• Sunday
  • Monday
  • Tuesday
  • Wednesday
  • Thursday
  • Friday
  • Saturday
  • Date:- 6-11-2019.
  • Day:- Wednesday.

सकाळी हॅन्ड ग्रॅन्डर, पॉवर कटर आणि ड्रिल मशीन यांची माहिती सरांनी सांगितली नंतर दिवसभर याच मशीनचा वापर करत राहिलो. लेडीज डोमच्या मागची पाईपलाईन नीट केली.

  • Date:- 7-11-2019.
  • Day:- Thursday.

सकाळी एकक रूपांतर म्हणजे मोजमाप करण्याच्या एककांवरती थेअरी लेक्चर झालं नंतर प्रॅक्टिकल करून पाहिलं वेल्डिंग मशीन कशी वापरावी हे सांगितलं प्रत्यक्षात केलं सुद्धा D.I.C. हॉस्टेलची पाईप लाईन नवीन टाकली व क्लिपा मारल्या.

  • Date:- 8-11-2019.
  • Day:- Friday.

सकाळी I.B.T. ऑफिस समोरील पाईपलाईनचे लिकीज काढले नंतर ड्रॉईंग क्लासला गेलो. जेवणानंतर अाम्मांनच्या रूम मधील बेसिंगची आऊटलाईन काढली फ्लश कमोड चे दुरुस्ती केली.

  • Date:- 10-11-2019.
  • Day:- Sunday.

सकाळी विशाल सरांनी A.C. आणि D.C.  या विषयावरती इलेक्ट्रिकल मध्ये थेअरी लेक्चर घेतले नंतर वर्कशॉप मध्ये वेल्डिंग ची प्रॅक्टिस केली.

  • Date:- 11-11-2019.
  • Day:- Monday.

सकाळी स्टोरी झाली.

  • Date:- 12-11-2019.
  • Day:- Tuesday.

सकाळी सनी सरांनी मापकांची माहिती या विषयावरती थेअरी लेक्चर घेतले गोठ्या समोरील  पाईपलाईनचे  लिकेज काढले.

  • Date:- 13-11-2019.
  • Day:- Wednesday.

सकाळी कैलास जाधव सरांनी विद्युत धारा अल्टरनेटिंग करंट होल्टेज किंवा रेजिस्टन्स पॉवर यांच्याविषयी थेअरी लेक्चर झालं डोम मधील बाथरूमची पाईप लाईन नवीन केली व क्लिपा बसवल्या.

  • Date:- 14-11-2019.
  • Day:- Thursday.

सकाळी घनफळ आणि घनता या विषयावर सनी सरांचं थेअरी लेक्चर झालं प्लाजमा मशीनची माहिती सांगितली आणि मशीन वर ते काही आकारांचे लोखंडाचे तुकडे सरांनी कापून दाखवले.

  • Date:- 15-11-2019.
  • Day:-  Friday.

सकाळी शेक्षण मध्ये गेल्यानंतर सर्व मुलांनी वह्या पूर्ण केल्या 11 वाजल्यानंतर ड्रॉईंग क्लासला गेलो 2वाजल्यानंतर जे 3 शेक्षण वाटून दिले होते त्या त्या शेक्षण मध्ये गेलो.

  • Date:- 17-11-2019.
  • Day:- Sunday.

सकाळी विशाल सरांनी अर्थिंग या विषयावर थेअरी लेक्चर घेतले लेक्चर झाल्यानंतर जाधव सरांनी विटा तयार करणे या विषयावर प्रॅक्टिकल घेतले आणि विटा तयार करायला सांगितल्या नंतर सर्वांनी विटा तयार केल्या.

  • Date:- 18-11-2019.
  • Day:- Monday.

सकाळी स्टोरी झाली स्टोरीमध्ये चुली विषयी कुलकर्णी सरांनी स्टोरी घेतली स्टोरी नंतर वर्कशॉप मध्ये सर्वांनी आपापले काम केली मी एका गजाला ग्राइंड केलं आणि कुऱ्हाडीला धार लावली.

  • Date:- 19-11-2019.
  • Day:- Tuesday.

सकाळी सनी सरांनी वजन आणि वस्तुमान या विषयावर थेअरी लेक्चर घेतलं लेक्चर नंतर मी माझं ग्राइंडिंग च काम केलं. जेवणानंतर कॉम्प्युटर क्लासला गेलो.

  • Date:- 20-11-2019.
  • Day:- Wednesday.

