प्रस्तावना

आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेअभावी पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ बनवणे कठीण होत चालले आहे. गहू खीर हा पौष्टिक, चविष्ट आणि सर्व वयोगटांसाठी उपयुक्त असा पारंपरिक गोड पदार्थ आहे. मात्र तो बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत लक्षात घेता अनेकदा लोक तो घरी बनवणे टाळतात. हीच अडचण लक्षात घेऊन गहू खीर प्रीमिक्स ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.

उदेश

गहू खीर सहज, कमी वेळेत आणि कमी मेहनतीत तयार करता यावी.

पारंपरिक गहू खिरीची चव आणि पौष्टिकता जपणे.

घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी सोयीस्कर खाद्यपदार्थ उपलब्ध करणे.

महिलांचे बचत गट, युवक आणि लघुउद्योगांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.

पौष्टिक, सुरक्षित आणि टिकाऊ (लाँग शेल्फ लाईफ) खाद्यपदार्थ तयार करणे.

सण-उत्सव, शाळा-महाविद्यालयीन उपक्रम व कॅन्टीनसाठी उपयुक्त प्रीमिक्स विकसित करणे.

साहित्य

  1. गहू (तुटलेला/रवा केलेला)
  2. साखर किंवा गूळ पावडर
  3. दूध पावडर
  4. तूप
  5. वेलची पूड
  6. काजू
  7. बदाम
  8. मनुका
  9. मीठ (चिमूटभर – ऐच्छिक)

टीप: सर्व साहित्य स्वच्छ, कोरडे व योग्य प्रमाणात घेऊन प्रक्रिया केल्यास प्रीमिक्स अधिक चविष्ट व टिकाऊ होतो.

कृती

1 कप दूध उकळवा.
त्यात 2–3 चमचे गहू खीर प्रीमिक्स घाला.
मंद आचेवर 5–7 मिनिटे ढवळत शिजवा.
आवडीनुसार साजूक तूप घालून गरम सर्व्ह करा.

नीरीश्नण

गहू नीट भाजल्यामुळे त्याला सुगंध आणि हलका सोनेरी रंग प्राप्त झाला.

गहू भरडसर दळल्यामुळे खीर बनवताना चांगली घट्टसर सुसंगतता (texture) मिळाली.

सुकं खोबरं व ड्रायफ्रूट्स मिसळल्याने चव आणि पोषणमूल्य वाढले.

वेलचीमुळे खिरीला आकर्षक व सुगंधी स्वाद आला.

प्रीमिक्स हवाबंद डब्यात ठेवल्यावर ओलावा न येता टिकाऊपणा चांगला राहिला.

दूधात प्रीमिक्स घातल्यावर तो सहज शिजला व गाठी न होता मिसळला.

कमी वेळात खीर तयार झाली, त्यामुळे वेळ आणि श्रमांची बचत झाली.

निष्कर्ष

गहू खीर प्रीमिक्स तयार करण्याचा प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
या प्रीमिक्समुळे कमी वेळात, सोप्या पद्धतीने व घरच्या घरी पौष्टिक खीर तयार करता येते हे आढळून आले.
गहू, सुकं खोबरं व ड्रायफ्रूट्समुळे खिरीचे पोषणमूल्य वाढले.
प्रीमिक्सची चव, सुगंध व सुसंगतता समाधानकारक होती.
हवाबंद साठवण केल्यास प्रीमिक्सचा टिकाऊपणा चांगला राहतो हे सिद्ध झाले.
हा प्रीमिक्स लहान मुले, वृद्ध तसेच सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे.
घरगुती तसेच लघुउद्योगासाठी गहू खीर प्रीमिक्स उपयुक्त व फायदेशीर ठरतो.