प्रस्तावना:

डोम रीनोवेषन

प्रस्तावना :-

आम्ही डोममध्ये सर्व नवीन काहीतरी करण्याचा ठरवलेला प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमधून आश्रमातील विविध कार्य व क्रियाकलाप लोकांसमोर दिसून यावेत, असा आमचा उद्देश आहे. हे सादरीकरण साध्या पद्धतीने न करता, वारली चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विचार आहे, ज्यामुळे पारंपरिक कलात्मकता टिकून राहील आणि आधुनिकतेसह एक आगळावेगळा संगम साधता येईल.

सर्वे :-

डोममध्ये काय व कसे करायचे यासाठी प्रथम 3D डिझाईन तयार केले. त्यानंतर लागणारे साहित्य निश्चित करून गावात जाऊन आणले. जागेची पाहणी व मोजमाप करून सर्वे केला.

उद्देश :-

डोम रिनोवेशन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की आश्रमातील मुलांसाठी एक चहा पिण्याची जागा तसेच आरामात बसण्यासाठी योग्य ठिकाण तयार करणे. या जागेमुळे मुलांना एकत्र येऊन गप्पा मारता येतील, विश्रांती घेता येईल आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी एक अनुकूल वातावरण मिळेल.

साहित्य :-

1 स्क्रॅपर

2 पुट्टी

3 ट्रॅक्टर इमल्शन

4 प्रायमर

5 डिस्टेंपर

6 सिमेंट कलर

7 काळा ऑइल पेंट

8 सिमेंट कच

9 पॉलिश पेपर (सॉफ्ट व हार्ड)

कृती :-

बाहेरून रंग केला, आत वारली चित्रकला केली, खांबाला काळा ऑइल पेंट लावला. बाहेर भिंत बांधली, झाडांच्या फांद्या कापल्या, पाणी जाण्यास भोक पाडले आणि पन्हाळीसाठी हिरवा प्लास्टिक पाईप लावला.

निरीक्षण :-

बाहेरचा रंग कोणता वापरायचा आणि तो छान दिसेल का, आतला रंग कसा द्यायचा, वारली चित्रकला करावी का, घर कमी खर्चात टिकाऊ कसे करावे—हे सर्व विचार करून निरीक्षण केले.

निष्कर्ष :-

बाहेरच्या रंगासाठी असे रंग निवडावेत जे आकर्षक दिसतात आणि हवामानापासून टिकतात.

आतच्या भिंतींवर हलका रंग वापरावा आणि वारली चित्रकला करून पारंपरिक सौंदर्य जोपासावे.

घर कमी खर्चात टिकाऊ बनवण्यासाठी साहित्याची योग्य निवड, मोजमाप, आणि योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.

पाणी जाण्याची सोय आणि पन्हाळीसाठी प्लास्टिक पाईप यासारख्या सूक्ष्म बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे

भविष्यातील उपयोय :-

डोम रिनोवेशनमुळे मुलांना विश्रांती, गप्पा मारणे आणि एकत्र बसण्याची जागा मिळेल. तसेच या जागेचा उपयोग छोटे कार्यक्रम, अभ्यास किंवा क्रिएटिव्ह अ‍ॅॅॅक्टिव्हिटीजसाठि करता येतो

कॉस्टिंग

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1.डिस्टेंपर10 L140 L1400
2.ट्रॅक्टर इमल्शन [प्रायमर]10 L70 L700
3.पॉलिश पेपर10 L15150
4.रेडीमेड बाईंड1 L230230
5.ब्लॅक ऑईल पेंट1 L300300
6.सिमेंट कलर15 Kg30450
7.टर्पेंटाईन1 L120120
8.पुट्टी5 Kg50250
9.पीव्हीसी पाइप (हिरवा)22 F1363000
10.सिमेंट50 गोणी350350
11.कच70 चमेली8480
12.ब्रश830240
13.रोलर250100
14.सिमेंट कलर (विटकरी)3 Kg3090
15.रूळ15 चमेली9150
16.मजुरी  2000
   Total10010

टाईनी हाउस

प्रस्तावना :-

आजच्या वेगवान जीवनशैलीत व वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची कमतरता भासत आहे. मोठ्या घरांच्या तुलनेत लहान, किफायतशीर व पर्यावरणपूरक घरांची संकल्पना पुढे येत आहे. त्यालाच टायनी हाऊस असे म्हणतात.

या प्रकल्पामध्ये आम्ही १० फूट × १० फूट क्षेत्रफळाचे टायनी हाऊस डिझाइन केले आहे.

सर्वे :-

कमी खर्चात व कमी जागेत आवश्यक सोयी उपलब्ध करून देणारे घर म्हणजे टायनी हाऊस.
या प्रकल्पात आम्ही १०x१० फूट टायनी हाऊस डिझाईन केले आहे.

