छत्री

प्रस्तावना :

या प्रकल्पात आम्ही फोल्डिंग छत्री तयार केली. ही छत्री तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे पाहुण्यांसाठी बसण्याची आणि सावलीची सोय करणे. कॅम्पर मध्ये योग्य जागा पाहून, छत्री बसवण्याची जागा ठरवली.

या कामात आम्ही वेल्डिंग, कटिंग, पॉलिशिंग, भेंडी आणि पावडर कोटिंग या सारखी तांत्रिक कौशल्य शिकलो. छत्री बनवताना सौंदर्य आणि उपयोग या दोन्ही गोष्टींचा विचार केला. भविष्यात ही छत्री पावण्यासाठी विश्रांतीची जागा म्हणून वापरली जाईल.

सर्वे :

विविध जागेचे निरीक्षण केले कॅम्पस मध्ये आणि छत्री कुठे लावाची मला त्याची जागा नेमली.

उद्धेश :

छत्री तयार करण्या मागचा कारण आहे होत कि जे पाहुणे येतील त्यांच्या साठी ऐक बसायची जागा व ऐखाद ठिकाण दाखवणे होय.

साहित्य :

ट्यूब

25×5

35×5

100×100

पट्टी

30×5

25×5

कृती :

कटिंग – आवश्यक मोजमापनानुसार कच्चामाल अचूक यंत्राद्वारे कट करणे

वेल्डिंग – वापरलेल्या पार्ट्स योग्य कोण व मापात वेल्डिंग द्वारे जोडणे

पॉलिशिंग – पृष्ठभागाला आकर्षक व चमकदार फिनिशिंग देण्यासाठी पॉलिशिंग

ग्राइंडिंग – वेल्डिंग जॉन्स व पृष्ठभाग गुलगुलीत करण्यासाठी ग्राइंडिंग करणे

पावडर कोटिंग – धातूचे संरक्षण व सुंदर लोक देण्यासाठी पावडर कोटिंग प्रक्रिया

असेंबलीग – सर्व तयार पार्ट्स एकत्र करून अंतिम उत्पादन तयार करणे

तपासणी – तयार उत्पादनाची मोजमापे फिनिशिंग व गुणवत्ता तपासणे

सिपिएम चार्ट

कामवेळ
थ्रीडी डिझाईन केले8 तास
साहित्य आणले3 तास
मेजरमेंट घेतले8 तास
पार्ट कटिंग अँड वेल्डिंग8 तास
पार्ट पॉलिशिंग अँड ग्राइंडिंग6 तास
पावडर कोटिंग8 तास
छत्री बसवणे3 तास
प्लाजमा कटिंग2 तास
एकूण6 दिवस

मी हे शिकलो :

RK वेल्डिंग मारायला शिकलो, co2वेल्डिंग मारायला शिकलो. RK वेल्डिंग मारायला शिकलो, co2 वेल्डिंग मारायला शिकलो, पावडर कोटिंग करायला शिकलो, ग्राइंडिंग व कटिंग शिकलो.

निरीक्षण :

छत्री कुठे लावायची कुठे छान दिसेल व किती हाईट वर असली पाहिजे यांचे निरीक्षण केले, व तिकडे किती साफसफाई करायची आणि काय केल्यामुळे आकर्षण होईल यांचे निरीक्षण केले

निष्कर्ष :

आणि मग शेवट निर्णय घेतला की डोम समोरील जागा निवडण्याची व त्यापुढे आकर्षण करण्याची

भविष्यातील उपयोग :

भविष्यात त्या छत्रीच्या सावलीमध्ये पाहुणे किंवा मुलं मुली बसायची व्यवस्था होईल हा यांचा भविष्यातील उपयोग आहे

कॉस्टिंग

क्र.मालाचे नावएकूण मालादरएकूण किंमत
11*1 ट्यूब60 F352100
240*5 पट्टी5 F30150
340*40 ट्यूब12 F45540
4100*100 ट्यूब13 F1501950
525*5 पटी6 F25150
64*4 प्लेट2150300
76*6 प्लेट2250500
830/10 नटबोल्ट2 Kg100200
9वाईअर500 G5050
10ब्रश250100
11फ्लॅन्स2150300
12रोलर250100
13गॉलीज पेपर51575
14रेडऑक्साईड1 L230230
15ऑइल पेंट ब्लॅक1 L300300
16सिमेंट1 गोणी350350
17ब्रश70 चमेली8480
18खडी15 चमेली9150
19रोल4100400
20थिनर0.5 L10050
21पावडर कोटिंग800
22मजुरी2318
Total11593

डोम रिनवेषण

आम्ही डोममध्ये सर्व नवीन काहीतरी करायचा ठरवलेला प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमधून आश्रमातील विविध कार्य व करियकलाप लोकांना सोमर दिसून यावेत, असा आमचा उद्देश आहे. हे सादरीकरण साध्या पद्धतीने न करता, वारली चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा आमचा विचार आहे, ज्यामुळे परंपरिक कलात्मकता राहील आणि आधुनिकतेसह एक आगलावेगळा संगम साधता येईल.

दोन मध्ये काय व कसे करायचे यासाठी प्रथम 3D डिझाईन तयार केली. लागणारे साहित्य निश्चित करून गावात जाऊन आणले. जागेची पाहणी व मोजमापन करून सर्वे केला.

डोम रिणवेशन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की आश्रमातील मुलांसाठी एक चहा पिण्याची जागा तसेच आश्रमात बसण्यासाठी योग्य ठिकाण तयार करणे. या जागेमुळे मुलांना एकत्र येऊन गप्पा मारता येतील, विश्रांती घेता येईल आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी एक अनुकूल वातावरण मिळेल.

स्क्रॅपर

पुट्टी

ट्रॅक्टर इमलेशन

प्रायमर

डिस्टेंपर

सिमेंट कलर

काला ऑइल पेंट

सिमेंट कच

पोलीस पेपर (सोफ्ट व हार्ड )

बाहेरून रंग केला, आत वारली चित्रकला केले, खांबाला काला ऑइल पेंट लावला. बाहेर भिंत बांधली, झाडांच्या फांद्या कापल्या, पाणी जाण्यासाठी भोक पाडले आणि पन्हाळी साठी हिरवा प्लास्टिक पाईप लावला.

कामवेळ
साफसफाई2 तास
मापन2 तास
साहित्य आणणे2 तास
भिंत बांधणी5 तास
पुट्टी भरणे3 तास
डोमला कलर लावणे16तास
झाडाची कटिंग2तास
लोखंडी पाईप घासणे1 तास
लोखंडी पाईपला ऑइल पेंट लावणे8 तास
एकूण6 दिवस

बाहेरचा रंग कोणता वापरायचा आणि तो छान दिसेल का, आजचा रंग कसा द्यायचा, वारली चित्रकला काढावी का, घर कमी खर्चात टिकाऊ कसे करावे हे सर्व विचार करून निरीक्षण केले.

