इन्व्हर्टर जोडणी ……

सर्वप्रथम आम्ही इन्व्हर्टर ठेवण्या साठी स्टॅंड तयार केले . स्टँड तयार करण्यासाठी आम्ही

स्क्रॅप मधील मटेरियल वापरले . स्टँड तयार करण्यासाठी आम्हाला १ तास लागला .

त्याला वेल्डिंग करून घेतली .

त्याला गंज लागल्या मुळे आम्ही ते स्टँड चांगल्या प्रकारे ग्रँडर ने घासून घेतले .

नंतर आम्ही स्टँड ला कलर काम सुरू केले . कलर करायला आम्हाला ३० मिनिट लागले .

तसेच कलर काम पूर्ण झाल्यावर आम्ही सरांना दाखवले ,तर सरांनी आम्हाला सांगितले की

चांगले झाले आहे म्हणून . त्याच प्रमाणे प्लायवूड ला सुद्धा कलर करून घेतला.

थोडा वेळ कलर वाळूण दिला . कलर वाळल्या नंतर आम्ही ते स्टँड मेडिटेशन हॉल मध्ये घेऊन गेलो .

आणि त्यानंतर इन्वर्टर जोडणे चालू केली . इन्वर्टर जोडण्यासाठी आम्हाला पक्कड ,ग्रीस,स्क्रू ड्रायवर , वायर,१६ a ची टॉप पिन,

वायर कटर,चिकट पट्टी इ . साधने लागली .काही वेळात इन्वर्टर जोडणी पूर्ण झाली .

त्यानंतर काही वेळ बॅटरी चार्ज करण्यासाठी दिला परंतु बॅटरी बॅकअप देत नसल्यामुळे सर्किट

पूर्णपणे चालू शकले नाही . तर बॅटरी चा प्रॉब्लेम असल्यामुळे ती बॅटरी बदलण्याची आवश्यकता

आहे.