13. थ्रेडिंग आणि टॅपिंग
उद्देश:-
थ्रेडिंग आणि टॅपिंग या प्रक्रियेमध्ये आपण एक साधन तयार करण्यासाठी थ्रेड आणि वापरण्याचे महत्त्व आणि त्याचे उपयोग शिकणे.
साहित्य:-
थ्रेडिंग टूल्स टेप रेंज डाय डायरेंज नळी पाईप गेज वर्नियर कॅलिपर ऑइल हॅन्ड ग्लोज
कृती:-
1.पहिल्यांदा जे मापनाने पट्टी मोजून घेतली ती 50 mm ते 12 mm अशी घेतली. त्याला त्या मापावर मार्किंग करून कट करून घेतले
2. ड्रिल मशीनच्या साह्याने दहा एमएम चे ड्रिल बीट घेऊन छिद्र पाडले. छिद्र पडल्यानंतर त्याच्यावर त्यात रेंज लावून टाईप करून शेडिंग पाडले
3. टॅपिंग साठी पण मशीनला घट्ट बसवले नंतर त्याला टायपिंग च्या साह्याने टॅपिंग केले.
4. टॅपिंग झाल्यानंतर त्याला नेट आणि बोल एका मध्ये बसतात का नाही ते बसून बघितले.
5. या सर्व प्रक्रिया करून आम्ही पेपरवेट थ्रेडिंग आणि टायपिंग करून बनवला.
6. आपल्या पाईपलाईन हे लोखंडी असते त्याला टॅपिंग कसे करावे ते पण एका बापाला मारून बघितले.
निष्कर्ष:-
थ्रेडिंग आणि टॅपिंग प्रक्रियेचा उपयोग विविध यांत्रिक कामासाठी केला जातो याचा उपयोग पाईप्स बोर्ड इत्यादी भागा तयार करण्यासाठी होतो.

12.सनमाइका बसवणे
उद्देश:-
सनमाइका बसवण्याचं मुख्य उद्देश म्हणजे भिंतींना आकर्षक टिकाऊ आणि साधारणपणे गंज दर्शन किंवा इतर बाह्य घटकांपासून संरक्षण देणे हे घर कार्यालय किंवा इतर संरचनांमध्ये सजावटीसाठी तसेच भिंतीवर संरक्षणात्मक भर म्हणून वापरली जाते.
साहित्य:-
सनमाइका पॅनल क्लाऊड किंवा एमडीएफ एपॉक्सी किंवा सिमेंट आधारित गोंड सनमाइका कटर आणि स्क्रू पिन मापणी पातळ लेवल पाणी हँड रोज गम आणि सेफ्टी साहित्य
कृती:-
1. पहिल्यांदा टेबल साफसफाई करून घेतली त्याला नीट झाडू मारला.
2. टेबल मोजमाप घेतले त्याला किती मापाचे सनमाइक बसवेल याची मार्किंग करून घेतले.
3. सनमाइका बॅनर्स मापानुसार मार्किंग केले व कापले व त्याला नीट केले. त्याचा सारखा राऊंड होत होता.
4. पॅनलच्या पाठीमागे गम (फेविकॉल) लावला व काही पोरांनी टेबलला गम लावून घेतला
5. टेबल ला फेविकॉल टेबल वरती नीट लावला व त्याला प्रेस करून घेतले दाबून घेतले.
6. सर्व गम व्यवस्थित लावल्या नंतर सनमाइका चांगली बसण्यासाठी टेबलला उलटे करून त्याच्यावर वजन दाबून ठेवले.
निष्कर्ष:-
सनमाइक बसवणे एक सोपी आणि खर्चिक सजावटीची पद्धत आहे जी भिंतींना आकर्षक टिकाऊ आणि मजबूत बनवते हे घरातील सौंदर्य वाढवते आणि त्याच वेळी भिंतींना संरक्षण प्रदान करते.

11.FRP ( Fibre Reinforced Polymer)
उद्देश:-
FRP च्या वापराच्या महत्त्व समजून घेणे आणि त्याच्या प्रॅक्टिकल चा उपयोग करून तपासणी यामध्ये सामग्रीची आणि गुणधर्मांची सुस्पष्ट समज प्राप्त करणे
साहित्य:-
फायबर,राळ ,कापड किंवा चटई ,रोड रोलर हॅन्ड ग्लोज, मास्क, चष्मा, बूट.