बाहेरच्या रंगासाठी असे रंग निवडावेत जे आकर्षक दिसतात आणि हवामानापासून टिकतात

आत मधल्या भिंतीवर हलका रंग वापरावा आणि वारली चित्रकला करून पारंपरिक सौंदर्य जोपासावे

घर कमी खर्चात टिकाऊ बनवण्यासाठी साहित्यांची योग्य निवड, मोजमापन, आणि योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे

पाणी जाण्यासाठी सोय आणि प्रणालीसाठी प्लास्टिक पाईप यासारख्या सूक्ष्म बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे

डोम रिणवेशनमुळे मुलांना विश्रांती, गप्पा मारणे आणि एकत्र बसण्याची जागा मिळेल. तसेच या जागेचा उपयोग छोटे कार्यक्रम, अभ्यास किंवा क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी साठी करता येईल.

मी हे शिकलो :

कलर मारायला शिकलो

वारली चित्र कसे काढायचे हे शिकलो

भिंत बांधायला शिकलो

सिमेंटचे प्रमाण कसे असते ते शिकलो

1 लास्ट साठी 1 : 3

बांधकामासाठी 1 : 6

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1.डिस्टेंपर10 L140 L1400
2.ट्रॅक्टर इमल्शन [प्रायमर]10 L70 L700
3.पॉलिश पेपर10 L15150
4.रेडीमेड बाईंड1 L230230
5.ब्लॅक ऑईल पेंट1 L300300
6.सिमेंट कलर15 Kg30450
7.टर्पेंटाईन1 L120120
8.पुट्टी5 Kg50250
9.पीव्हीसी पाइप (हिरवा)22 F1363000
10.सिमेंट50 गोणी350350
11.कच70 चमेली8480
12.ब्रश830240
13.रोलर250100
14.सिमेंट कलर (विटकरी)3 Kg3090
15.रूळ15 चमेली9150
16.मजुरी  2000
   Total10010

टाईनी हाऊस

आजच्या वेगवान जीवनशैलीत व वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची कमतरता भासत आहे. मोठ्या घरांच्या तुलनेत लहान, किफायतशीर व पर्यावरण पूरक घरांची संकल्पना पुढे येत आहे. त्याला टायनी हाऊस असे म्हणतात

या प्रकल्पामध्ये आम्ही 10 फुट × 10 फुट क्षेत्रफळाचे टायनी हाऊस डिझाईन केली आहे.

कमी खर्चात व कमी जागेत आवश्यक सोयी उपलब्ध करून देणारा घर म्हणजे टायनी हाऊस

या प्रकल्पात आम्ही 10×10 फुट टायनी हाऊस डिझाईन केली आहे

यात-

स्वयंपाक घर

हॉल

स्नानगृह व संचालक

कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग करणे

कमी पैशात जास्त जागेचा वापर करणे

स्वस्त व किफायतशीर घर उपलब्ध करून देणे

किचन, हॉल व बाथरूम यासारख्या मूलभूत सुविधा समाविष्ट करणे

पर्यावरण पूरक व टिकाऊ बांधकाम करणे

ग्रामीण व शहरी भागातून ग्रह समस्या कमी करणे

1.5 × 1.5 इंच ट्यूब

सिलिंग शीट ( PUC ) छतासाठी

भिंत शीट ( सिमेंट शीट ) भिंतीसाठी

नट व बोल्ट – जॉईट्स व जोडण्यासाठी

सिमेंट प्लायवूड – मजल्यासाठी व आतील कामासाठी

बाथरूम साहित्य –

नळ

कमोड ( कमोड / शौचालय सीट )

बेसिन ( हात धुण्याचे बेसिन )

काली वायर 1.5 mm/ 2.5

हिरवी वायर 1.5 mm/ 2.5

लाल वायर 1.5 mm/ 2.5

फ्रेम तयार करणे

1.5 × 1.5 इंच ट्यूब वापरून चौकट ( Frame ) तयार करणे

नट – बोल्टच्या साह्याने जोडणी करणे

भिंती व छत बसवणे

भिंतीसाठी सिमेंट शीट लावणे

छतासाठी PUC शीट बसवणे

वायरिंग केली व बोर्ड भरले आणि, वायम साठी वायरिंग पाईप लावणे

नळ ( Tap ) बसवणे

कमोड ( Toilet Seat ) बसवणे

बेसिन ( Wash Basin ) बसवणे

टायनी हाऊस प्रकल्पामध्ये कमी जागेत व कमी करतात किचन, हॉल व बाजूने आवश्यक सोयी उपलब्ध होतात

साहित्यांचा योग्य वापर करून घर मजबूर, टिकाऊ पर्यावरण पूरक बनले आहे

10×10 खूप टायनी हाऊस कमी खर्चात, कमी जागेत वर टिकाऊ साहित्य वापरून बांधता येते.

यामध्ये सर्व मूलभूत सुविधा मिळवून हे घर की किफायतशीर व उपयोग ठरते

टायबे हाऊस संकल्पना भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील गृह समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो

हे घर पोर्टेबल, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असल्याने विद्यार्थ्यांसाठी, प्रवाशांसाठी व लहान कुटुंबासाठी उपयोगी आहे

वायरिंग कसे करायचे ते शिकलो

PUC सिलिंग लावायला शिकलो

स्टाइल्स बसवायला शिकलो

प्लंबिंग शिकलो

दरवाजा आणि खिडकीची फ्रेम बनवायला शिकलो

पेंटिंग कसे करायचे ते शिकलो

थापेवाडी शेड

घरासमोरील मोकळ्या जागेचा योग्य वापर करून बसण्यासाठी, वाहन ठेवण्यासाठी व पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून शेड तयार करण्याचा विचार करण्यात आला

ठिकाणाची निवड: सपाट, निचरा असलेली, वारा व सूर्यप्रकाश योग्य असा भाग निवडणे.

जमिनीचे मोजमाप: क्षेत्रफळ मोजणे (मीटर/फूट मध्ये).

दिशा ठरवणे: शेडची दिशा (पूर्व-पश्चिम / उत्तर-दक्षिण) हवामानानुसार ठरवणे

घरासमोरील मोकळी जागा छायेअंतर्गत बसण्याची व विश्रांती घेण्याची सोयीची बनवणे.घरासमोरील साफसफाई आणि जमिनीचा हानीकारक परिणाम कमी करणे; परिसराचे उपयोगिता वाढविणे

2″x2″ ट्यूब I-Channel (30 फूट)

1″x3″ ट्यूब वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग व्हील पत्रे (16 फूटी)

कोटिंग / पेंट स्क्रू / बोल्ट-नट

फाउंडेशन मटेरियल – सिमेंट, वाळू, खडी (खांबांसाठी बेस)

आय चॅनल खांब उभारणे,शिडी तयार करणे,मापन करणे,

पत्रे लावणे,स्क्रू मारणे.

सेफ्टी साठी आडवा पत्रा बसवणे

कामवेळ
निरीक्षण१ तास
साहित्य आणले3 तास
मेजरमेंट घेतले2 तास
पार्ट कटिंग अँड वेल्डिंग8 तास
पार्ट पॉलिशिंग अँड ग्राइंडिंग4 तास
कलर५ तास
बसवणे3 तास
पत्र लावणे2 तास
एकूण२८ तास

संपूर्ण शेडचे मापन, जोड, वेल्डिंग व सुरक्षा बाबींचे प्रत्यक्ष निरीक्षण करून कामाची गुणवत्ता निश्चित केली

या कामात आय चॅनलचे खांब उभे केले, शिडी तयार केली, मोजमाप करून पत्रे बसवली व स्क्रूने घट्ट केली. सेफ्टीसाठी एक आडवा पत्रा लावून काम सुरक्षित व मजबूत बनवले. या प्रक्रियेतून मापन, बसवणी व सुरक्षा यांचे महत्त्व समजले.

