझाईन लावली नंतर
पत्र्याचे सीट बरोबर आहे का नाही ते पाहिले.
त्यानंतर मी स्वतः मशीन चालवले आणि 12 पीस शिडी( पायऱ्या )साठी कट केले.
फायदे:
1) लवकर आणि सरळ कटिंग
2) कमी खर्च
3) कमी उष्णता प्रभाव क्षेत्र

Rcc कॉलम
उद्देश :
Rcc – रेन्फोस्टर सिमेंट काँक्रीट ( reinforceted cement concrete )
इमारतीच्या सरचनेचे सामर्था आणि स्थिरता वाळून इमारतीची डिझाईन आणि योग्य ती रचना करणे व मोजमापन करणे.
साहित्य:
सिमेंट, खडी, रेती , पाणी, थापी, गज, पावडे ,घमेले,गोल पिलर साठी प्लास्टिक पाईप .
कृती:
1) पहिल्यांदा वर्कशॉपचे साईडला जाऊन साईड पाहिले.
2) नंतरुन स्क्रॅप ला जाऊन साच्याची लांबी आणि डायमीटर काढला.
3) नंतर लिटरचे फॉर्मुला वापरून टोटल माल किती बसतो ते काढले. नंतरुन त्याचे प्रमाण 1:2:4 अशाप्रकारे सिमेंट खडी रेती आणि पाणी जमा व सर्व साहित्य जमा केले
4) साच्याला ऑनलाईन ऑइल घेतले.
5) पाणी टाकून सर्व माल तयार केले
6) नंतरन पिलर च्या साच्यामध्ये माल टाकला आणि मिश्रण त्याचे पूर्ण पणे व्हायब्रेट केले.
7) नंतरुन त्याला गजाने वरून नीट दाबून घेतले.
फायदे:
1) उच्चतागत आणि टिकाऊपणा
2) लोड सहन करण्याची क्षमता.
3) देखभाल कमी लागते
4) आकार आणि डिझाईन मध्ये लवचिकता.
सूत्र : 1:2:4
1 घमेले सिमेंट 2) 2 घमेले 3) 4 खडी

फेरो सिमेंट
फेरो सिमेंट म्हणजे काय ?
फेरो सिमेंट हा एक बांधकाम साहित्य प्रकार आहे जे सिमेंट वाळू आणि लहान जाळीदार स्टीलची जाळी ( wire mesh ) किंवा लोखंडी बार यांच्या संयोजनातून तयार होते. याचा उपयोग हलक्या पण आणि मजबूत रचनेसाठी केला जातो .
उद्देश : पारंपरिक काँक्रीट पेक्षा कमी वजनात अधिक टिकवू आणि मजबूत बांधकामासाठी फिरोज सिमेंट वापरले जाते आणि कमी खर्चात टिकाऊ तर संरचना तयार करण्यासाठी हे उपयुक्त आहे
प्रमाण -1:3, 1= सिमेंट 3= वाळू ( रेती )
कृती :
1) पहिल्यांदा सर्व साहित्य जमा करून घेते.
2) नंतरन चेंबर ची लांबी आणि रुंदी मोजली 570×560
3) त्यानुसार टॉर्चर बारला बेंड करून कट करून वेल्डिंग मारले.
4) बार्शी फ्रेम मध्ये हँडल साठी बेंड करून घेतले आणि मध्ये एक एक आडवा बार सपोर्टला लावला.
5) त्यानंतरन फ्रेमनुसार wiremesh जाळी कट केली आणि बाइंडिंग तारेने बांधले.
6) नंतरुन चिकन मिस जाळीला बाइंडिंग तारेने तिच्यावरती बांधले.
7) सिमेंट आणि वाळू वरती फॉर्मुला वापरून तिचे प्रमाण काढले . त्यानुसार आम्ही तिचे मोल्टर ( मसाला तयार केला )
8) नंतरुन जाळीवरती फ्रेम मध्ये मसाला टाकला आणि मग हॅप्पीने प्लॅन करून घेतले.
9) बॉटम पट्टी लावून फिनिशिंग देण्यासाठी वरतून सिमेंट मारले आणि फिनिशिंग दिली.
