.

छत्री

प्रस्तावना :

. या प्रकल्पात आम्ही प्रकल्पात आम्ही . छत्री तयार करण्याबाबतचा उद्देश म्हणजे . पाहुण्यांसाठी बसायची आणि सावलीची सोय करणे . कॅमस मध्ये योग्य जागा पाहून छत्री बसवायची जागा ठरली .

या कामात आम्ही वेल्डिंग , कटिंग , पॉलिशिंग आणि पावडर कोटिंग या सारखी तांत्रिक कौशल्य शिकलो . छत्री बनवताना सौंदर्य आणि उपयोग या दोन्ही गोष्टींचा विचार केला . भविष्याची ही छत्री पाहुण्यांसाठी विश्रामाची जागा म्हणून वापरली जाईल .

सर्वे:

आम्ही कॅम्पस मध्ये निरीक्षण केले आणि छत्री कुठे लावायची त्याची जागा नेमली. सॉलिड वर्क वर छत्रीचे डिझाईन तयार करणे. छत्रीसाठी योग्य सामान्य निवडणे.

उद्देश :

छत्री तयार करण्याचे कारण हे होते जे पाहुणे येथील त्यांच्यासाठी बसायची जागा व विद्यार्थ्यांसाठी नवीन काहीतरी शिकणे .

साहित्य :

25×25[] = 60′ ,40×40[] = 12′ , 100×100 [] = 13′

. 25×5 = 6′ , 40×5 = 5′ ,

. 6×6 = प्लेट (2) , फ्लॅन्स = 2. , रोल = 4

. 30/10 नट बोल्ट = 2kg. , वायसर = 500 g

. ब्रश =2. , रोलर पॉलिश पेपर = 2 , रेड ऑक्साईड = 1L

. पावडर कोटिंग =

ब्लॅक ऑइल पेंट = 1L , थिनर = 0.5L

. सि सिमेंट = 1 गोणी , क्रश = 70 घमेली , खडी = 15 घमेली

. कृती :

. सर्वात अगोदर आम्ही छत्री चे 3d डिझाईन बनवलेत्यासाठी आम्ही सॉलिड वर्क हे ॲप्लीकेशन युज केले . सॉलिड वर्क वर आम्ही छत्री असेंबल होते आहे का नाही हे आम्ही बघितलेत्यानंतरन आम्ही छत्री बनवायला सुरुवात केली . सर्वात अगोदर 25 x 25 [] चे 1800 mm चे सात तुकडे कापून घेतले व त्याचे दोन्ही बाजूस पट्टीचे तुकडे लावून तोंडे बंद करून घेतली एका बाजुला नट बोल्ट लावण्यासाठी कान लावून घेतला कानापासून 880 mm या अंतरावर कॉलम ट्यूबच्या अलीकडे व पलीकडे अशा दोन बाजूस कान लावले. आंतर चुकू नये म्हणून जॉब तयार केला.असे आम्ही सात पार्ट तयार केले . त्यानंतर आम्ही 25 x 25 [] चे 800 mm चे सात तुकडे कापून घेतले व त्याचे दोन्ही बाजूस पट्टीचे तुकडे लावून तोंडे बंद करून घेतली दोन्ही बाजूला ब नट बोल्ट लावण्यासाठी कान लावून घेतले . त्यानंतर आम्ही प्लाजमा कटर वर फ्लान्स तयार केला . व त्याला कान लावून घेतले.छत्रीचे सगळे पार्ट एकामेकाला नटबॉलच्या साह्याने जॉईन करून घेतले . त्यानंतरून छत्रीच्या सर्व पार्टला पावडर कोटिंग केली .100 x 100 [] चा 5000 mm तुकडा कापून घेतला. व त्याला काळा ऑइल पेंट लावला .ज्या ठिकाणी छत्री लावायची होती त्या ठिकाणे 3 फुट खोल खट्टा घेतला . त्या खड्ड्यात खांब उभा केला . त्या खंड्यात सिमेंटचे मिश्रण टाकून खांब फिट केला , व खांबाच्या शेजारील जमिनीला लागून कोबा केला. छत्री उघडण्यासाठी व बंद करण्यासाठीरोलरच्या सह्याने जॉब तयार केला , व त्याला पावडर कोटिंग करून घेतले. छत्रीचे सगळे पाठ एकामेकांना कनेक्ट करून छत्री उभा केले . ही छत्री तयार करताना आम्हाला 9275 एवढा खर्च आला .