हे काम भविष्यात टिकाऊ, सुरक्षित व मजबूत रचना तयार करण्यास मदत करेल.
यामुळे वेळ, पैसा व मजुरीची बचत होईल आणि बांधकामाची गुणवत्ता वाढेल.

या कामातून मी आय चॅनल बसवणे, शिडी तयार करणे, मोजमाप घेणे, पत्रे लावणे व स्क्रूने फिटिंग करणे हे शिकलो. तसेच सेफ्टीसाठी योग्य आधार देणे किती महत्त्वाचे आहे हेही समजले.

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1.2×2 ट्यूब220 फूट8108910
2.पत्रा 16 फूट10192019200
3.IBM 11×235फूट602112
4.1.5×32850
5.ढापा पत्रा450
6.सिमेंट10kg770
7.वेल्डिंग रॉड2 पुडा400800
8.खडी3kg2675
9.स्क्रू450
10.प्रायमर1लिटर120120
11.ऑइल पेंट1लिटर230230
12.थिनर1लिटर120120
13.ब्रश23060
14.रोलर23060
15.Electricity [10%]3538
16.मजुरी [15%]  5308
  total 44200

I B T टेबल

प्रस्तावना

स्वयंपूर्ण पद्धतीने मजबूत व टिकाऊ स्ट्रक्चर तयार करण्यासाठी लोखंडी ट्यूब, अँगल, प्लायवुड, स्टील पत्रा तसेच सन्माईका वापरून एक युनिट/फ्रेम तयार करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये कटिंग, वेल्डिंग, फिनिशिंग व पेंटिंग हे काम करण्यात आले.

उद्देश

वापरासाठी उपयुक्त व मजबूत स्ट्रक्चर तयार करणे.

लोखंडी काम, वेल्डिंग, फिनिशिंग आणि पेंटिंग या कौशल्यांचा सराव व प्रत्यक्ष अनुभव घेणे.

साहित्य

1.5 x 1.5 ची ट्यूब

35 x 5 चा अँगल

4 x 8 चा प्लायवुड

सन्माईका

पंचिंग जाळी

रेड ऑक्साइड

बॉटम पट्टी

ऑइल पेंट

4 x 8 चा स्टील पत्रा

स्क्रू 2.5 इंच

रोलर 2 इंच – 2 नग

ब्रश 2 इंच – 2 नग

14 इंच व्हील – 1 नग

ग्रॅण्डिंग व्हील – 5 नग

कटिंग व्हील – 10 नग

पॉलिश व्हील – 5 नग

वेल्डिंग रॉड – 1 पुडा

कृती

आवश्यक मोजमाप घेऊन 1.5×1.5 ट्यूब व 35×5 अँगल कट केले.

फ्रेमचा आकार बनवत वेल्डिंग करून स्ट्रक्चर तयार केले.

जॉइंट ग्रॅण्डिंग करून सपाट केले.

4×8 स्टील पत्रा फिट केला व पंचिंग जाळी लावली.

प्लायवुड व सन्माईका शीट आकारानुसार कापून बसवली.

रेड ऑक्साइड कोटिंग करून फिनिशिंग दिली.

नंतर ऑइल पेंट रोलर व ब्रशने लावले.

बॉटम पट्टी, व्हील व स्क्रू बसवून पूर्ण तयार केले.

शेवटी पॉलिश व्हीलने स्मूथ फिनिश केली.

C P M चार्ट

कामवेळ
टिग वेल्डिंग4 तास
स्क्रू मारणे2 तास
प्लायवुड लावणे4 तास
वेल्डिंग16 तास
ड्रॉईंग2 तास
साहित्य आणले5 तास
मेजरमेंट घेणे3 तास
पार्ट कटिंग अँड वेल्डिंग18 तास
सन्माईक लावणे2 तास
पार्ट पॉलिशिंग अँड ग्राइंडिंग18 तास
कलर करणे8 तास
बेसिन बसवणे4 तास
पत्रा लावणे4 तास
एकूण80 तास

निरीक्षण

योग्य मोजमाप व कटिंग केल्यास स्ट्रक्चर अचूक व मजबूत होते.

रेड ऑक्साइड लावल्याने गंज रोखला जातो.

वेल्डिंग नंतर ग्रॅण्डिंग केल्यास फिनिशिंग आकर्षक मिळते.

व्हील बसवल्याने युनिट सहज हलवता येते.

निष्कर्ष

उत्तम नियोजन, योग्य साहित्य व कौशल्य वापरल्याने मजबूत आणि टिकाऊ स्ट्रक्चर तयार करता येते. फिनिशिंग व्यवस्थित केल्यास उत्पादनाचा दर्जा अधिक चांगला दिसतो


मी हे शिकलो

मोजमाप घेणे, कटिंग आणि वेल्डिंगची योग्य पद्धत.

पेंट व फिनिशिंगचे महत्त्व.

औद्योगिक साहित्य वापर कौशल्य.

कामातील सुरक्षितता आणि गुणवत्ता नियंत्रण.

भविष्यातील उपयोग्

घरगुती किंवा औद्योगिक वापरासाठी अशा प्रकारच्या युनिट्स/टेबल्स/रॅक तयार करता येतील.

कस्टम फर्निचर व्यवसायात उपयोग होऊ शकतो.

वेल्डिंग व फॅब्रिकेशन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात

बांधकाम

प्रस्तावना

गेस्ट हाऊस बांधकाम हा एक महत्वाचा प्रकल्प असून त्यामध्ये जागेची आखणी, विटांची मांडणी, भिंतींची उंची, खिडक्या–दरवाज्यांची जागा .या सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करावी लागते. या प्रकल्पाद्वारे आम्ही प्रत्यक्ष बांधकाम कसे करायचे, कोणते साधन कसे वापरायचे आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता कशी राखायची हे शिकून घेतले.

सर्वे

बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेचा सखोल सर्वे करण्यात आला.

जागेचे मोजमाप घेण्यात आले.

गेस्ट हाउसची दिशा, वारा–तापमान याचा विचार करण्यात आला.

  या सर्वेच्या आधारे अंतिम प्लॅन आणि मोजमाप निश्चित करून चौकट तयार करण्यात आली.