सकाळी जाधव सरांचं अर्थिंग या विषयावर थेअरी लेक्चर झालं नंतर शिविंग लॅब मधील ड्रावर रिपेरिंग करीत होतो दोन ड्रावर चारही बाजूंनी दुरुस्त केले.

  • Date:- 21-11-2019.
  • Day:- Thursday.

सकाळी सनी सरांनी बल, वेग, त्वरण आणि 1 न्यूटनबल या विषयावर सरांनी थेअरी लेक्चर घेतलं नंतर त्वरण या विषयावर प्रात्यक्षिक करून दाखवलं नंतर ड्रावरसाठी प्लायवूड कापला.

  • Date:- 22-11-2019.
  • Day:- Friday.

सकाळी वर्कशॉपमध्ये ड्रावरसाठी प्लायवूड चे तुकडे कापले अकरा च्या नंतर ड्रॉइंग क्लासला गेलो ड्रॉइंग क्लास झाल्यानंतर सर्व मुलं जेवणानंतर शुक्रवार चे शेक्षण वाटून दिले आहेत त्या त्या शेक्षण मध्ये गेलो.

  • Date:- 25-11-2019.
  • Day:- Monday.

सकाळी स्टोरी झाली नंतर जाधव सरांनी सुतार कामातील साहित्याची ओळख व उपयोग आणि महत्व या विषयावर थेअरी लेक्चर घेतलं सुतार कामातील साहित्यांना धार लावणे हे देखील प्रात्यक्षिक घेतले करून पाहायला सांगितले.

  • Date:- 26-11-2019.
  • Day:- Tuesday.

सकाळी सर्व मुलांना विज्ञान आश्रमातील सर्व प्लास्टिक आणि न कुजणाऱ्या वस्तू जमा करायला सांगितल्या जमा सुद्धा केल्या नंतर बिजागरी ची ओळख आणि उपयोग यावर थेअरी लेक्चर घेतलं 2च्या नंतर कॉम्प्युटर क्लासला गेलो.

  • Date:- 27-11-2019.
  • Day:- Wednesday.

सकाळी किचन समोरील विटांची भिंत बांधली आणि 2 नंतर अर्धा कोबा तयार केला.

  • Date:- 28-11-2019.
  • Day:- Thursday.

सकाळी किचन समोरचा अर्धा राहिलेला कोबा तयार करून पूर्ण केला.

  • Dare:- 29-11-2019.
  • Day:- Friday.

सकाळी सर्व मुलांनी प्रॅक्टिकल बुक डेली डायरी पूर्ण केली नंतर अकरा च्या नंतर ड्रॉइंग क्लासला झाला नंतर दोन च्या नंतर 3शेक्षण मध्ये सर्व मुलं गेली.

  • Date:-01-12-2019.
  • Day:- Sunday.

सकाळी रोडच्या कडेच्या झाडांना इलेक्ट्रिकल आणि वर्कशॉप च्या मुलांनी पाणी घातलं नंतर मी दिवसभर डोम च्या मागची टाकी बसवली नवीन पाईपलाईन केली.

  • Date:- 02-12-2019.
  • Day:- Monday.

सकाळी स्टोरी झाली स्टोरी नंतर प्लायवूड कटिंग केलं जेवणानंतर डोम च्या मागची पाईपलाईन जमिनीत गाडली 4वाजता सेमिनार झाला सुनील नि स्टूल बनवला महेश नी सेमिनार हॉलच्या साईटचा जिना रंगवला.

  • Date:- 03-12-2019.
  • Day:- Tuesday.

सकाळी सर्व मुलांनी प्रोजेक्ट वाटून घेतले ज्यांना प्रोजेक्ट मिळाला नव्हता त्यांना सनी सरांनी प्रोजेक्ट वाटून दिले नंतर नंतर सर्वांनी आपापल्या प्रोजेक्ट ची माहिती घेऊन कामाला सुरुवात केली मी Soil Lab च्या टाकीच्या खालच्या बाजूनी2 Endcap बसवल्या.

  • Date:- 04-12-2019.
  • Day:-  Wednesday.

सकाळी कैलास जाधव सरांनी वायर चा गेज म्हणजे काय आणि तो कसा मोजायचा या विषयावर थेअरी लेक्चर घेतले नंतर सनी सरांनी ऊर्जा व ऊर्जेचे 3 प्रकार या विषयावर थेअरी लेक्चर झाले स्थितिज ऊर्जा,  गतिज ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा नंतर Soil Lab च्या टाकीला होल पाडल पण ते छोटस पडलं.