यात –

स्वयंपाकघर

हॉल

स्नानगृह व शौचालय

उद्देश :-

कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग करणे

कमी पैशात जास्त जागेचा वापर करणे.

स्वस्त व किफायतशीर घर उपलब्ध करून देणे.

किचन, हॉल व बाथरूम यांसारख्या मूलभूत सोयी समाविष्ट करणे.

पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम करणे.

ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या कमी करणे.

साहित्य :-

१.५ × १.५ इंच ट्यूब

सिलिंग शीट (PUC) – छतासाठी

भिंत शीट (सिमेंट शीट) – भिंतीसाठी

नट व बोल्ट – जॉईंट्स व जोडणीसाठी

सिमेंट प्लायवूड – मजल्यासाठी व आतील कामासाठी

बाथरूम साहित्य –

नळ (Tap)

कमोड (कमोड/शौचालय सीट)

बेसिन (हात धुण्याचे बेसिन)

काळी वायर 1.5 mm/2.5

हिरवी वायर 1.5mm/2.5

लाल वायर 1.5 mm/2.5

कृती :-

फ्रेम तयार करणे

१.५ x १.५ इंच ट्यूब वापरून चौकट (Frame) तयार करणे

नट-बोल्टच्या सहाय्याने जोडणी करणे

भिंती व छत बसवणे

भिंतींसाठी सिमेंट शीट लावणे

छतासाठी PUC शीट बसवणे

वायरिंग केली व बोर्ड भरले आणि, वायर साठी वायरिंग पाईप लावले.

नळ (Tap) बसवणे

कमोड (Toilet Seat) बसवणे

बेसिन (Wash Basin) बसवणे

निरीक्षण :-

टायनी हाऊस प्रकल्पामध्ये कमी जागेत व कमी खर्चात किचन, हॉल व बाथरूम या आवश्यक सोयी उपलब्ध झाल्या.
साहित्याचा योग्य वापर करून घर मजबूत, टिकाऊ व पर्यावरणपूरक बनले आहे.

निष्कर्ष :-

१०x१० फूट टायनी हाऊस कमी खर्चात, कमी जागेत व टिकाऊ साहित्य वापरून बांधता येते.
यामध्ये सर्व मूलभूत सुविधा मिळून हे घर किफायतशीर व उपयुक्त ठरते.

भविष्यातील उपयोय :-

टायनी हाऊस संकल्पना भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हे घर पोर्टेबल, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असल्याने विद्यार्थ्यांसाठी, प्रवाशांसाठी व लहान कुटुंबासाठी उपयोगी आहे

मी हे शिकलो:-

वायरिंग कसे करायचे ते शिकलो.

PUC सिल्लिंग लावायचं शिकलो.

स्टाईल्स बसवायला शिकलो.

प्लंबिंग शिकलो.

दरवाजा आणि खिडकीची फ्रेम बनवायला शिकलो.

पेंटिंग कसे करायचे ते शिकलो.

छत्रीप्रोजेट

प्रस्तावना :- पाऊस व उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये मानवाला संरक्षण देणारे साधन म्हणजे छत्री होय. छत्रीचा शोध प्राचीन काळी लागला असून आज ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्ट बनली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी तसेच उन्हापासून सावली मिळवण्यासाठी छत्रीचा वापर होतो. हलकी, सोपी व नेहमी उपलब्ध राहणारी ही वस्तू माणसाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते.

सर्व :– अनिल सरांनी चित्र दाखवले व त्याची माहिती सांगितली व छत्री च्या सर्व पार्ट चे माप सांगितले .

उदेश :– लोकांच्या दैनंदिन जीवनात सोय आणि आराम मिळवून देणे. कमी किमतीत सहज उपलब्ध होणारे हवामानापासून रक्षणाचे साधन. वेगवेगळ्या डिझाइन, रंग, ब्रँड यामुळे फॅशन आणि व्यक्तिमत्वाचा भाग म्हणूनही वापर. मोठ्या छत्र्या (शेडसारख्या) दुकानदार, स्टॉल लावणारे वापरतात – ग्राहकांना उन्हा/पावसापासून वाचवण्यासाठी.

साहित्य:- २५ x २५ बॉक्स पाईप ५ नग , ४० x ४० १ नग ,१०० x १०० १ नग ,२५ x ५ १ नग , ४० x ५ पट्टी १ नग ,कलर १ लिटर , नट बोल्ट १० mm ३ किलो

कृती :

१ , cutting ( कटिंग ) – आवश्यक मोज मापानुसार कच्चामाल अचूक यंत्राद्वारे कट करणे .

