ELECTRIC WAYARING JOINT
प्रस्तावना
विद्युत कामामध्ये वायर जोडणे हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. घरगुती वायरिंग, औद्योगिक वायरिंग, मोटार कनेक्शन, पॅनेल बोर्ड इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वायर जॉइंट वापरले जातात. योग्य पद्धतीने वायर जॉइंट न केल्यास शॉर्ट सर्किट, स्पार्किंग किंवा अपघात होऊ शकतो. म्हणून वायर जॉइंटचे प्रकार समजून घेणे आवश्यक आहे.
सोलार पॅनलच्या मदतीने आपण सूर्याच्या उर्जेचा वापर करून मोफत वीज तयार करू शकतो. चला तर मग, सोलार पॅनल इंस्टॉलेशनची प्रक्रिया, फायदे आणि काळजी जाणून घेऊया.वायर जॉइंटचे प्रकार
उद्देश
वायर जॉइंटचे प्रकार
स्ट्रेट जॉइंट
हा जॉइंट दोन सरळ तारा जोडण्यासाठी वापरला जातो. घरगुती वायरिंगमध्ये हा जॉइंट जास्त वापरला जातो.
टी-जॉइंट
एका मुख्य वायरला बाजूची वायर जोडण्यासाठी टी-जॉइंट वापरतात. लाईट पॉइंट किंवा स्विच कनेक्शनमध्ये हा जॉइंट उपयोगी असतो.
वेस्टर्न युनियन जॉइंट
हा जॉइंट मजबूत व टिकाऊ असतो. ओव्हरहेड लाईन व जिथे जास्त ताण येतो तिथे हा जॉइंट वापरला जातो.
ब्रिटानिया जॉइंट
मोठ्या जाडीच्या तारांसाठी हा जॉइंट वापरला जातो. हा जॉइंट खूप मजबूत असतो.
स्क्रू जॉइंट
स्विच, सॉकेट, होल्डर यामध्ये स्क्रूच्या मदतीने वायर जोडली जाते. हा जॉइंट सहज उघडता व बंद करता येतो.
सोल्डर जॉइंट
तारा जोडून त्यावर सोल्डर लावून जॉइंट केला जातो. हा जॉइंट चांगला कंडक्टिव्ह व टिकाऊ असतो.
लागणारे साहित्यवायर जॉइंटचे प्रकार
साहित्य
इलेक्ट्रिक वायर
वायर स्ट्रिपर / चाकू
प्लायर
इन्सुलेशन टेप
सोल्डरिंग आयर्न (गरज असल्यास)
तारा जोडून त्यावर सोल्डर लावून जॉइंट केला जातो. हा जॉइंट चांगला कंडक्टिव्ह व टिकाऊ असतो.V
लागणारे साहित्य
SOLAR INSTULATIONप्रस्तावना
प्रस्तावना
आजच्या काळात वीजेचे वाढते बिल आणि पर्यावरणातील बदल पाहता सोलार पॅनल लावणे हा उत्तम पर्याय ठरतो
प्रमुख
उद्धेश
वीज खर्च कमी करणे – घर, शाळा, ऑफिस किंवा उद्योग यांचा वीजबिल कमी करण्यासाठी
सर्वे
ठिकाणाची माहितीआणि Droing
- guast house याचा प्रकार
- छताची उपलब्ध जागा (चौरस फूट/चौरस मीटर)
- छताचा प्रकार (काँक्रीट/टिन/टाईल्स)
- छताला मिळणारा सरासरी सूर्यप्रकाश (तास/दिवस)

