Feb 7, 2022 | Uncategorized
* उद्देश ;- डम्पी लेव्हलच्या साह्याने काटूर काढ़ने
* साहित्य ;- डम्पी लेव्हल, वही पेन
* कृती ;- सर्वात प्रथम बंधाऱ्याच्या मध्य भागी खोलगट जागेत `स्टॅन्ड उभा करावा व स्टॅन्ड ची लेव्हल काढा
२) डम्पि लेव्हल या उपकरणाला असलेली दुर्बीण तीन पैकी दोन फूट स्क्रूना समांतर ठेवावी . त्या नंतर ते दोन्ही स्क्रू एकाच वेळी आत किंवा बाहेर फिरवून स्पिरिट लेव्हलमधील बुडबुडा बरोबर मध्यावर आणावा
३) त्यानंतर उरलेला तिसरा फूट स्क्रू ला दुर्बीण काटकोनात येईल अशा रीतीने फिरवावी . दुर्बीण स्क्रूवर आणल्यानतंर हा तिसरा फूट स्क्रू योग्य रीतीने आत किंवा बाहेर फिरवून बुडबुडा मध्यावर आणावा .
४) दुर्बीनीत मध्यभागी तारेची फुली असते . याच्या वर व खाली दोन आडव्या रेषा असतात यांना स्टेडीय म्हणतात
* व्याख्या ;- समोच्च रेषा (कंटूर ) म्हणजे एका ठराविक ठिकाणापासून सारख्या उंचीवर असणाऱ्या ठिकाणांना जोडणारी रेषा होय
डम्पि लेव्हल वापरताना स्पिरिट लेव्हल मधील बुडबुडा मध्यभागी आहे किंवा नाही हे वेळोवेळी अवश्य पहा
* कौशल्ये ;- डम्पि लेव्हल स्टॅंडचा उपयोग करता येणे
२) दिशा मार्क करता येणे , बेअरिंग (कोण ) मोजता येणे
३) दुर्बिणीमधून स्टाफवरील रिडींग बरोबर वाचता येणे
४) कंटूर लाईन्स काढता येणे