1. दिशा दर्शक पत्रक

सेफ्टी : १) सेफ्टी शूज
२) सेफ्टी हॅन्डग्लोज
३) सेफ्टी गॉगल्स
४)वेल्डींग हेलमेट

साहित्य :१) लोखंडी रॉड
२) लोखंडी पत्रा
३) रंग

साधने :१) कलर स्प्रे
२) ब्रश
३) हॅन्ड ग्रॅण्डर
४) पत्रा कापायचे कटर

कृती : १) सर्वप्रथम साहित्य ,साधने गोळा केली .
२) ८* ४ इंच पत्रा कापून घेतला .
३) २ फूट रॉड घेतला .
४) पत्र्याला व रॉडला योग्य त्या प्रमाणात फिनिशिंग केली .
५) पत्रा योग्य त्या पध्दतीने रॉडला वेल्डींग करून घेतला .
६) हॅन्ड ग्रॅण्डर फिनिशिंग करून घेतली .
७) नंतर त्याच्यावर काळा कलर मारला .
८) त्या कलर ला २ तास सुकून दिले .
९) नंतर त्याच्यावर निळ्या रंगाने ड्रिम हाऊस नाव लिहिले .

फ्लायवूडला सनमायका बसवणे

1)फ्लायवूड व सनमायका सर्वप्रथम योग्य त्या मापात सनमायका कटरने कापून घेतले .

2)त्यांना फेविकॉल लावून एकत्र चिकटावले .

3) त्यावर दाब देवून चिकट पट्टीने सगळ्या बाजूने घट्ट बांधून घेतले .

सनमायका :- सनमायका ही चांगल्या प्रतीचे , टिकाऊ , परवडणारी एक कवच आहे .

उपयोग :- 1) फर्निचर

2) वॉल टेबलटॉपसाठी

वैशिट्य:– 1) डाग प्रतिरोधक

2) तापमान रोधक

3) बूरशी रोधक

1)सनमायकाचे प्रकार :-डेकोरेटीव्ह सनमायका :- फर्निचर , किचन

2) HPL :- फर्निचर , किचन

3)LPL:- फर्निचर , किचन

4)इंडस्ट्रियल सनमायका :- घरातील सर्किट बोर्ड , हॉस्पिटल मधील फर्निच

5)कॉम्पॅक्ट सनमायका :- लॅब मधील टॉप

जीआय पत्र्यापासून डबा बनवणे

1)प्रथम सगळे साहित्य गोळा केले .

2) ९ *९ *७ cm चा पत्रा कापून घेतला .

३)योग्य मापन करून त्याला फोल्ड करून ८ *८ *६ चा बॉक्स तयार केला .

४) तळाच्या बाजूला ८*८ चा पत्रा कापून घेतला .

५)योग्य पद्धतीने जाइंट करून त्याचा डबा तयार केला .

बिजागरी व स्क्रूचे प्रकार

T-बिजागरी : दरवाजे, खिडक्यांसाठी उपयोग होतो .

पार्लमेंट बिजागरी : दरवाजा भिंतीला समांतर राहण्यासाठी उपयोग होतो. हॉल, थिएटर शाळा, दवाखाना या ठिकाणी याचा वापर करतात.

टकरी बिजागरी : घडीच्या दरवाज्यासाठी उपयोग होतो.

पियानो बिजागरी : फर्निचर मध्ये उपयोग होतो.

बुश बेअरींग बिजागरी : प्रामुख्याने गेट साठी उपयोग केला जातो.

वूड स्क्रू : लाकडा मध्ये पूर्ण जाण्यासाठी याचा वापर होतो.

फ्लॅट हेड स्क्रू : बांधकामात उपयोग होतो.

ड्राय वॉल स्क्रू : फ्रेम साठी उपयोग करतात.

सुतार कामातील हत्यारांना धार लावणे

उद्देश :हत्यारांना धार लावायची योग्य पद्धत समजून घेणे.

पटाशी :30०ते 35०मध्ये एका बाजूने धार लावायची.

रंधा पाता :रंध्याच्या पात्याला 40०ते 45०मध्ये धार लावतात.