उदेश

गेस्ट हाऊसचा बांधकाम कार्य प्रत्यक्ष अनुभवणे

मार्किंग, प्लॅनिंग आणि मोजमाप यांचा योग्य वापर शिकणे

विटा लावणे, भिंत उचलणे, प्लॅस्टर करणे या मूलभूत टप्प्यांवर कौशल्य मिळवणे

बांधकामासाठी आवश्यक उपकरणांची ओळख करणे

सुरक्षित आणि दर्जेदार बांधकाम कसे करावे हे जाणून घेणे

साहित्य

ACC  

केमिकल 

थापी , घमेल

कळंबा स्पिरिट

लाईन दोरी

फक्की, मोजपट्टी, हातोडा इत्यादी

कृती

सर्वप्रथम गेस्ट हाऊसचा संपूर्ण प्लॅन काढण्यात आला. त्यामध्ये भिंतींची रचना, दारे-खिडक्या, बाथरूमची जागा इत्यादींचा समावेश होता.प्लॅननुसार जागेवर फक्कीने अचूक आखणी (Marking) करण्यात आली. गेस्ट हाऊसच्या बेसलाइनसाठी मजुरांकडून विटांची सरळ लाईन लावण्यात आली.

कळंबा स्पिरिट व लाईन दोरी वापरून भिंती सरळ आणि समतोल ठेवत विटा रचण्यात आल्या.ज्या जागी खिडक्या आणि दारे बसवायची होती, तेथे आवश्यक जागा सोडण्यात आली.भिंती निर्धारित उंचीपर्यंत उचलण्यात आल्या.

costing

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1ACC  1600801,28,000
2केमिकल 2350011,500
3मजुरी  [25%]34,875
total174,375

निरीक्षण

मार्किंग अचूक झाल्यास संपूर्ण बांधकाम व्यवस्थित होते.

भिंतींची उंची वाढवताना लाईन दोरी अत्यंत आवश्यक ठरली.

कळंबा स्पिरिटमुळे भिंत एकदम सरळ व संतुलित राहिली.

ग्रीलच्या आकारानुसार वेल्डिंगची गुणवत्ता बदलते हे लक्षात आले.

प्लॅस्टरची फिनिशिंग भिंतींच्या दिसण्यावर परिणाम करते.

निष्कर्ष

गेस्ट हाऊस बांधकाम प्रक्रियेमुळे आम्हाला प्रत्यक्ष बांधकामाची सर्व टप्प्यांमधील अचूकता आणि कौशल्य शिकायला मिळाले. मार्किंग, विटांची रचना, लेव्हल तपासणे, या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या प्रकल्पामुळे आम्ही बांधकामाचे तांत्रिक ज्ञान तसेच कौशल्य आत्मसात केले.

भविष्यातील उपयोग्

गवंडी आणि बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी अनुभव उपयुक्त

मोठ्या इमारती, घर, शेड किंवा ऑफिस बांधकामासाठी बेसिक कौशल्य विकसित होते

ग्रील बनवणे, प्लॅस्टर करणे याची स्वतंत्र कामेही करू शकतो

बांधकामातील अचूकता व सुरक्षा याबद्दल चांगले ज्ञान मिळाले

मी ही शिकलो

डिझाईनपासून रंगकामापर्यंत टेनी हाऊस तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजली.

अचूक मोजमाप, साधनांचा योग्य वापर आणि टीमवर्कचे महत्त्व कळले.

प्रकल्प करताना नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारी यांचे मूल्य शिकता आले.

छोट्या जागेत कार्यक्षम आणि आकर्षक घर कसे उभारता येते हे प्रत्यक्ष अनुभवले.

ग्रील 

प्रस्तावना

गेस्ट हाऊसच्या सुरक्षिततेसाठी आणि मजबूत बांधकामासाठी ग्रील बसवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पात आम्ही तीन वेगवेगळ्या मापांचे ग्रील मोजून, त्यांचे कॉस्टिंग करून, आवश्यक साहित्य खरेदी करून स्वतः ग्रील तयार केले. या प्रक्रियेत वेल्डिंग, ग्राइंडिंग, मोजमाप, फ्रेम तयार करणे, रेडॉक्साईड व पेंटिंग यासारखी कौशल्ये प्रत्यक्ष शिकण्याची आणि वापरण्याची संधी मिळाली.

सर्वे

. सर्वात प्रथम गेस्ट हाऊसच्या खिडक्यांचे मोजमाप घेतले असता खालीलप्रमाणे तीन वेगवेगळ्या आकाराच्या ग्रीलची आवश्यकता असल्याचे आढळले:

पहिली ग्रील: 6 ‘× 5’

दुसरी ग्रील: 4 ‘ × 7’

तिसरी ग्रील: 2′ × 20″

मोजमापांच्या आधारे कॉस्टिंग केले व त्याप्रमाणे साहित्य खरेदी करण्यात आले.

उदेश

गेस्ट हाऊससाठी आवश्यक त्या आकाराच्या मजबूत ग्रील तयार करणे* गेस्ट हाऊसला सुरक्षा प्रदान करणे* धातू काम, वेल्डिंग, ग्राइंडिंग आणि फ्रेम फॅब्रिकेशन या कौशल्यांचा विकास करणे कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचे ग्रील तयार करणे

साहित्य

. 30×3 L-angle

2×2 स्क्वेअर जाळी

10×10 स्क्वेअर बार

वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग डिस्क

Red oxide प्राइमर

काळा ऑइल पेंट

कृती

. सर्व खिडक्यांचे अचूक मोजमाप घेतले. तीन वेगवेगळ्या मापांच्या ग्रीलची कॉस्टिंग केली व साहित्य खरेदी केले.30×3 L-angleवापरून सर्व ग्रीलची फ्रेम तयार केली. ४×७ ग्रीलसाठी फ्रेममध्ये 2×2 जाळी बसवली. त्यावर 4 इंच अंतरावर आडवे 10×10 स्क्वेअर बार लावले.व चार उभे स्क्वेअर बार बसवले. सर्व बार व अँगलची वेल्डिंग करून मजबुती दिली.वेल्डिंगनंतर संपूर्ण ग्रीलला ग्राइंडिंग करून स्मूथ फिनिश दिली. भिंतीत बसवण्यासाठी 30×3 अँगलचे चार तुकडे जोडले. ग्रीलला प्रथम Red Oxide प्राइमर लावला. त्यानंतर काळा ऑइल पेंट लावून फिनिशिंग दिले.

आलेल्या आडचणी

.तीन वेगवेगळ्या मापांमुळे प्रत्येक ग्रीलसाठी फ्रेम वेगळ्या प्रकारे मोजावी लागली.

स्क्वेअर बारचे अंतर अचूक ठेवणे वेळखाऊ ठरले.

वेल्डिंग केल्यानंतर जॉइंट्स स्मूथ करण्यासाठी जास्त ग्राइंडिंग करावी लागली.

मोठ्या ग्रीलला हलवणे व सरळ ठेवणे कठीण गेले.

costing

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
130X30x3 L angal210 kg7014,700
210X10 [] BAR424 kg6025,440
32X2 जाळी[168] 2f223,696
430 x 3 पट्टी27 kg701,890
5रॉड पुडा34001,200
6कटींग व्हिल2025500
7ग्रीडिंग व्हिल2030600
8पॉलिश व्हिल1030600
9कटींग व्हिल [14 in]2200400
10प्रायमर4 l240960
11थीनर2 l120240
12ब्रश440160
13Electricity [10%]5,000
14मजुरी [15%]8,000
15TOTAL63,000

निरीक्षण

सर्व ग्रील मजबूत व योग्य मापात तयार झाल्या. L-angle व स्क्वेअर बारच्या वापरामुळे ग्रीलची मजबुती खूप वाढली. पेंटिंगमुळे ग्रीलला आकर्षक मिळाले. संपूर्ण प्रक्रियेत मोजमाप अचूक ठेवणे सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे जाणवले.