२ . welding ( वेल्डिंग ) – कापलेल्या पार्ट्स योग्य कोण व मापत वेल्डिंगद्वारे जोडणे

3.polishing (पॉलिशिंग ) -पृष्ठभागाला आकर्षक व चमकदार फिनिशिंग देण्यासाठी पॉलिसी

4.powder coating (पावडर कोटिंग )- धातूचे संरक्षण व सुंदर लूप देण्यासाठी पावडर कोटिंग प्रक्रिया

5. Assembling (असेंबलींग )–सर्व तयार पार्ट्स एकत्र करून अंतिम उत्पादन तयार करणे

6.inspection (तपासणी )- तयार उत्पादनाची मोजमापे व गुणवत्ता तपासणी

मी हे शिकलो :- आर्क वेल्डिंग मारायला शिकलो co2 वेल्डिंग मारायला शिकलो, पावडर कोटिंग करायला शिकलो ग्राइंडिंग करायला शिकलो

निरीक्षण :– रचना ,उपयोगिता ,गुणवत्ता ,डिझाईन ,किंमत व टिकाऊ ,अडचणी .

निष्कर्ष :- छत्री पावसापासून व उन्हापासून संरक्षण करते. फोल्डिंग छत्र्या हलक्या व सोयीच्या असतात. जास्त टिकाऊ छत्र्या किंचित महाग असतात.

भविष्यातील उपयोग :– पावसापासून आणि उन्हापासून बचाव .

क्र.मालाचे नावएकूण मालादरएकूण किंमत
11*1 ट्यूब60 F352100
240*5 पट्टी5 F30150
340*40 ट्यूब12 F45540
4100*100 ट्यूब13 F1501950
525*5 पटी6 F25150
64*4 प्लेट2150300
76*6 प्लेट2250500
830/10 नटबोल्ट2 Kg100200
9वाईअर500 G5050
10ब्रश250100
11फ्लॅन्स2150300
12रोलर250100
13गॉलीज पेपर51575
14रेडऑक्साईड1 L230230
15ऑइल पेंट ब्लॅक1 L300300
16सिमेंट1 गोणी350350
17ब्रश70 चमेली8480
18खडी15 चमेली9150
19रोल4100400
20थिनर0.5 L10050
21पावडर कोटिंग800
22मजुरी2318
Total11593

शेड

प्रस्तावना :

शेतीत तसेच बागायतीत रोपवाटिकेचे महत्त्व अतिशय मोठे आहे. निरोगी आणि दर्जेदार रोपे तयार करण्यासाठी अनुकूल वातावरणाची आवश्यकता असते. या उद्देशाने उभारले जाणारे शेड म्हणजेच शेडनेट हाऊस होय. शेडनेट हाऊसमध्ये सूर्यप्रकाश, उष्णता, पाऊस आणि वारा यांचा परिणाम नियंत्रित करता येतो. यामुळे रोपांची वाढ योग्य प्रकारे होते. यामध्ये हिरव्या, काळ्या किंवा पांढऱ्या जाळीचे वापर करून आवश्यकतेनुसार प्रकाश नियंत्रित केला जातो.

सर्व :जाधव सर आनि दोन मुल आम्ही गेलो व तेथे तो मालक आला मंग ती नैसर्गिक बघितले

उदेशउदेश: शेड नर्सरी एक ऐसी जगह होती है जहाँ पौधों के छोटे–छोटे रोप (Seedlings / Saplings) तैयार किए जाते हैं।
इसमें ऊपर शेड (छाया) बनाई जाती है ताकि पौधे तेज धूप, बारिश या ठंड से सुरक्षित रहें

साहित्य: वेलडिंग मशीन, dreel मशिन, ग्रेडर, सेफ्टी.

:कृती

1 cutting ( कटिंग ) – आवश्यक मोज मापानुसार कच्चामाल अचूक यंत्राद्वारे कट करणे .

2 welding ( वेल्डिंग ) – कापलेल्या पार्ट्स योग्य कोण व मापत वेल्डिंगद्वारे जोडणे

3 polishing (पॉलिशिंग ) -पृष्ठभागाला आकर्षक व चमकदार फिनिशिंग देण्यासाठी पॉलिसी

4 powder coating (पावडर कोटिंग )- धातूचे संरक्षण व सुंदर लूप देण्यासाठी पावडर कोटिंग प्रक्रिया

5 Assembling (असेंबलींग )–सर्व तयार पार्ट्स एकत्र करून अंतिम उत्पादन तयार करणे

6 inspection (तपासणी )- तयार उत्पादनाची मोजमापे व गुणवत्ता तपासणी

मी हे शिकलो :जाळी मारने, जाळी ओढने , वेलडिंग मारने.