वाकास :वाकसाला 20०ते 25० मध्ये धार लावतात.

यांना निसण्यावर धार लावतात.

करवत :करवतीला 90०मध्ये धार लावतात.यासाठी त्रिकोणी कानस वापरतात.आणि तिला 60०ते 65०चा कोन आवश्यक असतो.

आणि त्या हत्यारांना योग्य त्या पद्धतीने धार लावावी नाहीतर हत्यारांना इजा पोहचू शकते.

हत्यारांना जर नीट धार असेल तर आपले काम सुद्धा व्यवस्थित होते.

रंगकाम करणे

उद्देश :रंगकाम करण्यास शिकणे.

साहित्य:रंग , थिनर

साधने : स्प्रे गन , कॉम्प्रेसर,लोखंडी,टेबल,ब्रश,सेंड पेपर

कृती :– सर्वप्रथम रंग करायचा भाग सेंड पेपरने घासून साफ केला

2) स्प्रे गन मध्ये का रंग भरला

3) योग्यपद्धतीने स्प्रे गन्ने रंग केला

4)रंग केलेला टेबल सुकायला ठेवला

विटांची रचना व प्रकार

बॉन्ड व त्यांची माहिती :

१ ) स्ट्रेचर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंड स्ट्रेचर आडव्या ठेवल्या जातात . अनेक ठिकाणी हा बॉन्ड वापरला .

२ ) हेडर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर हेडर राखल्या जातात . यासाठी वक्र भाग तयार करतात .

३) फ्लेमिश बॉन्ड : क्वीन क्लोसेर ने होते . स्ट्रेचर आणि हेडर स्वारस्य मध्ये जोडणी असते .

४ ) इंग्लिश बॉब : स्ट्रेचर या हेडर बांधकम केल जात .

५) रॅट ट्रॅप बॉन्ड : मध्ये पोकळी असते. साहित्य कमी लागत आहे.

विटेला अर्धा , पाव , पावण कापणे याला सांधे मोड करणे .

फ्लेमिश बॉन्ड हा मजबूत बॉन्ड असतो .

घराच्या पायाची आखणी करणे

साहित्य : वाळू

साधने : स्पिरिट लेव्हल, लाईन दोरी, टाचण्या, टॉर्शन बार, मीटर टेप, पट्टी, लेव्हल ट्यूब, राईट अँगल, प्लमबॉम्ब, बॉल पिन हॅमर.

कारपेट एरिया : बिल्डिंगच्या आतील वॉल टू वॉल एरिया.

बिल्ट अप एरिया : बिल्डिंगचा पूर्ण एरिया

कृती : 1)सर्वप्रथम सेंटर लाईन गुण्या व लाईन दोरीच्या साहाय्याने काढली.

2) 3″हा सेंटर लाईन पासून आत व बाहेर बांधकाम लाईन काढली.

3) बांधकाम लाईन पासून 4″ वर फाऊंडेशन लाईन काढली.

4) फाऊंडेशन लाईन पासून 4″ वर पायाची लाईन काढली.

अशाप्रमाणे आम्ही 90° मध्ये घराच्या पायाची आखणी शिकलो.

सूचना : पायाची आखणी करताना सर्व कोन 90°मध्ये असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही घराचे बांधकाम कारण्यापूर्वी त्याच्या पायाची आखणी करणे आवश्यक आहे.

मापन

उद्देश : वेगवेगळ्या वस्तूंची मापे घेण्याची शिकणे व त्याचा उपयोग करणे.

साधने : फूट पट्टी , मेजरमेंट टेप (3m, 5m) , वर्नियर कॅलिपर , स्क्रू गेज इ.

मापनाच्या दोन पद्धती :-

1) ब्रिटिश पद्धत : इंच , फूट , शेर , मण , पायली , डजन आणि आणे इ.

2)मॅट्रिक पद्धत : मीटर , सेमी , किमी , लिटर , क्विंटल , टन , तास , सेकंद इ.

1cm चे m करताना 100ने भागाने.

फूट चे इंच करताना 12ने गुणणे.

