आज दहा वाजता सनी सरांचे लेक्चर झाले. आज सनी सरांनी वॉटरप्रोपिंग या विषयावर लेक्चर घेतले. मग जाधव सरांनी पावसाचे टेंपरेचर कसे मोजायचे आणि कसे ओळखायचे ते सांगितले. नंतर सरांनी आम्हाला प्रश्न विचारले की पाऊस मिलिमीटरमध्ये मोजायला आला पाहिजे असे काहीतरी तुम्ही एक छोटे यंत्र बनवा. मग आम्ही वेगवेगळ्या आयडिया सांगितल्या . मग सरांनी तीन तीन जणांचे ग्रुप बनवले आणि छोटे यंत्र तयार करायला लावले. मी, अशोक आणि स्वाती आम्ही तिघांनी एक डब्बा घेतला, त्या डब्याला एक पट्टी चिटकवली आमचं यंत्र तयार झाले. मंग आम्ही दोन ते तीन वाजेपर्यंत कॅम्पुटर मध्ये ब्लॉक भरले.