साधने व उपकरणे
उद्देश:-
अभियांत्रिकी विभागामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व साधणांची व उपकरणाची ओळख करून घेणे.कृती अभियांत्रिक विभागामधील सर्व उपकरण्याची व साधनांची ओळख करून घेतली व कसे चालते ते समजून घेतले.
- आर्क वेल्डिंग:- – 5000/-
- CO2 वेल्डिंग:-8000/- CO2 वेल्डिंग म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड वेल्डिंग ज्यामध्ये co2 गॅस चा वापर केला जातो हा प्रक्रिया साधारण स्टील आणि इतर धातूंमध्ये वेल्डिंगसाठी वापरली जाते.
- टिग वेल्डिंग एक टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग ज्यामध्ये एक टंगस्टन इलेक्ट्रोड वापरला जातो आणि गॅस वापरून वेल्डिंग प्रक्रिया सुरक्षित केली जाते. किंमत 2000/-
2) बेंच ग्राइंडर मशीन:- 8000/-
वेल्डिंग जॉईंट्सचा समतल करणे पृष्ठ भागावर गडद किंवा खराब सामग्री काढणे आकारमान सुधारणे ग्रा इंडिंगसाठी उपयुक्त आहे.
3) पाईप कटर मशीन:- 15000/-
विविध आकार आणि सामग्रीचा पाईप्स कट करण्यासाठी पाईप लाईन इन्स्टॉलेशन आणि रिट्रोफिटिंगसाठी. वेल्डिंग किंवा इतर प्रक्रियांसाठी योग्य आकारात पाईप्स तयार करणे.
4) आयर्न:- 7000/-
आयर्न (लोखंड) एक महत्त्वपूर्ण धातू आहे त्यावर ती आपण कोणत्याही लोखंडी वस्तूला सरळ करण्यासाठी त्याच्यावर ठेवू शकतो किंवा आपण ठोकून वाकवू शकतो.
5) वेडिंग साईड टेबल :- 30000/-
वेल्डिंग करतानी वस्तू हलू नये म्हणून तिला स्थिर ठेवण्यासाठी विविध वजनाच्या धातूच्या भागांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेल्डरला आरामदायक उंची वरती काम करण्यासाठी.
6) मिलिंग मशीन :- एक प्रकारची यांत्रिक उपकरण आहे जो विविध धातू किंवा इतर पदार्थांचे पृष्ठभाग काढण्याचे काम करते

मापन
उददेश :-
मापनाचे सर्व माहिती माहित असणे गरजेचे आहे. मापन अचूक प्रमाणे करता येणे.
मापन करण्याचे साहित्य:- मेजरिंग टेप, स्केल, वजन काटा, गेज.
प्रकार:- मापनाचे खालील दोन प्रकार असतात:-
ब्रिटीश पद्धत :-
ही पद्धत फुट, इंच, कोस,गुंठा, खंडी, मण इत्यादीमध्ये मोजले जाते. ही मापने ब्रिटिश च्या काळात वापरली जायची म्हणून या मापनाच्या पद्धतीला ब्रिटिश पद्धत असे म्हणतात.
मॅट्रिक पद्धत :-
ही पद्धत mm, cm, km, लिटर इत्यादी मध्ये मोजले जाते. या पद्धतीचा उपयोग आताच्या काळात जास्त प्रमाणात केला जातो.
मापनाचे सूत्र :- मॅट्रिक
Cm
1cm = 10mm
1 in = 2.5 cm
1m = 100cm
Ft
1mm = 0.001 m
1cm = 0.01 m
1 in = 0.0254 m
1ft = 0.3048m
मापनाचे सूत्र :- ब्रिटिश
1kg = 1000 gm
Gm = gram
Kg = kilogram, हे स्थूल मोजण्याचे एकक आहे.
ml = मिली लिटर
L = लिटर, हे द्रव मोजण्याचे एकक आहे.
पावडर कोटींग
पावडर कोटिंग म्हणजे
एखादी धातू जर रंगवायचे असेल तर आपण पावडर कोटिंग च्या मशीनचा वापर करून ती वस्तू किंवा धातू रंगवू शकतो. पावडर कोटिंग करत असताना आपल्याकडे सेफ्टी असणे व त्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या मशीनद्वारे मेटलला रंग दिले जाते, पावडर कोटिंग कलर मध्ये जो रंग असतो तो पावडरच्या स्वरूपात असतो. मेटल वर चिटकवण्यासाठी एक ओवन आहे ज्याने ते मेटल ओवन मध्ये ठेवल्यास पावडर गरम होते व वितळून पावडर मेटल वर चिटकते.