नर्सरी शेड
प्रस्तावना
नर्सरी शेड म्हणजे रोपे व लहान वनस्पती यांना योग्य वातावरण मिळावे म्हणून तयार केलेली संरचना होय. या शेडमुळे रोपांना जास्त ऊन, पाऊस, वारा व थंडीपासून संरक्षण मिळते तसेच तापमान, आर्द्रता व प्रकाश यांचे नियंत्रण करता येते. नर्सरी शेडमध्ये रोपे निरोगी वाढतात, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण वाढते. त्यामुळे व्यावसायिक तसेच घरगुती नर्सरीसाठी नर्सरी शेडचे महत्त्व खूप मोठे आहे. 🌱
सर्वे
नर्सरी शेड उभारणीपूर्वी केलेल्या सर्वेमध्ये जागेची निवड, जमिनीची समतलता, पाण्याची उपलब्धता व निचरा व्यवस्था तपासली. सूर्यप्रकाश किती वेळ मिळतो, वाऱ्याची दिशा, परिसरातील तापमान व आर्द्रता यांचा अभ्यास करण्यात आला. शेडसाठी लागणारे साहित्य, खर्चाचा अंदाज व रोपांच्या प्रकारानुसार शेडचे आकारमान ठरविण्यात आले. या सर्वेच्या आधारे योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीने नर्सरी शेड उभारणीचे नियोजन करण्यात आले. 🌿
साहित्य :
- .आय. पाईप / लोखंडी पाईप (फ्रेमसाठी)
- शेड नेट (५०% / ७५% – आवश्यकतेनुसार)
- प्लास्टिक शीट / पॉलिथिन (पावसापासून संरक्षणासाठी)
- नायलॉन दोरी / वायर
- नट-बोल्ट व क्लॅम्प
- सिमेंट, वाळू व खडी (खांब बसविण्यासाठी)
- लोखंडी अँगल / चॅनल (आधारासाठी)
- हातोडा, पाना, ड्रिल मशीन अशी अवजारे
- पाणीपुरवठ्यासाठी पाईप व स्प्रिंकलर (गरजेनुसार)
- रोपांची ट्रे, कुंड्या व माती मिश्रण
कृती :
- सर्वप्रथम नर्सरी शेडसाठी योग्य व समतल जागेची निवड करण्यात आली.
- जमिनीचे मोजमाप करून शेडचे लांबी-रुंदी निश्चित करण्यात आली.
- खांब बसविण्यासाठी ठराविक अंतरावर खड्डे खोदण्यात आले.
- जी.आय./लोखंडी पाईप खड्ड्यात उभे करून सिमेंट-कॉंक्रिटने घट्ट बसविण्यात आले.
- खांबांवर आडवे पाईप/अँगल बसवून मजबूत फ्रेम तयार करण्यात आली.
- फ्रेमवर शेड नेट व्यवस्थित पसरवून वायर किंवा दोरीने घट्ट बांधण्यात आले.
- पावसापासून संरक्षणासाठी वरच्या बाजूस प्लास्टिक शीट लावण्यात आली.
- पाणी निचरा होण्यासाठी योग्य उतार ठेवण्यात आला.
- शेडच्या आत रोपांच्या ट्रे, कुंड्या व पाण्याची सोय करण्यात आली.
- शेवटी संपूर्ण शेडची तपासणी करून वापरासाठी तयार करण्यात आले. 🌿


निरीक्षण
नर्सरी शेड उभारल्यानंतर रोपांना नियंत्रित प्रकाश व योग्य तापमान मिळाल्याचे आढळून आले. शेडमुळे जास्त ऊन, पाऊस व वाऱ्याचा थेट परिणाम रोपांवर होत नाही. रोपांची वाढ एकसमान व निरोगी झाली असून पानांचा रंग हिरवट व ताजातवाना दिसून आला. पाण्याचा अपव्यय कमी झाला व रोग-किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी झाल्याचे निरीक्षणात आले. एकूणच नर्सरी शेडमुळे रोपांची गुणवत्ता व जगण्याचे प्रमाण वाढले. 🌱
– निष्कर्ष :
नर्सरी शेडच्या वापरामुळे रोपांना सुरक्षित व अनुकूल वातावरण मिळते, ज्यामुळे त्यांची वाढ जलद व निरोगी होते. हवामानातील बदलांचा परिणाम कमी होऊन रोपांचे नुकसान टाळता येते. पाणी, वेळ व मेहनत यांची बचत होते तसेच रोपांची गुणवत्ता व उत्पादनक्षमता वाढते. त्यामुळे व्यावसायिक तसेच घरगुती नर्सरीसाठी नर्सरी शेड उपयुक्त व आवश्यक ठरतो. 🌿
भविष्यातील उपयोग :
रोपांची सुरक्षित वाढ – तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश नियंत्रित करून निरोगी रोपे तयार करता येतात.
उच्च दर्जाची लागवड सामग्री – शेतकरी व बागायतदारांना दर्जेदार रोपे मिळतात, उत्पादन वाढते.🌦️ हवामान बदलाचा सामना – अतिवृष्टी, उष्णता, थंडी यापासून रोपांचे संरक्षण होते.
