millet chocolate (तृणधान्य चॉकलेट )

उद्देश :- तृणधान्यांचा उपयोग करून चॉकलेट बनवणे .

साहित्य :- डार्क कंपाऊंड, व्हाइट कंपाऊंड, बाजरी पीठ ,तूप ,काजू , बदाम , ज्वारी पोहे ,

साधने :- मिक्सर , गॅस ,चमचा ,वाटी , कढई , ताट , पातेल ,परात इ.

कृती :- 1) प्रथम सर्व साहित्य गोळा केले व ते खाली दिलेल्या प्रमाणात वजन करून घेतले .

2) बाजरीचे पीठ ,ज्वारी पोहे , काजू व बदाम हे सर्व तुपात भाजून घेतले .

3) चॉकलेट डार्क कंपाऊंड आणि चॉकलेट व्हाइट कंपाऊंड हे एका भांड्यामध्ये काढून घेतले व मिक्स केले

4) एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले व त्यात मिक्स केलेले चॉकलेट विरघळून घेतले .

5) विरघळून घेतलेल्या चॉकलेट मध्ये भाजून घेतलेले पीठ ,पोहे , काजू व बदाम मिक्स करून घेलते .

6) एकत्र केलेले मिश्रण व्यवस्थित मिसळून घेतले व चॉकलेटच्या आकाराचा साचा घेवून त्याला आकार दिला .

7) चॉकलेटचा साचा फ्रीज मध्ये 10 ते 15 मिनट ठेवणे .

चॉकलेट कॉस्टिंग :-

क्र मटेरियल वजन दर /kg किंमत
1 डार्क कंपाऊंड 120 gm 125रू /400 gm 37.5
2 व्हाइट कंपाऊंड 120 gm 190रू/ 400 gm 57
3 बाजरी पीठ 30 gm 30रू 0.9
4 तूप 10 gm 500 रू 5.0
5 काजू 15 gm 900रू 13.50
6 बदाम 15 gm 900रू13.50
7 ज्वारी पोहे 15 gm 70रू/250 gm 4. 2
8 गॅस 30 gm/ 20 min 906रू/14200 1.91
9 इलेक्ट्रिसीटी 1/2 unit 10रू /1 unit 5
आलेला खर्च 138.51
मजुरी 35 %48.47
एकूण खर्च 186.98