1) मापन

उददेश :- मापनाचे सर्व माहिती माहित असणे गरजेचे आहे. मापन अचूक प्रमाणे करता येणे.

मापन करण्याचे साहित्य:- मेजरिंग टेप, स्केल, वजन काटा, गेज.

प्रकार:- मापनाचे खालील दोन प्रकार असतात:-

  1. ब्रिटीश पद्धत :- ही पद्धत फुट, इंच, कोस,गुंठा, खंडी, मण इत्यादीमध्ये मोजले जाते. ही मापने ब्रिटिश च्या काळात वापरली जायची म्हणून या मापनाच्या पद्धतीला ब्रिटिश पद्धत असे म्हणतात.
  2. मॅट्रिक पद्धत :- ही पद्धत mm, cm, km, लिटर इत्यादी मध्ये मोजले जाते. या पद्धतीचा उपयोग आताच्या काळात जास्त प्रमाणात केला जातो.

मापनाचे सूत्र :- मॅट्रिक

Cm

  1. 1cm = 10mm
  2. 1 in = 2.5 cm
  3. 1m = 100cm

Ft

  1. 1mm = 0.001 m
  2. 1cm = 0.01 m
  3. 1 in = 0.0254 m
  4. 1ft = 0.3048m

मापनाचे सूत्र :- ब्रिटिश

  1. 1kg = 1000 gm
  2. Gm = gram
  3. Kg = kilogram

हे स्थूल मोजण्याचे एकक आहे.

  1. ml = मिली लिटर
  2. L = लिटर

हे द्रव मोजण्याचे एकक आहे.

2) पत्रा काम

आम्ही पत्राकामामध्ये सुपली तयार केली.

उद्देश :- पत्रापासून विविध वस्तू बनवणे.

साहित्य:- मेजरींग टेप, GI पत्रा, पेन्सिल, पत्रा बेंडींग मशीन, कैची, रेबिट

कृती :-

  1. सर्वात आधी आम्ही कागदाची सुपली बनवण्यासाठी माप मोजून त्यावर पेन्सिलने आखले व ते कट करून घेतले. आणि त्याची सुपली बनवली.
  2. त्यानंतर ग्रुप तयार केले त्या ग्रुपमध्ये मी, पूर्वराज, जयेश होतो. आम्ही स्क्रॅप मध्ये जाऊन पत्रा घेऊन आलो.
  3. त्यानंतर 18 cm खालचा भाग व 20cm वरचा भाग घेतले, माप घेतल्यानंतर त्या मापानुसार कैचीने कट करून घेतले.
  4. कट केल्यानंतर त्या पत्र्याला बेंडिंग मशीन वर नेऊन समोरच्या बाजूस व उजव्या बाजूस, डाव्या बाजूस बेंड करून घेतले.
  5. त्यानंतर हँडल बनवण्यासाठी पत्रा कट केले. पत्रा कट केल्यानंतर बेंडिंग मशीन ने बेंड करून घेतले.
  6. तयार झालेल्या सुपलीला व हँडलला रेबिट ने जोडून घेतले.

निष्कर्ष :- आम्ही मिळून बनवलेली सुपली खूप सुंदर झाली.

3) वेल्डिंग

वेल्डिंग म्हणजे दोन धातना एकत्र जोडणे.

वेल्डिंग करताना आम्ही सेफ्टी वापरली. म्हणजेच वेल्डिंग गॉगल्स, हॅन्ड ग्लोज, ॲप्रन

वेल्डिंग च पुढील प्रकार आहेत :-

  1. ACR welding
  2. Mig welding
  3. Tig welding
  4. spoet welding
  5. Gas welding

धातूचे प्रकार :-

  1. Ms – माईस स्टील
  2. Ss – स्टेनलेस स्टील
  3. Beuss
  4. Coper
  5. फास्टायल

वेल्डिंग ग्रँडचे प्रकार :-

  1. Cast icon electcode
  2. coton welding electcode
  3. Mild steet
  4. Stoifess steet

जॉईंट चे प्रकार:-

  1. बड जॉईंट
  2. लॅप जॉईंट
  3. मज जॉईंट
  4. टी जॉईंट
  5. कॉर्नर जॉईंट

पोझिशन :-

  1. हिरोजंटल
  2. पर्टीकल
  3. कर्लट पोझिशन
  4. ओव्हर हेड.

हे सर्व प्रकार समजून घेतले.

4) RCC


उद्देश : RCC column तयार करने.

मटेरियल :

वाळू , सीमेंट , खडी , पानी , तार , ऑइल ई.

साहित्य :

coloum चा ढाचा , पाटी इ.

उपक्रमाची निवड : पार्किंग खांबाला आरसीसी कॉलम केले .