निरीक्षण :

छत्री तयार करताना छत्रीचे कार्य कसे चालते , व त्याची आतील रचना कशी असतेहे कळाले . छत्री सगळे पार्ट एकसारखे कड झाले पाहिजे , नाही तर छत्री नीट काम करणार नाही . छत्रीचे मटेरियल कसे असले पाहिजे . हेवी पाहिजे की लाईट मटेरियल पाहिजे . ज्या ठिकाणी छत्री लावणार आहे ती जागा छत्रीसाठी उपयुक्त आहे का नाही .

निष्कर्ष :

छत्री लावल्यापासून लोकांचे उन्हा व पावसापासूनसंरक्षण होते . आश्रमातील लोक एकत्रित जमा होतात येतात , गप्पा मारतात . छत्री लावल्यापासून छत्रीच्या बाजून स्वच्छता अपवाप होऊ लागली . छत्री लावल्यापासूनती मोकळी जागा वापरत आली .

भविष्यातील उपयोग :

या फोल्डेबल छत्री मुळेभविष्यात उन्हाचाव पावसाचा त्रास होणार नाही . लोकांना निवांत बसण्यासाठी एक जागा तयार झाली .

डोम रिनोवेशन

प्रस्तावना :

आम्ही डोममध्ये सर्व नवीन काहीतरी करण्याचा ठरवलेला प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमधून आश्रमातील विविध कार्य व क्रियाकलाप लोकांसमोर दिसून यावेत, असा आमचा उद्देश आहे. हे सादरीकरण साध्या पद्धतीने न करता, वारली चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विचार आहे, ज्यामुळे पारंपरिक कलात्मकता टिकून राहील आणि आधुनिकतेसह एक आगळावेगळा संगम साधता येईल.

सर्वे :

ड्रोममध्ये काय व कुसे करायचे यासाठी प्रथम 3D डिझाईन तयार केले. त्यानंतर लागणारे साहित्य निश्चित करून रावात जाऊन आपाले. जागेची पाहणी व मोजमाप करून सर्वे केला.

उद्देश :

डोम रिनोवेशन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की आश्रमातील मुलांसाठी एक चहा पिण्याची जागा तसेच आरामात बसण्यासाठी योग्य ठिकाण तयार करणे. या जागेमुळे मुलांना एकत्र येऊन गप्पा मारता येतील, विश्रांती घेता येईल आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी एक अनुकूल वातावरण मिळेल.

साहित्य :

स्क्रॅपर

पुट्टी

ट्रॅक्टर इमल्शन [प्रायमर]

डिस्टेंपर

सिमेंट कलर

काळा ऑइल पेंट

सिमेंट , कच

पॉलिश पेपर (सॉफ्ट व हार्ड)

कृती :

सर्वात अगोदर डोमचा सर्वे केला . डोम मध्ये आपण रेनोवेशन कसे करू शकतो याची चर्चा केली त्यानंतर त्यानंतर कॉल स्केच ऑफ वर थ्रीडी डिझाईन तयार केली .कामाला सुरुवात केली. सर्वात अगोदर डोमची स्वच्छता केली.स्क्रॅपच्या साह्याने जुना कलर काढला. व डोमच्या चिरा मध्ये पुट्टी भरली . डोमला आतून प्रायमर लावला व डोमच्यावरच्या साईडला सिमेंट कलर लावला .डोमच्या बाहेर बसण्यासाठी एक छोटीशी भिंत बांधली व त्याला प्लॅस्टर करून घेतले. त्याला पण सिमेंट कलर लावला

कॉस्टिंग

अ. क्र. मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1.डिस्टेंपर10 L140 L1400
2.ट्रॅक्टर इमल्शन [प्रायमर]10 L70 L700
3.पॉलिश पेपर10 L15150
4.रेडीमेड बाईंड1 L230230
5.ब्लॅक ऑईल पेंट1 L300300
6.सिमेंट कलर15 Kg30450
7.टर्पेंटाईन1 L120120
8.पुट्टी5 Kg50250
9.पीव्हीसी पाइप (हिरवा)22 F1363000
10.सिमेंट50 गोणी350350
11. कच70 चमेली8480
12.ब्रश830240
13.रोलर250100
14.सिमेंट कलर (विटकरी)3 Kg3090
15.रूळ15 चमेली9150
16.मजुरी  2000
   Total10010

निरीक्षण :

बाहेरचा रंग कोणता वापरायचा आणि तो छान दिसेल का आतला रंग कसा द्यायचा, वारली चित्रकला करावी का घर कमी खर्चात टिकाऊ कसे करावे – हे सर्व विचार करून निरीक्षण केले.