सोलार पॅनल इंस्टॉलेशनसाठी लागणारे साहित्य (साधारणतः घरगुती व लहान प्रकल्पासाठी) खालीलप्रमाणे असते:
साहित्य
- सोलार पॅनल सूर्यप्रकाशाला विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी.
- चार्ज कंट्रोलर बॅटरी डिस्चार्ज होऊ नये यासाठी.
- बॅटरी निर्माण झालेली वीज साठवण्यासाठी.
- इन्व्हर्टर DC करंटला AC मध्ये रूपांतर करण्यासाठी.
इतर
- पॅनल बसवण्यासाठी लोखंडी/अल्युमिनियमची चौकट.
- पॅनल, बॅटरी व इन्व्हर्टर जोडण्यासाठी.
- पॅनल आणि केबल जोडण्यासाठी.
- सुरक्षा आणि ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी.
- विजेपासून संरक्षणासाठी ग्राउंडिंग.
- अनेक पॅनलचे कनेक्शन एकत्र करण्यासाठी.
- पॅनल मजबुतीने बसवण्यासाठी.
CCTV CAMERA INSTULATION
प्रस्तावना
आजकाल चोरी, अनधिकृत प्रवेश आणि इतर सुरक्षा समस्या वाढल्या आहेत. घर, ऑफिस किंवा दुकान सुरक्षित ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे अत्यंत आवश्यक बनले आहेत. हे फक्त सुरक्षा नाही, तर घटना रेकॉर्ड करण्याचे एक विश्वसनीय साधन देखील आहे.
उद्देश
- आजकाल चोरी, अनधिकृत प्रवेश आणि इतर सुरक्षा समस्या वाढल्या आहेत. घर, ऑफिस किंवा दुकान सुरक्षित ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे अत्यंत आवश्यक बनले आहेत. हे फक्त सुरक्षा नाही, तर घटना रेकॉर्ड करण्याचे एक विश्वसनीय साधन देखील आहे.
- घर, कार्यालय किंवा इतर जागा सुरक्षित ठेवणे.
- घटनांचा तपशीलवार मागोवा ठेवणे.
- कोणत्याही अनधिकृत हालचालींवर नियंत्रण
साहित्य



- CCTV कॅमेरे Bullet
- DVR आणि हार्ड डिस्क
- Power Adapter
- वायर
- c clep
- Monitor किंवा मोबाइल अप किवा tv
इंस्टॉलेशन प्रक्रिया
प्रवेशद्वार, पार्किंग, मुख्य हॉल, बाहेरील जागा , शाळा ,योग्य कोनात, ब्रॅकेटने सुरक्षित.पॉवर व डेटा केबल जोडणे.कॅमेरे कनेक्ट करणे, हार्ड डिस्क लावणे, नेटवर्क सेट करणे.लाईव्ह फीड तपासणे, रेकॉर्डिंग मोडइंस्टॉलेशन नंतर, CCTV कॅमेरा योग्य रेकॉर्डिंग करतो की नाही हे तपासले पाहिजे. रात्रीच्या आणि दिवसा दृश्याची स्पष्टता पाहणे गरजेचे आहे.
इंस्टॉलेशन प्रक्रिया
जागेची निवड आणि मनी बसवणे वायार् साठी कॅमेरा चालू असण्यची खात्री करणे


कॅमेरा बसवणे
भिंतीवर ड्रिल करून स्क्रूच्या मदतीने कॅमेरा घट्ट बसवा.
प्रवेशद्वार, पार्किंग, जिने, आणि मैदान मध्ये कॅश काउंटर येथे कॅमेरे बसवावेत.
वायरिंग
कॅमेऱ्यापासून पर्यंत केबल सुरक्षितपणे टाका.
DVR कनेक्शन
सर्व कॅमेरे DVR/NVR ला जोडा व हार्ड डिस्क बसवा.
पॉवर सप्लाय
SMPS द्वारे कॅमेऱ्यांना व DVR द्या.

सेटिंग व टेस्टिंग
चित्र स्पष्ट येते का ते तपासा. डेट व वेळ सेट करा.
मोबाईल अॅप सेटअप
इंटरनेटद्वारे DVR/NVR मोबाईल अॅपशी कनेक्ट करा व लाईव्ह व्ह्यू पाहा.
देखभाल व मेंटेनन्स
नियमित स्वच्छता करा.
हार्ड डिस्क तपासा.
केबल कनेक्शन नीट आहेत का पाहा.
निष्कर्ष
ही CCTV कॅमेरा इंस्टॉलेशन मानवली वापरून सुरक्षित व प्रभावी सुरक्षा प्रणाली उभारता येते.
CCTV कॅमेरा इंस्टॉलेशन costing
boyesहोस्टेल मधील cctvकॅमेरा ground कवर करण्या साठी बसवला

