कलम करण्यात बियांपासून तयार केलेल्या रोपावर दुसर्‍या झाडाच्या डोळ्याचा अगर फांदीचा जोड जमवून तो जोपासावयाचा असतो. त्यामुळे एका झाडाच्या मुळावर दुसर्‍या झाडाचा विस्तार वाढविला जातो. मुळांचा भाग बनलेल्या भागाला खुंट आणि वरील विस्तार पुरविणार्‍या भागाला कलम म्हणतात. अशी कलमे काही विशिष्ट वनस्पतींमध्येच करता येतात.