कृती:-
1. पहिल्यांदा फायबर हे एका ड्रममध्ये होते ते घट्ट झालेले होते त्याला एका लहान डब्यात काढून घेतले.
2. बादलीत काढल्यानंतर त्याला हॅन्ड ग्लोज घालून गाडीने नीट मिक्स करून घेतले
3. फायबर मध्ये हार्डनेर कोबाल आणि रेझिंन व्यवस्थित मिक्स करून घेतले.
4. मिक्स केलेले मटेरियल क्लाऊड वरती टाकले. मिश्रण सुखायला आत त्यावर प्लास्टिक कागद टाकला त्याला तिने अगोदर लावून घेतले होते.
5. व्यवस्थित फायबर सर्व बाजूने पसरवून घेतले खूप प्रेस करून पातळ थर सर्व ठिकाणी पसरवून घेतला.
6. फायबर सुकण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे लागतील यामुळे त्याला सुखण्यासाठी ठेवून दिले.
निष्कर्ष:-
FRP सामग्रीचा योग्यपणे निर्मिती केल्यास ती उच्च ताकद अल्क वजन आणि उच्च तात्कालीन सामर्थ्य प्रदान करेल. FRP च्या वापरामुळे इतर सामान्य धातूविषयक अधिक टिकाऊपणा आणि कमी वजन असलेली घटक तयार होऊ शकतात.

10.पत्रा काम
उद्देश:-
पत्रा कामाच्या प्रक्रियेत तंत्रज्ञान आणि उपकरणांची अभ्यास करणे यामुळे आपल्याला पत्रा कामाची सखोल समज प्राप्त होते व इतर यांत्रिक कामांमध्ये सुरक्षित आणि प्रभावीपणे कार्य करू शकतो
साहित्य:-
लोखंडी पत्रा हॅमर चाकू किंवा ग्राइंडिंग फाईल प्रोजेक्ट गॉगल आणि पोर्ट वेल्डिंग मशीन केजी कागद पेन्सिल पेन वही
कृती:-
1. पहिल्यांदा सरांनी मापे सांगितली त्याच्याप्रमाणे आम्हाला कागदाचे सुपली आणि ड बनवायला सांगितले
2. कागदावर सर्व नाते आखून घेतली व त्याच्या त्याला त्या मापानुसार घडी घातली
3. काही ठिकाणी कट मारायचे होते ते कैचीने कट करून घेतले MM मध्ये पत्र्याला जॉईन करण्यासाठी दोन्ही साईटने चांगल्या प्रकारे जागा सोडा
4. सर्व मापानुसार सुपली व डब्बा बनवला व सरांना दाखवला त्याचप्रमाणे काही त्रुटी झाल्या होत्या त्या सरांनी सर्वांना समजून सांगितल्या व त्या दुरुस्त कसे करावे ते पण दाखवले.
निष्कर्ष
पत्र कामाचे यांत्रिक कामांमध्ये दक्षता आणि सुरक्षितता शिकवतो विविध साधनांचा वापर करून लोखंडी पत्रांचे जोडणी प्रक्रियेत निपुणता मिळवली जाते तांत्रिक कौशल्य कामाचे आयोजन आणि योग्य साधनांचा वापर सुधारतो.

9.मिलिंग मशीन
उद्देश:-
विविधआकारांचे आणि जटील यांत्रिक भाग निर्माण करणे आहे हे सामग्रीवर कटिंग ड्रीडवर शिपिंग आणि मिलिंद मशीन चा उपयोग जटिल आकार आणि सुसंगत अचूकता आवश्यक असलेल्या भागांच्या निर्मितीसाठी केला जातो.
साहित्य:-
मिलिंग मशीन कटिंग स्टूल लाकूड ब्लोअर जॉब की व सेफ्टी साहित्य
कृती:-
1. पहिल्यांदा मशीन चालू करण्यापूर्वी सर्व साफसफाई करून घेतली
2. सर्व सेफ्टी आहे का नाही ते पहिल्यांदा घालावे नंतर मशीन जवळ जावे.
3. लाकडाचा तुकडा हा मशीन मध्ये नीट बसवला व त्याला टाईप केला स्टॉलच्या मापावर त्याला ऍडजेस्ट करून घेतले व थोडे वरती घेतले
4. मशीन चालू करण्यासाठी पावर ऑन करणे व अलगद त्याला नक्षीकाम देण्यासाठी फिरवणे व साईडला नीट नक्षीकाम केले. जर लाकूड जास्त गरम झाले तर मशीन बंद करून ठेवावे नाहीतर धुवामुळे आग लागू शकते. हवा फवारू नये मशीन मधून भरून निघ साहित्य साहित्यताना लवकर आग पकडते.