कृती :

  1. प्रथम कॉलमचा धाच्याच माप घेऊन त्याचे घणफल काढून आदज खर्च काढावा.
  2. concernt मजबूत बसण्यासाठी खांबाला तर बांधून घेणे.
    कॉलमच्या धाच्या ला तेल लावून घेणे .
  3. नंतरून त्या धाच्याला लावांव यला तारेने बांधून घेतले.
  4. 1:2:4 प्रमाणात सीमेंट , वाळू व खडी घ्यावी.
    ते खोऱ्याने चांगले मिक्स करून concernt बनवावे.
  5. पाटीत भरून त्या साच्यात भरणे.पाटीत भरून त्याच्या सगळीकडे असे टाकावे.
  6. पुढच्या दिवशी तो धाच्या कडून ते कडक होण्यासाठी पानी मारावे.
  7. दक्षता : कॉलमचा दहाच्या लावतणी सगळ्या बाजूने कवर होईल अशा प्रकारे टाकावे.

5) प्लबिंग करणे

प्लंबिंगला लागणारे साहित्य:-

  1. हॅक्सो
  2. सोलुशन
  3. ड्रिल मशीन
  4. रेंज पाना बेकर
  5. कटर

• पाईप जॉईंट चे प्रकार :-

  1. एल्बो सॉकेट
  2. टी जॉईन युनियन
  3. एड कॅप कपलिंग
  4. रेडूसर

• U.P.V.C पाईप थंड पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप आहे.

• P.V.C पाईप

• कॉपर पाईप

• G.I पाईप

• आम्ही खालील गेस्ट हाऊस च्या तिथे U.P.V.C पाईपचे प्लंबिंग केले.

6) रंगकाम

साहित्य – ब्रश,बकेट,रंग,पाणी,पाॅलिश पेपर,थिनर व ज्या वर कलर.

आपण एखाद्या वस्तूला रंग यासाठी देतो की  ती वस्तू attractive  दिसावे, shine करावे.

आम्ही कॉम्पुटर लॅब ला painting केले ते पूढीलप्रमाणे :-

कृती:-

  1. सर्वात आधी आम्ही कॉम्पुटर लॅब चे मेजरमेंन्ट घेतले. व मेजरमेंट वरून पेंट किती लागेल ते काढले.
  2. त्यानंतर आम्ही paint व painting करण्यासाठी जे साहित्य लागते ते गावात जाऊन आणले.
  3. व नंतर आम्ही कॉम्पुटर लॅब मधील भिंत पॉलिश पेपर ने घासले, आणि त्यानंतर ज्या ठिकाणी होल असतील तिथे
    किंवा भिंत खराब असेल तिथे पुट्टी ने ते भरून घेतले.
  4. पुट्टी लावल्यानंतर ते सुकू दिले व पॉलीश पेपर ने
    परत पुट्टी लावलेल्या जागी घासून घेतले.
  5. व नंतर आम्ही भिंतीला primer लावले…. आणि रात्रभर तसेच
    ठेवले… आणि सकाळी ब्रश ने व रोलर ने painting केली.

7) पावडर कोटिंग 

पावडर कोटिंग म्हणजे एखादी धातू जर रंगवायचे असेल तर आपण पावडर कोटिंग च्या मशीनचा वापर करून ती वस्तू किंवा धातू रंगवू शकतो. पावडर कोटिंग करत असताना आपल्याकडे सेफ्टी असणे व त्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या मशीनद्वारे मेटलला रंग दिले जाते, पावडर कोटिंग कलर मध्ये जो रंग असतो तो पावडरच्या स्वरूपात असतो. मेटल वर चिटकवण्यासाठी एक ओवर आहे ज्याने ते मेटल ओवन मध्ये  ठेवल्यास पावडर गरम होते व वितळून पावडर मेटल वर चिटकते.

साहित्य:-  थ्री इन वन ऍसिड ,  हॅन्ड ग्लोज,  गॉगल,  ज्या वस्तूला पावडर कोटिंग करायचे आहे ती वस्तू…

कार्य:-

  1. सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारे पॉलिश करून घेणे. 
  2.  पॉलिश केल्यानंतर 3 इन 1 ऍसिड ने त्याला असलेले गंज काढून घ्यावे.
  3.  त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन दहा-पंधरा मिनिट सुकायला तसेच ठेवावे.
  4.  नंतर  आपल्याला जो कलर  लागत असेल ते पावडर टाकून घ्यावे.
  5. त्यानंतर जमिनीवर मोठे कार्पेट अंतरावे ज्याने खाली पडलेले कलर पावडर वाया जाणार नाही किंवा खराब होणार नाही. 
  6.  नंतर कॉम्प्रेसर चालू करून हवा भरून धातूवर कलर फवारला जातो.
  7.  त्यानंतर ओवन ठेवून त्याला सेट करावे व त्या धातूवरचा कलर हिट होऊन त्यावर चिटकला जातो.
  8.  आपण सेट केलेले टाईम आपोआप बंद होईल तसेच मशीन सुद्धा बंद होईल.