निरीक्षण : रचना, ऊपयोग डिजाइन, किंमत व टिकाऊ अडचनी

निरीक्षण :शेड नेट नर्सरी पौध तैयार करने की एक प्रभावी और सुरक्षित पद्धति है, जिसमें पौधों को नियंत्रित धूप, तापमान और नमी मिलती है। इससे बीजों का अंकुरण बेहतर होता है, रोप मजबूत बनते हैं और पौधों की मृत्यु दर कम हो जाती है

भविष्यातील उपयोग :पावसापासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी आनि ऊसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी

इलेक्ट्रिक लॅब रिनोवेशन

प्रस्तावना-:

या प्रयोगात इलेक्ट्रिकल लॅबमध्ये वापरले जाणारे विविध उपकरणे, साधने व साहित्य यांचा अभ्यास केला. घरगुती उपकरणे जसे की सोलर पॅनल, एक्वा फिल्टर, फॅन, मोटर इत्यादींचे कार्य समजून घेतले तसेच AC आणि DC करंट यातील फरकही शिकला. लॅबची साफसफाई व वस्तूंची योग्य रचना केली.

सर्वे-:

गावामध्ये जाऊन विविध इलेक्ट्रिकल साहित्य व उपकरणांची उपलब्धता तपासली. स्थानिक बाजारातून लागणारे साहित्य आणले. लॅबमध्ये वापरण्यास योग्य वस्तू निवडल्या.

उद्देश-:

इलेक्ट्रिकल उपकरणांचे कार्य समजणे

AC व DC करंट यातील फरक जाणून घेणे

इलेक्ट्रिकल लॅबमधील उपकरणांचे योग्य वापर शिकणे

व्यवहार्य अनुभव मिळवणे

साहित्य-:

4×8 चे दोन प्लायवुड

राऊंड पट्टी (१ इंची) – 200 फूट

मास्किंग टेप

निळा ऑइल पेंट, थिनर

पांढरा वुड प्रायमर

मिक्सर, सिलिंग फॅन, टेबल फॅन

सोलर पॅनल, एक्वा फिल्टर, इस्त्री, इंडक्शन स्टोव

फिटर मोटर (1 HP)

ड्रिल मशीन, हातोडी, टाय, वायर

35×5 अँगल, 30×5 तुकडे

इलेक्ट्रिकल लॅबची साधने

कृती-:

गावात जाऊन सर्वे करून सर्व साहित्य आणले.

4×8 च्या प्लायवुडवर व 2×4 च्या बोर्डवर एक्वा फिल्टर बसवले.

35×5 च्या अँगलला खाचा मारून भिंतीवर प्लायवुड बसवले.

निळा ऑइल पेंट, थिनर व प्रायमर वापरून रंगकाम केले.

ड्रिल मशीन, हातोडी, टाय व इतर साधनांचा वापर केला.

AC (अल्टरनेटिव्ह करंट) व DC (डायरेक्ट करंट) यांचा फरक शिकवला.

घरामध्ये 240 वॅट करंट वापरला जातो हे समजले.इलेक्ट्रिकल लॅब स्वच्छ करून कपाटांची रचना बदलली.

निरीक्षण-:

सर्व उपकरणे व्यवस्थित कार्यरत होती.

AC व DC करंट मधील फरक स्पष्ट झाला.

प्लायवुड बसवताना मोजमाप अचूक ठेवणे महत्त्वाचे आहे हे लक्षात आले.

निष्कर्ष- :

या कामातून इलेक्ट्रिकल लॅबमधील कामाची सखोल माहिती मिळाली. उपकरणांची बसवणी, वायरिंग, रंगकाम व उपकरणांची कार्यप्रणाली समजली.

भविष्यातील उपयोग- :

घरगुती व औद्योगिक वायरिंगसाठी उपयुक्त ज्ञान मिळाले.

इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठी मदत होईल.

सोलर सिस्टिम्स व करंट सिस्टीम्सचे व्यवहार्य ज्ञान मिळाले.

मी हे शिकलो-:

AC व DC करंट मधील फरक

उपकरणे बसवण्याची व रंगकामाची पद्धत

इलेक्ट्रिकल लॅबची निगा राखण्याचे महत्त्व

व्यवहार्य कौशल्य व सुरक्षितता उपाय

कॉस्टिंग :

अ . क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
प्लावूड8*4= 260 f३८४०
हाप राऊंडर पट्टी175 f१०१७५०
चुका १*१७५०० g२५१२५
फेव्हीकॉल२५० ग्राम१२०१२०
ब्ल्यू ऑइल पॅन्ट१ लीटर४७४४७४
ब. आर. वाईट प्रायमर१ लीटर५०८५०८
मास्किंग टेप4 टेप२५१००
Trugrip UR TRA८०० G.२५५२२०
पिवळा ऑइल पेंट५०० मी . लीटर२७०१३५
१०मजुरी१८१८
११एकूण९०९०

गेस्ट हाउसचे बांधकाम

प्रस्तावना :

गेस्ट हाऊस बांधकाम हा एक महत्वाचा प्रकल्प असून त्यामध्ये जागेची आखणी, विटांची मांडणी, भिंतींची उंची, खिडक्या–दरवाज्यांची जागा .या सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करावी लागते. या प्रकल्पाद्वारे आम्ही प्रत्यक्ष बांधकाम कसे करायचे, कोणते साधन कसे वापरायचे आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता कशी राखायची हे शिकून घेतले.