निष्कर्ष

.प्रकल्पातून आम्हाला ग्रील फॅब्रिकेशनचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले. वेल्डिंग, ग्राइंडिंग, फ्रेम तयार करणे, प्राइमिंग आणि पेंटिंग या सर्व कामांचे चांगले ज्ञान झाले. गेस्ट हाऊससाठी आवश्यक असलेल्या सर्व ग्रील्स यशस्वीरीत्या तयार करण्यात आल्या आणि कमी खर्चात उच्च गुणवत्ता मिळवली.

भविष्यातील उपयोग्

पुढील काळात अशाच प्रकारचे ग्रील, दरवाजे, फेन्सिंग किंवा खिडकी संरचना तयार करता येतील. या कौशल्याचा वापर करून स्वतंत्र काम किंवा व्यवसाय सुरू करता येईल.

कॉट तयार करणे

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक असा लोखंडी कोट (Cot) तयार करणे हा होता. कोटचे डिझाईन, फ्रेम तयार करणे, ग्राइंडिंग, वेल्डिंग, रेडऑक्साईड आणि पेंटिंग अशा सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष करून मेटल फॅब्रिकेशनचे मूलभूत कौशल्य आत्मसात करण्याचा हेतू या प्रकल्पातून साध्य केला.

सर्वे

बाजारात उपलब्ध मेटल ट्यूब्सची जाडी, प्रकार आणि गुणवत्ता

1×2 स्क्वेअर ट्यूब व 1×1 सपोर्ट ट्यूबची मजबुती

वेल्डिंग व ग्राइंडिंगसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता

रेडॉक्साईड आणि ऑइल पेंटच, टिकाऊपणा आणि किंमत

उदेश

या कॉट तयार करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश असा होता की गेस्ट हाऊससाठी वापरता येईल असा मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी लोखंडी कॉट तयार करणे.
गेस्ट हाऊस मध्ये अधिक वापर व वजन सहन करणारे फर्निचर आवश्यक असते, त्यामुळे लोखंडी स्क्वेअर ट्यूबचा वापर करून मजबुतीला प्राधान्य देण्यात आले.
गेस्ट हाऊसच्या सोयीसाठी दीर्घकाळ टिकणारे, कमी देखभालीचे आणि सुरक्षित फर्निचर तयार करणे हाच या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.

साहित्य

1” x 2” स्क्वेअर ट्यूब

1” x 1” स्क्वेअर ट्यूब

0.75″ x 0.75″ स्क्वेअर ट्यूब

वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग डिस्क

पॉलिश व्हील

रेडऑक्साईड प्रायमर

काळा ऑइल पेंट

पॉलिश पेपर

लंबी

कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन

कृती

सर्वप्रथम कोटचे पूर्ण डिझाईन तयार करण्यात आले.

माप, फ्रेमचे स्वरूप आणि सपोर्टचे स्थान निश्चित केले.

1×2 स्क्वेअर ट्यूब वापरून वरची मुख्य फ्रेम तयार केली.

कोपऱ्यांवर अचूक जॉइंट तयार करून वेल्डिंग केले.

फ्रेमच्या मजबुतीसाठी 1×1 च्या एकूण 2 सपोर्ट तुकड्या बसवल्या.

सर्व तुकडे समान अंतरावर बसवण्यात आले.संपूर्ण फ्रेम ग्राइंडिंग करून वेल्डिंग जॉइंट्स स्वच्छ आणि गुळगुळीत केले.

15 इंच लांबीचे 1.5×1.5 च्या ट्यूबचे पाय बसवले.

पायांना वेल्डिंग करून नंतर ग्राइंडिंग केले

.संपूर्ण कोटला पॉलिश व्हीलने पॉलिश केले.

फ्रेमला गंज रोखण्यासाठी रेडऑक्साईड लावला.

रेडऑक्साईड सुकल्यावर जोईंट लंबी लावली त्यानंतर पॉलिश पेपरने घासले.

शेवटी कोटला काळा ऑइल पेंट लावून अंतिम फिनिशिंग दिले.

आलेल्या आडचणी

1×1 सपोर्ट तुकड्यांचे मोजमाप अचूक ठेवणे

वेल्डिंग करताना ट्यूब सरळ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागली

ग्राइंडिंग करताना सरफेस पूर्ण सपाट आणण्यासाठी जास्त वेळ लागला

रेडॉक्साईड सुकण्यास उशीर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया थोडी उशीर झाली

costing

अ . क्रमालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
10.75 x 0.75 स्क्वेअर ट्यूब20′25500
21 x 2 स्क्वेअर ट्यूब360′3010,800
31 x 1स्क्वेअर ट्यूब100′353,500
41/2 x 1/2 स्क्वेअर ट्यूब100′404,000
5रॉड पुडा2400800
6कटींग व्हिल525125
7ग्रीडिंग व्हिल530150
8पॉलिश व्हिल330150
9कटींग व्हिल [14 in]1200200
10लंबी2 kg5001000
11प्रायमर2 L240480
12थीनर2 L120240
13काळा ऑईल पेंट2 L340680
14रोलर15050
15Electricity [10%]2,270
16मजुरी [15%]3,400
17total28,350

3DDesign :

कृती

सर्वप्रथम कोटचे पूर्ण डिझाईन तयार करण्यात आले.

माप, फ्रेमचे स्वरूप आणि सपोर्टचे स्थान निश्चित केले.

1×2 स्क्वेअर ट्यूब वापरून वरची मुख्य फ्रेम तयार केली.

कोपऱ्यांवर अचूक जॉइंट तयार करून वेल्डिंग केले.

फ्रेमच्या मजबुतीसाठी 1×1 च्या एकूण 2 सपोर्ट तुकड्या बसवल्या.

सर्व तुकडे समान अंतरावर बसवण्यात आले.संपूर्ण फ्रेम ग्राइंडिंग करून वेल्डिंग जॉइंट्स स्वच्छ आणि गुळगुळीत केले.

15 इंच लांबीचे 1.5×1.5 च्या ट्यूबचे पाय बसवले.

पायांना वेल्डिंग करून नंतर ग्राइंडिंग केले

निरीक्षण

वेल्डिंग व ग्राइंडिंगने कोटची मजबुती आणि फिनिशिंग उत्कृष्ट आली.

सर्व सपोर्ट तुकडे योग्य वापरल्यामुळे फ्रेमला मजबूत आधार मिळाला.

रेडऑक्साईडमुळे धातूचे गंजापासून संरक्षण झाले.

काळ्या पेंटमुळे कोट आकर्षक आणि टिकाऊ झाला.

निष्कर्ष

या प्रकल्पातून मेटल फॅब्रिकेशनचे महत्त्वाचे कौशल्य — डिझाइनिंग, कटिंग, वेल्डिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंग यांचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून एक मजबूत व दर्जेदार लोखंडी कोट तयार करण्यात आला.