5. मशीन बंद केल्यानंतर थंड झाल्यावर परत चालू करावे. व चालेल का पूर्ण करून घ्यावे काम झाल्यावर ब्लोरअर ने साफसफाई करून घेणे.
निष्कर्ष
मिलिंग मशीन एक अत्यंत महत्त्वाचे यांत्रिक उपकरण आहे जे विविध उद्योगांमध्ये उच्च-अचुकतेविणे आणि विविध आकाराने भाग तयार करण्यासाठी वापरले जाते याची प्रभावी वापर षटक आणि गुणवत्ता तपासणीच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया कार्यक्षमता आणि अचूकता वाढवता येथे मिलिंग मशीनच्या साह्याने जटील आकार आणि रचनात्मक भाग निर्माण करणे शक्य होते आणि यामुळे उत्पादन क्षेत्रात स्पर्धात्मक लाभ मिळवता येतो.
8.बांधकाम
उद्देश:-
बांधकाम क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान आणि प्रक्रिया शिकणे यात कच्च्या साहित्याचा वापरातून ते बांधकामाच्या अंतिम पूर्ण तेपर्यंत सर्व टप्प्यांचा अभ्यास केला जातो तसेच बांधकामाच्या सुरक्षितेचे महत्त्व आणि पर्यावरण पूरक तंत्रज्ञान शिकणे.
साहित्य:-
सिमेंट वाळू मुरूम पाणी स्टील रोड आयरन रोड मॉडल्स साचे हातोडे हलके कटर आणि टूल्स व शेपटी साहित्य स्टूल व शेपटी साहित्य
कृती:-
1. पहिल्यांदा बांधकामासाठी विटा शोधल्या व त्या एका जागेवर गोळा केल्या.
2. सर्व एका जागेवर बसलो व सरांनी ट्रेचार, हेडर, इंग्लिश (हेडर /ट्रेचर), फेमेश (हेडर /ट्रेचर), रॅट टेप असे वेगवेगळ्या प्रकारचे जॉईन शिकवले.
3. बांधकामासाठी पहिले मिश्रण (सिमेंट वाळू) यांचे खाली टाकायचे मग आपल्या ला कसे बांधकाम करायचे आहे कोणत्या प्रकारचे करायचे आहे त्यानुसार विटांची रचना ठरवून घ्यावी लागते व बांधकामाला सुरुवात करावी लागते
4. प्रत्येक विटांमध्ये एक सेंटीमीटर चा गॅप ठेवावा लागतो बांधकाम करतानी खालच्या स्तराचा गॅप आला नाही पाहिजे यानुसार विटांची रचना करावी लागते.
निष्कर्ष:-
बांधकाम करण्याचे प्रत्यक्ष कामात सिमेंट मुरूम वाळू इत्यादी साहित्यांचा योग्य प्रमाणात वापर व स्थिरता आणि सुरक्षा यांबद्दल शिकणे यामुळे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक कामांच्या तांत्रिक दृष्टिकोनाची समाधी आली आणि कौशल्याची सुधारणा झाली.

7.प्लंबिंग
उद्देश:-
प्लंबिंग मध्ये पाईपलाईन लावणे जोडणी करणे न सुधारणे यांसारख्या विविध कामांचा समावेश असतो तसेच पाणी पुरवठा आणि नाली प्रणालीचे ज्ञान प्राप्त होते.
साहित्य:-
1. पाईप (PVC ,PPR, GI, किंवा CPUC)
2. एल्बो , टी ,कॅप ,बेड
3. फॅट, बॉक्सर ,हॅन्ड शॉवर, गॅजेटस
4. वॉटर पंप, सिमेंट, टिपरेट सिमेंट
5. स्टूल प्लंबर व्हॅली स्पेनर टेप टूल ड्रिल मशीन
कृती:-
1. पहिल्यांदा पाईप किती मापाचे बसले त्याचे माप घेऊन व त्याच्या मापावर कट करून घेतले.
2. कापलेल्या बायकाला पहिल्यांदा सोलुशन लावून पाईप फिट केला.
