नाव :- विशाल रमेश धनावडे
प्रोजेक्ट :- ऑफीस टेबल बनवणे { मिटिंग टेबल }
साहीत्य :- 1.5 इंच स्क्वेअर ट्यूब , पाईन वूडच्या फळ्या , 1 इंची खिळे , वूड कलर , वूड पॉलिश
साधने :- वेल्डिंग मशीन , ग्राइंडर, वूड कटर, पॉलिश मशीन , कापड ,कॉम्प्रेसर , 35×8 स्क्रू, 1″ स्क्रू, हातोडा , इत्यादी.
कृती :- 1) प्रथम सामानाची नोंद केली व त्यानुसार सामान खरेदी केले.
2) दीड इंची स्क्वेअर ट्यूब चा सी आकाराचा टेबल बनवला.
3) टेबलाच्या आकारामध्ये फळ्या कापून घेतल्या
4)टेबलला वेल्डिंग केलेल्या जागी लांबी भरून लेवल काढली
5)लांबी सुकल्यानंतर पॉलिश पेपरने घासून घेतली. व त्या टेबलला प्रायमर मारला रेडॉक्साईडमध्ये व त्यानंतर त्याला ब्लॅक कलर दिला
6) फळ्यांना ग्राइंडर च्या साह्याने ग्राइंडिंग करून घेतलं त्यामध्ये 120 हे ब्लेड वापरलं ग्राइंडिंग झाल्यानंतर 300 420 व 600 नंबरचे पॉलिश ब्लेड वापरले
7) त्यानंतर फळांना ब्लॅक कलरचा वूड टच दिला.
8) त्यानंतर सिलर लिक्विड चा एक कोट दिला त्यानंतर त्याला 300 420 600 नंबरचे ब्लेडने पॉलिश केले. व परत सीलरचा एक कोट दिला तसेच त्या पद्धतीने 300 420 600 या नंबर ब्लेडने पॉलिश करून घेतले.
9) सिल्वर कोट झाल्यावर मॅट लिक्विडचं एक कोट दिला व त्याला 300 420 600 नंबरच्या ब्लेड नी पॉलिश केले. परत त्याला मेट लिक्विड चा एक कोट दिला.
10) लिक्विडचे कोट देताना स्प्रे गन चा वापर केला
11)कोटिंग झाल्यावर त्या फळ सुटल्यावर त्यांना टेबलवर जॉईट केला. जॉईट करताना स्क्रू चा वापर केला.
12) त्यानंतर टेबलला थ्रेडिंग करून टॅपिंग केले.
13)त्यानंतर पूर्ण तयार झाला.