भविष्यातील उपयोग्

घरगुती व हॉस्टेल वापरासाठी टिकाऊ कोट

कस्टम फर्निचर डिझाईनसाठी आधारभूत कौशल्य

विविध आकारमानाचे लोखंडी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी तांत्रिक ज्ञान

भातजोडणी मशीन तयार करणे

भारत हा कृषीप्रधान देश असून भात हे प्रमुख अन्नधान्य आहे. भात काढणीनंतर त्यातील दाणे वेगळे करण्याच्या प्रक्रियेस भात झोडणी असे म्हणतात. झोडणीमुळे भाताचे दाणे काडापासून वेगळे होतात आणि पुढील प्रक्रिया करणे सोपे होते.


आम्ही आमच्या परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून भात झोडणीची माहिती घेतली. काही शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने झोडणी करतात, तर काहीजण यंत्राद्वारे झोडणी करतात. यामुळे वेळ, श्रम व खर्च यामध्ये फरक दिसून आला.


  • भात झोडणीची माहिती मिळवणे
  • पारंपरिक व यांत्रिक पद्धतींचा अभ्यास करणे
  • झोडणीचे महत्त्व समजून घेणे
  • शेतकऱ्यांचे श्रम कमी होण्यासाठी उपाय जाणून घेणे

  • कापलेली भाताची पिके
  • झोडणीसाठी मोकळी जागा
  • काठी / दगड (पारंपरिक पद्धतीसाठी)
  • भात झोडणी मशीन (यांत्रिक पद्धतीसाठी)
  • गोणपाट / ताडपत्री

प्रथम कापलेली भाताची पिके उन्हात वाळवली जातात.
पारंपरिक पद्धतीत भाताच्या पेंढ्या जमिनीवर आपटून किंवा काठीने मारून दाणे वेगळे केले जातात.
यांत्रिक पद्धतीत भात झोडणी मशीनमध्ये पिके टाकली जातात आणि मशीनद्वारे दाणे वेगळे होतात.


  • पारंपरिक पद्धतीत जास्त श्रम लागतात
  • वेळ अधिक लागतो
  • पावसामुळे झोडणीला अडथळा येतो
  • मशीन उपलब्ध नसणे किंवा खर्च जास्त असणे

यांत्रिक पद्धतीने झोडणी केल्यास वेळ व श्रम दोन्ही कमी लागतात.
पारंपरिक पद्धत स्वस्त असली तरी ती कष्टाची आहे.
यांत्रिक झोडणीमुळे दाण्यांचे नुकसान कमी होते.


भात झोडणी ही भात उत्पादनातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. आधुनिक यंत्रांचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन उत्पादन अधिक सुरक्षित व वेगवान होते.


  • मोठ्या प्रमाणावर भात प्रक्रिया करणे सोपे होईल
  • शेतकऱ्यांचा वेळ व मेहनत वाचेल
  • उत्पादन खर्च कमी होईल
  • आधुनिक शेतीला चालना मिळेल

पिंजरा तयार करणे

ग्रामीण भागात कोंबड्यांचे संगोपन हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. कोंबड्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि व्यवस्थित जागा मिळावी यासाठी मजबूत व टिकाऊ पिंजरे तयार करणे आवश्यक आहे. या उद्देशाने सदर प्रकल्प राबविण्यात आला.

गावात जाऊन कोंबड्यांच्या पिंजऱ्यांची गरज, आकारमान आणि वापरातील अडचणी यांची पाहणी करण्यात आली. उपलब्ध जागा, खर्च आणि टिकाऊपणा यांचा विचार करून पिंजऱ्याची रचना ठरविण्यात आली.

कोंबड्यांसाठी मजबूत व सुरक्षित पिंजरे तयार करणे

कमी खर्चात टिकाऊ संरचना बनवणे

अँगल, पत्रा, जाळी, सिमेंट सीट, नट-बोल्ट, 6 मिमी बिट, डिस्क कटर, ड्रिल मशीन इत्यादी साहित्य वापरण्यात आले.

गावातून मटेरियल आणून डिस्क कटरवर कटिंग केली. पायांची उंची 31 इंच ठेवून 46 x 48 इंच आकाराची फ्रेम तयार केली. 6 मिमी बिटने होल मारून सिमेंट सीट बसवली. त्यावर पत्रा लावून 3 इंचाचा स्लोप दिला. नंतर जाळी लावून अँगल व पट्टीला होल करून नट-बोल्टने घट्ट बसवले. अशा प्रकारे 46 x 48 इंच आकाराच्या चार-दोन फ्रेम तयार करून एकूण 10 पिंजरे बनविण्यात आले.

तयार केलेले पिंजरे मजबूत, स्थिर आणि वापरण्यास सोपे आहेत. स्लोपमुळे पाणी व घाण सहज खाली जाते. जाळीमुळे हवा खेळती राहते व कोंबड्या सुरक्षित राहतात.

या पद्धतीने तयार केलेले पिंजरे कोंबड्यांच्या संगोपनासाठी उपयुक्त, टिकाऊ आणि कमी खर्चिक आहेत. स्थानिक साहित्य वापरल्यामुळे खर्चात बचत झाली.

हे पिंजरे कोंबडीपालन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वापरता येतील. भविष्यात सुधारित डिझाइन करून व्यावसायिक स्तरावर उत्पादन करता येईल तसेच ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.

क्र.मालाचे नाववापर / प्रमाणदर (₹)एकूण किंमत (₹)
1एल अँगल 25×25×355 फूट351925
21×1 sq tube4 फूट35140
3बार 12 mm12 फूट13156
4नट16 नग348
5बोल्ट16 नग232
6स्क्रू 3 इंच6 नग530
7स्क्रू 1 इंच50 नग3150
8सिमेंट शीट 4×80.5 नग1200600
9पत्रा 4×520 नग701400
10जाळी20 स्क्वेअर फूट20400
11ब्रश 2 इंच1 नग4040
12वॉशर50 नग150
13रोलर 2 इंच1 नग5050
14कडी-कोंडा1 नग6060
15स्क्रू 1 इंची2 नग510
16बिजागरी 2 इंच2 नग4080
17थिनर250 ml120 / L30
18ऑइल पेंट500 ml330 / L165
19कटिंग व्हील 14 इंच1 नग200200
20कटिंग व्हील 4 इंच1 नग2525
21ग्राइंडिंग व्हील1 नग3030
22वेल्डिंग रॉड400400

एकूण खर्च = 6,000 ₹

स्टोअर रूम

प्रस्तावना

वर्कशॉपमधील मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांचे संरक्षण होण्यासाठी व कामाच्या ठिकाणी शिस्त राहावी यासाठी स्वतंत्र मशीन स्टोअर रूमची गरज होती. उपलब्ध स्क्रॅपमधील लोखंडी रूमचा पुनर्वापर करून कमी खर्चात मशीन ठेवण्यासाठी उपयुक्त व मजबूत स्टोअर रूम तयार करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला.

सर्वे

काम सुरू करण्यापूर्वी मशीनचे आकारमान, वजन व संख्या यांची पाहणी करण्यात आली. तसेच स्क्रॅपमधील लोखंडी रूमची मजबुती, उपलब्ध जागा आणि मशीन ठेवण्यासाठी लागणाऱ्या कप्प्यांची गरज तपासली. त्यानुसार एका बाजूला 6 कप्पे व पूर्ण रूममध्ये एकूण 18 कप्पे बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.

