प्लग पिन टॉप ला जोडणे

थ्रि-पिन टॉप (3 Pin Top) जोडण्याची पद्धत:वायरची ओळख:

• सामान्यतः

तीन रंगांच्या वायर असतात – लाल किंवा तपकिरी (Live/Phase), काळा किंवा निळा (Neutral), आणि हिरवा किंवा पिवळा (Earth).

• कव्हर काढणे:

प्लग टॉपमधील मधला स्क्रू सैल करून त्याचे आवरण (कव्हर) बाजूला काढा.

• वायर सोलणे:

टोकाकडील इन्सुलेशन काढून सुमारे १.५ सेंमी तांब्याची वायर बाहेर काढा.

• टर्मिनल जोडणी:

L (Live): लाल किंवा तपकिरी रंगाची वायर ‘L’ लिहिलेल्या टर्मिनलला जोडा.

N (Neutral): काळा किंवा निळा रंगाची वायर ‘N’ लिहिलेल्या टर्मिनलला जोडा.

E (Earth): हिरवा किंवा पिवळा रंगाची वायर सर्वात वरच्या मोठ्या ‘E’ (अर्थिंग) टर्मिनलला जोडा.

• स्क्रू घट्ट करणे:

सर्व स्क्रू व्यवस्थित घट्ट करा जेणेकरून वायर बाहेर निघणार नाही.

कव्हर पुन्हा पूर्ववत बसवा.