छत्री
१) प्रस्तावना
पावसाळ्यात भिजण्यापासून तसेच उन्हाळ्यात उन्हाच्या कडाक्यापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा उपयोग होतो. छत्री हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा शोध आहे.
हॉटेल दुकानदारीसाठी सोयीस्कर
२) उद्देश
पावसापासून वाचण्यासाठी छत्रीचा वापर करणे
उन्हापासून बचाव करणे
सोयीस्कर व हलक्या साधनाद्वारे संरक्षण मिळवणे
३) सर्वे
आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत जसे की –
फोल्डेबल छत्री
लांब हँडलची छत्री
ऑटो-ओपन छत्री
डिझाईन छत्री
४) साहित्य
नायलॉन / पॉलिस्टर कापड
लोखंड / स्टीलचे रॉड
स्प्रिंग व फोल्डिंग मेकॅनिझम
५) कृती
छत्रीचे हँडल व स्टील रॉड्स तयार करणे
रॉड्सला स्प्रिंग व फोल्डिंग सिस्टिम जोडणे
कापड योग्य मापात कापून रॉड्सला शिवून बसवणे
छत्री उघडून व बंद करून तपासणी करणे


६) मी हे शिकलो
छत्री कशी बनवली जाते याची माहिती मिळाली
छत्रीच्या साहित्याचा व रचनात्मक भागाचा अभ्यास झाला
दैनंदिन जीवनातील साध्या साधनाचे महत्त्व समजले
सिपिएम चार्ट
| काम | वेळ |
| थ्रीडी डिझाईन केले | 8 तास |
| साहित्य आणले | 3 तास |
| मेजरमेंट घेतले | 8 तास |
| पार्ट कटिंग अँड वेल्डिंग | 8 तास |
| पार्ट पॉलिशिंग अँड ग्राइंडिंग | 6 तास |
| पावडर कोटिंग | 8 तास |
| छत्री बसवणे | 3 तास |
| प्लाजमा कटिंग | 2 तास |
| एकूण | 6 दिवस |
७) निरीक्षण
छत्री उघडणे व बंद करणे सोपे असते
मजबूत फ्रेम व टिकाऊ कापड जास्त काळ टिकते
८) निष्कर्ष
छत्री हा उपयुक्त व सोपा शोध असून पाऊस व ऊन यापासून आपले संरक्षण करते.
९) भविष्यातील उपयोग
सोलर छत्री (ऊर्जा निर्माण करणारी)
वॉटरप्रूफ व जास्त टिकाऊ साहित्याची छत्री

Tiny House
प्रस्तावना
आजच्या जगात जागेची कमतरता आणि वाढती घरांची किंमत यामुळे छोटे व किफायतशीर घर (Tiny House) हा उत्तम पर्याय ठरत आहे. कमी जागेत सर्व सुविधा असलेले घर तयार करून जीवनशैली साधी, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी करता येते.
उद्देश
- कमी जागेत सर्व सुविधा असलेले घर तयार करणे.
- स्वस्त, टिकाऊ व हलणारे (portable) घर बनवणे.
- पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे.
- समाजात साधेपणाने जगण्याचा संदेश देणे.
सर्वे
- मोठ्या घरांच्या तुलनेत छोटे घर बांधकाम खर्चात खूप स्वस्त ठरते.
- Tiny House 200–400 sq.ft. मध्ये बनवता येते.
- यासाठी लाकूड, स्टील, अॅल्युमिनियम, AAC ब्लॉक, सौर ऊर्जा वापरता येते.
- अमेरिकेत, जपानमध्ये व युरोपमध्ये याला मोठी लोकप्रियता आहे.
साहित्य
- लाकूड / स्टील फ्रेम
- छतासाठी पत्रा / टिन / सिमेंट शीट
- भिंतीसाठी सिमेंट शीट
- दरवाजे व खिडक्या
- पाणीपुरवठा व ड्रेनेज पाईप
- रंग, प्लंबिंग व इलेक्ट्रिकल साहित्य
कृती
- Tiny House चे डिझाईन तयार केले.
- आवश्यक साहित्य गोळा केले.
- बेस फ्रेम व स्ट्रक्चर तयार केले.
- भिंती, छप्पर व फ्लोअर बसवले.
- खिडक्या, दरवाजे व आतील सजावट केली.
- इलेक्ट्रिकल व पाणीपुरवठा जोडला.


मी हे शिकलो
- कमी साहित्य वापरून उपयोगी घर बांधता येते.
- डिझाईन व नियोजन किती महत्त्वाचे असते.
- टीमवर्क व वेळ व्यवस्थापन शिकायला मिळाले.
- टिकाऊ व पर्यावरणपूरक बांधकामाची माहिती मिळाली.
निरीक्षण
- घर मजबूत, हलके व आकर्षक झाले.
- साहित्य कमी वापरल्यामुळे खर्च कमी आला.
- हलवता येण्याजोगे घर असल्याने कुठेही नेऊ शकतो.
निष्कर्ष
Tiny House हा भविष्याचा एक पर्याय आहे. कमी खर्च, कमी जागा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यामुळे हे घर समाजासाठी उपयुक्त आहे.
भविष्यातील उपयोग
- ग्रामीण भागात किफायतशीर घरे उभारण्यासाठी.
- पर्यटन स्थळी तात्पुरती घरे / कॉटेजेस तयार करण्यासाठी.
- आपत्तीग्रस्त भागात तात्पुरते निवास देण्यासाठी.
डोम रिनोवेशन
प्रस्तावना
डोम म्हणजे गोल किंवा अर्धगोलाकार आकाराची रचना. प्राचीन काळापासून डोम प्रकारच्या बांधकामांचा वापर होत आला आहे. या रचनेत मजबुती, आकर्षक डिझाईन व कमी साहित्य वापरून जास्त जागा मिळते.
उद्देश
- डोम रचनेची माहिती घेणे.
- कमी खर्चात मजबूत व आकर्षक रचना तयार करणे.
- शैक्षणिक प्रकल्पाद्वारे बांधकाम तंत्र शिकणे.
सर्वे
- प्राचीन वास्तुशिल्पात डोमचा वापर (मस्जिद, मंदिरे, गॉथिक आर्किटेक्चर).
- आजच्या काळात – ग्रीनहाऊस, स्टोरेज, स्पोर्ट्स हॉल, टेम्पररी हाऊस.
- विविध प्रकारचे डोम – Geodesic dome, Concrete dome, Bamboo dome.
साहित्य
- लोखंडी/स्टील पाईप किंवा बांबू
- डोर / वेल्डिंग साहित्य
- प्लास्टिक शीट किंवा टीन शिट (कव्हरिंग साठी)
- स्क्रू, नट-बोल्ट, साधने (कटर, ड्रिल मशीन इ.)
कृती
- डिझाईन नुसार डोमची गोलाकार फ्रेम तयार करणे.
- पाईप/बांबू नट-बोल्ट/वेल्डिंगने जोडणे.
- सर्व जोड व्यवस्थित घट्ट करणे.
- डोम वर कव्हर लावणे (प्लास्टिक शीट / टीन शिट).
- शेवटी मजबुती तपासणे

मी हे शिकलो
- डोम बांधकामाची रचना समजली.
- टीमवर्क आणि मोजमापाचे महत्त्व कळले.
सिपिएम चार्ट
| काम | वेळ |
| साफसफाई | 2 तास |
| मापन | 2 तास |
| साहित्य आणणे | 2 तास |
| भिंत बांधणी | 5 तास |
| पुट्टी भरणे | 3 तास |
| डोमला कलर लावणे | 16तास |
| झाडाची कटिंग | 2तास |
| लोखंडी पाईप घासणे | 1 तास |
| लोखंडी पाईपला ऑइल पेंट लावणे | 8 तास |
| एकूण | 6 दिवस |
निरीक्षण
- डोम हलक्या साहित्यानेसुद्धा मजबूत बनवता येतो.
- वाऱ्याचा दाब व नैसर्गिक शक्ती डोमवर समान पसरतो त्यामुळे ती रचना टिकाऊ असते.
निष्कर्ष
डोम प्रकारची रचना स्वस्त, आकर्षक आणि मजबूत असल्यामुळे आजच्या आधुनिक बांधकामात उपयोगी आहे.
भविष्यातील उपयोग
- ग्रीनहाऊस तयार करणे
- टेम्पररी घरं किंवा शेल्टर
- खेळाची मैदाने, हॉल
- स्टोरेज व कार्यशाळा

बायो गॅस टाकी दुरुस्ती
🔹 प्रस्तावना
बायो-गॅस टाकी ही स्वयंपाक, लाईटिंग किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी एक पर्यावरणपूरक यंत्रणा आहे. दीर्घकाळ वापरामुळे टाकीत गंज, लीक, किंवा पाईप जॉइंट्समध्ये खराबी येऊ शकते. त्यामुळे टाकीची कार्यक्षमता कमी होते. या प्रोजेक्टद्वारे आम्ही बायो-गॅस टाकीतील दोष ओळखून योग्य प्रकारे दुरुस्ती करून तिचे आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
🔹 उद्देश
- बायो-गॅस टाकीतील लीक किंवा खराब भाग ओळखणे.
- टाकीची सुरक्षित व प्रभावी दुरुस्ती करणे.
- दुरुस्ती नंतर गॅस लीक तपासणे.
- टाकी पुन्हा कार्यक्षम बनवणे.
- पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर सुरू ठेवणे.
🔹 सर्वे
अनेक ठिकाणी गंज, पाईप जॉइंट सैल होणे, रबर गॅसकेट खराब होणे आणि सीलंट कोरडे पडणे या समस्या दिसल्या. काही टाक्यांमध्ये पाण्याची झिरप आणि गॅस लीक हेही कारण दिसले. या समस्यांसाठी योग्य उपाय म्हणजे नियमित तपासणी आणि वेळोवेळी दुरुस्ती करणे.
🔹 साहित्य
- सीलंट (गॅस-रेझिस्टंट सिलिकॉन/पीयू)
- मेटल पॅच
- वेल्डिंग मशीन (धातूच्या टाकीसाठी)
- सँडपेपर
- साबणाचे पाणी (लीक तपासणीसाठी)
- साफसफाईसाठी डिटर्जेंट / अल्कोहॉल
- हँड टूल्स (रेंच, प्लायर्स, स्क्रू ड्रायव्हर)
- ग्लव्ज, सेफ्टी ग्लासेस, मास्क
🔹 कृती
- टाकीच्या बाहेरील आणि आतील भागावर तपासणी करून लीक आणि क्रॅक शोधले.
- खराब भाग साफ करून सँडपेपरने गंज काढला.
- लहान लीकवर सीलंट लावले आणि मोठ्या छिद्रांवर फाइबरग्लास / मेटल पॅच लावला.
- दुरुस्ती झाल्यानंतर टाकी वाळवून पुन्हा गॅस भरला.
- साबणाच्या पाण्याने तपासणी करून लीक आहे का ते पाहिले.
- दुरुस्ती पूर्ण झाल्यावर टाकी योग्यरित्या कार्यरत असल्याचे निश्चित केले.


🔹 मी हे शिकलो
- बायो-गॅस टाकीची रचना आणि काम करण्याची प्रक्रिया समजली.
- लीक तपासणीची सोपी पद्धत (साबण-पाणी टेस्ट) शिकलो.
- दुरुस्ती करताना सुरक्षितता किती महत्त्वाची असते हे जाणले.
- विविध साहित्यांचा योग्य वापर कसा करावा हे शिकले.
- टीमवर्क आणि वेळेचे नियोजन याचे महत्त्व समजले.
🔹 निरीक्षण
दुरुस्तीपूर्वी टाकीत लीक आणि गंज होते.
दुरुस्ती केल्यानंतर गॅस लीक पूर्णपणे बंद झाला आणि टाकी व्यवस्थित कार्य करू लागली.
प्रेशर टेस्ट आणि साबण टेस्ट दोन्ही यशस्वी ठरल्या.
🔹 निष्कर्ष
बायो-गॅस टाकीची वेळेवर तपासणी आणि योग्य दुरुस्ती केल्यास ती दीर्घकाळ चालते आणि गॅस उत्पादन कार्यक्षम राहते. या प्रोजेक्टमधून दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया, सुरक्षितता आणि टिकाऊ उपाय याविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
🔹 भविष्यातील उपयोग
- ही पद्धत इतर बायो-गॅस टाक्यांवरही वापरता येते.
- नियमित तपासणी केल्यास टाकीचे आयुष्य वाढते.
- भविष्यात टाकी डिझाइनमध्ये सुधारणा करून लीक कमी करता येतील.
- ग्रामीण भागात ऊर्जा निर्माणासाठी हे ज्ञान उपयुक्त ठरेल.
- दुरुस्तीच्या माध्यमातून खर्च वाचवता येतो आणि पर्यावरणाचे रक्षणही होते.
नर्सरी शेड
प्रस्तावना :-
6×6 आकाराच्या शेडसाठी सर्वत्र 1 ते 1.5 फूट अँगल सपोर्ट लावले. सोळा फुटी पांढऱ्या कोटी पत्र्याचा वापर करून हिरवी शेडनेट बसवली. प्रोफाइल लावून सेल्फ स्क्रू व शेडनेट लावली. शेडला सपोर्ट देण्यासाठी GI अँगल जोडणी करून हुक, वेल्डिंग व खिळ्यांचा वापर केला.
सर्वे :–
प्रोफाइल व सेल्फ स्क्रूने शेडनेट लावली. GI अँगलने जोडणी करून हुक, वेल्डिंग व खिळ्यांचा वापर केला. मागील बाजूस अतिरिक्त सपोर्टसाठी GI अँगल बसवले. शेडनेट प्रोफाइलला स्प्रिंगने जोडली आणि खाली काळ्या रंगाची नीट कलर कोटिंग केली.
उद्देश :-
शेड मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित बनवून सूर्यप्रकाश, पाऊस व धूळ यापासून संरक्षण मिळावे तसेच कार्यक्षेत्र स्वच्छ व नीटनेटके ठेवणे हा या कामाचा मुख्य उद्देश आहे.
साहित्य :-
1 ते 1.5 फूट अँगल
6×6 शेड फ्रेम
16 फुटी पांढरा कोटी पत्रा
हिरवी शेडनेट
प्रोफाइल व सेल्फ स्क्रू
जीआय अँगल – जोडणी व सपोर्टसाठी
हूक, स्प्रिंग व वेल्डिंग साहित्य
कृती :-
अँगल सपोर्ट लावले, फ्रेम तयार केली, पत्रे बसवले, प्रोफाइल लावून सेल्फ स्क्रू मारले, शेडनेट स्प्रिंगने जोडली, जीआय अँगल व वेल्डिंगने सपोर्ट दिला, शेवटी खाली काळा कलर नीट टाकला.


निरीक्षण :-
सर्व अँगल, पत्रे व शेडनेट नीट बसवलेले दिसले.
जोडणी मजबूत आहे.
सपोर्ट व्यवस्थित लावलेले असून शेड स्थिर व सुरक्षित आहे.
कामाची गुणवत्ता समाधानकारक आहे.
निष्कर्ष :-
शेड बांधकामाचे काम नियोजनाप्रमाणे पूर्ण झाले.
सर्व साहित्य योग्य वापरले गेले.
रचना मजबूत, सुरक्षित आणि उपयोगी तयार झाली.
भविष्यातील उपयोय :-
शेडचा वापर साहित्य साठवण, वाहन पार्किंग, कामासाठी सावली व पावसापासून संरक्षण यासाठी करता येईल.
यामुळे जागेचा उपयुक्त वापर होईल आणि संरचना टिकाऊ राहील.
मी हे शिकलो:-
शेड बांधकामासाठी लागणारे साहित्य, मापन, जोडणी व सुरक्षितता याबद्दल ज्ञान मिळाले.
अँगल, पत्रे, प्रोफाइल आणि शेडनेट बसवण्याची पद्धत practically शिकलो.
टेबल
प्रस्तावना -:
स्वयंपूर्ण पद्धतीने मजबूत व टिकाऊ स्ट्रक्चर तयार करण्यासाठी लोखंडी ट्यूब, अँगल, प्लायवुड, स्टील पत्रा तसेच सन्माईका वापरून एक युनिट/फ्रेम तयार करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये कटिंग, वेल्डिंग, फिनिशिंग व पेंटिंग हे काम करण्यात आले.
उद्देश -:
वापरासाठी उपयुक्त व मजबूत स्ट्रक्चर तयार करणे.
लोखंडी काम, वेल्डिंग, फिनिशिंग आणि पेंटिंग या कौशल्यांचा सराव व प्रत्यक्ष अनुभव घेणे.
साहित्य -:
1.5 x 1.5 ची ट्यूब
35 x 5 चा अँगल
4 x 8 चा प्लायवुड
सन्माईका
पंचिंग जाळी
रेड ऑक्साइड
बॉटम पट्टी
ऑइल पेंट
4 x 8 चा स्टील पत्रा
स्क्रू 2.5 इंच
रोलर 2 इंच – 2 नग
ब्रश 2 इंच – 2 नग
14 इंच व्हील – 1 नग
ग्रॅण्डिंग व्हील – 5 नग
कटिंग व्हील – 10 नग
पॉलिश व्हील – 5 नग
वेल्डिंग रॉड – 1 पुडा
कृती -:
आवश्यक मोजमाप घेऊन 1.5×1.5 ट्यूब व 35×5 अँगल कट केले.
फ्रेमचा आकार बनवत वेल्डिंग करून स्ट्रक्चर तयार केले.
जॉइंट ग्रॅण्डिंग करून सपाट केले.
4×8 स्टील पत्रा फिट केला व पंचिंग जाळी लावली.
प्लायवुड व सन्माईका शीट आकारानुसार कापून बसवली.
रेड ऑक्साइड कोटिंग करून फिनिशिंग दिली.
नंतर ऑइल पेंट रोलर व ब्रशने लावले.
बॉटम पट्टी, व्हील व स्क्रू बसवून पूर्ण तयार केले.
शेवटी पॉलिश व्हीलने स्मूथ फिनिश केली.
सिपीएम चार्ट
| काम | वेळ |
| टिग वेल्डिंग | 4 तास |
| स्क्रू मारणे | 2 तास |
| प्लायवुड लावणे | 4 तास |
| वेल्डिंग | 16 तास |
| ड्रॉईंग | 2 तास |
| साहित्य आणले | 5 तास |
| मेजरमेंट घेणे | 3 तास |
| पार्ट कटिंग अँड वेल्डिंग | 18 तास |
| सन्माईक लावणे | 2 तास |
| पार्ट पॉलिशिंग अँड ग्राइंडिंग | 18 तास |
| कलर करणे | 8 तास |
| बेसिन बसवणे | 4 तास |
| पत्रा लावणे | 4 तास |
| एकूण | 80 तास |
निरीक्षण -:
योग्य मोजमाप व कटिंग केल्यास स्ट्रक्चर अचूक व मजबूत होते.
रेड ऑक्साइड लावल्याने गंज रोखला जातो.
वेल्डिंग नंतर ग्रॅण्डिंग केल्यास फिनिशिंग आकर्षक मिळते.
व्हील बसवल्याने युनिट सहज हलवता येते.
निष्कर्ष- :
उत्तम नियोजन, योग्य साहित्य व कौशल्य वापरल्याने मजबूत आणि टिकाऊ स्ट्रक्चर तयार करता येते. फिनिशिंग व्यवस्थित केल्यास उत्पादनाचा दर्जा अधिक चांगला दिसतो.
मी हे शिकलो -:
मोजमाप घेणे, कटिंग आणि वेल्डिंगची योग्य पद्धत.
पेंट व फिनिशिंगचे महत्त्व.
औद्योगिक साहित्य वापर कौशल्य.
कामातील सुरक्षितता आणि गुणवत्ता नियंत्रण.
भविष्यातील उपयोग -:
घरगुती किंवा औद्योगिक वापरासाठी अशा प्रकारच्या युनिट्स/टेबल्स/रॅक तयार करता येतील.
कस्टम फर्निचर व्यवसायात उपयोग होऊ शकतो.
वेल्डिंग व फॅब्रिकेशन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.





गेस्ट हाऊस बांधकाम
प्रस्तावना :
गेस्ट हाऊस बांधकाम हा एक महत्वाचा प्रकल्प असून त्यामध्ये जागेची आखणी, विटांची मांडणी, भिंतींची उंची, खिडक्या–दरवाज्यांची जागा .या सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करावी लागते. या प्रकल्पाद्वारे आम्ही प्रत्यक्ष बांधकाम कसे करायचे, कोणते साधन कसे वापरायचे आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता कशी राखायची हे शिकून घेतले.
सर्वे :
बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेचा सखोल सर्वे करण्यात आला.
जागेचे मोजमाप घेण्यात आले.
गेस्ट हाउसची दिशा, वारा–तापमान याचा विचार करण्यात आला.
या सर्वेच्या आधारे अंतिम प्लॅन आणि मोजमाप निश्चित करून चौकट तयार करण्यात आली.
उद्देश :
गेस्ट हाऊसचा बांधकाम कार्य प्रत्यक्ष अनुभवणे
मार्किंग, प्लॅनिंग आणि मोजमाप यांचा योग्य वापर शिकणे
विटा लावणे, भिंत उचलणे, प्लॅस्टर करणे या मूलभूत टप्प्यांवर कौशल्य मिळवणे
बांधकामासाठी आवश्यक उपकरणांची ओळख करणे
सुरक्षित आणि दर्जेदार बांधकाम कसे करावे हे जाणून घेणे
साहित्य :
ACC
केमिकल
थापी , घमेल
कळंबा स्पिरिट
लाईन दोरी
फक्की, मोजपट्टी, हातोडा इत्यादी
कृती :
सर्वप्रथम गेस्ट हाऊसचा संपूर्ण प्लॅन काढण्यात आला. त्यामध्ये भिंतींची रचना, दारे-खिडक्या, बाथरूमची जागा इत्यादींचा समावेश होता.प्लॅननुसार जागेवर फक्कीने अचूक आखणी (Marking) करण्यात आली. गेस्ट हाऊसच्या बेसलाइनसाठी मजुरांकडून विटांची सरळ लाईन लावण्यात आली.
कळंबा स्पिरिट व लाईन दोरी वापरून भिंती सरळ आणि समतोल ठेवत विटा रचण्यात आल्या.ज्या जागी खिडक्या आणि दारे बसवायची होती, तेथे आवश्यक जागा सोडण्यात आली.भिंती निर्धारित उंचीपर्यंत उचलण्यात आल्या.
कॉस्टिंग :
| अ. क्र. | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | ACC | 1600 | 80 | 1,28,000 |
| 2 | केमिकल | 23 | 500 | 11,500 |
| 3 | मजुरी [25%] | 34,875 | ||
| total | 174,375 |
निरीक्षण :
मार्किंग अचूक झाल्यास संपूर्ण बांधकाम व्यवस्थित होते.
भिंतींची उंची वाढवताना लाईन दोरी अत्यंत आवश्यक ठरली.
कळंबा स्पिरिटमुळे भिंत एकदम सरळ व संतुलित राहिली.
ग्रीलच्या आकारानुसार वेल्डिंगची गुणवत्ता बदलते हे लक्षात आले.
प्लॅस्टरची फिनिशिंग भिंतींच्या दिसण्यावर परिणाम करते.
निष्कर्ष :
गेस्ट हाऊस बांधकाम प्रक्रियेमुळे आम्हाला प्रत्यक्ष बांधकामाची सर्व टप्प्यांमधील अचूकता आणि कौशल्य शिकायला मिळाले. मार्किंग, विटांची रचना, लेव्हल तपासणे, या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या प्रकल्पामुळे आम्ही बांधकामाचे तांत्रिक ज्ञान तसेच कौशल्य आत्मसात केले.
भविष्यातील उपयोग :
गवंडी आणि बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी अनुभव उपयुक्त
मोठ्या इमारती, घर, शेड किंवा ऑफिस बांधकामासाठी बेसिक कौशल्य विकसित होते
ग्रील बनवणे, प्लॅस्टर करणे याची स्वतंत्र कामेही करू शकतो
बांधकामातील अचूकता व सुरक्षा याबद्दल चांगले ज्ञान मिळाले
मी हे शिकलो :
डिझाईनपासून रंगकामापर्यंत टेनी हाऊस तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजली.
अचूक मोजमाप, साधनांचा योग्य वापर आणि टीमवर्कचे महत्त्व कळले.
प्रकल्प करताना नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारी यांचे मूल्य शिकता आले.
छोट्या जागेत कार्यक्षम आणि आकर्षक घर कसे उभारता येते हे प्रत्यक्ष अनुभवले.


ग्रील
प्रस्तावना :
गेस्ट हाऊसच्या सुरक्षिततेसाठी आणि मजबूत बांधकामासाठी ग्रील बसवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पात आम्ही तीन वेगवेगळ्या मापांचे ग्रील मोजून, त्यांचे कॉस्टिंग करून, आवश्यक साहित्य खरेदी करून स्वतः ग्रील तयार केले. या प्रक्रियेत वेल्डिंग, ग्राइंडिंग, मोजमाप, फ्रेम तयार करणे, रेडॉक्साईड व पेंटिंग यासारखी कौशल्ये प्रत्यक्ष शिकण्याची आणि वापरण्याची संधी मिळाली.
सर्वे:
. सर्वात प्रथम गेस्ट हाऊसच्या खिडक्यांचे मोजमाप घेतले असता खालीलप्रमाणे तीन वेगवेगळ्या आकाराच्या ग्रीलची आवश्यकता असल्याचे आढळले:
पहिली ग्रील: 6 ‘× 5’
दुसरी ग्रील: 4 ‘ × 7’
तिसरी ग्रील: 2′ × 20″
मोजमापांच्या आधारे कॉस्टिंग केले व त्याप्रमाणे साहित्य खरेदी करण्यात आले.
उद्देश:
गेस्ट हाऊससाठी आवश्यक त्या आकाराच्या मजबूत ग्रील तयार करणे* गेस्ट हाऊसला सुरक्षा प्रदान करणे* धातू काम, वेल्डिंग, ग्राइंडिंग आणि फ्रेम फॅब्रिकेशन या कौशल्यांचा विकास करणे कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचे ग्रील तयार करणे
साहित्य:
. 30×3 L-angle
2×2 स्क्वेअर जाळी
10×10 स्क्वेअर बार
वेल्डिंग रॉड
ग्राइंडिंग डिस्क
Red oxide प्राइमर
काळा ऑइल पेंट
कृती:
. सर्व खिडक्यांचे अचूक मोजमाप घेतले. तीन वेगवेगळ्या मापांच्या ग्रीलची कॉस्टिंग केली व साहित्य खरेदी केले.30×3 L-angleवापरून सर्व ग्रीलची फ्रेम तयार केली. ४×७ ग्रीलसाठी फ्रेममध्ये 2×2 जाळी बसवली. त्यावर 4 इंच अंतरावर आडवे 10×10 स्क्वेअर बार लावले.व चार उभे स्क्वेअर बार बसवले. सर्व बार व अँगलची वेल्डिंग करून मजबुती दिली.वेल्डिंगनंतर संपूर्ण ग्रीलला ग्राइंडिंग करून स्मूथ फिनिश दिली. भिंतीत बसवण्यासाठी 30×3 अँगलचे चार तुकडे जोडले. ग्रीलला प्रथम Red Oxide प्राइमर लावला. त्यानंतर काळा ऑइल पेंट लावून फिनिशिंग दिले.
आलेल्या अडचणी :
.तीन वेगवेगळ्या मापांमुळे प्रत्येक ग्रीलसाठी फ्रेम वेगळ्या प्रकारे मोजावी लागली.
स्क्वेअर बारचे अंतर अचूक ठेवणे वेळखाऊ ठरले.
वेल्डिंग केल्यानंतर जॉइंट्स स्मूथ करण्यासाठी जास्त ग्राइंडिंग करावी लागली.
मोठ्या ग्रीलला हलवणे व सरळ ठेवणे कठीण गेले.
कॉस्टिंग :
| अ. क्र. | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | 30X30x3 L angal | 210 kg | 70 | 14,700 |
| 2 | 10X10 [] BAR | 424 kg | 60 | 25,440 |
| 3 | 2X2 जाळी | [168] 2f | 22 | 3,696 |
| 4 | 30 x 3 पट्टी | 27 kg | 70 | 1,890 |
| 5 | रॉड पुडा | 3 | 400 | 1,200 |
| 6 | कटींग व्हिल | 20 | 25 | 500 |
| 7 | ग्रीडिंग व्हिल | 20 | 30 | 600 |
| 8 | पॉलिश व्हिल | 10 | 30 | 600 |
| 9 | कटींग व्हिल [14 in] | 2 | 200 | 400 |
| 10 | प्रायमर | 4 l | 240 | 960 |
| 11 | थीनर | 2 l | 120 | 240 |
| 12 | ब्रश | 4 | 40 | 160 |
| 13 | Electricity [10%] | 5,000 | ||
| 14 | मजुरी [15%] | 8,000 | ||
| 15 | TOTAL | 63,000 | ||
निरिक्षण :
सर्व ग्रील मजबूत व योग्य मापात तयार झाल्या. L-angle व स्क्वेअर बारच्या वापरामुळे ग्रीलची मजबुती खूप वाढली. पेंटिंगमुळे ग्रीलला आकर्षक मिळाले. संपूर्ण प्रक्रियेत मोजमाप अचूक ठेवणे सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे जाणवले.
निष्कर्ष :
.प्रकल्पातून आम्हाला ग्रील फॅब्रिकेशनचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले. वेल्डिंग, ग्राइंडिंग, फ्रेम तयार करणे, प्राइमिंग आणि पेंटिंग या सर्व कामांचे चांगले ज्ञान झाले. गेस्ट हाऊससाठी आवश्यक असलेल्या सर्व ग्रील्स यशस्वीरीत्या तयार करण्यात आल्या आणि कमी खर्चात उच्च गुणवत्ता मिळवली.
भविष्यातील उपयोग :
पुढील काळात अशाच प्रकारचे ग्रील, दरवाजे, फेन्सिंग किंवा खिडकी संरचना तयार करता येतील. या कौशल्याचा वापर करून स्वतंत्र काम किंवा व्यवसाय सुरू करता येईल.


कॉट तयार करणे
प्रस्तावना :
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक असा लोखंडी कोट (Cot) तयार करणे हा होता. कोटचे डिझाईन, फ्रेम तयार करणे, ग्राइंडिंग, वेल्डिंग, रेडऑक्साईड आणि पेंटिंग अशा सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष करून मेटल फॅब्रिकेशनचे मूलभूत कौशल्य आत्मसात करण्याचा हेतू या प्रकल्पातून साध्य केला.
सर्वे :
बाजारात उपलब्ध मेटल ट्यूब्सची जाडी, प्रकार आणि गुणवत्ता
1×2 स्क्वेअर ट्यूब व 1×1 सपोर्ट ट्यूबची मजबुती
वेल्डिंग व ग्राइंडिंगसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता
रेडॉक्साईड आणि ऑइल पेंटच, टिकाऊपणा आणि किंमत
उद्देश:
या कॉट तयार करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश असा होता की गेस्ट हाऊससाठी वापरता येईल असा मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी लोखंडी कॉट तयार करणे.
गेस्ट हाऊस मध्ये अधिक वापर व वजन सहन करणारे फर्निचर आवश्यक असते, त्यामुळे लोखंडी स्क्वेअर ट्यूबचा वापर करून मजबुतीला प्राधान्य देण्यात आले.
गेस्ट हाऊसच्या सोयीसाठी दीर्घकाळ टिकणारे, कमी देखभालीचे आणि सुरक्षित फर्निचर तयार करणे हाच या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.
साहित्य:
1” x 2” स्क्वेअर ट्यूब
1” x 1” स्क्वेअर ट्यूब
0.75″ x 0.75″ स्क्वेअर ट्यूब
वेल्डिंग रॉड
ग्राइंडिंग डिस्क
पॉलिश व्हील
रेडऑक्साईड प्रायमर
काळा ऑइल पेंट
पॉलिश पेपर
लंबी
कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन
कृती:
सर्वप्रथम कोटचे पूर्ण डिझाईन तयार करण्यात आले.
माप, फ्रेमचे स्वरूप आणि सपोर्टचे स्थान निश्चित केले.
1×2 स्क्वेअर ट्यूब वापरून वरची मुख्य फ्रेम तयार केली.
कोपऱ्यांवर अचूक जॉइंट तयार करून वेल्डिंग केले.
फ्रेमच्या मजबुतीसाठी 1×1 च्या एकूण 2 सपोर्ट तुकड्या बसवल्या.
सर्व तुकडे समान अंतरावर बसवण्यात आले.संपूर्ण फ्रेम ग्राइंडिंग करून वेल्डिंग जॉइंट्स स्वच्छ आणि गुळगुळीत केले.
15 इंच लांबीचे 1.5×1.5 च्या ट्यूबचे पाय बसवले.
पायांना वेल्डिंग करून नंतर ग्राइंडिंग केले
.संपूर्ण कोटला पॉलिश व्हीलने पॉलिश केले.
फ्रेमला गंज रोखण्यासाठी रेडऑक्साईड लावला.
रेडऑक्साईड सुकल्यावर जोईंट लंबी लावली त्यानंतर पॉलिश पेपरने घासले.
शेवटी कोटला काळा ऑइल पेंट लावून अंतिम फिनिशिंग दिले.
आलेल्या अडचणी :
1×1 सपोर्ट तुकड्यांचे मोजमाप अचूक ठेवणे
वेल्डिंग करताना ट्यूब सरळ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागली
ग्राइंडिंग करताना सरफेस पूर्ण सपाट आणण्यासाठी जास्त वेळ लागला
रेडॉक्साईड सुकण्यास उशीर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया थोडी उशीर झाली
पाय (Legs) व फ्रेम एकाच लेव्हलवर आणणे आव्हानात्मक होते
कॉस्टिंग :
| अ . क्र | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | 0.75 x 0.75 स्क्वेअर ट्यूब | 20′ | 25 | 500 |
| 2 | 1 x 2 स्क्वेअर ट्यूब | 360′ | 30 | 10,800 |
| 3 | 1 x 1स्क्वेअर ट्यूब | 100′ | 35 | 3,500 |
| 4 | 1/2 x 1/2 स्क्वेअर ट्यूब | 100′ | 40 | 4,000 |
| 5 | रॉड पुडा | 2 | 400 | 800 |
| 6 | कटींग व्हिल | 5 | 25 | 125 |
| 7 | ग्रीडिंग व्हिल | 5 | 30 | 150 |
| 8 | पॉलिश व्हिल | 3 | 30 | 150 |
| 9 | कटींग व्हिल [14 in] | 1 | 200 | 200 |
| 10 | लंबी | 2 kg | 500 | 1000 |
| 11 | प्रायमर | 2 L | 240 | 480 |
| 12 | थीनर | 2 L | 120 | 240 |
| 13 | काळा ऑईल पेंट | 2 L | 340 | 680 |
| 14 | रोलर | 1 | 50 | 50 |
| 15 | Electricity [10%] | 2,270 | ||
| 16 | मजुरी [15%] | 3,400 | ||
| 17 | total | 28,350 |
निरिक्षण :
वेल्डिंग व ग्राइंडिंगने कोटची मजबुती आणि फिनिशिंग उत्कृष्ट आली.
सर्व सपोर्ट तुकडे योग्य वापरल्यामुळे फ्रेमला मजबूत आधार मिळाला.
रेडऑक्साईडमुळे धातूचे गंजापासून संरक्षण झाले.
काळ्या पेंटमुळे कोट आकर्षक आणि टिकाऊ झाला.
निष्कर्ष :
या प्रकल्पातून मेटल फॅब्रिकेशनचे महत्त्वाचे कौशल्य — डिझाइनिंग, कटिंग, वेल्डिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंग यांचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून एक मजबूत व दर्जेदार लोखंडी कोट तयार करण्यात आला.
भविष्यातील उपयोग :
घरगुती व हॉस्टेल वापरासाठी टिकाऊ कोट
कस्टम फर्निचर डिझाईनसाठी आधारभूत कौशल्य
विविध आकारमानाचे लोखंडी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी तांत्रिक ज्ञान