उद्देश

मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टोअर रूम तयार करणे

मशीनचे नुकसान, गंज व धूळ टाळणे

स्क्रॅप साहित्याचा पुनर्वापर करून खर्च कमी करणे

मशीन व्यवस्थित मांडणी करून कामाची कार्यक्षमता वाढवणे

साहित्य

25x25x3 मिमी L अँगल, अर्धा इंची जाळी (62 स्क्वेअर फूट), पंचिंग शीट (45 स्क्वेअर फूट), 1 इंची स्क्रू (200 नग), स्टार बिट, बिल्डिंग पुढारी, 14 इंची कटिंग व्हील, ग्राइंडिंग व्हील, कटिंग व्हील, वेल्डिंग रॉड (2 नग), रेड ऑक्साईड प्रायमर 2.5 लिटर, पिवळा ऑइल पेंट 2 लिटर, तसेच दोन प्रकारच्या जाळ्या वापरण्यात आल्या.

कृती

स्क्रॅपमधील लोखंडी रूम बाहेर काढून स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली. मशीन ठेवण्यासाठी योग्य माप घेऊन L अँगलच्या साहाय्याने मजबूत फ्रेम तयार केली. एका बाजूला 6 कप्पे व संपूर्ण रूममध्ये एकूण 18 कप्पे बनवून त्यामध्ये वेगवेगळ्या मशीन व पार्ट्स ठेवण्याची सोय केली. जाळी व पंचिंग शीट कटिंग करून स्क्रू व वेल्डिंगच्या सहाय्याने फिक्सिंग केली. कटिंग व ग्राइंडिंग करून कडा गुळगुळीत केल्या. शेवटी गंज रोखण्यासाठी रेड ऑक्साईड प्रायमर व त्यावर पिवळा ऑइल पेंट देण्यात आला.

निरीक्षण

तयार झालेली मशीन स्टोअर रूम मजबूत व सुरक्षित आहे. कप्प्यांमुळे मशीन वेगवेगळ्या ठिकाणी नीट ठेवता येतात. जाळीमुळे हवा खेळती राहते, त्यामुळे मशीनवर ओलावा व गंज कमी होतो.

निष्कर्ष

मशीन ठेवण्यासाठी तयार केलेली ही स्टोअर रूम कमी खर्चात, टिकाऊ व उपयोगी ठरली. स्क्रॅप साहित्याचा योग्य वापर झाला असून मशीन सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था सुधारली.

भविष्यातील उपयोग

ही मशीन स्टोअर रूम वर्कशॉप, ITI, पॉलिटेक्निक, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र किंवा शेती यंत्र साठवणीसाठी वापरता येईल. भविष्यात याच डिझाइनमध्ये मोठ्या क्षमतेच्या मशीन रूम तयार करता येतील.फेरो सिमेंट

costing

अ.मालाचे नावएकूण माल दर  /   रुकिंमत
125x25x3 L२००फूट३०६०००
2जाळी१३x६  ५०१९००
3पंचींग जाळी६x७६०२५२०
4पट्टी२०३०६००
5वायसर२००२००
6स्क्रू२००६००
7स्टार बीट४०४०
8कडी कोंडा७०७०
9बिजागरी४०२४०
10थिनर२ लिटर१२०२४०
11ब्रश५०१००
12रोलर५०१००
13रेड ऑक्साईड३ लिटर१२०३६०
14कलर३लिटर३३०९९०
15प्लाय९६  १९००५७००
16व्हील३००३००
17प्लेट२००८००
18नट बोल्ट१६९६
19चाक७००२८००
20  एकूण किंमत२३६५६


फेरो सिमेंट

प्रस्तावना

फेरो सिमेंट हे एक आधुनिक बांधकाम साहित्य आहे. यामध्ये सिमेंट, वाळू, पाणी आणि लोखंडी जाळी (Wire Mesh) यांचा वापर केला जातो. फेरो सिमेंट वजनाने हलके पण मजबूत असून कमी खर्चात टिकाऊ बांधकामासाठी वापरले जाते. आजकाल पाण्याच्या टाक्या, छप्पर, भिंती आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये फेरो सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.

सर्वे

फेरो सिमेंटची माहिती मिळवण्यासाठी खालील सर्वे करण्यात आला:

बांधकाम कामगारांशी चर्चा

शिक्षक व पालकांकडून माहिती इंटरनेट व पुस्तकांचा अभ्यास जवळील फेरो सिमेंटच्या टाक्यांचे निरीक्षण

या सर्वेक्षणातून फेरो सिमेंटचे फायदे व उपयोग समजले.

उद्देश

या प्रकल्पाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:

फेरो सिमेंटची संपूर्ण माहिती मिळवणे

त्याचे घटक व रचना समजून घेणे

पारंपरिक सिमेंटपेक्षा असलेले फायदे जाणून घेणे

आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे

साहित्य

या प्रकल्पासाठी वापरलेले साहित्य:

सिमेंट

वाळू

पाणी

लोखंडी जाळी (Wire Mesh)

वही, पेन व संदर्भ पुस्तके

कृती

फेरो सिमेंट तयार करण्यासाठी खालील कृती केल्या जातात:

  1. लोखंडी जाळीचा आवश्यक आकार तयार करणे
  2. सिमेंट व वाळूचे मिश्रण बनवणे
  3. हे मिश्रण जाळीवर थरांमध्ये लावणे
  4. योग्य प्रकारे पाणी शिंपडून curing करणे

निरीक्षण

फेरो सिमेंटच्या अभ्यासातून पुढील निरीक्षणे झाली:

फेरो सिमेंट हलके पण मजबूत असते

कमी जाडीमध्ये जास्त मजबुती मिळते

तडे जाण्याची शक्यता कमी असते देखभाल खर्च कमी असतो

निष्कर्ष

फेरो सिमेंट हे कमी खर्चात, टिकाऊ व मजबूत बांधकामासाठी उपयुक्त साहित्य आहे. आधुनिक बांधकाम क्षेत्रात फेरो सिमेंटला मोठे महत्त्व आहे. योग्य पद्धतीने वापर केल्यास याचे आयुष्य जास्त असते.

भविष्यातील उपयोग

फेरो सिमेंटचा भविष्यातील उपयोग:

पाण्याच्या टाक्या

घरांचे छप्पर व भिंती

प्रकल्पातून काय शिकलो

या प्रकल्पातून मला पुढील गोष्टी शिकायला मिळाल्या:

फेरो सिमेंट म्हणजे काय

आधुनिक बांधकाम साहित्याचे फायदे

सर्वेक्षण व निरीक्षण कसे करावे

माहिती व्यवस्थित मांडण्याची पद्धत

COSTING

अ.क्र.साहित्याचे नावप्रमाणदर (₹)एकूण किंमत (₹)
1सिमेंट10 घमेले35 / घमेला350
2वाळू10 घमेले8 / घमेला80
3तार500 ग्रॅम100 / किलो50
4खिळे1 किलो200 / किलो200
5मजुरी200
एकूण खर्च₹ 880

आर.सी.सी. कॉलम

नर्सरी शेडसाठी मजबूत, टिकाऊ व सुरक्षित संरचना आवश्यक असते. पावसाचे पाणी, सूर्यप्रकाश व वाऱ्याचा परिणाम सहन करण्यासाठी आर.सी.सी. कॉलमचा वापर केला जातो. या प्रकल्पामध्ये नर्सरी शेडसाठी आर.सी.सी. कॉलम तयार करण्यात आला असून त्यामध्ये लोखंडी बारचा सांगाडा, योग्य कव्हर व बॉक्स शटरिंगचा वापर करण्यात आला आहे.