नवीन वाणांची चाचणी – सुधारित किंवा संकरित वाणांची प्रयोगात्मक लागवड करता येते.
पाणी व संसाधनांची बचत – ड्रिप/मिस्ट सिंचनामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर.
स्वयंरोजगार व उत्पन्नाचे साधन – रोपे विक्री, प्रशिक्षण केंद्र, कृषी व्यवसायासाठी उपयोगी.
शाश्वत शेतीला चालना – सेंद्रिय शेती, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धतींसाठी महत्त्वाचे.
प्रशिक्षण व संशोधन – विद्यार्थी, शेतकरी प्रशिक्षण व कृषी संशोधनासाठी वापर.
साईडिंग विंडो
प्रस्तावना
आजच्या आधुनिक बांधकामामध्ये स्लाइडिंग विंडोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कमी जागेत सहज उघड–बंद होणारी, हवा व प्रकाश चांगल्या प्रकारे देणारी आणि आकर्षक दिसणारी अशी स्लाइडिंग विंडो आहे. ही खिडकी अल्युमिनियम, UPVC किंवा लोखंडी फ्रेममध्ये तयार केली जाते.
उद्देश
- स्लाइडिंग विंडोचे भाग व रचना समजून घेणे.
- स्लाइडिंग विंडो बसवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया शिकणे.
- योग्य मापन, फिटिंग व सुरक्षितता पद्धतींचा अभ्यास करणे.
लागणारे साहित्य व साधने
साहित्य:
- स्लाइडिंग विंडो फ्रेम (अल्युमिनियम/UPVC)
- काच (ग्लास)
- रोलर/व्हील
- रबर बीडिंग
- स्क्रू, रॉ वॉल प्लग
- सिलिकॉन सीलंट
साधने:
- मोजपट्टी
- स्क्रू ड्रायव्हर / ड्रिल मशीन
- स्पिरिट लेव्हल
- रबर हातोडा
- सेफ्टी हातमोजे
कृती
जागेची पाहणी व मापन
- सर्वप्रथम ज्या ठिकाणी स्लाइडिंग विंडो बसवायची आहे त्या जागेची पाहणी केली.
- भिंत सरळ आहे की नाही हे स्पिरिट लेव्हलने तपासले.
- मोजपट्टीच्या सहाय्याने खिडकीच्या उघड्या जागेची रुंदी व उंची अचूक मोजली.
- घेतलेले मापन नोटबुकमध्ये नोंदवले.
- मापनानुसार स्लाइडिंग विंडो फ्रेम योग्य आकाराची आहे का ते तपासले.
फ्रेमची तयारी
- स्लाइडिंग विंडोची फ्रेम जमिनीवर ठेवून तिचे सर्व भाग तपासले.
- फ्रेममध्ये कोणतीही वाकडी किंवा तुटलेली जागा नाही याची खात्री केली.
- फ्रेमवरील स्क्रू होल योग्य ठिकाणी आहेत का ते पाहिले.
फ्रेम बसवणे
- फ्रेम खिडकीच्या उघड्या जागेत उचलून ठेवली.
- स्पिरिट लेव्हलने फ्रेम पूर्णपणे सरळ (लेव्हल) आहे का ते तपासले.
- फ्रेम हलू नये म्हणून लाकडी वेज/सपोर्ट लावले.
- ड्रिल मशीनने फ्रेमच्या होलमधून भिंतीत होल पाडले.
- भिंतीत रॉ वॉल प्लग घालण्यात आले.
- स्क्रूच्या सहाय्याने फ्रेम भिंतीला घट्ट बसवली.
स्लाइडिंग ट्रॅक व रोलर बसवणे
फ्रेममधील वरचा व खालचा ट्रॅक साफ केला.
स्लाइडिंग पॅनलच्या खालच्या बाजूस रोलर (व्हील) बसवले.
रोलर योग्य प्रकारे घट्ट बसले आहेत का ते तपासले.
स्लाइडिंग पॅनल बसवणे
- स्लाइडिंग पॅनल सावधपणे उचलून फ्रेमच्या ट्रॅकमध्ये बसवले.
- पॅनल डावीकडे व उजवीकडे सरकवून त्याची हालचाल तपासली.
- पॅनल अडकत असल्यास रोलरची उंची समायोजित केली.
ग्लास) बसवणे
- स्लाइडिंग पॅनलमध्ये काच काळजीपूर्वक बसवली.
- काच सुरक्षित राहण्यासाठी रबर बीडिंग लावली.
- रबर हातोड्याच्या सहाय्याने बीडिंग नीट बसवली.
सीलिंग व फिनिशिंग
- फ्रेम व भिंतीच्या जोडावर सिलिकॉन सीलंट लावला.
