Vigyan Ashram
  • DBRT
  • Batches
    • 2025-26
    • 2024-25
    • 2023-24
    • 2022-23
    • 2021-22
    • 2020-21
    • 2019-20
    • 2018-19
    • 2017-18
    • 2016-17
    • 2015-16
    • 2014-15
    • 2009-10
  • Projects
  • Rural Startup
  • DIC
  • Technologies
  • About
  • Login

Select Page

अर्थिंग (EARTHING) अर्थिग कसे करावे? व अर्थिगची उपयुक्तता काय आहे? हे आपण आता बघू या. अर्थिगला इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते. अर्थिग कसे करावे? व अर्थिगची उपयुक्तता काय आहे? हे आपण आता बघू या. अर्थिगला इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते. अर्थिग कसे करतात. – जमिनीमध्ये साधारणत: ५ फुटांपर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक १’X१’ चा १’’ जाडीची तांब्याची किंवा बिडाची प्लेट पुरतात. या प्लॅटच्या सभोवताली कोळसा, मीठ, वाळू पुरतात. या क्रियेस ‘अर्थिग’ असे म्हणतात. जमिनीमध्ये पुरलेल्या प्लेटपासून तांब्याची एक जाड तार बाहेर काढलेली असते. या तारेस ‘अर्थिगची तार’ असे म्हणतात. अर्थिग केलेल्या जागेच्या आसपास ओलावा राहील, अशी खबरदारी घेतली जाते. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या धातूच्या भागास शॉक बसू नये. याकरिता उपकरणांच्या धातूच्या भागास अर्थिग करतात. म्हणजे अर्थिगपासून एक तांब्याची तार काढून ती उपकरणाच्या धातूच्या भागास जोडली जाते. काही वेळा उपकरणांच्या धातूच्या भागाशी कनेक्शनची वायर चुकून थोडासा स्पर्श करते. (शॉर्ट होते.) अशावेळी धातूच्या भागामधून तो एक वाहक असल्याकारणाने प्रवाह वाहतो, या स्थितीमध्ये चुकून जरी अशा भागास आपला स्पर्श झाला; तरी आपल्याला शॉक बसतो. जर अशाभागास आपला स्पर्श झाला; तरी आपल्याला शॉक बसतो. जर अशा उपकरणांना अर्थिग केलेले असेल, तर हा प्रवाह चटकन अर्थवायरमार्गे जमिनीत वाहून डेड (निकामी) होतो. असा प्रवाह जास्त असल्यास ताबडतोब फ्यूजही जातो. सुरक्षिततेकरिता, विजेवर चालणारी जी उपकरणे धातूची असतात, त्यांना अर्थिग करण्याची आवश्यकता असते. घरामध्ये पाण्यांच्या नळापासून अर्थ वायर काढली तरी चालते. कारण पाण्यांचा नळ हाही एक वाहक आहे. त्याच प्रमाणे हा जमिनीमध्ये लांबवर पुरलेला असतो. अर्थिग टर्मिनलची व्यवस्था असलेले खास प्लग सॉकेटही बाजारात मिळतात. यांना ‘थ्री पिन प्लग सॉकेट’ असे म्हणतात. यामध्ये जे जाड टर्मिनल असते, ते अर्थिग करिता असते. इंडियन इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्टप्रमाणे आजकाल घरामधील दिव्यांच्या सर्किटकरिताही थ्री पीन सॉकेटचा वापर करणे आवश्यक आहे.

Feb 7, 2022 | Uncategorized

Share:

PreviousElectric tools
Nextडंपी लेव्हल

Related Posts

सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

February 10, 2022

eletrical

eletrical

September 14, 2025

बँच विल

बँच विल

December 14, 2021

केक

केक

November 24, 2024

  • ELECTRIC SECTION
  • फूड ब्लोग
  • AGRI CULTURE
  • (no title)
  • food lab

Designed by Elegant Themes | Powered by WordPress