बाजरी क्रकर्स

साहित्य :-1) बाजारीचे पिठ -94 gm

2) काली मिरी पावडर-0.71gm

3)पांढरे तिळ -3 gm

4) ओवा -0.62 gm

5)मीठ – 2 gm

6)लाल मिरची पावडर -1 gm

7) तेल -26 gm

8)आंबाडा पावडर /आमचूर पावडर- 0.25

साधने :-1) ओवेन

2) ताट

3) परात

4) वाटी

5) वजन काटा

6) कढई

7) चमचा

8) पक्कड

9) हँड ग्लोस (हात मोजे) इ .

कृती :- 1) बाजारीचे पीठ घ्या त्यावर तिळ ,ओवा ,मीठ, लाल मिरची पावडर, काली मिरी पावडर, आमचूर पावडर घ्या .

2) वरील सर्व साहित्य मिक्स करू नये .

3) तेल गरम करून घेणे व पीठावर घेतलेल्या साहित्यावर ओतणे .

4) वरील सर्व नीट मिक्स करून घ्या आणि त्यात थोडे -थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्या .

5) मिक्स करून उरलेल्या तेलामध्ये पीठ मळून घ्या .

6) 10 – 15 मिनिट फ्रीज मध्ये पिठाचा गोल नीट झाकून ठेवा .

7) फ्रीज मधून पीठ काढल्या नंतर परात मळून घ्या आणि क्रकर्सला आकार द्या .(आवडीनुसार आकार देऊ शकता )

8) 150 अंश c वर 15 -20 मिनिट भाजून घ्या .

बाजरी क्रकर्सची कॉस्टिंग :-

क्र मटेरियल वजन दर /kg किंमत
1 बाजरी पीठ 94 gm32 रू 3.00
2 कालीमिरी पावडर0.71 gm200 रू /100 gm1.42
3 पांढरे तिळ 3 gm220 रू 0.66
4 ओवा 0.62 gm300 रू /100 gm1.86
5 मीठ 2 gm15 रू 0.03
6 लाल मिरची पावडर 1 gm485 रू 0.48
7 तेल 26 gm110 रू 2.86
8 आमचूर पावडर0.25 gm24 रू/20 gm0.3
9 ओवेन 1/2 यूनिट 10 रू /1 यूनिट 5
आलेला खर्च 15.61
मजुरी 35 % 5.46
एकूण खर्च 21.07