कास्टिंग cctv दुरुस्ती करने व नवीन बसवण्याची कास्टिंग इलेक्ट्रिक Lab

soielab मधील डोम कॅमेरा ची कॉस्टिंग
soillab माफ्धील कॅमेरा ची तोतल कास्टिंग आणि माहिती

camptur lab च्या जिन्या मधील एरिया कवर केला त्याची कॉस्टिंग कॅमेरा इन्स्तुलेषण ची

अनिल साराच्या ओफीस जवळील पोल वर बसवलेला कॅमेराची कॉस्टिंग

बोर्ड भरने आणि बसवणे
प्रस्तावना

घरगुती व औद्योगिक वीज व्यवस्थेमध्ये बोर्ड भरने अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. योग्य पद्धतीने बोर्ड भरल्यास वीजपुरवठा सुरक्षित राहतो, उपकरणे नीट चालतात व अपघाताचा धोका कमी होतो.
उद्देश
- इलेक्ट्रिक बोर्ड योग्य पद्धतीने भरता यावा
- वायरिंग सुरक्षित व नीटनेटकी करणे
- शॉर्ट सर्किट व ओव्हरलोड टाळणे
- विद्यार्थ्यांना व प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष उपयोगी माहिती देणे
- स्विच (5A / 16A)
- सॉकेट
- इंडिकेटर
- MCB / फ्यूज
- वायर (लाल – फेज, काळी/निळी – न्यूट्रल, हिरवी – अर्थ)
- स्क्रू ड्रायव्हर
- टेस्टर
- कटर / प्लायर
- बोर्ड प्लेट
कृती

ओल्या हाताने काम करू नयेजास्त भार एका बोर्डवर घेऊ नयेयोग्य क्षमतेची वायर वापरावीअर्थिंग आवश्यक आहे
निष्कर्ष
योग्य पद्धतीने इलेक्ट्रिक बोर्ड भरणे केल्यास वीज नुकसान टळते व अपघाताचा धोका कमी होतो.
मोटार रीवायाडिंग
मोटार रीवाइंडिंग
प्रस्तावना
आजच्या काळात शेती, उद्योग, घरगुती पाणीपुरवठा, वर्कशॉप इत्यादी ठिकाणी विद्युत मोटारींचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मोटार दीर्घकाळ चालल्यानंतर किंवा चुकीच्या वापरामुळे तिचे वायंडिंग जळणे, शॉर्ट सर्किट होणे, ओव्हरलोड येणे अशा समस्या उद्भवतात. अशा वेळी नवीन मोटार घेण्यापेक्षा मोटार रीवाइंडिंग करणे अधिक किफायतशीर ठरते. या ब्लॉगमध्ये मोटार रीवाइंडिंगची माहिती मानवली (सोप्या) भाषेत दिली आहे.
उद्देश
मोटार रीवाइंडिंग म्हणजे काय हे समजून घेणे
मोटार खराब होण्याची कारणे जाणून घेणे
रीवाइंडिंगची प्रक्रिया समजावून घेणे
योग्य काळजी व सुरक्षिततेची माहिती देणे
लागणारे साहित्य
कॉपर वायंडिंग वायर (योग्य गेजची)
इन्सुलेशन पेपर स्लिव्ह
वार्निश (Varnish)
लाकडी वेज स्लॉट इन्सुलेशन
सोल्डरिंग साहित्य
हातोडा, प्लायर, स्क्रू ड्रायव्हर
मेगर मल्टीमीटर
कृती
- सर्वप्रथम मोटारचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद करावा.
- मोटार उघडून जुने जळालेले वायंडिंग काळजीपूर्वक काढावे.
- स्लॉट साफ करून त्यामध्ये इन्सुलेशन पेपर बसवावा.
- मोटारच्या क्षमतेनुसार योग्य गेजची कॉपर वायर निवडावी.
- ठराविक टर्न्सप्रमाणे नवीन वायंडिंग गुंडाळावे.
- कनेक्शन योग्य प्रकारे सोल्डर करावे.
- पूर्ण वायंडिंग झाल्यानंतर वार्निश लावून वाळवावे.
- मोटार पुन्हा जोडून टेस्ट रन घ्यावा.

