शेंगदाणा चिक्की
चिक्कीचा इतिहास:-
चिक्की हा एक् महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. गुळाचा पाक व भाजलेले शेंगदाणे वापरून केलेला हा पदार्थ आहे. चिक्कीत टाकण्यापूर्वी शेंगदाण्याची साले काढली जातात. कोणी साखरेचा पाक व शेंगदाणे वापरूनही चिक्की करतात. लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे. येथे खोबरे,डाळ्या,अश्या विविध प्रकारच्या चिक्क्या मिळतात.चिक्कीचा प्रसार लोणावळ्यातून झाला, मात्र तिचं मूळ वेगळ्या स्वरूपात पूर्वीपासून अस्तित्वात होतंच. घरी आलेल्या पाहुण्याला गूळपाणी द्यायची पद्धत होती. प्रवासामुळे आलेला थकवा दूर करण्याची कामगिरी तो गुळाचा खडा करायचा. या गुळासोबतच काही वेळा शेंगदाणेही दिले जायचे. हे सारे पदार्थ कच्च्या रूपात होते. पण याच गूळ, शेंगदाणा व तुपाचा वापर करून गुडदाणा किंवा गुडदाणी तयार केली जायची. हा गुडदाणा म्हणजेच आजची चिक्की.
चिक्कीचे प्रकार :-
• शेंगदाणा चिक्की
• गुळची चिक्की
• खोबऱ्याची चिक्की
• तिळाची चिक्की
• फुटाणा चिक्की
अन्न पदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून चिक्की तयार करणे :-
- भाजणे
- उकळणे
- गोडवणे
- हवा बंद पॅकिंग .
साहित्य व प्रमाण :-
- शेंगदाणे =३५० ग्रॅम
- गूळ /साखर =३५० ग्रॅम
- तेल ५ ग्रॅम .
साधने :-
- कढई
- गॅस
- पलिता / चमचा
- लाटण
- चिक्की ट्रे
- कटर
- वजन काटा
- पक्कड
- पॅकिंग बॉक्स
- अप्रॉन
- कॅप
क्र | मटेरियल | वजन | दर /kg | किंमत |
१ | शेंगदाणे | ३५० ग्रॅम | १२० रू | ४२ |
२ | साखर | ३५० ग्रॅम | ४० रू | १४ |
३ | तेल | ५ ग्रॅम | ११० रू | ०.५५ |
४ | गॅस | ३०ग्रॅम (२० मिनिट ) | ९०६ रू १४२०० | १.९१ |
५ | पॅकिंग बॉक्स | १ बॉक्स | ६ रू / १ बॉक्स | ६ |
६ | लेबल | १ लेबल | ४ रू / ६ लेबल | ०.६६ |
total | ६५.१२ | |||
मजुरी | २२.७९ | |||
आलेला खर्च | ८७.९१ |