8) पायाची आखणी

•पायाची आखणी करणे म्हणजे पायाचे योग्य रचना आणि संरचना तयार करणे.

• साहित्य:- पेपर, पेन्सिल, स्केल, रबर, टेप, गज, ओळंबा, गुणा, पावडर राखण्यासाठी, कोन मापक.

कृती:- सर्वात आधी पायाखणीसाठी सर्व साहित्य जमा करावे. त्यानंतर लेव्हल टूप मध्ये पाणी आहे का नाही ते पहावे व नंतर Sprite level ने चेक करून घ्यावे. ओळंबा लावावे व विटा बरोबर लावलेत का नाही ते चेक करावे. सर्व मापे नीट बरोबर लावल्यावर पुढची आखणी करून घ्यावी.

9) बांधकाम

उद्देश:- बांधकाम क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान आणि प्रक्रिया शिकवणे आहे यामध्ये कच्चा साहित्याचा वापरापासून ते बांधकामाच्या अंतिम पूर्णते पर्यंतच्या टप्प्यांचा अभ्यास केला जातो बांधकाम करताना सुरक्षिततेचा महत्त्व आणि पर्यावरण पूरक तंत्रज्ञान शिकवणे.

साहित्य:- विटा, सिमेंट, वाळू, पाणी, स्टील रॉड, आयरन रॉड, हातोडा, मोडेल्स ( साचे ), कटर, टूल्स व सेफ्टी.

कृती:-

  1. पहिल्यांदा बांधकामासाठी विटा घेतल्या व त्यांना एका जागेवर जमा केल्या.
  2. त्यानंतर जॉईंट चे प्रकार सांगितले.
  3. त्यानंतर ज्या ठिकाणी बांधकाम करायचे होते त्या जागेचे मापन घेतले व समान जागा आहे का नाही ते पाहिले.
  4. त्या ठिकाणी सिमेंट व वाळूचे मिश्रण खाली टाकले व नंतर आपल्याला कसे बांधायचे आहे त्यावरून विटांची रचना ठरवून घेतली.
  5. प्रत्येक विटांमध्ये 1 cm तरी अंतर असावे, बांधकाम करत असताना खालच्या थरावर गॅप असेल तर वरच्या थरावर गॅप आला नाही पाहिजे ही काळजी घ्यावी.

10) लेथ मशीन

लेथ मशीन उद्देश : लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठी लेथ मशीन चा वापर करतात.

साहित्य :वर्णीय कलीफएर , लेथ मशीन मटेरियल : लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा.

कृती :लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . लेथ मशीन वापरताना सेफ्टी घातली. नंतर लेथ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. टूल पोस्ट वर टूल बीट लावले . चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. मशीन चालू करून हळू हळू टूल पोस्ट पुढे ढकलला.

लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूल :-

Facing :- लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.·

TAPERING:- टेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.

PARALLEL TURNING:- एक महत्त्वाचे ऑपरेशन आहे जे सामग्रीचा व्यास कमी करण्यासाठी वापरले जाते.

11) Milling Machine

उद्देश:-

विविध आकारांचे आणि जटील यांत्रिक भाग निर्माण करणे आहे हे सामग्रीवर कटिंग ड्रीडवर शिपिंग आणि मिलिंद मशीन चा उपयोग जटिल आकार आणि सुसंगत अचूकता आवश्यक असलेल्या भागांच्या निर्मितीसाठी केला जातो.

साहित्य:- मिलिंग मशीन, कटिंग, स्टूल, लाकूड, ब्लोअर, जॉब, की व सेफ्टी.

कृती:-

  1. पहिल्यांदा मशीन चालू करण्यापूर्वी सर्व साफसफाई करून घेतलीसर्व सेफ्टी आहे का नाही ते पहिल्यांदा घालावे नंतर मशीन जवळ जावे.
  2. लाकडाचा तुकडा हा मशीन मध्ये नीट बसवला व त्याला टाईप केला स्टॉलच्या मापावर त्याला ऍडजेस्ट करून घेतले व fit केले.
  3. नंतर हळू हळू त्याला forward press केले मग तिथून परत vertically आणल.
  4. मशीन चालू असताना जर मशीन मधून धूर निघाला तर फुक मारू नये त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते .