कॉट तयार केले
प्रस्तावना
आज काल खाली कोणी झोपत नाही .झोपण्या साठी लोक कॉट चा जास्तीट जास्त वापर करतात .वर्कशोप सुरु केल्या नंतर कॉट तयार करून विकू शकतो .
उद्दिष्ट
- गेस्ट हाऊस मध्ये येणाऱ्या गेस्ट साठी झोपण्याची सोय करणे
- कॉट बनवायला शिकणे
साहित्य
1” x 2” स्क्वेअर ट्यूब
1” x 1” स्क्वेअर ट्यूब
0.75″ x 0.75″ स्क्वेअर ट्यूब
वेल्डिंग रॉड
ग्राइंडिंग डिस्क
पॉलिश व्हील
रेडऑक्साईड प्रायमर
काळा ऑइल पेंट
पॉलिश पेपर
लंबी
कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन
कृती





- ज्या तयार फ्रेम होत्या त्यांना ग्रँडिंग केली
- 5 कॉट ग्रँडिंग केल्या नंतर त्या 5 कॉट ल प्राइमार कलर दिला
- कलर वाळल्यावर 5 कॉट ल लांबी लावली
- एका कॉट ला फळ्या लावल्या
कॉस्टिंग
| अ . क्र | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | 0.75 x 0.75 स्क्वेअर ट्यूब | 20′ | 25 | 500 |
| 2 | 1 x 2 स्क्वेअर ट्यूब | 360′ | 30 | 10,800 |
| 3 | 1 x 1स्क्वेअर ट्यूब | 100′ | 35 | 3,500 |
| 4 | 1/2 x 1/2 स्क्वेअर ट्यूब | 100′ | 40 | 4,000 |
| 5 | रॉड पुडा | 2 | 400 | 800 |
| 6 | कटींग व्हिल | 5 | 25 | 125 |
| 7 | ग्रीडिंग व्हिल | 5 | 30 | 150 |
| 8 | पॉलिश व्हिल | 3 | 30 | 150 |
| 9 | कटींग व्हिल [14 in] | 1 | 200 | 200 |
| 10 | लंबी | 2 kg | 500 | 1000 |
| 11 | प्रायमर | 2 L | 240 | 480 |
| 12 | थीनर | 2 L | 120 | 240 |
| 13 | काळा ऑईल पेंट | 2 L | 340 | 680 |
| 14 | रोलर | 1 | 50 | 50 |
| 15 | Electricity [10%] | 2,270 | ||
| 16 | मजुरी [15%] | 3,400 | ||
| 17 | total | 28,350 |
काय शिकलो
- कलर कसं मारायचा
- फळ्या कटींग करायला शिकलो
- वेळदीनग मारायला शिकलो
- ग्रँडिंग करायला शिकलो
- टीम वर्क करायला शिकलो
- फळ्यांना कोणत्या प्रकारचा कलर दिल जातो
- फळ्यांना पॉलिश माररायला शिकलो
- राऊटर मशीन चालवायला शिकलो
आलेल्या समस्या
- वेलडिंग मारता कॉट च्या टुब जाळायच्या
- राऊटर मशीन चालवत येत नव्हती
समस्येवरचे उपाय
- संदीप आणि पवन कडून वेलडिंग करायला शिकलो
- मशीन कशी चालवायची ते शिकून घेतल
निष्कर्ष
टीम वर्क करायला शिकलो आणि टीम वर्क करताना जे कोणी टीम मध्ये आहेत त्यांच्याशी कामीनिकेशन वाढल.या प्रकल्पातून मेटल फॅब्रिकेशनचे महत्त्वाचे कौशल्य — डिझाइनिंग, कटिंग, वेल्डिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंग यांचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून एक मजबूत व दर्जेदार लोखंडी कोट तयार करण्यात आला.