3. त्याला सरळ रेषेत पाणीचे प्रेशर घेण्यासाठी लेवल टू च्या साह्याने सरळ करून घेतले व वाकडेतिकडे होऊ नये याच्यासाठी क्लिपा मारल्या क्लिपा मारताना पहिले ड्रिल मारून घेतले व नंतर त्याला खेळ ठोकून घेतले.
4. सोलुशन मारल्यावर पाईप घट्ट बसण्यासाठी त्याला प्रेस करून गोल फिरवावे लागते व नीट बसवावे लागते नाहीतर पाईप लिकेज राहण्याची शक्यता असते.
5. काही पाईपाना एडपटर नसले तर त्याला सोलुशन लावून गरम करून आपण सॉकेट बनवू शकतो व पाईपला बसू शकतो.
निष्कर्ष:-
प्लंबिंग मध्ये प्लंबिंग प्रणालीचे शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळते पाणीपुरवठा गटार प्रणाली जोडणी व दुरुस्ती परकीय ची चांगली समज मिळाल्यामुळे त्याचा भविष्यात योग्य वापर करून आपण आपले काम करू शकतो.

6.पायाची आखणी
उद्देश:-
पायाची आखरी करणे म्हणजे पायाचे योग्य आकार रचना आणि संरचना तयार करणे या प्रॅक्टिकल चालू उद्देश पायाची आखणी त्याच्या अंगाची मापे आणि एक पायाची वास्तविक प्रतिमा तयार करण्याची प्रक्रिया शिकणे
साहित्य:–
पेपर पेन्सिल रबर मीटर टेप गज ओळबा आखण्यासाठी कोण मापक
कृती:-
1. पहिल्यांदा आम्ही सर्वांनी पायाखणीसाठी व सर्व साहित्य व अवजारे जमा केली
2. पाया हा कधीही आखतानी रस्त्याच्या कडेला असला तर रस्त्याच्या मधून वीस मीटर अंतर सोडून पायाची आखणी करावी ते मीटर च्या साह्याने समजन घेतले.
3 रस्त्यापासून पहिले अंदाजे रेष आखून घेतली. त्या मापावर गजू ठोकून घेतला.
4. पाया आखण्याच्या जागेवर स्वच्छ साफसफाई करून घेतली.
5. पाया टाकण्यासाठी पावडर चुना घेऊन आलो त्याचे नीट रेस मारून घेतली. पाया फाउंडेशन बांधकाम अशा तीन रेषा मारायला लावलं त्यांचे ग्रुप पाडून आम्ही सर्वांनी आखणी केली
6. पाया फाउंडेशन आठ mm अंतर सोडायला लावले नंतर बांधकामाचे अंतर 12mm अंतर सोडायला लावले सर्व आखणी केल्यावर क्रॉस चेक करून बघितले त्याच्यामध्ये अकरा सेंटिमीटर असे अंतर दाखवत होते.
7. सर्वांनी दोरी लावून व अंतर चारी कोपऱ्याचे गज व्यवस्थित मारले व योग्य अंतरावर दोरी लावली.
8 गुन्हा घेऊन कोपरा हा व्यवस्थित आहे का नाही ते बघितले व दोरी हलवून मापावर घेतली. सर्व कोपरे सेट झाल्यावर क्रॉस मीटर टेपने मापन करून घेतले मापन करून घेतले मापन बरोबर आल्या वर आखणी करून घेतली.
पहिल्यांदा आखणी करताना प्रत्येक जण चुकतच असतो पण आम्ही ऍक्युरेट माप काढले त्यामुळे सरांनी शाब्बासकी दिली. आणि मापनाबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारले एम एम मध्ये मीटर मध्ये कसे मोजमाप करावे किंवा घरातील खोलीची रुंदी किती येईल हे सांगितले.
निष्कर्ष:–
पायाची आखणी एक महत्त्वाची कला आहे जी शरीराच्या संरचनेच्या विश्लेषणावर आधारित आहे यामुळे पायाच्या अंगाची व्यवस्थित मापे घेण्याची आकार आणि रचना काढण्यासाठी आणि त्या रचनेचे विवेचन करण्याची क्षमता प्राप्त केली यामुळे पायाची कार्यक्षमता आणि त्याच्या यांत्रिक लवचिकतेची चांगली समज प्राप्त झाली.


5.वेल्डिंग
वेल्डिंग:-
वेल्डिंग म्हणजे दोन मेटल जोडणे म्हणजेच दोन मीटर ला डायरेक्ट करंट एकत्र जोडले जाते तिथे इलेक्ट्रोड फिल्टर चा उपयोग केला जातो अशा प्रक्रियेस वेल्डिंग म्हणतात. जेव्हा आपण वेल्डिंग करतो तेव्हा त्यातून अल्ट्राव्हायोलेट रे बाहेर पडते असताना व त्याचे (2700°-2800°C) पर्यंत असतात त्यामुळे आपण डोळ्याला त्रास होतो
वेल्डिंग चे प्रकार
1.Co2 वेल्डिंग :-
आपल्याकडे CO2 वेल्डिंग आहे जात 52 Kg चा गॅस आहे. व त्याची किंमत 35000 इतकी आहे.
2.Arc वेल्डिंग
Arc वेल्डिंग करायला आपल्याकडे एक रोडची गरज असते यात केमिकल्स ते तर त्या केमिकल रिएक्शन ने देखील आपल्याला त्रास होतो आपल्याकडे अर्क वेल्डिंगच्या दोन मसणे आहेत
3.TIG वेल्डिंग
टंगस्टन इलेक्ट्रोड चा वापर करून जोडले जातात
5.Spot वेल्डिंग
वेल्डिंग चे साहित्य
1वेल्डिंग मशीन:-विविध प्रकारचे वेल्डिंग मशीन
2. वेल्डिंग रॉड:- धातू जोडण्यासाठी रोडचा वापर केला जातो
3. वेल्डिंग गॉगल आणि मास्क:-डोळ्याचे आणि चेहऱ्याची संरक्षण करण्यासाठी
गण चे पार्ट
1. नोझल
2 कनेक्टर :-करंट सप्लाय करण्याची काम करते
3. डीकुजर -गॅस फेल होण्याची काम करते
4 हेड नोज होल्डर
5. स्विच
6 कॉनिक रिप्स
निष्कर्ष
वेल्डिंग एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त प्रक्रिया आहे जी धातूचे तुकडे जोडण्यासाठी वापरली जाते वेल्डिंग विविध प्रकार आहेत जसे की आर्क वेल्डिंग गॅस वेल्डिंग मिग वेल्डिंग आणि ती वेल्डिंग ज्यामुळे शेवटी एक प्रमुख पद्धत आहे.

4.पावडर कोटिंग
उद्देश:-
पावडर कोटिंग प्रक्रियेसाठी सिद्धांत आणि तंत्रज्ञान समजून घेणे तसेच त्याचा उपयोग करून विविध मेटलला सुरक्षात्मक व आकर्षक बनवणे (फिनिशिंग)
पावडर कोटिंग म्हणजे काय ?
पावडर कोटिंग ही एक प्रकारची धातू रंगवण्यासाठी मशीन आहे म्हणजेच या मशीनद्वारे मीटर रंग दिला जातो तर त्या मेटलला रंग देत असताना आपल्याला सर्व शेपटी घ आवश्यक आहे हा रंग पावडर च्या स्वरूपात असतो व त्याच्या पावडरला मेटल वर चिटकण्यासाठी एक ओव्हन आहे त्याने तो मेटल ओव्हन मध्ये ठेवले की ती पावडर गरम होती व वितळते जेणेकरून पावडर मेटल वर चिकटवली जाते
साहित्य:–
पावडर कोटिंग पावडर (पॉलिस्टर), पावडर कोटिंग मशीन , पॅनल साठी स्प्रे रिंगण गण , सेफ्टी साहित्य, ओव्हन, गॅलनाईट किंवा स्टीलचे कामाचे तुकडे, कागद ( प्लास्टिक)
कृती :-
1. सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारचे पॉलिश करून घेणे
2. त्यानंतर 3 इन लिक्विड जाऊन त्यावरती घाण किंवा गंजलेले असलेले पदार्थ निघून जातील व पावडर कोटिंग चांगली बसेल
3. पाण्याने लिक्विड कोरडे झाले की पाण्या त धुवून घेणे व दहा-पंधरा मिनिटे सुकायला ठेवणे
4. धातू सुकल्यावा मशीन मध्ये पावडर टाकून घेतली.
5 . जमिनीवर एक मोठा कागद पसरवून घेतला जेणेकरून त्याच्यावर पावडर खाली पडेल ते वाया जाणार नाही आणि खाली चा पेस खराब पण होणार नाही
6. त्यानंतर कॉम्प्रेसर चालू करून हवा भरून घेतले व कलर फवारायला सुरुवात केली. त्याच्यावरती पावडर फवारली
7. ओव्हन मध्ये ठेवून त्याला सेट केले जेणेकरून त्या धातूवरचा कलर गरम होईल व इकडे तिकडे टच होणार नाही नीट चिटकेल . त्याला 150 डिग्री टेंपरेचर पर्यंत होसपर्यंत ओहन मध्ये ठेवले आणि ते दीडशे पर्यंत गेले की आपोआप मशीन बंद होते.
निष्कर्ष
1. टिकाऊ पणा आणि संरक्षण
2. पर्यावरणीय फायदेशीर
3. आर्थिक फायदे एकाच थरात उत्कृष्ट कव्हरेज मिळतात
4. विविध उपयोग
5. रंग आणि शैलीची विविधता

3.मापन
उद्देश:-
मापन हे आपण सतिकपणे घेऊन त्यातील त्रुटी कमी करणे मापन प्रणालीचा उपयोग करून कौशल्य विकसित करणे
साहित्य:-
स्केल टेप लहानगेज वजन काटा गुन्हा फनल (गुणा)
सूत्र:-
cm | ft |
1in = 2.5cm | 1mm =0.003280ft |
1m =100cm | 1cm =0.03280ft |
10mm =1cm | 1in =0.08333ft |
1cm = 10mm | 1m = 3.2808 |
m | |
1mm =0.001m | 1dc = 10m |
1cm = 0.01m | 1m = 10 dc |
1in =0.0254m | |
1ft = 0.3048m |
1 फूट=12 इंच | 1मैल=8 फ्ल्यांग |
1 गज =3 ft | 1 मैल=1760 |
1फ्ल्यांग =220 गज | 1 मैल=5280 |
1 kg =1000gm
gm –ग्रॅम kg–किलोग्रॅम
हे स्थूल मोजण्याचे एकक आहेत
ml — मिली मीटर L– लिटर
हे द्रव मोजण्याचे एकक आहेत.
कृती:-
1.पहिल्यांदा स्क्रॅप मधून स्टूल बनवण्यासाठी रोड घेऊन आलो
2. त्याला जुने स्टूलच्या मापावर टीप च्या साह्याने मोजले व मार्किंग केली
3. मापन हे mm मध्ये घेतले. आणि Cm मध्ये पण मोजून बघितले
4. स्टूल बनवायला होता म्हणून त्याचे माप घेण्यासाठी टेप वापर ला व गुन्ह्याचा उपयोग केला आणि 45 डिग्री कापण्यासाठी कोण मापक चा उपयोग केला.
5. सर्वांना मोजमाप समजण्यासाठी mm आणि cm मध्ये सर्वांना एकेक खराट्याची काडी मोजण्यासाठी प्रॅक्टिकल दिले व होमवर्क दिला.
निष्कर्ष
ब्रिटिश आणि मॅट्रिक पद्धतीमध्ये मापनाची मूलभूत भिन्नता आहे. ती समजून घेणे मॅट्रिक पद्धत अधिक सुसंगत आणि सोपी आहे मॅट्रिक पणाली ही जागतिक स्तरावर स्वीकारलेली आहे म्हणून त्याचा उपयोग जास्त करून घेतला.

2.RCC कॉलम
उद्देश:-
इमारतीच्या सरन सनराचे सामर्थ आणि स्थिरता वाढवणे इमारतीची डिझाईन आणि योग्य ती रचना करणे व मोजमाप करणे
साहित्य:-
सिमेंट खडी रेती पाणी थापी गज पावडा घमेल टेप प्लावूड
सूत्र:-
1 एकास,2 दोनस,4 चार
कृती:-
- पहिल्यांदा हॉलमध्ये (अस्मिता भवन) जाऊन कॉलमचे माप घेऊन आलं व त्याला साफ केले.
- मापन करून आल्यावर आम्ही क्लाऊड त्या मापाचे कट केले व त्याला 45 डिग्री कापून गम व खेळा लावून ठोकून घेतले व गुण्याच्या साह्याने काटकोनात बघितले
- एक लिटरचा डब्बा घेऊन त्याचे माप घेऊन सिमेंट एक डब्बा खडी एक डब्बा रेती दोन डबे असे घेतले त्यांचे व्यवस्थित कोरडे असतानाच मिक्स केले मिक्सर झाल्यावर त्याच्यामध्ये पाणी ओतले व सर्व अजून व्यवस्थित मिक्स केले
- प्लाऊड कट करून घेतले होते त्याला व्यवस्थित अगोदर बसून घेतले होते कालवलेला मिक्सर हे कॉलम मध्ये टाकले व बाजूने विटांचा सपोर्ट दिला.