वाटर फिल्टर बनवणे
प्रस्तावना
पाणी हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी शुद्ध नसते. अशुद्ध पाण्यामुळे विविध आजार होऊ शकतात. त्यामुळे पाणी स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी वापरणे वाटर फिल्टर गरजेचे आहे. कमी खर्चात घरच्या घरी साधा वॉटर फिल्टर कसा बनवता येते
उद्देश
पाणी शुद्ध करण्याचे महत्त्व समजून घेणे
साधा वॉटर फिल्टर बनवण्याची पद्धत शिकणे
कमी खर्चात उपयोगी फिल्टर तयार करणे आणि मावशी ला डोक्यावरती ओज होत असत्या कारणाने फिल्टर बनवला फिल्टरमुळे पाणी स्वच्छ, पारदर्शक व वापरण्यास योग्य होते.
साहित्य

कृती
साहित्य stand तयार करणे आणि त्या एक एक पार्ट बसवणे stand ला झाकण बसवणे स्क्रु ने फीट करणे
आणि बात्तोल बसवणे नळी बसवणे UV लाइट बसवणे अडप्टर लावणे

FILTER
मॅन्युअली फिल्टर बनवणे ही प्रक्रिया सोपी, आहे. योग्य साहित्य, पद्धतशीर आणि नियमित देखभाल केल्यास हे फिल्टर करण्यासाठी. घरगुती वापरासाठी किंवा लहान प्रकल्पांसाठी मॅन्युअल फिल्टर हा पर्याय ठरू शकतो
gray water
पाणी हे जीवनाचे आधारस्तंभ आहे. मानव, प्राणी, वनस्पती सर्वांचे जीवन पाण्यावर अवलंबूनग्रे वॉटर म्हणजे काय?
घरात वापरलेले पण जास्त घाण नसलेले पाणी म्हणजे ग्रे वॉटर.
उदा.
- आंघोळीचे पाणी
- कपडे धुतल्याचे पाणी
- भांडी धुतल्याचे पाणी
प्रस्तावना
ग्रे वॉटरच्या पुनर्वापरामुळे पाण्याची बचत होते, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि पाण्याच्या समस्येवर उपाय शोधण्यास मदत मिळते. त्यामुळे ग्रे वॉटर ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची ठरते.
उद्देश
पर्यावरण संरक्षणासाठी ग्रे वॉटरचा उपयोग कसा होतो हे अभ्यासणे.
ग्रे वॉटर म्हणजे काय हे समजून घेणे.
ग्रे वॉटरचे स्रोत ओळखणे (आंघोळ, कपडे धुणे, हात धुणे इ.).
ग्रे वॉटरचा पुनर्वापर कसा करता येतो हे जाणून घेणे.
पाण्याची बचत करण्याचे महत्त्व समजून घेणे.
साहित्य
ग्रे वॉटर प्रकल्प
वही व पेन
प्लास्टिकची टाकी किंवा बादली
पाणी जमा करण्यासाठी पाइप
वाळू
खडी
कोळसा
जाळी किंवा सूती कापड (फिल्टरसाठी)
दुसरी स्वच्छ टाकी (फिल्टर केलेले पाणी साठवण्यासाठी)
कृती

- घरातील आंघोळ, हात धुणे आणि कपडे धुण्याचे पाणी वेगळ्या पाइपद्वारे एका टाकीत जमा केले.
- त्या टाकीमध्ये वाळू, खडी आणि कोळसा यांचा साधा फिल्टर तयार केला.
- जमा झालेले पाणी या फिल्टरमधून हळूहळू सोडले.
- फिल्टर केलेले पाणी वेगळ्या स्वच्छ टाकीत साठवले.
- हे पाणी बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी व शौचालय फ्लशसाठी वापरले.
- पाण्याचा रंग, वास आणि स्वच्छता यांचे निरीक्षण केले व नोंद केली.
ही कृती केल्यामुळे ग्रे वॉटरचा सुरक्षित व उपयुक्त पुनर्वापर करता येतो.
निष्कर्ष
ग्रे वॉटरचा योग्य प्रकारे पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करता येते. घरातील आंघोळ, कपडे धुणे व हात धुणे यामधून निघणारे पाणी प्रक्रिया करून बागकाम व फ्लशसाठी वापरता येते. त्यामुळे स्वच्छ पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि पर्यावरणाचे संरक्षण होते.
यामुळे असे निष्पन्न होते की, ग्रे वॉटर व्यवस्थापन ही पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि उपयुक्त उपाययोजना आहे.
Tiny house
प्रस्तावना
. या वायरिंगमध्ये घरामध्ये ३ ते ४ विद्युत पॉइंट दिले गेले, ज्यामध्ये लाईट आणि स्विच बोर्डचे पॉइंट होते. वायरिंग करण्यासाठी आवश्यक साहित्य आम्ही गोळा केले आणि गावामधून आणले. आम्ही वापरलेले साहित्य खालीलप्रमाणे होते:
साहित्य
- २ पिट्ट्यांची वायर
- ४ मीटर लांबीची वेगवेगळी ३ वायर
- १६ एमपीआर बोर्ड
- स्क्रू
- एक SSC कंबाईन बोर्ड
- इतर लहान साधनसामग्री जसे की टेप, ड्रायव्हर इत्यादी
उद्देश
पहिले केलेले काम चुकीचे होते त्याला रीपैरे करण्यासाठी चुकीच्या पोइंट गर्जे नुसार बोर्ड बसून देणे
कृती
सर्व साहित्य उपलब्ध झाल्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वायरिंगचे काम काळजीपूर्वक टप्प्याटप्प्याने केले. योग्य रंगाच्या वायरचा वापर करून सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले. वायरिंग पूर्ण झाल्यानंतर सर्व पॉइंट तपासण्यात आले आणि ते योग्यरीत्या कार्यरत असल्याची खात्री करण्यात आली. या संपूर्ण वायरिंगसाठी एकूण ₹1,004 इतका खर्च आला.
या प्रॅक्टिकलमुळे आम्हाला घरगुती वायरिंगची प्रत्यक्ष माहिती मिळाली तसेच साहित्य निवड, खर्च नियोजन आणि सुरक्षित कामकाज यांचे महत्त्व समजले. हा अनुभव आमच्यासाठी खूप उपयुक्त, शिकण्यासारखा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला.
आम्ही Tiny House साठी नियोजित विद्युत काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले. सर्वप्रथम घराच्या आराखड्यानुसार लाइट पॉइंट, फॅन पॉइंट, प्लग पॉइंट व स्विच बोर्ड यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. त्यानंतर योग्य क्षमतेच्या 2.5 mm आणि 1.5 mm वायरचा वापर करून संपूर्ण वायरिंग करण्यात आली. सर्व वायरिंग सुरक्षित पद्धतीने conduit मधून टाकण्यात आली असून जोडण्या मजबूत आणि नीटस ठेवण्यात आल्या.
वायरिंग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात multimeter च्या सहाय्याने विद्युत तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये continuity, voltage supply, polarity तसेच कोणताही short circuit किंवा leakage आहे का याची खात्री करण्यात आली. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर Tiny House मधील earthing प्रणालीची तपासणी करण्यात आली. earthing योग्य प्रकारे कार्यरत असल्याचे आढळून आले आणि आवश्यक resistance मानकांमध्ये असल्याची खात्री झाली.
निष्कर्ष
या सर्व तपासणीनंतर Tiny House मधील विद्युत व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित, कार्यक्षम आणि वापरासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. योग्य वायरिंग आणि earthing मुळे भविष्यातील विद्युत अपघात टाळता येतील व घरातील उपकरणे सुरक्षितपणे वापरता येतील, असा निष्कर्ष काढण्यात .
Table Fan Reparing & DC टेबल फॅन दुरुस्ती
प्रस्तावना
आजच्या आधुनिक युगात DC टेबल फॅन हा घर, ऑफिस आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा उपयुक्त विद्युत उपकरण आहे. हा फॅन कमी वीज वापरतो, इन्व्हर्टरवर सहज चालतो आणि ऊर्जा बचत करण्यास मदत करतो. त्यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
उद्देश
DC टेबल फॅन दुरुस्ती
- DC टेबल फॅनची रचना व कार्यपद्धती समजून घेणे.
- फॅनमध्ये येणाऱ्या सामान्य बिघाडांची माहिती मिळवणे.
- लहान तांत्रिक समस्या ओळखून त्यांची दुरुस्ती कशी करावी हे शिकणे.
- दुरुस्ती करताना आवश्यक सुरक्षितता उपाय जाणून घेणे.
- उपकरणांची योग्य देखभाल करून त्यांचे आयुष्य वाढवणे.
साहित्य
1 बेरिंग 2ओईल 3ब्रुश स्क्रूड्रायव्हर
लहान ब्रश किंवा कापड धूळ साफ करण्यासाठी
लहान तेलाची बाटली मोटर बियरिंगसाठी
मल्टीमीटर विजेची तपासणीसाठी
नवीन बॅटरी जर रिमोट असेल तर
कृती
फॅनचे पंखे आणि धूळ साफ करा
- फॅनचे ब्लेड बाहेर काढा.
- धूळ किंवा घाण ब्रश/कपड्याने स्वच्छ करा.
- ब्लेड नीट बसवा.
रिमोट आणि बॅटरी तपासा
- रिमोटमध्ये बॅटरी योग्य प्रकारे आहे का तपासा.
- खराब बॅटरी बदलून पहा.
- रिमोटची कामगिरी तपासा.
सर्किट आणि कंडेंसर तपासा
- मल्टीमीटर वापरून पॉवर इनपुट तपासा.
- काही फॅन्समध्ये कंडेंसर खराब होतो, तर योग्य कंडेंसर बदलणे गरजेचे आहे.
मोटर आणि बियरिंगची तपासणी