  • Date:- 05-12-2019.
  • Day:- Thursday.

सकाळी आम्ही सर्व मुलं रांजणगाव एमआयडीसी तील बजाज कंपनी ला भेट देण्यासाठी निघालो रांजणगावचा महागणपती पाहिला त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहिला बजाज कंपनीतील लाईटचे पोल आणि टॉवर कसे तयार केले जातात हे देखिल पाहिले ग्यालोनाइज(G.I.) चा लेप कसा देतात हे पाहिलं नंतर विदेशी फ्लॉवर आणि कोबी यांचं पॉलिहाऊस पाहिल.

  • Date:- 06-12-2019.
  • Day:- Friday.

सकाळी वह्या पूर्ण केल्या नंतर ड्रॉइंग क्लास ला गेलो. नंतर शुक्रवारच्या तीन शेक्षण मध्ये गेलो. ड्रॉइंग क्लास मध्ये आयसो मेट्रिक ऑब्जेक्ट च फ्रंट , टॉप आणि साईड व्ह्यू काढले.

  • Date:- 8-12-2019.
  • Day:- Sunday.

सकाळी जाधव सरांनी R.C.C. कॉलम तयार करणे या विषयावर थेअरी लेक्चर घेतले यावर आम्ही R.C.C. कॉलम तयार करून पाहिला सेमिनार हॉलच्या बाजूला. रॅकसाठी लागणारे ट्रे ठेवायचे कप्पे तयार केले. खलबत्ता तयार केला.

Date:- 9-12-2019.

  • Day:- Monday.

सकाळी स्टोरी झाली. स्टोरी नंतर हात गाडीला वेल्डिंग केली. Soil Lab च्या टाकीत फुटबॉल बसवला आणि पाईपलाईनचा मेन्टेनन्स केला.

  • Date:- 10-12-2019.
  • Day:- Tuesday.

सकाळी सनी सरांनी ऊर्जा संवर्धनाचा नियम या विषयावर थेअरी लेक्चर घेतलं. E gram Vyapar या विषयी माहिती मिळाली. जेवणानंतर कॉम्प्युटर लॅब मध्ये गेलो. शेड बनवायचे कॉन्ट्रॅक्ट वाटून दिले.

  • Date:- 11-12-2019.
  • Day:- Wednesday.

सकाळी कैलास जाधव सरांनी नकाशा कसा तयार करायचा आणि नकाशा विषयी माहिती या विषयावरील थेअरी लेक्चर घेतले. नंतर जाधव सरांनी पायाची आखणी कशी करायची हे करून दाखवलं.

  • Date:- 12-12-2019.
  • Day:- Thursday.

काल जे कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्यासाठी आज खड्डे खोदून घेतले आणि खड्ड्यात पाणी ओतून ठेवले.

  • Date:- 13-12-2019.
  • Day:- Friday.

आज सर्व मुलं किसान प्रदर्शन पाहून आलो. आळंदी आणि मोशी या गावाला जाऊन आलो.

  • Date:- 15-12-2019.
  • Day:- Sunday.

आज खड्ड्यांमध्ये चैनल उभा करून घेतले आणि सिमेंटने पॅक केले.

  • Date:- 16-12-2019.
  • Day:- Monday.

सकाळी स्टोरी झाली. नंतर दिवसभर उभ्या केलेल्या उभे केलेल्या चैनल वर चैनल अशे 3 चैनल वेल्डिंग केले आणि लेव्हल चेक केली. सेमिनार झाला.

  • Date:- 17-12-2019.
  • Day:- Tuesday.

आज मला वेल्डिंग लागली होती. त्यामुळे फक्त बामन  ने  3 चैनल ला रेड ऑक्साईड  हा कलर मारला.

  • Date:- 18-12-2019.
  • Day:- Wednesday.

सकाळी कैलास जाधव सरांनी नकाशा चे मोजमाप या विषयी थेअरी लेक्चर घेतले. 4 चैनल ला काळा कलर मारला आणि त्यातला 1 चैनल जेसीबी ने वाकवला. आज सेमिनार देण्यासाठी P.P.T. तयार केली स्नेहालय विषयी माहितीवर P.P.T. तयार केली.

  • Date:- 19-12-2019.
  • Day:- Thursday.

सकाळी सनी सरांनी लिवर या विषयावर थेअरी लेक्चर घेतले. नंतर दिवसभर काल जेसीबी ने वाकवले ला चैनल काढून नवीन दुसरा चैनल टाकायचं काम केलं.

  • Date:- 20-12-2019.
  • Day:- Friday.