भविष्यातील उपयोग
- जर मला काही काम नाही मिळालं तर मी कॉट तयार करायच काम करू शकतो
- घरात हवे असतील टर स्वत साठी तयार करू शकतो
प्लंबिंग
प्रस्तावना
आजच्या काळात प्लाम्बिग ची काम कमी नाहीत .स्वतच्या घरात सुधा प्लाम्बिग लागते
उद्दिष्ट
- प्लंबिंग शिकण्य साठी
- प्लंबिंग साठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवण्या साठी
- बाहेर जेव्हा काम घेतो तेव्हा कशी काम करायची कोनत्या प्रकारची असतात
साहित्य
1) पाइप्स (नळ्या):
- PVC पाइप
- CPVC पाइप
- GI (लोखंडी) पाइप
- uPVC पाइप
- 2फिटिंग्ज:
- एल्बो (Elbow)
- टी (Tee)
- कपलर (Coupler)
- रिड्यूसर (Reducer)
- युनियन (Union)
- कॅप (Cap)
- बेंड (Bend)
- ३ वाल्व्ह / नळ:
- बॉल वाल्व्ह
- गेट वाल्व्ह
- स्टॉप कॉक
- मिक्सर नळ
- बिब कॉक (साधा नळ)
- ४ साधने (Tools):
- पाइप कटर / हॅक्सॉ
- पाइप रिंच
- अॅडजस्टेबल स्पॅनर
- स्क्रूड्रायव्हर
- मेजरिंग टेप
- लेव्हल
कृती
- घेस्त होस्टेल मध्ये पाईप लाईन ची मार्किंग करून घेतली
- मार्किंग केलेलं फोडून घेतला
- सामानाची यादी केली
- पाईप लाईन बसवून घेतली
- गावात जाऊन पाईप लाईन फिटिंग केली
- गावातच वॉटर हिटर बसवला
- टाकी बसवली
- पाईप लाईन साठी खड्डे करून घेतले
- जमिच्या आतील पाईप लाईन शोधली
- त्या पाईप लाईन ला t लाऊन नवीन नळ घेतला


काय शिअकलो
- पाईप चे प्रकार शिकलो
- प्लंबिंग साठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती शिकलो
- चेंबर लाईन साठी पाईप करा कात करायचा
- वॉटर हिटर बसवला शिकलो
- कोणत्या ठिकाणी कोणता पाईप बसवायचा हे शिकलो
आलेल्या समस्या
- पाईप ला क्लिप लावताना क्लिप किंवा पाईप तुटायचे
- पाईप कमी जास्त कापला जायचा
समस्येवरचे उपाय
- क्लिप लावताना क्लिप ताणून लावायची
- पाईप कमी कात झाला असेल तर मध्ये सॉकेट लाऊन दुसरा पाईप जोडायचा
निष्कर्ष
प्लंबिंग शिकणे म्हणजे केवळ नळ-पाईप दुरुस्ती नव्हे, तर घरगुती स्वच्छता, सुरक्षितता आणि पाण्याचा योग्य वापर यांची जबाबदारी समजून घेणे होय. प्लंबिंगमुळे समस्या ओळखणे, तांत्रिक कौशल्ये विकसित करणे आणि वेळेत उपाय करणे शिकता येते. हे कौशल्य रोजगाराच्या दृष्टीनेही उपयुक्त असून स्वावलंबन वाढवते. त्यामुळे प्लंबिंग शिकणे हे जीवनोपयोगी, व्यावहारिक आणि भविष्यासाठी फायदेशीर ठरते.
भविष्यतील उपयोग
- घरत जर नळ खराब झाल तर चगेच स्वत दुरुस्त करू शकतो
- स्वत प्लंबिंग चा व्यवसाय सुरु करू शकतो
RCC कॉलम
प्रस्तावना
RCC (Reinforced Cement Concrete) कॉलम हा इमारतीच्या संरचनेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कॉलमचे मुख्य कार्य म्हणजे वरून येणारा भार (स्लॅब, बीम, भिंती, छप्पर इ.) सुरक्षितपणे पाया (फाउंडेशन) पर्यंत पोहोचवणे.
उद्दिष्ट
- इमारतीवरील वरचा संपूर्ण भार (स्लॅब, बीम, भिंती, छप्पर इ.) सुरक्षितपणे पायाकडे (फाउंडेशन) पोहोचवणे.
- संरचनेला आवश्यक ती मजबुती व स्थैर्य प्रदान करणे.
- दाब (Compression) व ताण (Tension) सहन करून इमारतीची सुरक्षितता वाढवणे.
- इमारतीचे आयुष्य वाढवण्यासाठी टिकाऊ व मजबूत आधार देणे.
साहित्य
- सिमेंट (Cement)
- काँक्रीट तयार करण्यासाठी वापरले जाते. हे साहित्य घटकांना एकत्र बांधून मजबुती देते.
- वाळू (Fine Aggregate)
- सिमेंट व खडी यांच्यामधील रिकाम्या जागा भरून काँक्रीटला घट्टपणा देते.
- खडी / गिट्टी (Coarse Aggregate)
- काँक्रीटला मजबुती व भार सहन करण्याची क्षमता प्रदान करते.
- पाणी (Water)
- सिमेंटच्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक असून काँक्रीटला कार्यक्षम बनवते.
- स्टील सळया (Reinforcement Steel / TMT Bars)
- कॉलमला ताण व वाकणे सहन करण्याची क्षमता देतात.
- स्टिरप्स / रिंग्स (Stirrups / Ties)
- मुख्य सळयांना बांधून ठेवण्यासाठी व कॉलमची स्थिरता वाढवण्यासाठी वापरल्या जातात.
- फॉर्मवर्क (Shuttering / Mould)
- कॉलमला आवश्यक आकार देण्यासाठी वापरले जाणारे तात्पुरते साहित्य.
कृती
- मेजार्मेंट घेतलं
- खड्डे खणून घेतले
- सळ्यांचा सांगाडा तयार केला
- फाल्यांचा बॉक्स तयार केला
- सिमेंट कालवल
- सांगाडा आणि फाल्यांचा बॉक्स खड्यात ठेऊन वरून सिमेंट भरल

पाया बांधकाम
बांधकाम म्हणजे काय
बांधकाम म्हणजे भौतिक रचनेची निर्मिती किंवा उभारणी करण्याची प्रक्रिया या बांधकामासाठी इमारती, पूल,रस्ते,धरणे इत्यादी उभारणी करण केले जातात त्याला आपण बांधकाम असे म्हणतो.
1) बांधकामातील महत्त्वाचे बॉड प्रकार :
1) स्टेरचर बॉड : वेट लांब बाजूने एकमेकांना वर ठेवून बांधकाम केल जात.
2) हेडर बॉण्ड : प्रत्येकी एक स्टेरचर म्हणजे वीट रुंद बाजूने ठेवून रचना केली जाते.
3) इंग्लिश बॉण्ड – प्रत्येकी एक स्टेरचर आणि हेडर रांग ठेवून मजबूत बांधकाम केले जाते.
4) फ्लेमिश बॉण्ड : प्रत्येक रांगेत स्ट्रेरचर आणि हेडर विटा उलटून पलटून मांडल्या जातात.
बांधकामा साठी आवश्यक प्रमाण
प्रत्येक बांधकामसाठी प्रमाण महत्वाचे असते व योग्य पद्धतीताला प्रमाण उपयोग करता आले पाहिजे.
1) सिमेंट आणि वाळूचे प्रमाण (mortar ratio )
उदाहरण: विटाचे बांधकाम -1:6 ( एक घमेले सिमेंट , सहा घमेले वाळू.)
2) प्लास्टरिंग – 1:4 ( 1 घमेले सिमेंट, 6 घमेले वाळू)
3) काँक्रीट मिक्सर प्रमाण :
• रूमच्या बांधकामासाठी -1:2:3 ( 1 घमेले सिमेंट , दोन घमेले वाळू, तीन घमेले खडी )
• मजबूत आरसीसी साठी :1:1.5:3,( 1 घमेले सिमेंट ,1.5 घमेले वाळू ,3 घमेले खडी )
*R.C.C चा पूर्ण अर्थ : रेनफोर सिमेंट काँक्रेट.
साहित्य
1(हातगाडी 2) फावडा 3) वाळू,सिमेंट,डस्ट 4) विटा 5) थापी 6)घमेले
तपासणी केली
1) पायपाची जागा बघितली
2) पाईप सुरक्षित आणि बेजवानीसाठी सोपे चेंबर तयार केले.
3) प्रमाण 1:6 घेतले ( एक घमेले सिमेंट आणि 6 जमेले क्रश
4) तयार करण्याचे जागेवरती पाणी टाकून नंतरुन माल टाकला आणि विटा पाण्यात भिजून घेतल्या.
5) व चेंबर तयार केले आणि प्लास्टर केले .



पाया आखणी
प्रस्तावना
कोणत्याही इमारतीच्या बांधकामामध्ये पाया हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. इमारतीची मजबुती, टिकाऊपणा व सुरक्षितता पूर्णपणे पायावर अवलंबून असते. पायाची योग्य रचना व अचूक मोजमापानुसार प्रत्यक्ष जागेवर आखणी करणे या प्रक्रियेला पाया आखणी असे म्हणतात.
उद्देश
इमारतीचा पाया योग्य ठिकाणी व योग्य मापात आखता येणे
नकाशानुसार रेषा, कोन, मोजमाप आणि लेव्हल अचूक ठेवण्याचे कौशल्य विकसित करणे
बांधकामात होणाऱ्या चुका व खर्च टाळणे
पायाची मजबुती, स्थिरता व सुरक्षितता सुनिश्चित करणे
प्रत्यक्ष साईटवर सेटिंग-आऊट (layout) करण्याची क्षमता मिळवणे
पुढील बांधकाम कामे (भिंती, स्तंभ इ.) सुलभ आणि अचूक होण्यासाठी आधार तयार करणे
साहित्य
मोजमाप टेप (Measuring Tape)
दोरी / नायलॉन दोरी
हातोडा
चुना पावडर / खडू / चुन्याचे द्रावण
काटकोन तपासण्यासाठी 3-4-5 पद्धत किंवा स्क्वेअर