- मोटर आणि बियरिंग हाताने हलवून पहा.
- आवाज किंवा अडथळा असेल तर, बियरिंगमध्ये तेल लावा किंवा बदल करा.
पुन्हा एकत्र करा आणि तपासा
- सर्व भाग व्यवस्थित एकत्र करा.
- फॅन प्लग करून चालवा.
- गती, आवाज, आणि रिमोट कामकाज नीट आहे का तपासा.
निष्कर्ष
तिची नियमित तपासणी, धूळ साफ करणे, तेल लावणे आणि बॅटरी/सर्किटची काळजी घेणे हे फॅनला दीर्घकाळ कार्यक्षम ठेवते.
A-Frame होड्रोमार्करने जागामापणे
प्रस्तावना
A-Frame होड्रोमार्करने जागामापणे
आपल्याला जगजर एक लेवल बगण्या साठी आपणासाठी या A फेम चा उपयोग करण्या मुले सोपे होहू शकत आणि haidro मार्कर नि लेवल एक सारखा आहे ते अगदी सोपया पद्धतीने वापरू शकतो
उद्देश
आपण अदाज न लावता एक चगला प्रयोग करू शकतो जेणे करून आपला काम सोप होऊ शकतो या A फेम आफ्झाम च वापर जाजागी वर खाली असेल त्या ठिकाणी याच वापर एक चागले ठरेल haidro मार्कर नि लेवल एक सारखा आहे ते अगदी सोपया पद्धतीने वापरू शकतो
A fame आणि haidro markar च वापर करून विघ्यान आश्रम मधील जागा मापने
साहित्य
1 A fame
2 white powder कुना कर न्या साठी
3 threed
4 water
कृती
आपण अदाज न लावता एक चगला प्रयोग करू जेणे करून आपला काम सोप होऊ शकतो या A फेम
haidro मार्कर नि लेवल एक सारखा आहे ते अगदी सोपया पद्धतीने वापरू शकतो

याप्रकारे आपण जागे च च्गले माप घेऊ शकतो याठिकाणी A-Frame होड्रोमार्करनच उपयोग केलेलं आहे
निरीक्षण
- उतार असलेल्या जमिनीवर पाणी वेगाने वाहते
- समतल भागात पाणी जास्त काळ साठते
- योग्य लेव्हल केल्यास पाण्याचा अपव्यय कमी होतो
निष्कर्ष
A-Frame होड्रोमार्कर ही स्वस्त, सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. ग्रामीण भागात शेतकरी, विद्यार्थी आणि प्रशिक्षण केंद्रांसाठी ही पद्धत खूप उपयुक्त ठरते. कमी साधनांतून अचूक जागामापणी करता येते आणि पाणी व्यवस्थापन सुधारता येते.