नवीन चैनल ला काळा कलर दिला. आडवा चैनल टाकला. ड्रॉईंग क्लास झाला क्लासमध्ये शेती विभागाच्या पोरांनी बनवलेल्या शेड च ड्रॉइंग शिकवलं आयसो मॅट्रिक ड्रॉइंग. जेवणा नंतर 2 स्क्वेअर टूब  वेल्डिंग करून आडवी स्क्वेअर टूब टाकली.

  • Date:- 21-12-2019.
  • Day:- Saturday.

सकाळी सर्व शेडला पक्की वेल्डिंग केली नंतर 4 स्क्वेअर ट्यूबा एकत्र करून 2 स्क्वेअर ट्युबा शेड वरती आडव्या टाकल्या दिवसभर हेच काम चाललं.

  • Date:- 22-12-2019.
  • Day:- Sunday.

सकाळी विशाल सरांनी स्विच आणि स्विच चे प्रकार व त्यांची माहिती आणि उपयोग या विषयावर ती थेअरी आणि प्रॅक्टिकल लेक्चर घेतलं. नंतर दिवसभर स्क्वेअर ट्युबांना पक्की वेल्डिंग करून शेड वरती पत्रे टाकले.

  • Date:- 23-12-2019.
  • Day:- Monday.

सकाळी साऊंड या विषयावरती रणजीत सरांनी स्टोरी घेतली. नंतर पत्र्यांना दिवसभर स्क्रू मारले. 4 वाजता माझा सेमिनार होता, त्यामुळे स्नेहालय या विषयावरती मी प्रेझेंटेशन दिलं.

  • Date:- 24-12-2019.
  • Day:- Tuesday.

सकाळी सनी सरांचे उष्णता आणि तापमान या विषयावरती  थेअरी लेक्चर झाले. नंतर दिवसभर पत्र्यांना J Bolt हुक मारले. पोल्ट्री ची पाईपलाईन केली.

  • Date:- 25-12-2019.
  • Day:- Wednesday.

सकाळी खायला जाधव सारणी वायर फिटिंग करण्याचा व्हिडिओ दाखवला. क्लाऊड कंपनीचे लोक आले होते. त्यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग वर्कशॉप घेण्याचे ठरवले. नंतर दिवसभर गोट्याला काळा कलर मारला.

  • Date:- 26-12-2019.
  • Day:- Thursday.

सकाळी सनी सरांनी उष्णता वहन या विषयावरती थेअरी लेक्चर घेतलं. नंतर सूर्यग्रहण पाहिलं. लेक्चर झाल्यावर तारेची जाळी सरळ करून घेतली. नंतर जेवण झाल्यावर थ्रेडिंग आणि टॅपिंग या विषयावरती प्रॅक्टिकल घेतलं. प्रत्यक्षात करूनही पाहिलं.

  • Date:- 27-12-2019.
  • Day:- Firday.

सकाळी ऑफिस मधील कपाटाला बिजागरी बसवली. नंतर ड्रॉइंग क्लास झाला. जेवणानंतर Fab Lab मध्ये गेलो Fab Lab च लेक्चर Computer Lab मध्ये झालं.

  • Date:- 28-12-2019.
  • Day:- Saturday.

आज सुट्टी होती म्हणून पपई प्लॉटच्या खालच्या रानात पाईप लाईन फिटिंग केली. शेत तळ्यावरील सिंगल फेज मोटर च्या पाईपलाईनचा L Bo बसवला. रिटर्न वालच्या तिथे त्या निळ्या झाकणाला टॅपलॉन टेप लावून फिट केले. पॉली हाऊस च्या वॉटर फिल्टर च्या खत मिक्स करण्याच्या सिलेंडरचा पाईप वॉटर फिल्टर ला गरम करून बसवला. त्याच्या नेपलला टॅपलॉन टेप लावून फिट केलं. पॉली हाउस च्या पॅड खालच्या आउट लाईन च्या पाईपाचा तुकडा P.V.C. सोलुशन लाऊन फिट केला.

  • Date:- 29-12-2019.
  • Day:- Sunday.

सकाळी विशाल सरांनी सोलर चूल आणि सोलर कुकर या विषयावरती थेअरी लेक्चर घेतलं. त्यातून सोलर कुकर कसा काम करतो ते शिकायला मिळालं, नंतर सनी सरांनी नरसाळे कसं तयार करायचं हे शिकवलं. एल अँगल ला ग्राइंड केलं.

  • Date:- 03-01-2020.
  • Day:- Friday.