नर्सरी शेडसाठी कॉलम उभारण्यापूर्वी खालील सर्वे करण्यात आला:

जमिनीची पातळी व मजबुती तपासली

कॉलम उभारणीसाठी योग्य जागा निश्चित केली

आराखड्यानुसार मोजमाप घेतले

कॉलमची उंची 15 फूट 10 इंच ठेवण्याचे ठरवले

संरचनेचा डायगोनल 23 फूट निश्चित केला

या सर्वेमुळे कॉलम योग्य जागी व सुरक्षितरीत्या उभारणे शक्य झाले.

नर्सरी शेडसाठी मजबूत आधार तयार करणे

आर.सी.सी. कॉलमची प्रत्यक्ष निर्मिती समजून घेणे

लोखंडी बारच्या सांगाड्याचा योग्य वापर करणे

टिकाऊ व दीर्घकाळ उपयोगी अशी रचना तयार करणे

या आर.सी.सी. कॉलमसाठी खालील साहित्य वापरण्यात आले:

सिमेंट

वाळू

खडी

पाणी

लोखंडी बार (स्टील रॉड)

बाइंडिंग वायर

बॉक्स शटरिंग (लाकडी / प्लाय)

कव्हर (कव्हर ब्लॉक)

मोजमापासाठी टेप व लेव्हल

कॉलमचे स्थान मार्किंग करण्यात आले

लोखंडी बार कापून त्याचा सांगाडा तयार करण्यात आला

बारला योग्य कव्हर देण्यात आले

बॉक्स बनवून शटरिंग बसवली

शटरिंग नीट घट्ट केली

आर.सी.सी. काँक्रीट तयार करून कॉलममध्ये ओतण्यात आले

व्हायब्रेशन देऊन काँक्रीट घट्ट बसवले

शटरिंग काढल्यानंतर योग्य क्युरिंग करण्यात आली

लोखंडी बारचा सांगाडा मजबूत असल्यामुळे कॉलम स्थिर राहिला

बॉक्स शटरिंगमुळे कॉलमला योग्य आकार मिळाला

योग्य प्रमाणात काँक्रीट वापरल्यामुळे क्रॅक दिसले नाहीत

क्युरिंग केल्यामुळे कॉलमची ताकद वाढली

नर्सरी शेडसाठी तयार केलेला आर.सी.सी. कॉलम मजबूत, सुरक्षित व टिकाऊ झाला आहे. योग्य सर्वे, मोजमाप, दर्जेदार साहित्य आणि योग्य कार्यपद्धती वापरल्यामुळे कॉलम भविष्यातील भार सहज पेलू शकतो.

नर्सरी शेडला दीर्घकाळ आधार मिळेल

पॉलिथीन शेड, नेट शेड किंवा टिन शेड उभारण्यासाठी उपयोगी

शेती व बागायती संरचनांसाठी आदर्श

भविष्यात विस्तार करताना कॉलम पुन्हा वापरता येईल

costing

क्र.मालाचे नावप्रमाणदर (₹)एकूण किंमत (₹)
1सिमेंट10 गोणी35350
2खडी10 घमेले770
3वाळू20 घमेले8160
4लोखंडी बार20 फूट601200
5तापी2 नग150300
6मजुरी600
एकूण खर्च2680

प्रस्तावना

गेस्ट होस्टेल इमारतीच्या भिंतींवर रंगकाम करण्यापूर्वी प्रायमर लावणे अत्यंत आवश्यक असते. प्रायमरमुळे भिंती मजबूत होतात, रंग टिकाऊ राहतो व पृष्ठभाग गुळगुळीत होतो. या कामासाठी आवश्यक साहित्य, साधने व मनुष्यबळ वापरून नियोजनबद्ध पद्धतीने प्रायमर मारण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

सर्वे

काम सुरू करण्यापूर्वी गेस्ट होस्टेलच्या भिंतींची पाहणी करण्यात आली.

भिंतींची अवस्था तपासली

भेगा, खड्डे व असमान भाग ओळखले

प्रायमरची गरज असलेले क्षेत्र निश्चित केले

लागणाऱ्या साहित्याचा अंदाज घेतला

या सर्वेनंतर प्रत्यक्ष कामाचे नियोजन करण्यात आले.

उद्देश

गेस्ट होस्टेलच्या भिंतींना प्रायमर लावणे

भिंती रंगकामासाठी योग्य बनवणे

भिंतींची टिकाऊपणा व मजबुती वाढवणे

अंतिम रंगकामाचा दर्जा सुधारणे

साहित्य

प्रायमर – एकूण 60 लिटर

पत्रे – 4 नग

स्क्रॅपर – 2 नग

9 इंची रोलर – 2 नग

6 इंची रोलर – 2 नग

ब्रश – 3 नग (4 इंची)

रोलर – ₹250 चा

पुट्टी – 10 किलो

रंगाची बादली

कृती

सर्वप्रथम भिंती स्क्रॅपरने स्वच्छ करण्यात आल्या.

भेगा व खड्डे पुट्टीने भरून पृष्ठभाग समतल केला.

पुट्टी सुकल्यानंतर हलके घासून भिंती तयार केल्या.

प्रायमर बादलीत योग्य प्रमाणात तयार केला.

मोठ्या पृष्ठभागावर 9 इंची रोलर वापरून प्रायमर मारला.

लहान व कडांच्या भागांसाठी 6 इंची रोलर व ब्रश वापरले.

संपूर्ण गेस्ट होस्टेलमध्ये एकसारखा प्रायमर कोट देण्यात आला.

निष्कर्ष

सर्व नियोजनानुसार गेस्ट होस्टेलला यशस्वीपणे प्रायमर मारण्यात आला. भिंती स्वच्छ, मजबूत व रंगकामासाठी योग्य झाल्या. वापरलेला प्रायमर योग्य प्रमाणात असून साहित्याचा अपव्यय टाळण्यात आला.

भविष्यातील उपयोग

या प्रायमरवर रंग लावल्यास रंग जास्त काळ टिकेल

भिंतींना ओलावा व भेगांपासून संरक्षण मिळेल

गेस्ट होस्टेलचे सौंदर्य व दर्जा वाढेल

पुढील देखभाल खर्च कमी होईल

काय शिकलो

प्रायमरचे महत्त्व आणि त्याचा योग्य वापर

साहित्य व साधनांची योग्य निवड कशी करावी

काम सुरू करण्यापूर्वी सर्वे करणे किती आवश्यक आहे

टीमवर्क व नियोजनामुळे काम वेळेत आणि दर्जेदार होते

कॉस्टिंग