- पाणी व हवा आत येणार नाही याची खात्री केली.
- संपूर्ण स्लाइडिंग विंडो साफ केली.
- शेवटी खिडकी उघड–बंद करून अंतिम तपासणी केली.
निरीक्षण
- स्लाइडिंग विंडो सहज उघड–बंद होते.
- योग्य फिटिंग केल्यामुळे हवा व पाणी गळती होत नाही.
- खिडकी दिसायला स्वच्छ व आकर्षक दिसते.
आलेल्या अडचणी
- अचूक मापन न घेतल्यास फ्रेम बसवताना अडचण येते.
- रोलर नीट न बसल्यास पॅनल अडकते
निष्कर्ष
या प्रॅक्टिकलमधून स्लाइडिंग विंडो बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजली. योग्य साहित्य, अचूक मापन व सुरक्षित पद्धती वापरल्यास स्लाइडिंग विंडो टिकाऊ व उपयुक्त ठरते.
`भविष्यातील उपयोग
- घर, ऑफिस, गेस्ट हाऊस व शाळांमध्ये वापर.
- कमी जागेत जास्त प्रकाश व हवा मिळवण्यासाठी उपयुक्त.
- देखभाल खर्च कमी असल्यामुळे दीर्घकाळ वापरासाठी फायदेशीर.
गेस्ट होस्टेल प्रायमर मारणे
प्रस्तावना
गेस्ट होस्टेल इमारतीच्या भिंतींवर रंगकाम करण्यापूर्वी प्रायमर लावणे अत्यंत आवश्यक असते. प्रायमरमुळे भिंती मजबूत होतात, रंग टिकाऊ राहतो व पृष्ठभाग गुळगुळीत होतो. या कामासाठी आवश्यक साहित्य, साधने व मनुष्यबळ वापरून नियोजनबद्ध पद्धतीने प्रायमर मारण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
सर्वे
काम सुरू करण्यापूर्वी गेस्ट होस्टेलच्या भिंतींची पाहणी करण्यात आली.
भिंतींची अवस्था तपासली
भेगा, खड्डे व असमान भाग ओळखले
प्रायमरची गरज असलेले क्षेत्र निश्चित केले
लागणाऱ्या साहित्याचा अंदाज घेतला
या सर्वेनंतर प्रत्यक्ष कामाचे नियोजन करण्यात आले.
उद्देश
गेस्ट होस्टेलच्या भिंतींना प्रायमर लावणे
भिंती रंगकामासाठी योग्य बनवणे
भिंतींची टिकाऊपणा व मजबुती वाढवणे
अंतिम रंगकामाचा दर्जा सुधारणे
साहित्य
प्रायमर – एकूण 60 लिटर
पत्रे – 4 नग
स्क्रॅपर – 2 नग
9 इंची रोलर – 2 नग
6 इंची रोलर – 2 नग
ब्रश – 3 नग (4 इंची)
रोलर – ₹250 चा
पुट्टी – 10 किलो
रंगाची बादली
कृती
सर्वप्रथम भिंती स्क्रॅपरने स्वच्छ करण्यात आल्या.
भेगा व खड्डे पुट्टीने भरून पृष्ठभाग समतल केला.
पुट्टी सुकल्यानंतर हलके घासून भिंती तयार केल्या.
प्रायमर बादलीत योग्य प्रमाणात तयार केला.
मोठ्या पृष्ठभागावर 9 इंची रोलर वापरून प्रायमर मारला.
लहान व कडांच्या भागांसाठी 6 इंची रोलर व ब्रश वापरले.
संपूर्ण गेस्ट होस्टेलमध्ये एकसारखा प्रायमर कोट देण्यात आला.
निष्कर्ष
सर्व नियोजनानुसार गेस्ट होस्टेलला यशस्वीपणे प्रायमर मारण्यात आला. भिंती स्वच्छ, मजबूत व रंगकामासाठी योग्य झाल्या. वापरलेला प्रायमर योग्य प्रमाणात असून साहित्याचा अपव्यय टाळण्यात आला.
भविष्यातील उपयोग
या प्रायमरवर रंग लावल्यास रंग जास्त काळ टिकेल
भिंतींना ओलावा व भेगांपासून संरक्षण मिळेल
गेस्ट होस्टेलचे सौंदर्य व दर्जा वाढेल
पुढील देखभाल खर्च कमी होईल
काय शिकलो
प्रायमरचे महत्त्व आणि त्याचा योग्य वापर
साहित्य व साधनांची योग्य निवड कशी करावी
काम सुरू करण्यापूर्वी सर्वे करणे किती आवश्यक आहे
टीमवर्क व नियोजनामुळे काम वेळेत आणि दर्जेदार होत
कॉस्टिंग