र्वे :

बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेचा सखोल सर्वे करण्यात आला.

जागेचे मोजमाप घेण्यात आले.

गेस्ट हाउसची दिशा, वारा–तापमान याचा विचार करण्यात आला.

  या सर्वेच्या आधारे अंतिम प्लॅन आणि मोजमाप निश्चित करून चौकट तयार करण्यात आली.

उद्देश :

गेस्ट हाऊसचा बांधकाम कार्य प्रत्यक्ष अनुभवणे

मार्किंग, प्लॅनिंग आणि मोजमाप यांचा योग्य वापर शिकणे

विटा लावणे, भिंत उचलणे, प्लॅस्टर करणे या मूलभूत टप्प्यांवर कौशल्य मिळवणे

बांधकामासाठी आवश्यक उपकरणांची ओळख करणे

सुरक्षित आणि दर्जेदार बांधकाम कसे करावे हे जाणून घेणे

साहित्य :

ACC  

केमिकल 

थापी , घमेल

कळंबा स्पिरिट

लाईन दोरी

फक्की, मोजपट्टी, हातोडा इत्यादी

कृती :

सर्वप्रथम गेस्ट हाऊसचा संपूर्ण प्लॅन काढण्यात आला. त्यामध्ये भिंतींची रचना, दारे-खिडक्या, बाथरूमची जागा इत्यादींचा समावेश होता.प्लॅननुसार जागेवर फक्कीने अचूक आखणी (Marking) करण्यात आली. गेस्ट हाऊसच्या बेसलाइनसाठी मजुरांकडून विटांची सरळ लाईन लावण्यात आली.

कळंबा स्पिरिट व लाईन दोरी वापरून भिंती सरळ आणि समतोल ठेवत विटा रचण्यात आल्या.ज्या जागी खिडक्या आणि दारे बसवायची होती, तेथे आवश्यक जागा सोडण्यात आली.भिंती निर्धारित उंचीपर्यंत उचलण्यात आल्या.

कॉस्टिंग :

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1ACC  1600801,28,000
2केमिकल 2350011,500
3मजुरी  [25%]34,875
total174,375

निरीक्षण :

मार्किंग अचूक झाल्यास संपूर्ण बांधकाम व्यवस्थित होते.

भिंतींची उंची वाढवताना लाईन दोरी अत्यंत आवश्यक ठरली.

कळंबा स्पिरिटमुळे भिंत एकदम सरळ व संतुलित राहिली.

ग्रीलच्या आकारानुसार वेल्डिंगची गुणवत्ता बदलते हे लक्षात आले.

प्लॅस्टरची फिनिशिंग भिंतींच्या दिसण्यावर परिणाम करते.

 निष्कर्ष :

गेस्ट हाऊस बांधकाम प्रक्रियेमुळे आम्हाला प्रत्यक्ष बांधकामाची सर्व टप्प्यांमधील अचूकता आणि कौशल्य शिकायला मिळाले. मार्किंग, विटांची रचना, लेव्हल तपासणे, या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या प्रकल्पामुळे आम्ही बांधकामाचे तांत्रिक ज्ञान तसेच कौशल्य आत्मसात केले.

भविष्यातील उपयोग :

गवंडी आणि बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी अनुभव उपयुक्त

मोठ्या इमारती, घर, शेड किंवा ऑफिस बांधकामासाठी बेसिक कौशल्य विकसित होते

ग्रील बनवणे, प्लॅस्टर करणे याची स्वतंत्र कामेही करू शकतो

बांधकामातील अचूकता व सुरक्षा याबद्दल चांगले ज्ञान मिळाले

कॉट तयार करणे

प्रस्तावना :

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक असा लोखंडी कोट (Cot) तयार करणे हा होता. कोटचे डिझाईन, फ्रेम तयार करणे, ग्राइंडिंग, वेल्डिंग, रेडऑक्साईड आणि पेंटिंग अशा सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष करून मेटल फॅब्रिकेशनचे मूलभूत कौशल्य आत्मसात करण्याचा हेतू या प्रकल्पातून साध्य केला.