साहित्य:-
थ्री इन वन ऍसिड , हॅन्ड ग्लोज, गॉगल, ज्या वस्तूला पावडर कोटिंग करायचे आहे ती वस्तू…
सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारे पॉलिश करून घेणे.
पॉलिश केल्यानंतर 3 इन 1 ऍसिड ने त्याला असलेले गंज काढून घ्यावे.
त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन दहा-पंधरा मिनिट सुकायला तसेच ठेवावे.
नंतर आपल्याला जो कलर लागत असेल ते पावडर टाकून घ्यावे.
त्यानंतर जमिनीवर मोठे कार्पेट अंतरावे ज्याने खाली पडलेले कलर पावडर वाया जाणार नाही किंवा खराब होणार नाही.
नंतर कॉम्प्रेसर चालू करून हवा भरून धातूवर कलर फवारला जातो.
त्यानंतर ओवन ठेवून त्याला सेट करावे व त्या धातूवरचा कलर हिट होऊन त्यावर चिटकला जातो.
आपण सेट केलेले टाईम आपोआप बंद होईल तसेच मशीन सुद्धा बंद होईल.
रंगकाम
रंगकाम म्हणजे
एखाद्या वस्तूला गंज लागलेले असेल किंवा एखाद्या लोखंडाचे लाईफ वाढवण्यासाठी त्या वस्तूला रंग लावला जातो. त्यालाच रंगकाम असे म्हणतात
रंगकाम हा औद्योगीयसाठी नव्हे तर भिंती आणि संरचनेचे सुरक्षण करण्यासाठी देखील केला जातो.
रंगकामाचे प्रकार :
• ऑइल पेंट ( oil paint) – तेलयुक्तरंग,जास्त टिकणार
• डिस्टेंपर ( distemper) – पाण्याचे विरघळणारे आणि स्वतः
•अक्रि्लिक पेंट ( Acrylic paint) – पाणी व तेल दोन्ही प्रकारात उपलब्ध असतो.
•एनमेल पेंट (Enamel /paint ) – लोखंडी वस्तूवर वापरले जाणारे रंग.
• सिमेंट पेंट ( cement paint ) – बाहेरील भिंतीवर वापरला जाणारा रंग.
रंगकामाचे थर :
रंगकामात करताना त्यावर वेगवेगळे थर असतात व एकूण तीन थर असतात.
• प्रायमर : भिंतीवर किंवा पृष्ठभागावर रंग छिद्र बसवण्यासाठी बेस लेअर .
• अंडरकोट : मुख्य रंगाचा बेस तयार करण्यासाठी थर.
• टॉप कोट : शेवटीचा रंगाचा थर जो सौंदर्य आणि टिकावपणासाठी असतो.
3) आवश्यक साधने:
1) ब्रश 6) फडका
2) रोलर 7) झाडू
3) पत्रा 8) सेफ्टी चे साधने
4) पोलीस पेपर
5) प्रायमर आणि पुट्टे
भिंतीची पूर्वतयारी :
1) भिंतीची मळकटपणा धूळ आणि जुन्या रंगाचे तुकडे घासून टाकणे
2) पोलीस पेपर ने भिंत गुळगुळीत करणे व चांगले घासून घेणे.
3) छिद्र पुट्टीने बुजवणे घेणे
4) पाणी आणि गंज यामुळे खराब झालेली भिंत साफ करून घेणे.
प्रायमर लावणे :
1) प्रायमर हा रंगाचा पाया असतो आणि तो नीट लावल्याच्याने रंग चांगला लागतो.
2) रोलर किंवा ब्रशच्या साह्याने लावणे.
3) प्रायमर मध्ये जेवढे पाणी लागेल 1 लिटरला 200 ml पाणी.
4) प्रायमर ला 6 ते 8 तास सुकवणे.
रंग लावण्याचे पद्धत :
1) पहिला तर ब्रश किंवा रोलरने सुरुवातीचा थर लावला जातो.
2) दुसरा थर : पहिला थर पूर्ण सुकल्यानंतर दुसरा थर लावला जातो.
3) फिनिशिंग – अचूक फिनिशिंग मिळण्यासाठी शेवटी चा रंग मारला जातो.
सुरक्षा आणि काळजी :
1) हात मोजे व मास्क
2) रंग डोळ्यात किंवा किंवा त्वचेवर लागू नये म्हणून काळजी घेणे .
3) सीडीवर ते चढताना काळजी घेणे.
4) सेफ्टी बेल्ट घालून व हेल्मेट.