दहा प्रकारच्या पानांपासुन केलेल्या अर्कास् दशपर्णी अर्क म्हणतात. दशपर्णी अर्क हे एक‌ भवुउपयोगी पर्यावरणपूरक कमी खर्चात तयार होणारे खीटकनाशक आहे.

① कडूलिंब

② करंजाचापाला

③ शिताफळाचा पाला

4)एरंडाचा पाला

⑤टनटनीचा पाला (घाणेरी)

6) पपई पनि ④

7)कापूसा पाला

8)निरगुडी चे पाने

9)गुळवेलाचे पाने

⑩ बेलाची पाने

कृती:- सर्वप्रथम दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो शेण मिक्स करायचे. 24 तासानंतर दहा प्रकारचा पाला त्यात ठेचून टाकावा. हे द्रावण सावलीमध्ये 30 ते 40 दिवस आंबवण्यासाठी ठेवावे. चाळीस दिवसानंतर द्रावण ढवळून त्याला वस्त्रने गाळून घ्यावे. गाळलेला अर्क सावलीत ठेवावा हा अर्क सहा महिन्याच्या महिन्यापर्यंत ठेवू शकतो. आणि त्याचा वापर करू शकतो.

*अर्धा लिटर अर्क प्रति पंप (15 लिटर पाणी-अर्धा लिटर अर्क)

१)दशपर्णी अर्क फवारल्यामुळे लहान अळ्या, रस शोषक कीड , किडींची अंडी यांचे निमूलन होते.

२) सर्व पिकांवर हा अर्क प्रभावी असल्याने रासायनिक कीटकनाशकावर खर्च करावा लागत नाही.

३) उग्र वासामुळे खिडकी पिकांमध्ये अंडी घालण्यापासून परावृत्त होतात.

४) मित्र किडींचे सर्वधन होऊ नैसर्गिक पद्धतीने किडनियंत्रण होते.