र्वे :

बाजारात उपलब्ध मेटल ट्यूब्सची जाडी, प्रकार आणि गुणवत्ता

1×2 स्क्वेअर ट्यूब व 1×1 सपोर्ट ट्यूबची मजबुती

वेल्डिंग व ग्राइंडिंगसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता

रेडॉक्साईड आणि ऑइल पेंटच, टिकाऊपणा आणि किंमत

उद्देश:

या कॉट तयार करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश असा होता की गेस्ट हाऊससाठी वापरता येईल असा मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी लोखंडी कॉट तयार करणे.
गेस्ट हाऊस मध्ये अधिक वापर व वजन सहन करणारे फर्निचर आवश्यक असते, त्यामुळे लोखंडी स्क्वेअर ट्यूबचा वापर करून मजबुतीला प्राधान्य देण्यात आले.
गेस्ट हाऊसच्या सोयीसाठी दीर्घकाळ टिकणारे, कमी देखभालीचे आणि सुरक्षित फर्निचर तयार करणे हाच या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.

साहित्य:

1” x 2” स्क्वेअर ट्यूब

1” x 1” स्क्वेअर ट्यूब

0.75″ x 0.75″ स्क्वेअर ट्यूब

वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग डिस्क

पॉलिश व्हील

रेडऑक्साईड प्रायमर

काळा ऑइल पेंट

पॉलिश पेपर

लंबी

कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन

कृती:

सर्वप्रथम कोटचे पूर्ण डिझाईन तयार करण्यात आले.

माप, फ्रेमचे स्वरूप आणि सपोर्टचे स्थान निश्चित केले.

1×2 स्क्वेअर ट्यूब वापरून वरची मुख्य फ्रेम तयार केली.

कोपऱ्यांवर अचूक जॉइंट तयार करून वेल्डिंग केले.

फ्रेमच्या मजबुतीसाठी 1×1 च्या एकूण 2 सपोर्ट तुकड्या बसवल्या.

सर्व तुकडे समान अंतरावर बसवण्यात आले.संपूर्ण फ्रेम ग्राइंडिंग करून वेल्डिंग जॉइंट्स स्वच्छ आणि गुळगुळीत केले.

15 इंच लांबीचे 1.5×1.5 च्या ट्यूबचे पाय बसवले.

पायांना वेल्डिंग करून नंतर ग्राइंडिंग केले

.संपूर्ण कोटला पॉलिश व्हीलने पॉलिश केले.

फ्रेमला गंज रोखण्यासाठी रेडऑक्साईड लावला.

रेडऑक्साईड सुकल्यावर जोईंट लंबी लावली त्यानंतर पॉलिश पेपरने घासले.

शेवटी कोटला काळा ऑइल पेंट लावून अंतिम फिनिशिंग दिले.

आलेल्या अडचणी :

1×1 सपोर्ट तुकड्यांचे मोजमाप अचूक ठेवणे

वेल्डिंग करताना ट्यूब सरळ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागली

ग्राइंडिंग करताना सरफेस पूर्ण सपाट आणण्यासाठी जास्त वेळ लागला

रेडॉक्साईड सुकण्यास उशीर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया थोडी उशीर झाली

पाय (Legs) व फ्रेम एकाच लेव्हलवर आणणे आव्हानात्मक होते

कॉस्टिंग :

अ . क्रमालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
10.75 x 0.75 स्क्वेअर ट्यूब20′25500
21 x 2 स्क्वेअर ट्यूब360′3010,800
31 x 1स्क्वेअर ट्यूब100′353,500
41/2 x 1/2 स्क्वेअर ट्यूब100′404,000
5रॉड पुडा2400800
6कटींग व्हिल525125
7ग्रीडिंग व्हिल530150
8पॉलिश व्हिल330150
9कटींग व्हिल [14 in]1200200
10लंबी2 kg5001000
11प्रायमर2 L240480
12थीनर2 L120240
13काळा ऑईल पेंट2 L340680
14रोलर15050
15Electricity [10%]2,270
16मजुरी [15%]3,400
17total28,350

निरिक्षण :

वेल्डिंग व ग्राइंडिंगने कोटची मजबुती आणि फिनिशिंग उत्कृष्ट आली.

सर्व सपोर्ट तुकडे योग्य वापरल्यामुळे फ्रेमला मजबूत आधार मिळाला.

रेडऑक्साईडमुळे धातूचे गंजापासून संरक्षण झाले.

काळ्या पेंटमुळे कोट आकर्षक आणि टिकाऊ झाला.

निष्कर्ष :

या प्रकल्पातून मेटल फॅब्रिकेशनचे महत्त्वाचे कौशल्य — डिझाइनिंग, कटिंग, वेल्डिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंग यांचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून एक मजबूत व दर्जेदार लोखंडी कोट तयार करण्यात आला.