- सर्व मिक्सर टाकल्यानंतर माप घेतलेल्या मापावर समान केले व वरून चांगले सपाट करून घेतले
निष्कर्ष :-
आरसीसी कॉलम तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे विविध साहित्यांचे योग्य प्रमाणात आणि मिश्रण आवश्यक आहे हा अभ्यास कॉलमच्या सामर्थ्यावर आणि स्थितेवर प्रभाव टाकतो योग्य क्युरिंग तंत्राचा वापर केल्यास आरसीसी कॉलमची दीर्घकालीन कार्यक्षमता सुनिश्चत करता येते.

1.रंगकाम
उद्देश:-
सजावट: कपाटाला रंगकाम करून त्याचे सौंदर्य वाढवणे.
वृद्धावस्थेपासून संरक्षण: रंगकाम कपाटाच्या पृष्ठभागाला माती, धूळ, आणि घर्षणापासून बचाव करण्यास मदत करते.नवीन लुक: घराच्या इंटिरियर्समध्ये सुधारणा करण्यासाठी कपाटाला एक नवीन आणि आकर्षक लुक मिळवून देणे.
साहित्य:-
पेंट: योग्य रंग (अॅक्रेलिक पेंट, ऑइल पेंट, किंवा वॉटर बेस पेंट). ब्रश: विविध आकार आणि प्रकारचे (पातळ, जाड, सिमित). सॅंडपॅपर: पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी. प्राइमर: पेंट चांगले लागण्यासाठी.कपाटाचा साफसफाई करणे. डाग किंवा धूळ काढण्यासाठी. पॅलेट आणि नळी: रंग मिसळण्यासाठी आणि पेंट लावण्यासाठी .टेप: रंग बाहेर न गेला तरी त्याचे बॉर्डर निश्चित करण्यासाठी.
कृती:-
1. कपाट साफ करणे: कपाटाचा पृष्ठभाग स्वच्छ करा. धूळ, घाण, किंवा तेलाच्या डागांचा हटवण्यासाठी सफाई करा.
2. सॅंडपॅपर वापरणे: कपाटाच्या पृष्ठभागावर हलक्या गुळगुळीतपणासाठी सॅंडपॅपर वापरा. यामुळे पेंट चांगल्या प्रकारे लागेल.
3. प्राइमर लावणे: एक थोडा प्राइमर लावा. यामुळे रंग चांगले बसतील आणि कपाटाला दीर्घकाळ टिकाव देईल.
4. रंगाची निवड आणि लावणे: आपल्याला हवा असलेला रंग निवडा. ब्रश वापरून रंग लावा. जर आपल्याला खूप नाजूक काम करायचे असेल तर रोलर वापरा. रंग लावून १०-१५ मिनिटे त्याला वाळू द्या आणि आवश्यकता असल्यास दुसरा कोट लावा.
5. डिझाइन किंवा पॅटर्न तयार करणे: रंगकामात विशेष डिझाइन, चिमटी, किंवा बॉर्डर तयार करा. यासाठी टेप वापरून विशिष्ट आकार तयार करू शकता.
6. सुखाने वाळवणे: कपाट पूर्णपणे वाळवून टाका. जर आवश्यक असेल तर दुसऱ्या कोटसाठी परत रंग लावा.
7. समाप्ती: सर्व पेंट्स कोरडे झाल्यावर, कपाट पुन्हा एकदा तपासा आणि त्याचे सुरकुतणे किंवा दोष लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास पॅचवर्क करा.
निष्कर्ष:–
कपाटाला रंगकाम करणे हे एक सोपे आणि आकर्षक सुधारणा करण्याचे कार्य आहे. यामुळे घराच्या आंतरिक सजावटीला एक नवीन लुक मिळतो, तसेच कपाटाची टिकाऊपण आणि सौंदर्य दोन्ही वाढतात. योग्य पेंट आणि काळजीपूर्वक केलेली प्रक्रिया कपाटाला दीर्घकाल टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.