निष्कर्ष :

बाहेरच्या रंगासाठी असे रंग निवडावेत जे आकर्षक दिसतात आणि हवामानापासून टिकतात.

आतच्या भिंतींवर हलका रंग वापरावा आणि वारली चित्रकला करून पारंपरिक सौंदर्य जोपासावे.

घर कमी खर्चात टिकाऊ बनवण्यासाठी साहित्याची योग्य निवड, मोजमाप, आणि योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.

पाणी जाण्याची सोय आणि पन्हाळीसाठी प्लास्टिक पाईप यासारख्या सूक्ष्म बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे

भविष्यातील उपयोग :

डोम रिनोवेशनमुळे मुलांना विश्रांती, गप्पा मारणे आणि एकत्र बसण्याची जागा मिळेल. तसेच या जागेचा उपयोग छोटे कार्यक्रम, अभ्यास किंवा क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीजसाठी करता येईल.

टाईनी हाऊस

प्रस्तावना :

आजच्या वेगवान जीवनशैलीत व वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची कमतरता भासत आहे. मोठ्या घरांच्या तुलनेत लहान, किफायतशीर व पर्यावरणपूरक घरांची संकल्पना पुढे येत आहे. त्यालाच टायनी हाऊस असे म्हणतात.

या प्रकल्पामध्ये आम्ही १० फूट × १० फूट क्षेत्रफळाचे टायनी हाऊस डिझाइन केले आहे.

सर्वे :

कमी खर्चात व कमी जागेत आवश्यक सोयी उपलब्ध करून देणारे घर म्हणजे टायनी हाऊस.
या प्रकल्पात आम्ही १०x१० फूट टायनी हाऊस डिझाईन केले आहे.

यात –

स्वयंपाकघर

हॉल

स्नानगृह व शौचालय

उद्देश :

कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग करणे

कमी पैशात जास्त जागेचा वापर करणे.

स्वस्त व किफायतशीर घर उपलब्ध करून देणे.

किचन, हॉल व बाथरूम यांसारख्या मूलभूत सोयी समाविष्ट करणे.

पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम करणे.

ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या कमी करणे.

साहित्य :

१.५ × १.५ इंच ट्यूब सिलिंग शीट (PUC) – छतासाठी

भिंत शीट (सिमेंट शीट) – भिंतीसाठी नट व बोल्ट – जॉईंट्स व जोडणीसाठी

सिमेंट प्लायवूड – मजल्यासाठी व आतील कामासाठी

बाथरूम साहित्य –

नळ (Tap)

कमोड (कमोड/शौचालय सीट)

बेसिन (हात धुण्याचे बेसिन)

काळी वायर 1.5 mm/2.5

हिरवी वायर 1.5mm/2.5

लाल वायर 1.5 mm/2.5

कृती :

फ्रेम तयार करणे

१.५ x १.५ इंच ट्यूब वापरून चौकट (Frame) तयार करणे

नट-बोल्टच्या सहाय्याने जोडणी करणे

भिंती व छत बसवणे

भिंतींसाठी सिमेंट शीट लावणे

छतासाठी PUC शीट बसवणे

वायरिंग केली व बोर्ड भरले आणि, वायर साठी वायरिंग पाईप लावले.

नळ (Tap) बसवणे

कमोड (Toilet Seat) बसवणे

बेसिन (Wash Basin) बसवणे

निरीक्षण :

टायनी हाऊस प्रकल्पामध्ये कमी जागेत व कमी खर्चात किचन, हॉल व बाथरूम या आवश्यक सोयी उपलब्ध झाल्या.
साहित्याचा योग्य वापर करून घर मजबूत, टिकाऊ व पर्यावरणपूरक बनले आहे.

निष्कर्ष :

१०x१० फूट टायनी हाऊस कमी खर्चात, कमी जागेत व टिकाऊ साहित्य वापरून बांधता येते.
यामध्ये सर्व मूलभूत सुविधा मिळून हे घर किफायतशीर व उपयुक्त ठरते.

भविष्यातील उपयोय :

टायनी हाऊस संकल्पना भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हे घर पोर्टेबल, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असल्याने विद्यार्थ्यांसाठी, प्रवाशांसाठी व लहान कुटुंबासाठी उपयोगी आहे

मी हे शिकलो :

वायरिंग कसे करायचे ते शिकलो.

PUC सिल्लिंग लावायचं शिकलो.

स्टाईल्स बसवायला शिकलो.

प्लंबिंग शिकलो.

दरवाजा आणि खिडकीची फ्रेम बनवायला शिकलो.

पेंटिंग कसे करायचे ते शिकलो.