भविष्यातील उपयोग :

घरगुती व हॉस्टेल वापरासाठी टिकाऊ कोट

कस्टम फर्निचर डिझाईनसाठी आधारभूत कौशल्य

विविध आकारमानाचे लोखंडी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी तांत्रिक ज्ञान

कॉम्प्युटर बेसिक आणि डिजिटल टूल्स

१) प्रस्तावना

आजच्या डिजिटल युगात कॉम्प्युटर, इंटरनेट, AI टूल्स आणि ग्राफिक डिझाईन ही महत्त्वाची कौशल्ये आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रोजेक्ट मेकिंग किंवा दैनंदिन आयुष्यात यांचा वापर वाढत आहे. या प्रशिक्षणाद्वारे मी कॉम्प्युटरची मूलभूत माहिती, Windows ऑपरेशन्स, फाईल मॅनेजमेंट, MS Word, इंटरनेट, ईमेल, डिजिटल सेफ्टी तसेच Canva, PPT, ChatGPT, Ideogram, Leonardo आणि InVideo.AI सारखी प्रगत AI टूल्स वापरणे शिकलो.

२) उद्देश

या प्रशिक्षणाचे मुख्य उद्देश:

  • कॉम्प्युटरचे बेसिक भाग समजून घेणे
  • Windows 10/11 चे बेसिक ऑपरेशन शिकणे
  • फाईल व फोल्डर मॅनेजमेंटची सवय विकसित करणे
  • MS Word आणि WordPad मध्ये टायपिंग कौशल्य वाढवणे
  • इंटरनेट आणि ईमेलचा सुरक्षित वापर शिकणे
  • डिजिटल सेफ्टीचे नियम समजणे
  • Canva मध्ये पोस्टर, डिझाईन तयार करणे
  • PPT प्रेझेंटेशन तयार करणे
  • ChatGPT वापरून माहिती, कंटेंट तयार करणे
  • Ideogram, Leonardo आणि InVideo.AI सारख्या AI tools द्वारे लोगो, अ‍ॅनिमेशन व व्हिडीओ तयार करण्याची कौशल्ये शिकणे

३) कृती (मी काय काय शिकलो)

A) कॉम्प्युटर बेसिक कौशल्ये

  • CPU, Monitor, Mouse, Keyboard, SMPS, RAM, HDD/SSD ओळखणे
  • Windows On/Off, Restart, Sleep वापरणे
  • फोल्डर तयार करणे, Rename, Copy–Paste, Delete
  • Pen drive मध्ये फाईल कॉपी व सेव्ह करणे

B) MS Word / WordPad

  • मराठी आणि इंग्रजी टायपिंग
  • फॉन्ट, Bold, Italic, Underline वापरणे
  • फाईल Save आणि Edit करणे

C) कीबोर्ड शॉर्टकट्स

  • Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+S, Alt+Tab, Ctrl+A, Ctrl+Z

D) इंटरनेट स्किल्स

  • Browser वापरणे
  • Google Search
  • YouTube learning videos पाहणे

E) ईमेल स्किल्स

  • Gmail account तयार करणे
  • Email लिहिणे, Attach file, Send करणे

F) डिजिटल सेफ्टी

  • Strong Password तयार करणे
  • Safe Browsing
  • Fake मेसेज कसे ओळखायचे

G) Canva Skill

  • Canva वर पोस्टर तयार करणे
  • Templates वापरणे
  • Text, Icons, Images व Design arrangements
  • पोस्टर PDF/PNG मध्ये डाउनलोड करणे

H) PPT तयार करणे

  • PowerPoint मध्ये स्लाइड्स तयार करणे
  • Titles, Photos, Shapes आणि Design Themes वापरणे
  • Slide show आणि Presentation skills

I) ChatGPT वापरणे

  • माहिती मिळवणे
  • ब्लॉग, रिपोर्ट, PPT content बनवणे
  • Poster ideas आणि prompts
  • Study notes तयार करणे

J) AI Tools वापरणे

1. Ideogram.AI – Logo Design

  • टेक्स्ट प्रॉम्प्ट वापरून लोगो तयार करणे
  • वेगवेगळे स्टाइल, फॉन्ट आणि कलर कॉम्बिनेशन

2. Leonardo.AI – Animation / Image Creation

  • क्रिएटिव्ह इमेजेस
  • Animation शैलीचे सीन
  • Character design

3. InVideo.AI – Video Making

  • Script टाकून Auto Video तयार करणे
  • Template वापरून व्हिडीओ एडिट करणे
  • Background music आणि animations लावणे

4. Gamma. AI PPT generater

४) निरीक्षण (Training मधून मला जाणवलेली गोष्टी)

  • कॉम्प्युटर चालवणे जितके अवघड वाटते तितके नसते.
  • Keyboard shortcuts वापरल्याने कामाची गती वाढते.
  • Canva आणि AI tools मुळे डिझाईन करणे खूप सोपे होते.
  • ईमेल आणि इंटरनेट वापरताना सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे.
  • ChatGPT वापरल्याने माहिती मिळवणे आणि कंटेंट तयार करणे खूप सोपे झाले.
  • AI Tools भविष्यातील सर्वात मोठी गरज आहेत.