इंच चे फूट करताना 12ने भागाने.

m चे cm करताना 100ने गुणणे.

•least count :- वर्नियर कॅलिपर = 0.01मिमी

स्क्रू गेज = 0.001मिमी

फूट पट्टी = 0.5 मिमी

मेजरमेंट टेप = 1सेमी

लेथ मशीन वर टर्निंग , बोरिंग व फेशिंग करणे

उद्देश : लेथ मशीन ची ओळख करून घेणे व टर्निंग , बोरिंग व फेशिंग करण्यास शिकणे.

साहित्य : लाकूड आणि वेगवेगळे रॉड

साधने : लेथ मशीन आणि त्याचे वेगवेगळे टूल्स

लेथ मशीन चे प्रकार : इंजिन लेथ , स्पीड लेथ , कॅप्सटन आणि टरेट लेथ , ऍटोमॅटिक लेथ इ.

लेथ मशीन ऑपरेशन :-

 1. टर्निंग ऑपरेशन वर्कपीसचा व्यास कमी करण्यासाठी केला जातो.
 2. टेपर टर्निंग म्हणजे ज्यामध्ये एका कोणाला टर्निंग केला जातो.
 3. फेशिंग ऑपरेशन वर्कपीसची लांबी कमी करण्यासाठी वापरतात.
 4. ड्रीलिंग ऑपरेशन वर्कपीसला छेद करण्यासाठी वापरतात.
 5. बोरिंग ऑपरेशन वर्कपीसमधील छेद मोठा करण्यासाठी वापरतात.
 6. थ्रेडिंग ऑपरेशन वर्कपीसच्या वरती थ्रेड्स करण्यासाठी वापरतात.

GI पाईपला थ्रेडिंग व टॅपिंग करणे

उद्देश : पाईपला थ्रेडिंग व टॅपिंग करण्यास शिकणे.

साहित्य : पाईप , सळई , ऑईल

साधने : डायस्टॉक , बुधली , टॅपिंग टूल्स – टेपर टॅप , सेकंड टॅप , बोटमिंग टॅप.

थ्रेडिंग : थ्रेडिंग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे.

टॅपिंग : टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाडणे.

टॅप्सचे प्रकार :-

 1. टेपर टॅप : हे टॅप अत्यंत हळूहळू आणि कमी आक्रमक कटिंग क्रिया प्रदान करते.
 2. सेकंड टॅप : हे टेपर टॅप पेक्षा जास्त आक्रमक पण बोटमिंग टॅप पेक्षा कमी आक्रमक असतात.
 3. बोटमिंग टॅप : हा सगळ्यात आक्रमक असतो व प्रक्रिया जलद होते.

वेल्डिंग

उद्देश : वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग करण्यास शिकणे व त्याचा महत्त्व समजून घेणे.

साधने : 1) वेल्डिंग मशीन 2)चिपिंग हॅमर 3) वेल्डिंग हल्मेट 4) वेल्डिंग गॉगल्स 5) सेफ्टी ग्लोज 6) सेफ्टी शूज 7) ऍप्रॉन

साहित्य : 1) इलेक्ट्रोड (वेल्डिंग रॉड) [2.5mm]

2) L अँगल

कृती : 1) सर्वप्रथम सर्व साहित्य साधने गोळा करणे.

2) टेबल बनवण्यासाठी आवश्यक त्या बापाचे L अँगल पावर कटरने कापून घेतले.

3) आर्क वेल्डिंग च्या साहाय्याने L अँगल व्यवस्थित जोडून घेतले.

4) वेल्डिंग करून झाल्यावर योग्य त्या प्रमाणे फिनिशिंग करून घेतले.

5) नंतर त्यांना कलर करून टेबल पूर्ण केला.

वेल्डिंग जॉइन्ट : 1) बट जॉइन्ट 2) कॉर्नर जॉइन्ट 3) टी जॉइन्ट

4) लॅप जॉइन्ट

वेल्डिंग रॉड : 1) लांबी – 250 mm ते 450mm पर्यन्त

2) व्यास – 205 mm

सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग


उद्देश : सुतार कामात वापरल्या जाणाऱ्या हत्यारांचे उपयोग समजून घेणे.

हत्यारे व त्यांची माहिती :-

 1. क्रॉस पीन हॅमर :- पत्र्याच्या कामासाठी या हॅमरचा वापर करतात.
 2. सी क्लॅम :- एखादी लहान गोष्ट घट्ट पकडण्यासाठी याचा वापर करतात.
 3. क्लॉ हॅमर :- हा हॅमर जास्त करून लाकडातील खडे काढण्यासाठी वापरला जातो.
 4. करवत :- लाकूड कापण्यासाठी याचा वापर होतो.
 5. वाकास :- लाकडावरील जास्ती चा भाग कमी करण्यासाठी याचा वापर होतो.

6. रंधा :- याचा वापर लाकूड किंवा फळी सपाट करण्यासाठी वापरतात.

7. हॅन्ड व्हॉईस :- आपल्या कामातील लहान वस्तू घट्ट पकडण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

8. हॅन्ड ड्रील मशीन :- हाताने लाकडावर ड्रिल करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

9. पॉवर रंधा :- पॉवर रंधा म्हणजे विद्युत उपकरणावर चालतो.

10. पॉवर वूड कटर :– विद्युत उपकरणाचा वापर करून लाकूड कापण्यासाठी याचा वापर केला जातो.

आर . सी . सी . कॉलम तयार करणे

उद्देश :- आर . सी . सी . कॉलमचे उपयोग व माहिती मिळवणे .

साहित्य :- 1) सिमेंट 2) वाळू 3) खडी 4) ऑईल

5) टॉर्शन बार 6) बायडिंग तार

साधने :- 1) थापी 2) फावडे 3) पॉवर कटर

4) साचा 5) मेजर टेप

कृती :- 1) सर्वप्रथम टॉर्शन बार कापून घेतले .(2.10 मी. उंचीचे 3 नग ) तसेच 31 सेमीचे राऊंड 7 बार कापून घेतले.

2) साचा पूर्णता स्वच्छ करून त्याला ऑइल लावला .

3) सिमेंट , वाळू , व खडी यांचे 1: 2: 4 हे प्रमाण घेतले . 35 ltr खडी , 17.5 ltr वाळू व 8.7 ltr सिमेंट घेतले .

4) साच्यामध्ये टॉर्शन बारला 7 राऊंड लावून ते साच्यात ठेवले व कॉक्रीट भरून कॉलम तयार केला .

PCC :- plain cement concrit

RCC :- rainforsed cement

फेरो सीमेंट शिट तयार करणे

उद्देश :- फेरो सीमेंट तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- 1) सीमेंट 2) वाळू 3) टॉर्शन बार

4) वेल्ड मेश जाळी 5) चिकन मेश जाळी

साधने :- 1) थापी 2) घमेले

3) पक्कड 4) फावडा

कृती :- 1) टॉर्शन बारची फ्रेम तयार केली . ( 90 cm x 42 cm )

2) फ्रेमला वेल्ड मेश जाळी तारेने बांधली तसेच त्यावर चिकन मेश जाळी तारेने बांधली .

3) मॉर्टरचे प्रमाण ( सीमेंट : वाळू = 1 : 3 ) तयार केले .

4) पहिले मॉर्टरचा थर टाकला त्यावर फ्रेम बसवली त्यावर पुन्हा मॉर्टरचा थर देऊन आयताकृती फेरोसिमेंटची शिट तयार केली .

5) 20 ते 21 दिवस त्याला क्युरिंग केले .

सोल्डरिंग करणे

उद्देश :- Gi पत्र्याच्या डब्याला सोल्डरिंग करणे.

साहित्य :- 1) सोल्डरिंग मटेरियल 2) HCI 3) जस्त

4) फ्लक्स

साधने :- 1) खड्या 2) ब्लॉ लॅम्प

कृती :- 1) HCI मध्ये जस्त टाकून फ्लक्स तयार केला.

2) खड्या ब्लॉ लॅम्पवर गरम करून घेतलं.

3) त्याने सोल्डरिंग मटेरियल सोल्डरिंग करण्याच्या ठिकाणी वितळवले व सोल्डरिंग केले.

कथिल (60%) + शिस (40%) = सोल्डरिंग मटेरियल

HCI + जस्त = फ्लक्स

खड्या हा नेहमी तांब्याचा असतो. कारण तांबे हा पदार्थ लवकर गरम होतो आणि लवकर थंड होतो.

बांधकामासाठी मातीची व सिमेंटची वीट तयार करणे.

उद्देश :- विटांचे प्रकार समजून घेणे.व विटा तयार करणे.

साधने :- वीट मेकर, थापी, घमेले इ.

साहित्य :- सिमेंट, वाळू, माती, पाणी इ.

कृती :- 1) सिमेंट व वाळू यांचे 1:6 या प्रमाणात मिश्रण तयार केले.

2) मिश्रण Bricks Maker मध्ये टाकून विटा तयार केल्या जातात.

3) एका विटेची लांबी 35 cm रुंदी 15 cm व उंची 15 cm घेतली आहे.

4) या विटेसाठी 1.1 ltr. सिमेंट व 6.6 ltr. वाळू लागली.

प्रोजेक्ट

सन :- 2022 – 2023

विभागाचे नाव :- वर्कशॉप

प्रोजेक्टचे नाव :- F. R. P करून फुटलेल्या टाकीचे लिकेज काढणे.

प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव :- रवी वऱ्हे

मार्गदर्शकाचे नाव :- जाधव सर & पुर्णेश सर

फुटलेल्या टाकीचे लिकेज काढणे

टाकीचे लिकेज काढण्यासाठी लागणारे मटेरियल :- रेक्झिन , हार्डनर , कोबाल्ट , ग्लास मॅट इ.

त्यासाठी लागणारे साहित्य :- ब्रश , रॉड , चंचुपात्र , कात्री , हॅन्डग्लोज इ.

कृती :- सर्वप्रथम आम्ही लागणारे साहित्य गोळा केले.

नंतर आम्ही स्क्रॅब मधून एक फुटलेली टाकी घेतली.

त्यानंतर ती टाकी स्वच्छ कपडाने पुसून घेतली.

पुसून झाल्यावर 1/2 लिटर रेक्झिन , 4 मिली कोबाल्ट , 4 मिली हार्डनर चे मिश्रण करून घेतले.

ते मिश्रण टाकीच्या फुटलेल्या ठिकाणी ब्रशच्या साहाय्याने पसरवून घेतले.

मग टाकीचे फुटलेल्या जागेचे माप घेणे .

त्यानंतर तेवढ्याच मापाचे ग्लास मॅटचे 4 – 5 तुकडे करून घेणे .

नंतर एक तुकडा त्या मिश्रणावर लावावा .

पुन्हा त्यावर मिश्रण करून लावावे .

व पुन्हा त्यावर ग्लास मॅट लावावे . असे आतून व बाहेरून 4-5 वेळ करणे .

त्यानंतर त्या टाक्यांना बाजूला सुकण्यासाठी ठेवणे .

अशाप्रकारे आम्ही स्क्रॅबमधील 2 टाक्यांचे F.R.P. करून लिकेज काढले .

टाकीची Costing :-

अ . क्र मालाचे नाव एकूण माल दर / kg किंमत
1)ग्लास मॅट 1.15 kg 300 /-346/-
2)पुट्टि पावडर 500 gm 30/-15/-
3)रेक्झिन2.200 ltr145/-319/-
4)कोबाल्ट 30 ml 400/-12/-
5)हार्डनर 30 ml 200/-6/-
6)थिणर 250 ml 350/-87.5/-
Total =785.5
मजुरी =30%274.92
एकूण Total =1060/-

सूचना :-

आपले काम करून झाल्यावर आपण वापरलेले सर्व साहित्य व्यवस्थित पुन्हा धुवून होते त्या जागेवर ठेवणे .

व ब्रश स्वच्छ धुवून तो थिणर मध्ये बुडवून ठेवावा .