५) निष्कर्ष

या संपूर्ण प्रशिक्षणातून मला कॉम्प्युटरचे बेसिक ऑपरेशनपासून ते AI आधारित डिझाईन व कंटेंट क्रिएशनपर्यंत सर्व महत्त्वाची कौशल्ये मिळाली. ही कौशल्ये माझ्या शिक्षणात, प्रोजेक्ट कामात, ऑनलाईन शिकण्यात आणि भविष्यातील करिअरमध्ये खूप उपयुक्त ठरणार आहेत.
आता मी Computer Basic वापर, Internet Handling, Email, MS Word, Canva, PPT, ChatGPT आणि विविध AI Tools confidently वापरू शकतो.

टेबल


प्रस्तावना -:

स्वयंपूर्ण पद्धतीने मजबूत व टिकाऊ स्ट्रक्चर तयार करण्यासाठी लोखंडी ट्यूब, अँगल, प्लायवुड, स्टील पत्रा तसेच सन्माईका वापरून एक युनिट/फ्रेम तयार करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये कटिंग, वेल्डिंग, फिनिशिंग व पेंटिंग हे काम करण्यात आले.

उद्देश -:

वापरासाठी उपयुक्त व मजबूत स्ट्रक्चर तयार करणे.

लोखंडी काम, वेल्डिंग, फिनिशिंग आणि पेंटिंग या कौशल्यांचा सराव व प्रत्यक्ष अनुभव घेणे.

साहित्य -:

1.5 x 1.5 ची ट्यूब

35 x 5 चा अँगल

4 x 8 चा प्लायवुड

सन्माईका

पंचिंग जाळी

रेड ऑक्साइड

बॉटम पट्टी

ऑइल पेंट

4 x 8 चा स्टील पत्रा

स्क्रू 2.5 इंच

रोलर 2 इंच – 2 नग

ब्रश 2 इंच – 2 नग

14 इंच व्हील – 1 नग

ग्रॅण्डिंग व्हील – 5 नग

कटिंग व्हील – 10 नग

पॉलिश व्हील – 5 नग

वेल्डिंग रॉड – 1 पुडा

कृती -:

आवश्यक मोजमाप घेऊन 1.5×1.5 ट्यूब व 35×5 अँगल कट केले.

फ्रेमचा आकार बनवत वेल्डिंग करून स्ट्रक्चर तयार केले.

जॉइंट ग्रॅण्डिंग करून सपाट केले.

4×8 स्टील पत्रा फिट केला व पंचिंग जाळी लावली.

प्लायवुड व सन्माईका शीट आकारानुसार कापून बसवली.

रेड ऑक्साइड कोटिंग करून फिनिशिंग दिली.

नंतर ऑइल पेंट रोलर व ब्रशने लावले.

बॉटम पट्टी, व्हील व स्क्रू बसवून पूर्ण तयार केले.

शेवटी पॉलिश व्हीलने स्मूथ फिनिश केली.

कामवेळ
टिग वेल्डिंग4 तास
स्क्रू मारणे2 तास
प्लायवुड लावणे4 तास
वेल्डिंग16 तास
ड्रॉईंग2 तास
साहित्य आणले5 तास
मेजरमेंट घेणे3 तास
पार्ट कटिंग अँड वेल्डिंग18 तास
सन्माईक लावणे2 तास
पार्ट पॉलिशिंग अँड ग्राइंडिंग18 तास
कलर करणे8 तास
बेसिन बसवणे4 तास
पत्रा लावणे4 तास
एकूण80 तास

निरीक्षण -:

योग्य मोजमाप व कटिंग केल्यास स्ट्रक्चर अचूक व मजबूत होते.

रेड ऑक्साइड लावल्याने गंज रोखला जातो.

वेल्डिंग नंतर ग्रॅण्डिंग केल्यास फिनिशिंग आकर्षक मिळते.

व्हील बसवल्याने युनिट सहज हलवता येते.

निष्कर्ष- :

उत्तम नियोजन, योग्य साहित्य व कौशल्य वापरल्याने मजबूत आणि टिकाऊ स्ट्रक्चर तयार करता येते. फिनिशिंग व्यवस्थित केल्यास उत्पादनाचा दर्जा अधिक चांगला दिसतो.

मी हे शिकलो -:

मोजमाप घेणे, कटिंग आणि वेल्डिंगची योग्य पद्धत.

पेंट व फिनिशिंगचे महत्त्व.

औद्योगिक साहित्य वापर कौशल्य.

कामातील सुरक्षितता आणि गुणवत्ता नियंत्रण.

भविष्यातील उपयोग -:

घरगुती किंवा औद्योगिक वापरासाठी अशा प्रकारच्या युनिट्स/टेबल्स/रॅक तयार करता येतील.

कस्टम फर्निचर व्यवसायात उपयोग होऊ शकतो.

वेल्डिंग व फॅब्रिकेशन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.